Halloween Costume ideas 2015

माणूस म्हणून जन्मलो तर माणुसकीने जगू या!


जगातील सर्वात हुशार प्राण्याला माणूस म्हटले जाते, परंतु काहीवेळा माणसाची रानटी प्राण्यांपेक्षाही क्रूरता पाहिली जाते, ज्यामुळे माणसाला माणूस म्हणून घ्यायची लाज वाटते. मानव या शब्दापासून मानवता आणि माणूस या पासून माणुसकी शब्द निर्माण झाला आहे, परंतु आताच्या आधुनिक काळात मानवी गुणांमध्ये बदल होत आहे, जे चुकीचे आहे. मनुष्य जगात धनाने किंवा पदाने कितीही मोठा असला तरी, पण त्याच्यात मानवी गुण नसतील तर त्याला माणूस म्हणणे व्यर्थ आहे. सहानुभूती, उत्स्फूर्तता, अंतर्ज्ञान, जबाबदार, दयाळूपणा, आत्मबोध, प्रामाणिकपणा, धैर्य, आत्म-जागरूकता, वचनबद्धता, सामाजिकता, परोपकार, सद्गुण चारित्र्य, सर्जनशीलता, विश्वासार्हता, दृढनिश्चय, वक्तृत्व, इच्छाशक्ती, औदार्य, स्वच्छता, शिस्त, नम्रता, परिपक्वता, आशावाद, सकारात्मकता, विवेक, संस्कार, कारागिरी, कर्तव्यदक्ष, आदर भाव, संवेदनशीलता, एकता, स्वाभिमान, सत्यता, ध्येयाभिमुख, सहायक, वस्तुनिष्ठता हे गुण फक्त माणसात असतात. मानवता ही सर्वात मौल्यवान आहे, तिचे रक्षण करणे हे प्रत्येक जागरूक व्यक्तीचे सर्वोच्च कर्तव्य आहे. 

खोटेपणा, कपट, द्वेष, स्वार्थ, लोभ, भेदभाव, भेसळ, व्यसन, चारित्र्यहीन, बेजबाबदारपणा, अत्याचार पणा, फसवेपणा, बळजबरी, आळशीपणा, धूर्तपणा, बोलण्यात व कामात फरक, अशांत, रागीट, अभिमान, अहंकार, अनादर, दुर्व्यव्हार सारखे दुर्गुण अमानवी लोकांचे आहेत. असे लोक स्वतःच्या फायद्यासाठी दुस-यांचे नुकसान करण्यास कधीच कमी पडत नाहीत आणि नियम व संस्काराला झुगारून समाजाला कलंकित करण्यास गुन्ह्यांना जन्म देतात. आज सर्वत्र शोर, प्रदूषण, संसाधनांचे अति वापर, ताणतणाव, त्रास आणि समस्यांचे जाळे आहे, तसेच गरिबी, भूक, आर्थिक विषमता, बेरोजगारी, भ्रष्टाचार सातत्याने वाढत आहे. लोकांच्या दु:खावर हसणे आणि आनंदावर इर्षा करणे ही आजकाल एक सवय झाली आहे, अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करण्याऐवजी व्हिडिओ बनवून त्यांचा छळ केला जातो. अशा परिस्थितीत समाजाचा समतोल सतत बिघडतो, ज्यामुळे समाज अधोगतीकडे जातो. आज वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रे सतत मानवी विध्वंसक बातम्यांनी भरलेली असतात, विनाकारण मोठ-मोठ्या घटना घडवून आणल्या जातात, सतत असच वाटतं. घटनांना जबाबदार असणारी व्यक्ती थेट हात वर करून स्वतःला निर्दोष म्हणून दुसऱ्यांवर दोष लावतो. ज्या माणसाला माणुसकीचं भान नाही त्याला स्वतःला शहाणा म्हणण्याचा अधिकार नाही. 

१९ ऑगस्ट हा जागतिक मानवतावादी दिन म्हणून साजरा केला जातो, जगभरातील संघर्षात असलेल्या नागरिकांच्या दुर्दशेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख करून देण्याची वेळ आहे, ज्यांनी संकटामुळे प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. दरवर्षी या विशेष दिवशी गरजूंना मदत करण्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या शूर मानवांचा  सन्मान केला जातो. आज २०२२ मध्ये, जगभरातील ३०३ दशलक्ष लोकांना युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या त्रासामुळे मानवतावादी मदतीची गरज आहे.

सर्व धर्म आपल्याला फक्त सद्भावना, एकता, प्रेम, संस्कार आणि चांगले आचरण शिकवतात, पण स्वार्थी लोक आपापल्या परीने भेद करू लागतात. संपूर्ण जगात मानवतेपेक्षा महत्त्वाचे दुसरे काहीही नाही. प्रत्येक माणसामध्ये परोपकाराची भावना असली पाहिजे, जेवढी मदत करता येईल तेवढी मदत केली पाहिजे. माणूस निघून जातो, पण त्याची माणुसकी कायम लोकांच्या हृदयात जिवंत असते. स्वत:च्या फायद्यासाठी शिफारस करून, गोरगरिबांचे हक्क मारून, त्यांच्यावर अत्याचार करून, भेसळ द्वारे निरपराधांना विष देऊन, भेदभाव करून, दबाव टाकून, भ्रष्टाचार करून, लाचारी पत्करून अमानुषाचे जीवन जगणे हे काही जगणे नाही. जे व्यवहार आपल्याला स्वतःसाठी आवडत नाही ते इतरांशी कधीही करू नका. आपण स्वत: सक्षम होऊ शकत नाही, म्हणून आपण इतरांना दाबून जगतो, परंतु हे जीवन माणुसकीचे नाही. आज प्रत्येकजण फक्त पैशाच्या मागे धावताना दिसतो, प्रत्येकाला लवकरच मोठे व्हायचे आहे, मग तो वाम मार्ग असो तरी हरकत नाही, असे विचार झाले आहेत. आज माणसाची ओळख पैसा ठरवतो, माणुसकी नाही, असे का?. निस्वार्थी मदत ही आयुष्यातली मोठी संपत्ती आहे, आपण त्या लायक झालो आहोत की कुणाचा तरी उपयोगी पडू शकतो. रडणाऱ्या चेहऱ्यावर हसू आणणे ही खूप मोठी गोष्ट आहे, तुम्ही पैशाने सर्व वस्तू विकत घेऊ शकता, पण तुम्ही कधीही मनाची शांतता विकत घेऊ शकत नाही, शांतता फक्त चांगल्या कामाने, माणुसकीनेच मिळते, जी तुम्ही नि:स्वार्थपणे असहाय्य लोकांना, पर्यावरण, प्राणी, पक्ष्यांना मदत केल्याने मिळते. जगाकडून काय मिळालं? असा विचार करण्यापेक्षा जगाला चांगले बनवण्यासाठी आपण आपले कार्य करीत रहावे. जर तुम्ही लोकांना मदत करत असाल तर कृपया कधीही लोकांना दाखवू नका, खोटा देखावा करू नका, चांगली कामे करा आणि विसरून जा. थोर समाजसुधारक आणि क्रांतिकारानी ही स्वार्थी होऊन स्वतःचा विचार केला असता तर आजही आपण कुप्रथेमध्ये अडकलेल्या गुलामगिरीचे जीवन जगत असतो. माणुसकीची ज्योत पेटवा, मतभेद विसरून जा. माणूस म्हणून जन्माला आलो तर माणुसकीने जगू या, प्रेम शांती सद्भाव पसरवू या.

- डॉ. प्रितम भी. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget