Halloween Costume ideas 2015

लेखक बुचकळ्यात पडून समाजाकडे पाहतो आहे


सत्याचा उच्चार करणं, उच्चरवाने सत्याचा उद्घोष करणं ही लेखकाची भूमिका असते, धर्मही असतो, कर्तव्यदेखील असतं. तो बोलेल, कदाचित उद्या. आणि सत्य बोलण्याचा धर्म स्वीकारणारे आरसेदेखील तडजोड न करता सत्यच सांगत आहेत.

-भारत सासणे, संमेलनाध्यक्ष. (भाग-2)


आजच्या मराठी साहित्याला सर्वसामान्य माणसाच्या जगण्याबाबत काहीएक करुणा वाटते काय, हा जुनाच प्रश्न आहे. या प्रश्नाला अजूनही नकारार्थी उत्तर द्यावं लागतं. उर्दूमधल्या ‘सआदत हसन मंटो’ने अनेक वर्षांपूर्वीच उर्दू कथेला विलक्षण उंचीवर नेऊन उर्दू कथेला मानवी चेहरा दिला. वेश्या, हमाल, डोअरकीपर्स, टांगेवाले, रस्त्यावर अंगमेहनतीची कामं करून जगणारे, अशांच्या जीवन व्यवहाराबाबत विलक्षण करुणा व आस्था मंटोंच्या कथांमधून प्रकट झाली. मराठी कथेला अद्यापही एखादा मंटो मिळालेला नाही.

साहित्यांतर्गत काही भाषेचे प्रश्न आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे. कपडयावरून माणसं ओळखण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून चर्चा केली जात असली तरी भाषेवरून माणसांची ओळख पटवण्याचा खेळ जुन्या संहितेमध्ये आढळतो. अभिजन कोण तर अभिजात भाषा बोलतात ते, आणि अभिजात भाषा कोणती तर अभिजन बोलतात ती, असा उपहास पाणिनीच्या सूत्रपाठात नोंदविला आहेच. विद्वानांनी निवाडा दिला नसला तरी  ‘संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे’ असा निवाडा राजकीय पक्षाचे पदाधिकारी देतात तेव्हा साहित्याला चिंता वाटली पाहिजे. भाषेवरून माणसांची ओळख कशी करणार? पाली इत्यादी प्राचीन भाषांचं काय करणार? उर्दू ही मुसलमानांची भाषा नसून ती भारतीय भाषा आहे हे कोण सांगणार?

संविधानाला अभिप्रेत असलेला भारत घडवला जातो आहे किंवा नाही याबाबत मराठी साहित्य बोलताना आढळत नाही. आता तर संविधानच बदलण्याची भाषा सुरू आहे. मराठी साहित्यांतर्गत या घटनेचे पडसाद बहुधा पडलेले नाहीत.

खरं आणि खोटं लेखकाला ‘आंदोलन-जीवी बुद्धिवाद्यां’कडून एक गुप्त वार्ता समजली आहे आणि त्याची छाती धडधडायला लागली आहे. त्याने ऐकलं आहे की, ‘ ढर्हीेीसहींहश श्रेेज्ञळपस सश्ररीी’ या पुस्तकाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता देण्याचं चाललं आहे. लेखक बुचकळयात पडतो आहे आणि या मागचं कारण बुद्धिवाद्याला विचारतो आहे. बुद्धिवादी दबल्या आवाजात सांगतो की, चार्ल्स लुटविज् याने ‘लेविज् कॅरॉल’ या नावाने सन 1871 मध्ये ही कादंबरी लिहिली. लेखकाला ते थोडं माहीत असतं. तो म्हणतो की, ही तर बालांसाठी लिहिलेली कादंबरी आहे. दबल्या आवाजात पुन्हा उत्तर मिळतं की, नाहीतरी सध्या समाज बालबुद्धी होत चाललेला आहे. या कादंबरीतली अ‍ॅलिस नावाची बालनायिका आरशाच्या आतमध्ये प्रवेश करते. आरशाचं जग उलटं असतं. जे डावे ते उजवे दिसतात, जे उजवे ते डावे दिसतात. आंदोलनकारी राष्ट्रद्रोही दिसतात. सत्याचं असत्य होतं.

असत्याचं सत्य होतं. भ्रमाला वास्तव मानलं जातं. वास्तवाला स्वप्न मानलं जातं. जे काही दाखवलं जातं आहे ते खरं, असं मानणाऱ्या आणि संमोहित झालेल्या जनतेसाठी हाच ग्रंथ ‘राष्ट्रीय ग्रंथ’! बुद्धिवादी असं सांगतो की, या कादंबरीचं सार ‘झश्ररूुळींहींहशीशश्ररींळेपीहळि लशीुंशशपीोशींहळपस रपव पेींहळपस’ तसंच ‘णपीशरश्रुेीश्रवेष ळश्रश्रेसळलरश्र लशहर्रींर्ळेीी’ असं आहे. म्हणजेच फॅन्टसीच्या जागी वास्तव आणि वास्तवाच्या जागी फॅन्टसी. त्यातून सामान्य जनतेच्या मनाशी केलेला, जनतेच्या बुद्धीशी केलेला हा खेळच. ते ऐकून लेखक आणखीनच खचून जातो आहे. हताश होतो आहे. स्वत:शीच, कुजबुजत्या स्वरात म्हणतो आहे, ‘म्हणजे ही भ्रमयुगाची सुरुवात तर नाही?’

लेखक पाहतो लेखक बघतो आहे. समजून घेतो आहे. त्याला जाणवतं आहे. तो सहकंपित होतो आहे. भोवताल त्याला अस्वस्थ करतं आहे. लेखक चिंता वाहतो. तो सामान्य माणसाच्या एकूण फसवणुकीकडे पाहतो. बुद्धिवाद्यांची आणि बुद्धिजीवींची आणि परिणामत: बुद्धिवादाची होणारी टिंगल लेखक पाहतो आहे. ‘हार्वर्ड युनिव्हर्सिटी’ आणि ‘हार्डवर्क’ यावर केलेली निर्बुद्ध कोटीदेखील त्यांनी ऐकली-पाहिली आहे. सरस्वतीचा अपमान आणि लक्ष्मीचं पूजन तो पाहतो आहे. पैसे मोजून मोजून हाताला घट्टे पडतात आणि त्यामुळे हळुवार स्पर्श समजेनासा होतो, तसं काहीसं तुमचं, माझं, समाजाचं आणि राज्यकर्त्यांचं झालं आहे का, असं लेखक स्वत:ला विचारतो आहे. हताश बुद्धिवाद्यांची स्थलांतरं आणि त्यांचं मौनात जाणं तो पाहतो आहे.

एक देश, एक भाषा, एक पुस्तक, एक संस्कृती असं काहीसं कोणीतरी म्हणतं आहे. लेखकाला यात ‘मेथड इन मॅडनेस’चा वास येतो आहे. पण हा केवळ मॅडनेस नाहीए. विचारपूर्वक केलेलं चिथावणीखोर विधानदेखील आहे. मुस्लीम आणि ख्रिश्चन संस्कृती अस्तित्वात नाही, ते धर्मही नाहीत, असलेच तर ‘पंथ’ आहेत असंही हा कोणीतरी म्हणतो आहे. ऐकून चकित होणारे लोक संस्कृतीची व्याख्या वगैरे शोधू लागले आहेत.

लेखक व्याख्या इत्यादीच्या घोटाळयात पडत नाही. त्याला बगलेमधली लपवलेली सुरी नेमकी दिसते आहे. लेखक बुचकळयात पडून समाजाकडे पाहतो आहे. समाजात विभाजनवादी निर्थक, पण अनर्थकारी, उत्तेजना वाढवणारा खेळ मांडला जातोय. आता, त्या पाठोपाठ कुठल्याशा सिनेमाचं समर्थनसुद्धा करण्यात येतं आहे. आता त्यामुळे, सिनेमाही ‘तुमचा’ आणि ‘आमचा’ झाला. कला विभाजित झाली. उपद्रव आणि उपद्रव. उन्माद आणि उन्माद.

जनतेच्या भोळया मनाशी चालवलेला हा खेळ लेखक पाहतो आहे. माणसांचं विभाजन होताना पाहतो आहे आणि विद्वेषाचं गणितही मांडलेलं पाहतो आहे. कोणीतरी म्हणतं आहे की, स्वातंत्र्य भिकेत मिळालंय. भिकेत मिळालं? म्हणजे स्वातंत्र्यसेनानी काय भीक मागत होते? पण निर्बुद्ध लोकांकडून स्वातंत्र्याचा अपमान होतो आहे हे आपण उघडया डोळयाने पाहतो आहोत. काही कथित साधू मुसलमानांचं शिरकाण करायचं म्हणतायत. ते असंही म्हणतायत की भारतीय संविधानावर विश्वास ठेवणाऱ्यांचा आणि त्यांच्या मुलांचाही मृत्यू होणार आहे. असा हास्यास्पद शाप देणारे हे साधू आहेत?

लेखक एकदा गावी गेला होता. एका बडया घराच्या अंगणात बांधलेली कुत्री त्याच्यावर अकारण भुंकू लागली. लेखकाने घरमालकाकडे तक्रार केली. त्याला म्हटलं की, तुमचे कुत्रे आमच्यावर भुंकत आहेत. घराचा मालक म्हणाला, आम्ही काही त्या कुत्र्यांना भुंकायला सांगितलेलं नाही. लेखक म्हणाला, पण तुम्ही त्यांना भुंकू नका असंदेखील सांगितलेलं नाही.

लेखक पाहतो की, सरस्वतीचे उपासक दु:खी होतायत आणि लक्ष्मीची उद्धट उपासना चाललीय. अपवाद वगळता सर्वत्र शांतता आहे. सर्वत्र दडे बसवणारी शांतता. कोणीच बोलत नाही. कोणीच हरकत घेत नाही. सर्वत्र आणि सर्वत्र ‘चतुर मौन’ पसरलेलं आहे. या मौनात स्वार्थदेखील आहे. तुच्छतादेखील आहे. हिशेब आणि व्यवहारदेखील आहे. सामान्य जनतेच्या दु:खाला चिरडणंदेखील आहे. भीती आणि दहशतदेखील आहे. प्रलोभनंदेखील आहेत. विनाशदेखील आहे.

लेखकाने असं ऐकलं आहे की, कवी शंकर वैद्यांच्या कवितेतल्या पुस्तकांनी कपाटामध्येच आत्महत्या केल्या आहेत. उरलेल्या पुस्तकांना दिनांक 23 एप्रिलच्या जागतिक पुस्तकदिनाच्या दिवशी आत्महत्या करायच्यात म्हणे! त्याने असंही ऐकलं आहे की, याच कपाटात भारतीय संविधानानेदेखील आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. लेखक ऐकतो, लेखक पाहतो, लेखक चिंतित होतो. क्वचित कोणी बोलतं आहे, नाही असं नाही.

काही कवी बोलतायत. अशोक बागवे नावाचा कवी ‘मौनाचा नि:शब्द कोलाहल’ ऐकतो आहे. तो म्हणतो,‘‘मौनाचा नि:शब्द कोलाहल नंग्या तलवारी परजत निघून गेलेला थेट रक्ताच्या पल्याड’’ आणि पुढे हा कवी सद्य परिस्थितीबद्दल बोलताना लिहितो,‘‘आकाश ठणकतंय धरती सुन्न भरवसा उडून गेलाय एकमेकांवरचा.. ’’

भरवसा उडून गेलाय? माणसाचा माणसांवरचा? राज्यांचा केंद्रावरचा? केंद्राचा राज्यांवरचा? मित्राचा मित्रांवरचा? समाजाचा समाजांवरचा? म्हणजे मग जगण्याचा आधार तरी काय आहे, लेखकाचा प्रश्न स्वत:ला.

तिकडे, परकीय नसलेला पण परकीय प्रदेशात राहिलेला एक कवी आश्वासनपूर्ततेची वाट पाहतो आहे. तो म्हणतो की, नियतीशी करार करून स्वातंत्र्य मिळालं. मग विधिच्या विधानात लिहिल्याप्रमाणे आश्वासनपूर्ती तर झालीच पाहिजे ना? जगण्याचे अधिकार तुम्हालाही आहेत मलाही आहेत. एक दिवस या दु:स्वप्नाचा अंत होईल आणि जनताजनार्दनाचं राज्य येईल-‘और राज करेगी ख़ुल्क-ए-ख़ुदा’ असं स्वप्नं तो कवी पाहतो आहे. ख़ुल्क-ए-ख़ुदा म्हणजे जनताजनार्दन-आम जनता. लेखक त्यामुळे आशावादी आहे. 

समाजदेखील आशावादी असतो. ‘इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो’ असा उद्घोष समाजाने पूर्वीच केलेला आहे. कालपर्यंत लेखक ऐकत होता. आज लेखक हे सगळे पाहतो आहे. उद्या कदाचित तो बोलेल. पण मग त्याने बोललं पाहिजे. त्याने बोललंच पाहिजे. तो न बोलला तर प्रमाद होईल. तो न बोलला तर तो ‘चतुर मौनाचा’ बळी ठरेल. लेखक आशावादी आहे. लेखक सत्याग्राही आहे, तो सत्यान्वेषी आहे. तो सत्याभिलाषी आहे.

सत्याचा उच्चार करणं, उच्चरवाने सत्याचा उद्घोष करणं ही लेखकाची भूमिका असते, धर्मही असतो, कर्तव्यदेखील असतं. तो बोलेल, कदाचित उद्या. आणि सत्य बोलण्याचा धर्म स्वीकारणारे आरसेदेखील तडजोड न करता सत्यच सांगत आहेत. आणि म्हणून इथे लेखकाला जोतिबा फुले यांची कविता आठवते आहे. जोतिबांनी सत्याचा उद्घोष केला आहे. सत्य सर्व धर्माचे माहेर आहे, सत्य सुखाचा आधार आहे, त्याव्यतिरिक्त सर्वत्र अंधकार आहे आणि सत्याचं बळ पाहून बहुरूपी भयभीत होत आहेत, असं जोतिराव फुले म्हणतायत. राहूचे छद्मरूपी उपासक सत्याच्या प्रकाशामुळे भयभीत होतील अशी आशा त्यामुळे लेखकाला वाटते. लेखक असं बरंच काही आठवतो आहे.

आणि हो.. करोनाने आपल्याला सोशल डिस्टिन्सग शिकवलं. म्हणजे माणसाने माणसापासून दूर जाणं. ते आपण करीत राहिलो. करोनाने आपल्याला हात धुवायला शिकवलं. पण ज्यांच्या हाताला रक्त लागलं आहे, किंवा पापाचा स्पर्श झाला आहे ती मंडळी शेक्सपिअरच्या त्या नाटकातल्याप्रमाणे ‘वॉश माय हँड्स’ असं म्हणतदेखील नाहीएत. - लेखक हे सगळं पाहतो आहे. सगळं आठवतो आहे. पण हे आठवलेलं त्याने सांगितलं मात्र पाहिजे. सत्यवदन हा लेखकाचा धर्म. निर्भयता हा त्याचा धर्म. त्या धर्माला तो जागला पाहिजे. सर्जनबळाचं विस्मरण त्याला, आणि समाजाला परवडणार नाही.

तेव्हा, लेखकाची भूमिका काय असते, तुमची भूमिका काय आहे असे प्रश्न तुम्ही मला विचारता म्हणून तुम्हाला मी हे विस्ताराने सांगितलं. तुमच्या आणि माझ्या मनात-मेंदूत दडलेला सामान्य माणूस निर्भयतेने जगायला लागेल तेव्हा ‘अच्छे दिवस’ येतील, असा मला विश्वास वाटतो. लेखकाने आशावादी असणं त्याला क्रमप्राप्त आहे आणि त्याला दुसरा कोणता तरणोपायदेखील नाही. आशावादी असणं ही त्याची अपरिहार्यतादेखील आहे. आशावादी असणं याव्यतिरिक्त तो दुसरं काय करू शकतो? 

(क्रमशः )


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget