Halloween Costume ideas 2015

‘धाक आणि दरारा’ची लक्तरे


इराककडे रासायनिक शस्त्रास्त्रे असल्याचा खोटा आरोप करीत तत्कालिन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी जगभरातील सर्वच देशांची आघाडी करून इराकवर जो हल्ला केला होता त्याला ‘धाक आणि दरारा’ (Shock and Awe) असे नाव दिले होते. पुढे त्या युद्धाचा अलीकडच्या युगाचा रक्तरंजित इतिहास आहे. हे युद्ध थांबले असे जरी वाटत असले तरी अमिरकेकडून इराक, सीरिया इत्यादी अरब देशांची नासधूस अजूनही चालू आहे. आता जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा या यूरोपियन देशाची मदत करण्यास एकही राष्ट्र पुढे सरसावले नाही. याच राष्ट्रांनी जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तान आणि इराकवर हल्ला करण्यासाठी त्याच्याशी आघाडी केली तेव्हा अमेरिकेचा हात धरू पळत मुस्लिम देशावर हल्ला करण्यासाठी, तिथली साधनसंपत्ती नष्ट करण्यासाठी, तिथल्या माणसांची, लहान मुलांची हत्या करण्यासाठी मोठ्या हिरीरीने पुढे सरसावली होती, जणू त्यांना ईश्वराने रक्तपात करण्याची संधीच दिली होती. ज्या नाटोच्या सदस्यत्वावरून रशियाaने युक्रेनवर हल्ला केला आहे त्या नाटो संस्थेने युक्रेनच्या मदतीस धावून येण्यास नकार दिला. अमेरिकेने म्हटले आहे की तो युक्रेनमध्ये आपले सैन्य पाठविणार नाही. याचे कारण हे की नाटोचे गठणच मुस्लिम देशांचे विभाजन करणे आणि मग त्यांची नासधूस करण्यासाठी केले गेले होते. अशा ते इतर कोणत्या सदस्य राष्ट्राची मदत कशी करणार. अमेरिकी सैन्य पूर्णपणे मुस्लिम राष्ट्रांवर हल्ला करून तिथल्या जनतेचा नरसंहार करण्यासाठी राखून ठेवलेले आहे. युक्रेन तर मुस्लिम राष्ट्र नाही, तिथे आपले सैन्य का बरे अमेरिका पाठवील? अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी मागे इराकवर हल्ला करण्यासाठी वेळोवेळी काय म्हटले आहे ते पाहू या. अफगाणिस्तानवर हल्ला करण्यासंदर्भात ज़ॉर्ज बुश म्हणाले होते, ‘आम्हाला त्याला (लादेनला) शोधावे लागेल.’ इराकच्या बाबतीत हेच महाशय म्हणतात, ‘त्याच्याकडे आण्विक शस्त्रास्त्रे आहेत, आम्हाला त्याला रोखावे लागेल.’ बराक ओबामा लीबियाविषयी म्हणतात, ‘त्या देशात एकाधिकारशाही आहे. आम्हाला तेथील नागरिकांची मदत करायला हवी.’ सध्या अमेरिकेच्या साहाय्याने काय हाल झाले आहेत ते जगासमोर आहे. सीरियाच्या बाबतीत हे ओबामा महाशय म्हणाले होते, ‘त्यांच्याकडे रासायनिक हत्यारे आहेत. आम्हाला त्यांना रोखायला हवं.’ सीरियाला बेचिराख करून त्या देशाला जगाच्या नकाशावरूनच संपवून टाकले, अशी त्याची मदत केली. ज्या युक्रेनने इराकविरुद्ध लढण्यास आपले सैन्य पाठवले होते. त्याच युक्रेनवर रशियाने हल्ला केला. युद्ध काय असते याचा प्रत्यय आता त्याला येत आहे. इतर राष्ट्रांवर हल्ला करून तिथे रक्तपात करण्यात आणि आपल्या देशावरील हल्ल्यात काय फरक हे त्याला आता कळत असेल. आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलिनस्की कोण? त्यांनी इस्रायलचे राष्ट्रीयत्व धारण केलेले आहे. युनोमध्ये पॅलेस्टाइनला मान्यता देण्याचा प्रस्ताव आला तेव्हा त्यांनी त्या प्रस्तावाविरुद्ध मतदान केले होते. त्याचबरोबर इस्रायलविरुद्ध प्रतिबंध लादण्याचा प्रस्तावाच्या वेळी देखील त्यांनी त्या विरुद्ध मत दिले होते. रशियाने युक्रेन युद्धात आण्विक शस्त्रावचा वापर करण्यासाठी आपल्या सैन्य अधिकाऱ्यांना तयार राहण्याचे आदेश दिल्याच्या बातम्या आहेत. असे कळताच अमेरिकेसहित युरोपियन राष्ट्रांना घाम फुटला. ते रशियासारख्या महाशक्तीविरुद्ध उभे ठाकू शकत नाहीत. त्यांना तर निःशस्त्र अरब देशांविरुद्ध युद्ध करण्याचे प्रशिक्षण आणि मनोबल मिळालेले आहे. अमेरिकेचा धाक आणि दरारा एका झटक्यात धरळा बनून उडून गेला. जगाला तिसऱ्या महायुद्धाचा धोका असल्याचे म्हटले जाते, पण तसे काही घडणार नाही. तिसरे महायुद्ध झालेच तर ते युरोपियन देशांमध्ये होईल आणि यासाठी ते तयार नाहीत. ते युक्रेनला रशियाच्या ताब्यात देतील. तिसऱ्या महायुद्धासाठी त्यांनी अरब देशांची रणभूमी निश्चित केली आहे. तसे आमच्या मते जगात कुठेही युद्ध होता कामा नये. युद्धात जिंकणारे राष्ट्राध्यक्ष आणि मोठमोठे उद्योगधंद्यांची श्रीमंती वाढते, तर मानवता सदैव हरते. मानवतेची नासधूस होते. म्हणून ‘जंग टलती रहे तो बेहतर है!’

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget