Halloween Costume ideas 2015
2022


सफियान बिन अब्दुल्लाह यांनी प्रेषितांना विचारले, ‘हे प्रेषित, मला इस्लामविषयी अशी शिकवण सांगा ज्यानंतर मला कुणालाही काही विचारायची गरज भासणार नाही.’ प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘अल्लाहवर श्रद्धा ठेवा आणि मग त्यावर दृढ राहा.’’                                                   (अबू अमरो, मुस्लिम)

प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या या वक्तव्याचा आधार पवित्र कुरआनच्या या आयतीवर आहे,

‘‘जे लोक म्हणाले, ‘अल्लाह आमचा विधाता आहे’ आणि त्यावर ठाम राहिले, त्यांच्याकडे अल्लाहचे दूत येतात आणि म्हणतात, ‘भिऊ नका आणि दुःखीही होऊ नका’ आणि त्या स्वर्गाची खूशखबर देतात ज्याचे अल्लाहने तुम्हाला वचन दिले आहे.’’                            (पवित्र कुरआन, हा मिम अस्सजदा – २०)

इब्ने मलिक म्हणतात की मी प्रेषित (स.) यांच्याकडे गेलो त्या वेळी ते अरफातमध्ये होते. प्रेषितांना दोन गोष्टींविषयी विचारले, ‘कोणत्या कर्मामुळे मला नरकापासून मुक्तता मिळेल आणि कोणत्या कर्मामुळे मला स्वर्ग प्राप्त होईल.’

प्रेषितांनी उत्तर दिले, ‘‘तुम्ही थोडक्यातच बरेच काही विचारले आहे. ’’

आणि पुढे शिकवण देताना प्रेषित (स.) म्हणाले, ‘‘अल्लाहची आराधना करा, त्याला कुणी भागीदार जोडू नका. अनिवार्य केलेली नमाज अदा करा, जकात द्या, रमजानचे रोजे ठेवा आणि लोकांनी तुमच्याशी कसा व्यवहार करावा असे तुम्हाला वाटते तसाच व्यवहार तुम्ही इतरांशी करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला पसंत नसतील त्या गोष्टी लोकांसाठीही पसंत करू नका. जोपर्यंत तुम्ही श्रद्धा धारण करणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वर्गात प्रवेश करणार नाही. तसेच जोपर्यंत तुम्ही एकमेकांशी स्नेहाने, प्रेमाने वागणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वर्गात जाणार नाही.’’

प्रेषित (स.) म्हणतात, ‘‘ज्याने समर्पित मनाने ‘लाइलाहा इल्लल्लाह’ची घोषणा केली तो स्वर्गात दाखल होईल.’’

लोकांनी विचारले, ‘समर्पित मनाचा अर्थ काय?’ प्रेषितांनी उत्तर दिले, ‘‘जे अवैध आहे ते वर्ज्य करणे.’’     (ह. हसन बसरी)

पवित्र कुरआनात असे विधान आहे की,

‘‘त्यांना सांगा, जर वास्तवात तुम्ही अल्लाहशी जवळीक साधू इच्छित असाल तर माझे अनुसरण करा. अल्लाह तुम्हाला जवळ करील.’’ 

(पवित्र कुरआन, ३:३१)

आणि ‘‘अल्लाह अशा लोकांना पसंत करतो जे प्रायश्चित्त करतात आणि स्वच्छता बाळगतात.’’                                             (पवित्र कुरआन, २:२२२)

श्रद्धा म्हणजे काही वाईट गोष्टींना सोडून देणे आणि चांगल्या गोष्टी अंमलात आणणे असे आहे.

जकात केवळ श्रद्धावंत लोकच देत असतात. कुणीही व्यक्ती मोकळ्या मनाने आपल्या संपत्तीतून दान करू इच्छित नसतो. आणि जर कुणी आनंदाने जकात देत असेल तर त्याचा अर्थ असा की त्यास अल्लाहची प्रसन्नता, त्याने दिलेल्या वचनावर त्याला दृढ विश्वास आहे. जकात दिल्याशिवाय कुणाचीही श्रद्धा परिपूर्ण होऊ शकत नाही.

(संदर्भ : गंजीन-ए-हिकमत)


संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद(९) चला, यूसुफ (अ.) ला ठार करा अथवा त्याला कोठेतरी फेकून टाका जेणेकरून तुमच्या वडिलांचे लक्ष केवळ तुमच्याकडेच राहावे. हे काम उरकल्यावर पुन्हा सदाचारी बनून राहा.’’१० 

(१०) यावर त्यांच्यापैकी एकाने सांगितले, ‘‘यूसुफ (अ.) ला ठार करू नका, जर काही करावयाचेच असेल तर त्याला एखाद्या कोरड्या विहिरीमध्ये टाकून द्या, एखादा येणारा जाणारा काफिला त्याला काढून नेईल.’’ 

(११) असे ठरल्यावर त्यांनी जाऊन आपल्या वडिलांना सांगितले, ‘‘हे पिता, काय कारण आहे की आपण यूसुफ (अ.) च्या बाबतीत आम्हावर विश्वास ठेवीत नाही, वास्तविक पाहाता आम्ही त्याचे खरे हितचिंतक आहोत? उद्या त्याला आमच्याबरोबर पाठवून द्या. थोडे फळफळावळ खाईल१०अ 

(१२) खेळून बागडून मनोरंजनही करून घेईल. आम्ही त्याच्या रक्षणासाठी आहोतच.’’११ 

(१३) वडिलांनी सांगितले, ‘‘तुमचे त्याला घेऊन जाणे मला जड जाते आणि मला भीती आहे की एखादे वेळी त्याला लांडग्याने फाडून खाऊ नये जेव्हा तुम्ही त्याच्याकडून गाफील असाल.’’ 

(१४) त्यांनी उत्तर दिले, ‘‘जर आम्ही असताना त्याला एखाद्या लांडग्याने खाल्ले जर आम्ही एक जथा आहोत त्याअर्थी आम्ही तर अगदीच निकामी ठरू.’’ 

(१५) अशाप्रकारे आग्रह करून जेव्हा ते त्याला घेऊन गेले आणि त्यांनी ठरवून घेतले की त्याला एका कोरड्या विहिरीत सोडून द्यावे तेव्हा आम्ही यूसुफ (अ.) ला दिव्य प्रकटन केले की, ‘‘एक वेळ येईल जेव्हा तू या लोकांना त्यांच्या या कृत्याची समज देशील, हे आपल्या कृत्याच्या परिणामापासून बेखबर आहेत.’’१२१०) हे वाक्य त्यांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकतो जे स्वत:ला आपल्या मनोकामनांच्या हवाली करतात. परंतु दुसरीकडे ईमानधारक आणि सदाचारीपणाशी संबंध जोडतात. अशा लोकांची जीवनपद्धत अशी असते जेव्हा त्यांचे मन दुष्टव्याकडे वळते तेव्हा ते ईमानकडे दुर्लक्ष करतात आणि मनोकामनांची पूर्तता तत्परतेने करतात. त्यांचा अंतरात्मा त्यांना टोचू लागतो तेव्हा ते मनाचे सांत्वन करतात, असे सांगून की हा एक अपराध आमच्या हातून घडू दे. नंतर आम्ही अल्लाहशी क्षमायाचना करून मनासारखे सदाचारी बनू.

१०अ) बोली भाषेत मुल जेव्हा जंगलात जाऊन झाडाचे फळ तोडून खात फिरते तेव्हा प्रेमळ वर्णनशैलीत हे शब्द वापरले जातात.

११) हे वर्णनसुद्धा बायबल आणि तलमूदच्या वर्णनांशी भिन्न आहे. त्याचे वर्णन असे आहे की पैगंबर यूसुफ (अ.) यांचे भाऊ गुरे चारण्यासाठी सक्कमकडे गेले होते आणि त्यांच्या शोधात स्वत: पैगंबर याकूब (अ.) यांनी पैगंबर यूसुफ (अ.) यांना मागे पाठविले होते. परंतु हे अयोग्य वाटते कारण पैगंबर याकूब (अ.) यांनी पैगंबर यूसुफ (अ.) यांच्याविषयी घोर ईर्षा इतर भावांडे करीत होती, हे ठाऊक असतांनासुद्धा ते यूसुफ (अ.) यांना मृत्यूच्या दाढेत का म्हणून लोटतील? म्हणून कुरआनचे वर्णनच वस्तुस्थितीला अनुकूल आहे.

१२) अरबी मध्ये `वहुमला यशउरुन' त्याचे तीन अर्थ होतात आणि तिन्हीही योग्य आहेत. 

१) आम्ही यूसुफ (अ.) यांचे सांत्वन करतो आणि त्यांच्या भावांना खबर नव्हती की त्याच्यावर दिव्य प्रकटन होत आहे.

२) तू अशा परिस्थितीत त्यांचे हे कृत्य त्यांना दाखवावे जेथे तुझ्या अस्तित्वाविषयी ते कल्पनाही करू शकत नव्हते.

३) आज हे विचार करून हे कृत्य करीत आहे आणि जाणत नाही की पुढे याचे परिणाम काय होणार आहेत. बायबल आणि तलमूद या विवरणापासून रिक्त आहे. त्यावेळी पैगंबर यूसुफ (अ.) यांच्यावर अल्लाहतर्पेâ काही सांत्वन दिले होते. याव्यतिरिक्त तलमूदमध्ये जो उल्लेख आला आहे तो म्हणजे पैगंबर यूसुफ (अ.) यांना विहिरीत टाकले गेले तेव्हा त्यांनी आरडाओरडा केला. त्यांनी भावांशी ओरडून विनंती केली. कुरआनच्या उल्लेखाने तर हे स्पष्ट होते की ते पुढे एक महान ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व बनणार होते. तलमुदला वाचल्यावर असे वाटते की जंगलात काही खेडुतांनी त्यांना विहिरीत ढकलून दिले आणि नंतर ते एका सामान्य मुलांसारखे आरडाओरड करू लागले.जहन्नुम भला सर्द क्यूं कर न होगा

के महवे दुआ हैं हमारे मुहम्मद (स.)

अजल से अबद तक रहेगा जो रौशन

वो रौशन दिया हैं हमारे मुहम्मद (स.)

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या अवमाननेसंंबंधाने जगभरात एक सारख्याच प्रतिक्रिया व्यक्त होत असतात आणि त्या हिंसक असतात. अगदी इतिहासापासून वर्तमानापर्यंत पैगम्बर सल्ल. यांच्या अवमानना प्रकरणी हिंसक प्रतिक्रियेचे कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाची पुरेशी माहिती नसणे हे आहे. 1920 ते 23 च्या काळात भारतात स्वामी श्रद्धानंदांनी शुद्धी आंदोलन सुरू केले होते. त्या दरम्यान, त्यांनी प्रेषित सल्ल. यांची अवमानना करणारी अनेक भाषणे केली होती. तेव्हा अब्दुर्रशीद नावाच्या एका युवकाने त्यांची हत्या केली होती. जेव्हा त्याच्यावर खटला चालविला जात होता तेव्हा मुस्लिमांच्या एका शिष्टमंडळाने डॉ. शेख मुहम्मद इ्नबाल यांची भेट घेऊन अब्दुर्रशीद याची खटल्यातून मुक्तता करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. तेव्हा इ्नबाल उत्तरले, ’’ जेव्हा तो स्वतः म्हणतोय की, या हत्येच्या बदल्यात मी शहादत खरेदी केली आहे. तर त्याच्या पुण्यकर्माच्या आडवा मी का बरे येऊ?’’ इ्नबाल एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी अब्दुर्रशीद याच्यासाठी एक कताअ (कवितेच्या ओळी) तयार करून उपस्थितांना ऐकवला. तो कताअ खालीलप्रमाणे-

नजर अल्लाह पर रखता है मुसलमां गय्यूर

मौत क्या शय है फकत आलमे माना का सफर

इन शहीदों की दीत अहेले कलीसा से न मांग

कद्रो कीमत में खूं जीनका हरम से बढकर

आह ! ऐ मर्दे मुसलमां तुझे क्या याद नहीं

हर्फ-ला-तदाअ मा-अल्लाह अलहन आखीर

ही झाली विसाव्या शतकातील पैगम्बर सल्ल. यांच्या अवमानने विषयी व्यक्त होण्याची मुस्लिम मानसिकता. ही मानसिकता शंभर वर्षानंतरही बदललेली नाही. 7 जानेवारी 2015 रोजी पॅरिसच्या शार्ली हॅब्दो मासिकाच्या कार्यालयावर मुस्लिमांच्या एका गटाने हल्ला करून अनेकांची हत्या केली होती. कारण हेच होतं. शार्ली हॅब्दोमध्ये पैगंबर सल्ल. यांच्या विषयी व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते. ही या शतकातील दोन ठळक उदाहरणं वाचकांसोबत यासाठी शेअर केली की त्यांच्या लक्षात यावे की, मुस्लिम समाज प्रेषित सल्ल. यांच्या विषयी किती संवेदनशील आहे. ही झाली मुस्लिमांची प्रेषित सल्ल. यांच्या अवमाननेसंबंधी व्यक्त होण्याची रीत. आता या पार्श्वभूमीवर आपण हे पाहुया की, अशा प्रकरणामध्ये स्वतः प्रेषित सल्ल. कसे वागत होते?

प्रेषित सल्ल. यांच्या हयातीतच एकदा नव्हे अनेकदा त्यांची मानहानी केली गेली. त्यांच्या चरित्राचा लक्षपूर्वक अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते की, प्रेषित सल्ल. यांचा मक्कावासियांनी पावलोपावली अपमान केला होता. पण प्रेषित सल्ल. यांनी त्या अपमानाकडे दुर्लक्ष केले व जो संदेश ईश्वराने त्यांच्याकडे सुपूर्द केला होता तो लोकांपर्यंत पोहोचविण्यावरच आपले लक्ष केंद्रित केले. म्नकाविजय झाल्यावरसुद्धा त्यांनी आपल्या अपमानाचा बदला घेतला नाही. प्रेषित सल्ल. यांच्या अपमानाविषयी स्वतः ईश्वर काय म्हणतो हे अगोदर समजून घेतले म्हणजे या विषयी व्यक्त होण्याची खरी पद्धत आपल्या लक्षात येईल. 

या संबंधी ईश्वर म्हणतो की,’’ अल्लाह जाणतो जे काही यांच्या मनात आहे, यांच्याकडे लक्ष देऊ नका. यांची समजूत घाला व असा उपदेश द्या जो यांच्या अंतःकरणात उतरावा.’’ (4:63).

एहसानुल बयान या कुरआनच्या भाष्यामध्ये या आयातीचे स्पष्टीकरण करताना हाफिज सलाउद्दीन युसूफ म्हणतात की, ’’ईश्वराला माहित आहे हे लोक तुमच्या विषयी मनात किती अदावत बाळगून आहेत. ईश्वर त्यांना पाहून घेईल तुम्ही त्यांची काळजी करू नका. त्यांना क्षमा करा. आणि उत्तम पद्धतीने त्यांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न करत रहा.’’  यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, ज्या लोकांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा अपमान केला त्यांच्याविरूद्ध कुठलीही कारवाई ईश्वराला मान्य नाही. आणि प्रेषितांनी ईश्वराचा हा संदेश आयुष्यभर अमलात आणला. 

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये त्यांना काही कमी त्रास दिला गेला नाही. कोणी त्यांना वेडा म्हणून संबोधित केले होते तर कोणी जादूगर. ते काबागृहासमोर बसलेले असतांना कोणी त्यांच्या अंगावर उंटांच्या पोटातील आतड्याची घाण टाकली तर कोणी येण्याजाण्याच्या मार्गात काटे टाकले. परंतु प्रेषित सल्ल. यांनी त्यांना कधीही नकारात्मक प्रतिउत्तर दिले नाही की बदला घेतला नाही.

हजरत आएशा सिद्दीका रजि. यांना प्रेषित सल्ल. यांनी सांगितले होते की, ’’तायफचा दिवस हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होता. त्या दिवशी तायफच्या लोकांनी त्यांनी दिलेला ईश्वरीय संदेश फक्त अमान्यच केला असे नाही तर त्यांचा अपमानही केला व उनाड पोरांना त्यांच्यावर दगडफेक करायला लावली. जेव्हा ते जीव वाचवून एका अंगुरच्या बागेत जाऊन बसले तेव्हा त्यांच्या सोबत असलेल्या हजरत जैद रजि. यांनी प्रेषित सल्ल. यांना विनंती केली की, ’’या लोकांच्यासाठी त्यांनी शाप द्यावा.’’ तेव्हा प्रेषित सल्ल. उत्तरले की, ’’मला शाप देण्यासाठी नव्हे तर कृपा करण्यासाठी प्रेषित बनविलेले आहे. मी ईश्वराकडे दुआ करतो की, हे नाही तर यांचे वंशज तरी भविष्यात माझा संदेश जरूर समजून घेतील’’ आणि झालेही तसेच पुढच्या दहा वर्षात अवघा अरब इस्लाममय झाला. 

कुरआनमध्ये दुसऱ्या ठिकाणी सांगितलेले आहे की,

’’ हे पैगंबर ज्या गोष्टी हे रचत आहेत त्या गोष्टींवर संयम बाळगा’’ (सुरे ताहा (20) : आयत क्र. 130)

या अध्यायामध्ये ईश्वराचा इन्कार करणाऱ्या लोकांना संबोधित करतांना आयत क्र. 128 मध्ये म्हटले गेेले आहे की, ’’मग त्या लोकांना, (इतिहासाच्या धड्याने) कोणतेही मार्गदर्शन मिळाले नाही का? त्यांच्यापूर्वी कित्येक लोकसमुदायांना आम्ही नष्ट करून टाकले आहे. ज्यांच्या (उध्वस्त) वस्त्यांमध्ये हे आज वावरत आहेत. वास्तविक यांच्यात पुष्कळ संकेत आहेत त्या लोकांसाठी जे सद्बुद्धी बाळगणारे आहेत’’ मुळात ईश्वरीय मार्गदर्शनाचा इन्कार करणारे मग ते नुपूर शर्मा असो की नविन जिंदल असो का आणखीन कोणी असो, त्यांना फक्त इस्लामोफोबिया झालेला आहे. त्यामुळे त्यांना इस्लामच्या चांगल्या गोष्टी सुद्धा त्यांना वाईट दिसतात म्हणून अशा प्रसंगी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच श्रेयस्कर.

कुरआनने सुरे यासीन क्र.36 आयत नं. 30 मध्ये म्हटलेले आहे, ’’ खेद आहे दासांच्या दशेवर जे कोणी प्रेषितांपाशी येतात आणि त्यांची थट्टा करतात.’’ या ठिकाणी प्रेषितांशी थट्टा करणाऱ्यांना शिक्षा देण्याचे कुठलेही निर्देश प्रेषितांना देण्यात आलेले नाहीत. संपूर्ण कुरआनमध्ये अशी एकही आयत नाही जी प्रेषित सल्ल. यांच्या अवमान करणाऱ्याला शिक्षा देण्याचे अधिकार मुस्लिमांना देते. अलबत्ता इस्लामी फ्निहा (दंडशास्त्रा) तील काही तरतुदींचा अर्थ काढून पाकिस्तानसारख्या राष्ट्रामध्ये प्रेषित सल्ल. यांच्या अवामानना करणाऱ्याला मृत्यूदंड देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे परंतु ही तरतूद गैरस्लामी आहे. या संदर्भात इमाम अबु हनिफा यांचे मत खालीलप्रमाणे - 

’’अगर शातीमे रसूल (प्रेषितांचा अवमान करणारी व्यक्ती) बिगर मुस्लिम है तो उसपर कत्ल की हद नाफिज नहीं होगी. बल्के हुकूमते वक्त उसे ताजीरी (दंड, कैद वगैरे) सजा देगी. अगर गैरमुस्लिम ने हल्की नोईयत का जुर्म किया होगा तो हुकूमत उसे तंबीह करके सजा-मुकम्मील तौर पर माफ भी कर सकती है.’’ 

भारतीय मुस्लिमांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की कुरआन आणि प्रेषित सल्ल. यांचे व्यक्तिमत्व ह्या दोन्ही गोष्टी जगासाठी कृपा आहेत. त्यात घृणा पसरविणाऱ्या गोष्टींचा लवलेशसुद्धा नाही. उलट घृणा करणाऱ्यांसोबत प्रेमाने वागण्याचा स्पष्ट आदेश खालीलप्रमाणे दिलेला आहे, 

’’आणि हे पैगंबर (स.), भलाई आणि दुष्टता एकसमान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे त्या भलाईद्वारे निरसन करा जी अत्युत्तम असेल. तुम्ही पाहाल की तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते, तो जिवलग मित्र बनला आहे.  (सुरे हामीमसज्दा क्र. 41, आयत क्र. 34)’’ या आयातीमध्ये केलेल्या मार्गदर्शनानंतर तर प्रेषितांच्याच अवमाननेप्रसंगी नव्हे तर कुठल्याही घृणेचे उत्तर मुस्लिमांना घृणेने देण्याचा अधिकार राहत नाही. या आयातीमध्ये मणुष्यजातीच्या मानसिकतेचे एक रहस्य उलगडून दाखविण्यात आलेले आहे. ते रहस्य म्हणजे माणसाला शक्तीने जरी नमवता येत असले तरी प्रेमाने त्याला जिंकता येते. माणसानी कुठल्याही कारणांनी केलेल्या घृणेचे उत्तर घृणेने दिल्यास जग एक असे जंगल होऊन जाईल ज्यात एकमेकांचा बदला घेण्यासाठीच लोक जगतील. अशाने तर मनुष्य जातीच संपुष्टात येईल. 

कुरआनने मुस्लिमांनाच नव्हे तर सर्वच मानवजातीला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रत्येक माणूस आपल्यावर झालेल्या संस्काराप्रमाणे बोलत असतो. ज्याच्यावर चांगले संस्कार झाले तो चांगले बोेलतो आणि ज्याच्यावर वाईट संस्कार झाले तो वाईट बोलतो. आता कोणी वाईट बोलत असेल म्हणून प्रत्युत्तरादाखल चांगले लोकही वाईट बोलणे सुरू करतील तर मग चांगल्या आणि वाईटामध्ये फरकच काय राहील? एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, घृणेला कोणीही घृणेने थोपवू शकत नाही. तसे केल्याने ती वाढतच जाते. अग्नी जसा पेट्रोल टाकून विझविता येत नाही त्यासाठी पाणीच टाकावे लागते. अगदी त्याचप्रमाणे घृणेला घृणेने विझविता येत नाही. त्यासाठी घृणेवर प्रेमाचे पाणीच ओतावे लागते. 

सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, कोणा मायकेल एच.हार्ट याने ’द हंड्रेड’ हे पुस्तक लिहून त्यात प्रेषित सल्ल. यांना पहिले स्थान दिले. म्हणून जसा प्रेषित सल्ल. यांचा सन्मान वाढत नाही तसाच कोणा नुपूर शर्मा ने त्यांचा अपमान केला म्हणून त्यांच अपमान होत नाही. प्रेषित मुहम्मद सल्ल. हे जगातील एकमेव असे व्यक्तिमत्व आहे जे स्तुती, घृणा, अपमान या सर्व गोष्टींच्या वर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जगातील 180 कोटी लोक जीवन जगतात. त्या व्यक्तिमत्वाचा कोणी अपमान करायचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्या विषयी असलेल्या आदरामध्ये तुसभरही फरक पडणार नाही. शेवटी अल्लाहने कुरआनमध्ये प्रेषित सल्ल. यांचे जे स्टेटस ठरविलेले आहे ते खालीलप्रमाणे -  ’’हे पैगंबर (स.), आम्ही तर तुम्हाला जगवासियांसाठी कृपा बनवून पाठविले आहे.’’  (21:107)

आता ईश्वरानेच ज्यांचे स्टेटस जगासाठी कृपा म्हणून घोषित केलेले आहे त्यांच्याबद्दल कोण काय बोलते? काय लिहिते यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेवर काडीचा फरक पडत नाही. म्हणून मुस्लिमांनी इस्लाम किंवा प्रेषितांच्या अवमाननेप्रकरणी कुठलीही प्रतिक्रिया न देता अनुल्लेखाने अशी प्रकरणे हाताळावीत. मात्र एवढे करून थांबता येणार नाही तर त्यांना आपल्या लेखणीने, वाणीने आणि चारित्र्याने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणी जगाला दाखवून द्याव्या लागतील व त्यांचे मार्गदर्शन हेच जगाला तारण्याचा एकमेव मार्ग आहे हे दाखवून द्यावे लागेल. हाच पैगंबर सल्ल. यांच्या अवमाननेचा बदला घेण्याचा पैगंबरी मार्ग आहे. दूसरा मार्गच नाही.

की मुहम्मद (स.) से वफा तूने तो हम तेरे हैं

ये जहां चीज है क्या लोहो कलम तेरे हैं

- एम. आय. शेखजेव्हा जगातली 98 टक्के लोकसंख्या लॉकडाऊनच्या खाली होती, आंतरराष्ट्रीय व्यापार बंद पडला होता. पर्यटनचे क्षेत्र बंद पडले होते. अशा काळात दररोज एक ना एक व्यक्ती अब्जाधीश होत राहिला आणि याच काळात जगातील 160 दशलक्ष लोक गरीबीच्या खाईत गेली. 

कोरोना महामारीनंतर दोन वर्षात पहिल्यांदाच जागतिक आर्थिक फोरमच्या अधिवेशनात संस्थेच्या सदस्यांनी वैयक्तिक भाग घेतला. यावेळी ऑ्नसफॅम या संस्थेने आपला अहवाल सादर केला. या अहवालानुसर कोरोना महामारीच्या काळात जगामध्ये दर 30 तासाला एक अरबपतीची भर पडली म्हणजेच महामारीच्या काळात एकूण 573 नवे अरबपती उदयास आले. या अगोदर या धनवानांची संपत्ती 23 वर्षाच्या काळात जेवढी वाढली होती तितकीच संपत्ती या लोकांना कोरोनाच्या 24 महिन्यात जमविली. या काळात गोरगरीबांचे किती प्रमाणात शोषण झाले याचा अंदाज लावला जाऊ शकतो. 2000 साली साऱ्या धनवानांची एकूण संपत्ती जागतिक जीडीपीच्या 4.4 टक्के होती. ही टक्केवारी आता 13.9 टक्के पर्यंत पोहोचली आहे. यामागचे कारण हे की जे गोरगरीब कष्टकरी कामगार होते त्यांनी विवश होऊन कमी मजुरीत काम करायला तयार झाले. त्याचबरोबर खाजगीकरण आणि मोनोपली देखील एक कारण आहे. महामारीच्या काळात जनतेने निवडून दिलेल्या सरकारांनी नागरिकांच्या हिताकडे दुर्लक्ष करून उद्योगपतींना विविध प्रकारच्या करांमध्ये सूट दिली. जागतिक स्तरावर ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या पाच सर्वात मोठ्या भारतीय कंपन्यांनी दर सेकंदाला 2600 डॉलर्सची कमाई केली आणि अन्न (फुड) च्या क्षेत्रात व्यापार करणारे 62 नवीन अरबपती बनले. यानंतर औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी 20 नव्या अरबपतींना जन्म दिला. लशीचे उत्पादन करणाऱ्या मॉडेरना आणि फाईजर कंपन्यांनी 20 हजार डॉलर प्रतिसेकंदर इतकी कमाई केली.

दुसरीकडे दर 33 तासामध्ये दहा लाख लोक गरीबीच्या खाईत लोटले गेले. त्यांच्या संख्येत या वर्षी 26.3 कोटींची भर पडली आहे. आपल्या देशात निवडणुकीचा हंगाम संपल्यानंतर ज्या 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिले जात होते त्यातून गहू वगळले गेले आहेत आणि अशा बातम्या ऐकायला आल्या आहेत की रेशनकार्ड परत घेतले जाणार आहेत. भारतात गेल्या 48 वर्षामध्ये महागाईत कमालीची वाढ झालेली दिसते आणि त्याच वेळेला अन्न आणि उर्जाच्या क्षेत्रात दर दोन दिवसात 100 कोटी उद्योगपती कमवत आहेत. लाखो लोका या पुढील काळात काय होणार या चिंतेने ग्रस्त आहेत. ह्या आर्थिक विषमतेने मानवतेला छिन्नविछिन्न करून टाकले आहे. 

ह्या आर्थिक विषमतेमुळे श्रीलंका आणि सुदानमध्ये महागाई इतकी वाढली की त्या देशात यादवी माजण्याची चिन्हे आहेत. ज्या देशाची उत्पन्न क्षमता इतकी खालावली आहे की त्या देशाचे अखंडत्व पणाला लागले आहे. यावेळी गरीब देशाचे लोक श्रीमंत लोकांपेक्षा दोन पटीने भाव देऊन अन्नधान्य खरेदी करत आहेत. याचा परिणाम असा होत आहे की जगातील गरीबातले गरीब लोक 112 वर्षात जितकी कमाई करू शकतात तितकी कमाई जगात एक टक्के श्रीमंत लोक एका वर्षात कमवत आहेत. ऑक्सफॅम या संस्थेने लोकशाही देशांना या करोडपती अरबपती लोकांशी 2 ते 5 टक्के कर आकारण्याची शिफारस केली आहे. ज्यामुळे दरवर्षी 2520 अरब रूपये जमा होतील. ज्याद्वारे 2.3 अरब लोकांना गरीबीच्या खाईतून वर उचलण्यात मदत होऊ शकते. पण पूर्वीप्रमाणेच ऑ्नसफॅमच्या अहवालाला नाकारून लोकांना जसे मंदिर-मस्जिद वादात गुंतवले गेले तसेच काही आताही होणार. कोरोना महामारीच्या पहिल्या सहा महिन्यातच याचा अंदाज आला होता की, मानवतेसमोर किती गंभीर समस्या येणार आहे. कोरोना विषाणू विषयी संशोधन करणाऱ्या तज्ञांनी असे म्हटले होते की, नायजेरिया आणि भारतासारख्या गरीब देशांना या महामारीचा जास्त फटका बसणार आहे. त्यांची भविष्यवाणी खरी ठरली पुढे जाऊन जागतिक आरोग्य संस्थेने आपल्या अहवालात असे म्हटले होते की, भारतात या महामारीने मरण पावलेल्यांची संख्या शासनाच्या आकडेवारीपेक्षा दहा पटीने जास्त आहे. इम्पिरियल कॉलेजचे संशोधक पीटर व्हिन्स्कल श्रीमंत लोकांच्या रूग्णाच्या तुलनेत गरीब रूग्णांना मृत्यूचा धोका 32 टक्के जास्त होता. कारण रूग्णालयात जाणे अवघड झाले होते. जर दवाखान्यात प्रवेश मिळालाच तर अतिदक्षता विभागात प्रवेश मिळेल याची खात्री नव्हती. ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा नसल्याने कित्येक लोकांचे प्राण गेले. 

कोरोना महामारीचा नकारात्मक प्रभाव लोकांवर झाला. त्याचवेळी लोकशाही राष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या 10 अति श्रीमंत लोकांची संपत्ती दुपटीने वाढली. त्यांची संपत्ती 700 अब्ज डॉलरवरून एक 1.5 खरब डॉलरपर्यंत पोहोचली म्हणजे दर दिवशी सरासरी 1.3 अब्ज डॉलरची वृद्धी झाली. या काळात सत्ता व्यवस्था या लुटीचा दुरून तमाशाच पाहत नव्हत्या तर या प्रक्रियेत त्यांची मदतही करत होत्या. महामारीच्या काळात गेल्या 14 वर्षांच्या तुलनेत अब्जाधीश श्रीमंतांची संख्या सर्वात जास्त वाढलेली आहे. जागतिक संपत्तीत त्यांचा वाटा जलद गतीने वाढत गेला. ऑक्सफॅम संस्थेने जगात लसीच्या उत्पादनाबरोबरच्या पर्यावरण आणि हिंसा रोखण्यासाठी देखील निधी पुरवून लोकांचे प्राण वाचविण्यासाठी कर व्यवस्थेत सुधारणा करण्याचीही शिफारस केली आहे. पण सर्व राष्ट्रांनी त्याला धुडकावून लावले. 

ही परिस्थिती केवळ युरोप आणि अमेरिकेपर्यंत सीमित नव्हती तर अब्जाधीश श्रीमंतांच्या यादीत बीजिंग पहिल्या क्रमांकावरच होता. त्याच बरोबर ऑस्ट्रेलियामध्ये देखील 47 अब्जाधीश श्रीमंतांच्या संपत्तीत दररोज 205 दशलक्ष डॉलरची वाढ होत होती. कोरोनाच्या पहिल्या दोन वर्षात त्यांनी आपल्या संपत्तीमध्ये वाढ करून 255 बिलियन डॉलरपर्यंत वाढविली याचा अर्थ असा की हे लोक दर सेकंदाला 2300 डॉलरची कमाई करत होते. या लोकांच्या संपत्तीचा 1 टक्का जगातील 99 टक्के लोकांपेक्षा जास्त होता आणि म्हणूनच ऑक्सफॅम संस्थेने ऑस्ट्रेलिया सहित जगातल्या विविध सत्ताधाऱ्यांना अशी विनंती केली आहे की, श्रीमंतांवर जास्तीत जास्त कर आकारावा. पण ह्या श्रीमंतांनी कर देण्याऐवजी निधी गोळा करून निवडणुका लढवण्यास प्राधान्य दिले. आस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी संचालित क्रॉफर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्राध्यापक पीटर वॉल्टफर्ड ने वयस्कर नागरिकांच्या देखरेखीसाठीच्या संस्थांना निधी पुरवण्यावर दुजोरा दिला. पण त्यांना ऐकणार कोण?

ऑक्सफॉमचे प्रमुख कार्यकारी डेन्टी सरसिकंद यांनी आश्चर्य व्यक्त केले की जेव्हा जगातली 98 टक्के लोकसंख्या लॉकडाऊनच्या खाली होती, आंतरराष्ट्रीय व्यापार बंद पडला होता. पर्यटनचे क्षेत्र बंद पडले होते. अशा काळात दररोज एक ना एक व्यक्ती अब्जाधीश होत राहिला आणि याच काळात जगातील 160 दशलक्ष लोक गरीबीच्या खाईत गेली. 

याचा अर्थ असा की त्यांची दररोजची कमाई 9.90 डॉलरपेक्षाही कमी होती. त्यांनी हे मान्य केले की अन्यायी अर्थव्यवस्थेत बऱ्याच चुका आहेत. कारण जागतिक टंचाईच्या काळात देखील ही व्यवस्था श्रीमंतातील अधिक श्रीमंत आणि गरीबाला अधिक गरीब बनवत होती. ते पुढे म्हणत की राजकीय नेत्यांना ही ऐतिहासिक संधी प्राप्त आहे की आम्ही ज्या धोकादायक मार्गावर जात आहोत त्यात त्यांनी बदलून टाकण्याचे धाडस करणे आणि भांडवलदारी लोकशाही व्यवस्थेत राजकीय निधीचा वाटप करून माध्यमांना विकत घेऊन सत्ता करणाऱ्यांशी ही अपेक्षा अशी केली जाऊ शकते. डेनीसर सिकेंद्रा संपत्तीवर जास्तीचा कर आकारणी करून यातून होणाऱ्या उत्पन्नातून आरोग्य आणि सामाजिक सुरक्षासाठी खर्च करण्याची शिफारस देखील केली आहे.                

- सय्यद इफ्तेखार अहमदस्त्री सन्मानाचे प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी सुचविलेले उपाय हेच खरे उपाय आहेत. वेश्यांना खोटा सन्मान देणे हे उपाय नव्हे; याचा अर्थ असा नाही की ज्या महिला आज वेश्या व्यवसात आहेत त्यांचा सन्मान व्हायला नको. माझे मत असे आहे की सन्मानापेक्षा जास्त त्यांना पूनर्वसनाची गरज आहे. ते सरकारने करावे हाच त्यांचा खरा सन्मान ठरेल.

आमची आजी घराबाहेर लेकरांना सोडायची नाही, लेकरं खेळण्यासाठी जरी बाहेर पडली की तिच्या काळजात धासत व्हायची. या मागे एकच मोठे कारण होते ’’उमराव जान’’ चित्रपट तिने पाहिला होता. सारखी सांगायची घराबाहेर गेलात तर कोणीतरी उचलून नेईन. ’’वेश्या’’ हा स्त्रीला संबोधीत करताना वापरला जाणारा सर्वात तिरस्कारीत शब्द आहे असे मला वाटते.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या एका पिठाकडे जेव्हा वेश्या व्यवसाय संबंधी सुनावणी सुरू असताना जी टिप्पणी केली तिची चर्चा देशभर झाली. न्यायमूर्ती एल. नागेश्वरराव आणि इतर दोन सन्माननीय न्यायमूर्तींच्या पीठाने पोलिसांना निर्देश देताना असे म्हटले की, वेश्याव्यवसाय हा सुद्धा एक व्यवसाय आहे त्यामुळे या व्यवसायात स्वतःच्या मर्जीने उतरलेल्या महिलांचा सन्मान व्हायला हवा. कोर्टाच्या निदर्शनास आले आहे की पोलीस जेव्हा वेश्या वस्तीवर छापे टाकतात तेव्हा देहविक्री करणाऱ्या महिलांसोबत त्यांची वर्तणूक अतिशय क्रूर असते. 

कोर्टाने या संबंधित नाराजगी व्यक्त करताना स्पष्ट केले आहे की, ज्या महिला स्वतःच्या मर्जीने हा व्यवसाय करतात त्यांनासुद्धा सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. यानंतर या निर्णयाच्या समर्थनार्थ आणि विरोधात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. कोणी काय प्रतिक्रिया दिल्या याबाबत चर्चा न करता आज यातील मूलभूत मुद्यांवर चर्चा करण्याचा माझा मानस आहे.

वैद्यकीय व्यवसाय करत असताना एक महिला डॉ्नटर म्हणून माझ्याकडे येणाऱ्या पेशंट महिला असतात. त्यातील अनेक अतिशय गरीब, मोलमजूरी करणाऱ्या असतात पण त्या सन्मानाने जगत असतात. त्यांच्याशी रोज संवाद होतो. त्यावरून माझा असा ठाम विश्वास आहे की कोणतीही महिला स्वतःच्या मर्जीने वेश्या व्यवसायात जाणार नाही. 

वेश्या पैदा नहीं होती, वो बनाई जाती है

ज्या महिला या व्यवसायात आहेत त्या विशिष्ट परिस्थितीला बळी पडलेल्या असतात. आजकाल मुक्त सामाजिक व्यवस्थेत कोवळ्या वयातील तरूण मुली प्रेमाच्या नावाखाली प्रियकराच्या भूलथापांना बळी पडतात, लग्नापूर्वीच त्याच्या स्वाधीन होऊन जातात. जन्मभर ज्यांनी पालनपोषण केले त्या आई-वडिलांचा विरोध डावलून ह्या मुली निघून जातात. किंबहुना त्यांना न सांगताच अनेक मुली आपल्या प्रियकराकर विश्वास ठेवून पळून जातात. यातील अनेक प्रियकर त्यांना भूलथापा देऊन शहरात घेऊन जातात. चार-दोन महिने एकत्र राहतात, सूखाचे दिवस ओसरतातच. एक दिवस प्रियकर त्यांना एखाद्या कुंटणखान्यात विकून पोबारा करतो. अशाप्रकारे अनेक मुली या व्यवसायात ओढल्या जातात. तरूण मुलींचा अखंड पुरवठा सुरू असतो. आई-वडिलांचा विरोध डावलून आपल्या मर्जीने घर सोडून आल्यामुळे व परतीचे दोर कापले गेलेले असल्यामुळे अशा परिस्थितीत या मुली त्या व्यवसायात विवश होऊन अडकतात. या व्यवसायात एकही मुलगी अडकणार नाही याची काळजी घेणे ही खरतर सभ्य समाजाची जबाबदारी आहे. यात फक्त मुलींचा नव्हे तर मुलांच्या भविष्याचाही प्रश्न आहे, कितीतरी मूले

शिक्षणासाठी पैसे घेऊन आई-वडिलांचे पैसे यामागे उधळून टाकतात. आपल्या मुला-मुलींना पवित्र तारुण्य द्यायचे असेल तर हे व्यवसाय बंदच केले पाहिजे. 

’’मय ही नही मिलेगी साकी, 

तो पिलाओगे कहाँ से तुम?’’ 

परंतू असे होताना दिसत नाही. उलटपक्षी अडकलेल्या अशा असहाय महिलांना सन्मान देण्याचे निर्देश कोर्ट देते यापेक्षा दुसरे दुर्दैव ते कोणते? अनेक महिला विधवा झाल्यावर निराधार होतात. त्यांच्या पूनर्वसनाची कुठलीही विश्चासार्ह व्यवस्था नसल्यामुळे नाविलाजाने त्या या व्यवसायामध्ये ओढल्या जातात. अशा परिस्थितीत या महिला स्वतः च्या मर्जीने आल्या असा   अर्थ जर समाज काढत असेल तर ते त्या महिलेचे नव्हे तर समाजाचे दुर्दैव म्हणावे लागेल. 

इस्लामला हा व्यवसाय मान्य नाही. तो या व्यवसायाचा निषेध करतो. वेश्याव्यवसाय थांबविण्याचे सोपे उपाय प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी चौदाशे पन्नास वर्षापूर्वीच सुचविलेले आहेत. ते म्हणजे समाजमध्ये मुला-मुलींचे लग्न वेळेवर व कमी खर्चात होईल याची व्यवस्था करणे. प्रेषित सल्ल. यांनी म्हटलेले आहे की, ‘‘सबसे बेहतरीन निकाह वो है जिसमें खर्च कम हो.’’ 

आज लग्न म्हणजे संकट असल्याचा भास मुलीच्या आई-वडिलांना होत आहे म्हणून कन्याभ्रृण हत्या करण्याची पद्धत रूढ झाली आहे. कायदा करुन सुद्धा ही पद्धत थांबवता आलेली नाही हे विशेष. प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी दाखविलेला मार्ग म्हणजे वेळेवर व कमी खर्चात लग्न करण्याचा मार्ग. हा मार्ग अवलंबविला गेला तर सहज लग्नं होतील. त्यामुळे मुलींना प्रेमप्रकरणात पळायची व प्रियकराच्या भूलथापांना बळी पडण्याची वेळच येणार नाही आणि आई-वडिल्लाना सुद्धा त्रास होणार नाही.

एकदा असे झाले असे झाले की नवीन इस्लाम स्विकारलेल्या काही बदवी (ग्रामीण) मुस्लिमांच्या चर्चेदरम्यान असा प्रश्न उपस्थित झाला की कोणाचा कबिला श्रेष्ठ? त्यावर आपसात गरमागरम चर्चा होऊन प्रकरण हातगाईवर येऊ लागले. कोणालाच दुसऱ्या कबिल्याचे श्रेष्ठत्व मान्य नव्हते. तेव्हा त्यांच्यापैकी एकाने हा प्रश्न प्रेषित सल्ल. यांच्याकडे नेण्याचा सल्ला दिला. तेव्हा सर्वजण प्रेषित सल्ल. यांच्याकडे हजर झाले व आपले गाऱ्हाणे मांडले. तेव्हा प्रेषित सल्ल. उत्तरले, ’’ तुमच्यापैकी ज्या कबिल्यामध्ये विवाह जितका सोपा व व्याभिचार तितकाच कठीण असेल तो कबिला तितकाच श्रेष्ठ.’’ यावरूनसुद्धा सरळ सोप्या लग्नाचा सरळ संबंध वेश्याव्यवसायाशी असल्याचे स्पष्ट होते. लग्न महाग असेल तर ते होणार नाहीत आणि त्यातून व्याभिचार आणि त्या पुढचा अटळ असतो.  

येथे अगदी संक्षेप मध्ये इच्छिते की, इस्लाममध्ये विवाहची संकल्पना अशी आहे की मुलाने मुलीला बघून पसंत करावे व दोन वकील आणि गवाह (साक्षीदार) यांच्या समक्ष इजाब (मागणी) व कुबूल (स्वीकार) व्हावे मुलाने मुलीला महर अदा करावे व वलिमाची दावत ही मुलानेच करावी. मुलीच्या आईवडिलांवर दहेज, हुंडा व लग्नादिवशीची आलीशान मेजवानी हे सगळे इस्लाम मध्ये निषिद्ध आहे. परंतु वस्तुस्थिती या याउलट आहे. त्यामुळे लग्न अवघड होत चाललेत व वेश्याव्यवसाय फुलताहेत. आपण खराब झालेले जोवण आपल्या लेकरांना खाऊ घालत नाही. चांगल्या आणि वाईट पर्यायांपैकी आपण चांगला पर्याय

आपल्या लेकरांसाठी निवडणार. वेश्या ही पण कुणाचीतरी मुलगी, कुणाचीतरी बहीण असणार. आपण आपल्या मुलीसाठी हा व्यवसाय पसंत करणार का? किंवा आपला मुलगा ह्या वाम मार्गाला लागावा हे आपल्याला मान्य असेल का? मग समाजाची प्रतेक मुलगी आपलीच व मुलगाही आपलाच आहे असे समजून आपल्याला हा व्यवसाय बंद होईपर्यंत शांत बसायचे नाही, असा संकल्प करावा लागणार आहे. त्यासाठी लागणारे आवश्यक ते सर्व प्रयत्न करावे लागतील. याशिवाय वेश्याव्यवसाय थांबवण्याचा एक उपाय म्हणजे पुनर्विवाह होय. समाजामध्ये तसाही पुरुषांचा मृत्यूदर महिलांपेक्षा जास्त असतो. त्यात कोरोनासारख्या महामारी नंतर तर तरुण विधवांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली आहे, अशा परिस्थितीत त्यांना सन्मानाने समाजात सामावून घेण्याचा उपाय म्हणजे पूर्नर्विवाह होय. पूनर्विवाहाला चुकीचे समजणे हीच एक मोठी चूक आहे.

याशिवाय एकापेक्षा जास्त लग्न करण्याचा सक्षम पुरूषांनी विचार करायला हवा. जेणेकरूनसमाजामध्ये अतिरिक्त ठरलेल्या महिलांचे समायोजन चांगल्या प्रकारे होऊ शकेल व त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळेल. 

स्त्री सन्मानाचे हे प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी सुचविलेले उपाय हेच खरे उपाय आहेत, वेश्यांना खोटा सन्मान देणे हे उपाय नव्हे. याचा अर्थ असा नाही की ज्या महिला आज वेश्या व्यवसात आहेत त्यांचा सन्मान व्हायला नको. माझे मत असे आहे की सन्मानापेक्षा जास्त त्यांना पूनर्वसनाची गरज आहे. ते सरकारने करावे हा त्यांचा खरा सन्मान ठरेल. माझे स्वप्न आहे की ह्या जगातून वेश्या व्यवसाय संपावा, अल्लाहकडे प्रार्थना आहे की तो माझे हे स्वप्न माझ्या आयुष्यातच खरे झालेले बघण्याची संधी देवो व सगळ्यांना यासाठी प्रयत्न करण्याची सदबुद्धी देवो. (आमीन).

- डॉ. सिमीन शहापुरे


सामाजिक संघटनांचा गौरव : युथविंग, जमाअते इस्लामी हिंदचा उपक्रम


लातूर (आसेफ सय्यद) 

शहरातील युथ विंग, जमाअते इस्लामी हिंद तर्फे या यशस्वीतेकडे (आओ भलाई की तरफ) ही राज्यव्यापी मोहीम 19 ते 29 जून दरम्यान राबविण्यात येत आहे. यानिमित्त लातूर येथील युथ विंगच्या साळे गल्ली स्थित कार्यालयात मोहिमेचा शुभारंभ शहराध्यक्ष अशफाक अहमद यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाची सुरूवात कुरआन पठणाने मुफ्ती वसीम यांनी केली.

मंचावर युथविंगचे शहराध्यक्ष शकील शेख, सय्यद आसेफ, निहाल बागवान,  रफिक शेख यांची उपस्थिती होती. यावेळी जमाअतचे शहराध्यक्ष अशफाक अहमद म्हणाले, चारित्र्यनिर्माण करण्यासाठी प्रत्येक युवकाने पुढाकार घेतला पाहिजेत.आओ भलाई की तरफ म्हणजे या यशस्वीतेकडे या मोहिमेचा उद्देश युवकात चारित्र्यनिर्माण करणे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे, त्यांच्यामधील गुणांना वाव देणे. वाईट गोष्टींना आळा घालण्यासाठी नमाज आणि अल्लाहशी जवळीकता निर्माण केल्यानंतर आम्ही या वाईट गोष्टींपासून दूर राहू शकतो असेही ते म्हणाले. प्रास्ताविक आसेफ सय्यद यांनी केले. ते म्हणाले, आज तरुण वर्गामध्ये पसरलेल्या वाईट सवयी जसे व्यसन, मोबाईलचा चुकीचा वापर, लग्नामध्ये होणाऱ्या अनावश्यक प्रथा, यासारख्या वाईट गोष्टींना आळा घालणेही या मोहिमेचा उद्देश आहे. त्यामुळे प्रत्येक युवकाने या मोहिमेत सहभागी होऊन चारित्र्यनिर्माणासाठी पुढाकार घ्यावा.  यावेळी शहरातील रेड फ्लड फाउंडेशन, उस्मानपुरा बॉईज, जमात-ए-इस्लामी हिंदी निलंगा या उल्लेखनिय सामाजिक काम करणाऱ्या संघटनाचा स्मृतीचिन्ह देऊन जमाअतचे शहराध्यक्ष अशफाक अहमद यांच्या हस्ते गौरविण्यात आले.राज्य शासनाने बुधवार 15 जून पासून शाळा सुरू करण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय घेतला. राज्य शासनाच्या या निर्णयाचं स्वागतच करायला हवं. गेली दोन वर्षे कधी सुरू, कधी बंद असणाऱ्या शाळांमध्ये मुलांचा विशेषत: चिमुकल्यांचा किलबिलाट आता पुन्हा नव्याने, नव्या जोमाने सुरू होणार आहे. 2020-21 व 2021-22 ही दोन शैक्षणिक सत्र शिक्षण क्षेत्राच्या इतिहासात कधी नव्हे ती सुरू बंद होत राहिली. 2020-21 च्या तुलनेत मागील शैक्षणिक सत्र काहीसे दिलासादायक होते. तरी शाळांच्या पूर्ण क्षमतेनं सुरू होण्यास या शैक्षणिक सत्राची वाट पहावी लागली आहे. 

आता नव्याने 2022-23 या शैक्षणिक सत्राला सुरवात होत आहे. शाळा सुरू होणार इतक्यातच कोरोनाने पुसटशी दस्तक दिलीच. कोरोनाचा हा ओझरता स्पर्श रुग्ण वाढीच्या रूपाने सध्या जाणवू लागला आहे. मात्र राज्याच्या टास्क फोर्सने शाळा सुरू करण्याबाबत हिरवा कंदिल दाखविल्याने शाळा सुरू होण्यास सद्यातरी काही अडचण नाही. 

15 जून पासून विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होत असल्या तरी तात्काळ अभ्यास सुरू व्हायला नको असं जाणकारांचं मत आहे. अनेक प्रयोगशील शिक्षक सुद्धा या विचाराचे समर्थक आहेत. कारण शाळेसाठी आधी मुलांची मानसिकता तयार करायला हवी. शाळेत येण्याची, वर्गात बसण्याची, शिक्षण घेण्याची, शिस्तीत वागण्याची आणि वेळापत्रकाचं, शिक्षकांच्या सूचनांचं पालन करण्याची सवय मुलांना लागायला हवी. यापूर्वी मुलांनी कधी नव्हे एवढ्या मोठ्या सुट्या अनुभवलेल्या आहेत. गेली दोन शैक्षणिक सत्र शाळा सुरू-बंद होत राहिल्याने शाळा पूर्ण वेळ, पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्यामुळे मुले काहीशी संभ्रमात होती. शाळेत कमी आणि घरीच त्यांचा जास्त वेळ गेला. पालकही मुलांना शाळेत पाठवावे किंवा कसे या दृष्ट चक्रात सापडले होते. त्यामुळे मुलांची घरी राहून काहीशी शिस्त बिघडली आहे. त्यांचं झोपण्याचं, उठण्याचं, जेवणाचं वेळापत्रक बिघडलं आहे. त्यांची शिकण्याची गती बरीचशी मंदावली आहे. वाचन आणि लेखनासोबतच त्यांच्या आकलनाच्या गतीत कमालीची घट झाली आहे. यासर्व बाबी रुळावर येण्यासाठी काही काळ लागेल. तो आम्ही त्यांना द्यायलाच हवा. त्यासाठी शाळा सुरू होताच लगेच अभ्यासाची घाई नको. परीक्षा तर नकोच नको. 

मुलांसाठी सुरू होणाऱ्या शाळा यावेळी सुखद धक्काच आहे. प्रदीर्घ काळाने शाळेत आल्यावर त्यांना मित्रांना भेटू द्यायला हवं. त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारू द्याव्यात. मनमोकळं बोलू द्यावं. मुलांना थोडं हलकं होवू द्यावं. गाणी, गप्पा आणि गोष्टींची धम्माल वर्गात होऊन जाऊ द्यावी. वर्गात व शाळेत किमान दोन आठवडे तरी गाणी, गप्पा आणि गोष्टींचा हा आनंद महोत्सव सुरू राहायला हवा. शिक्षकांनी मुलांच्या या गप्पांमध्ये सहभागी व्हायला हवं. कारण त्यांची मोठी भूमिका या नव्यानं सुरु होणाऱ्या शिक्षण प्रक्रियेत असणार आहे. गप्पात भाग न घेणाऱ्या मुलांना बोलतं करायला शिक्षकांचे जाणीवपूर्वक प्रयत्न असायला हवेत. 

शाळा सुरू होताच अभ्यासाचा घोषा मुलांमागे न लावता त्यांना पुस्तकं चाळायला, वाचायला द्या. पदार्थ बनवायची कृती सांगू द्या. प्राणी, पक्षी, वाहने, शास्त्रज्ञ, खेळाडू, संत, थोर नेते, राष्ट्रपुरुष, समाजसुधारक यांच्या विषयी बोलू द्या. चर्चा करू द्या. माहितीसह चित्रांचा संग्रह करायला सुचवा. वर्तमानपत्राची एका विषयाची माहिती देणारी कात्रण वही बनवायला सहकार्य करा. शालेय परिसरात किल्ला बनवू द्या. मातीच्या, कापडाच्या विविध वस्तू, आकार बनवू द्या. कागदापासून विविध वस्तू तयार करुन घ्या. त्यांची प्रदर्शनी लावा. पाऊस मोजू द्या. पाऊस जमिनीत जिरवू द्या. झाडं लावू द्या. गाणी गाऊ द्या. ती रेकोर्ड करून ठेवा. विविध विषयांवर माहिती लिहू द्या. ती भाषण रुपाने व्यक्त करायला सांगा. ही भाषणं रेकॉर्ड करा. वाद्य वाजवू द्या. वाद्य ऐकू द्या. संगीताचा आनंद घेवू द्या. मेहंदी काढणं, कोन बनविणं ही कामंही करु द्या. शाळेत रांगोळी घालायला सांगा. रांगोळीची वही बनवू द्या. फराळाचे व खायचे विविध पदार्थ कसे बनवितात याचं मुलांचं स्वत:चं ‘होममेड’ रेसिपी बुक तयार करु द्या.

कोविडमुळे गेले अनेक दिवस शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती बदलली आहे. यापूर्वी सुरु झालेल्या शाळांमधील मुलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात रोडावली होती. अनेक विद्यार्थ्यांना दुपारच्या सत्रात वर्गात उपस्थित राहण्याची इच्छाच होत नव्हती. तेव्हा विद्यार्थ्यांना पूर्ववत शैक्षणिक प्रवाहात आणण्याकरीता विद्यार्थ्यांना आवडेल, रुचेल, पचेल असे हलके फुलके आनंददायी उपक्रम शाळेने घ्यावेत. खेळण्या बागडण्याचा हा आनंद महोत्सव शाळांशाळांमध्ये राबविला जावा. विद्यार्थ्यांचे गट करून गटांना विद्यार्थ्यांना आवडेल अशी नावे द्या. दररोज एक इनडोअर व एक आउटडोअर उपक्रम घ्या. सुलेखन, संगीत खुर्ची, अंताक्षरी, लिंबू चमचा, एक मिनिट स्पर्धा, दोरीवरच्या उड्या, संदेश पोहचविणे, रंग भरण, पोत्याची शर्यत, बेडूक उडी, बटाटा शर्यत, कोडे ओळखा, सुई दोरा, शुभेच्छा कार्ड बनवणे, स्लो सायकलींग, अनुभव कथन, कथा कथन, कविता वाचन व गायन, धावणे, मनोरंजक प्रश्नमंजुषा, वेशभूषा, नाट्यीकरण, नकला, क्रिकेट, एक पात्री प्रयोग, फुगडी असे अनेक खेळ, स्पर्धा बाल महोत्सवातंर्गत घ्या. स्पर्धांमधील विजेत्या मुलांना बक्षिसे देऊन त्यांचा उत्साह वाढवा. गप्पात, खेळात आणि स्पर्धांमध्ये भाग न घेणाऱ्या मुलांना बोलतं करायला, सहभागी व्हायला शिक्षकांचे प्रयत्न असावेत. शिक्षकांनी असे प्रयत्न केले तर शाळेत मुले येतील. आलेली मुले पूर्ण वेळ टिकतील. त्यामुळे ते पुन्हा एकदा शिकू लागतील.

वर्गात आणि शाळेत मुलांचा हा आनंदोत्सव सुरू करण्याची, तो टिकेल असं वातावरण तयार करण्याचं काम शिक्षकांनी शाळा सुरू होताच हाती घ्यायला हवं. त्यासाठी आवश्यक ते नियोजन आणि पूर्वतयारी त्यांना करावी लागेल. 

मुलांच्या शाळेत जाण्याची तयारी पालकांनी सुध्दा करायला हवी. मुलांच्या वह्या, पुस्तके लेखन साहित्य, स्कुल बॅग, पाण्याची बाटली, शूज, सॉक्स, गणवेश या गोष्टींची तयारी तर आलीच शिवाय मुलांना शाळेसाठी वेळेवर उठण्याची, शिस्त व वेळापत्रक पाळण्याची सवय लागावी म्हणून शाळा सुरू होण्यापूर्वी चार दिवस आधी त्यांना या बाबींची जाणीव करून द्यायला हवी. शाळेत राहावं कसं? वागावं कसं? याचं प्रशिक्षण घरी द्यायला हवं. आवश्यक त्या सूचना द्यायला हव्यात. त्यांचं पालन करायला सांगायला हवं. मुलं एकदा शाळेत रूळली की मग हळूहळू त्यांना अभ्यासाकडे वळवायला हवं. मुलांना एकदाची शाळा सरावाची झाली की त्यांना स्वाध्याय, गृहकार्य, सराव व मग अभ्यासाला लावायला हवं.

- आमीन चौहान

9423409606

(लेखक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित प्रयोगशील शिक्षक आहेत.)मादक पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी २६ जून रोजी साजरा केला जातो. जगाला अंमली पदार्थांच्या व्यसनापासून मुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृती आणि सहकार्य मजबूत करणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे. या वर्षीची थीम "आरोग्य आणि मानवतावादी संकटातील अंमली पदार्थांचे आव्हाने सोडवणे" आहे. अंमली पदार्थांचे व्यसन हे समाजाचे एक असे संकट आहे, जे सतत पिढ्यानपिढ्या पसरत चालले आहे, लहान मुलांपासून तरूण आणि वृद्धांपर्यंत सुद्धा त्याच्या विळख्यात आहेत. स्वस्त नशेसाठी घातक रासायनिक पदार्थांचा उग्र वास (पेट्रोल, थिनर, हँड सॅनिटायझर, व्हाइटनर, वेदना कमी करणारे लोशन, क्लिनिंग लिक्विड) ओढला जातो, मुले रस्त्याच्या कडेला किंवा घाण निर्जन ठिकाणी अशी नशा घेताना दिसतात. थोड्याशा गुंगीत टाकणाऱ्या क्षणाचा मोहात व्यसनाधीनाचे अयोग्य वर्तन आणि गंभीर आजारांनी अनमोल जीव वेदनादायकपणे संपविले जात आहे. जीवनाबरोबरच नशा आरोग्य, कुटुंब, नातेसंबंध, आर्थिक, सामाजिक मान-प्रतिष्ठाही नष्ट करते, कोणताही सुसंस्कृत माणूस नशा करणाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवू इच्छित नाही. असंख्य पैसा खर्च करूनही आपण एक क्षणाचे आयुष्य विकत घेवू शकत नाही आणि आपण आनंदाने नशेचे विष प्राशन करतोय, यापेक्षा मूर्खपणा या जगात कोणता असू शकतो की आपण स्वतः नशेच्या आहारी जावून जीव संपवतोय. दररोज मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची खेप पकडली जावून हजारो कोटींचा माल जप्त करण्यात आला आहे, अशा बातम्या वारंवार येत असतात, दिवसेंदिवस अमली पदार्थांच्या व्यसनाची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. 

व्यसन हा एक आजार आहे ज्याचा मेंदू आणि वर्तनावर वाईट परिणाम होतो. जेव्हा तुम्हाला ड्रग्सचे व्यसन असते, तेव्हा तुम्ही ते वापरण्याच्या प्रतिकार करू शकत नाही, मग ते तुम्हाला कितीही नुकसान करीत असले तरीही. तंबाखू, अल्कोहोलपासून ते गांजा, ओपिओइड्स, हेरॉइन, बेंझोडायझेपाइन्स, मेथॅम्फेटामाइन, कोकेन, भांग, स्टिरॉइड्स सारखे अनेक विषारी अंमली पदार्थ वापरली जातात. देशात, भांग, हेरॉईन आणि अफू ही सर्वात जास्त वापरली जाणारी अंमली पदार्थं आहेत परंतु मेथॅम्फेटामाइनचा वापर देखील वाढत आहेत. ड्रग्सचे इंजेक्‍शन घेणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, भारतात हेरॉईनचे दहा लाख वापरकर्ते आहेत, परंतु अनधिकृत अंदाजानुसार ५ दशलक्ष ही वास्तविक आकडेवारी आहे. 

युनायटेड नेशन्स मधील ऑन ड्रग्ज अँड क्राइम्स (यूएनओडीसी) च्या वर्ल्ड ड्रग रिपोर्ट २०२१ नुसार, गेल्या वर्षी कोविड-१९ महामारी दरम्यान जगभरात सुमारे २७५ दशलक्ष लोकांनी ड्रग्सचा वापर केला, २०१० च्या तुलनेत २२ टक्के वाढ झाली आहे. व्यसन करणाऱ्यांच्या एकूण संख्येपैकी १३ टक्के, म्हणजे ३६.३ दशलक्ष लोक अंमली पदार्थांच्या वापराच्या विकारांनी ग्रस्त आहेत. ताज्या जागतिक अंदाजानुसार, ५ ते ६४ वयोगटातील सुमारे ५.५ टक्के लोकांनी गेल्या वर्षी किमान एकदा तरी अंमली पदार्थं वापरले आहे. असा अंदाज आहे की जागतिक स्तरावर ११ दशलक्षाहून अधिक लोक अंमली पदार्थांचे इंजेक्शन घेतात, त्यापैकी निम्मे हेपेटायटीस सी ग्रस्त आहेत. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडीनुसार, बेकायदेशीर औषधांमुळे २०१७ मध्ये जगभरात सुमारे ७.५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. भारतातील अंदाजे मृतांची संख्या २२,००० होती. काही अंदाजानुसार, जागतिक अंमली पदार्थांच्या तस्करीचा व्यापार ६५० अब्ज डॉलर इतका आहे. 

२०१९ मध्ये भारतातील अंमली पदार्थांच्या वापराच्या प्रमाणात आणि नमुन्यावरील राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार, देशातील लोकसंख्येपैकी सुमारे २.१% (२.२६ कोटी लोक) ओपिओइड्स वापरतात ज्यात अफू, हेरॉइन आणि फार्मास्युटिकल ओपिओइड्सचा समावेश आहे. एम्सच्या अहवालानुसार, १०-७५ वर्षे वयोगटातील सुमारे २.८% भारतीय (३.१ कोटी लोक) गांजा आणि चरस वापरत आहेत. गेल्या दशकात भारतात अंमली पदार्थांचे सेवन आणि दारूचे व्यसन दुपटीने वाढले आहे.

व्यसनाचा आहारी गेल्यामुळे शारीरिक आणि मानसिक बदल होतात. डोळे लाल होणे, तोंडाची दुर्गंधी येणे, खाण्यापिण्याच्या सवयी आणि झोपेत बदल, चिडचिडपणा, शिवीगाळ करणे, अस्वच्छता, शरीर आणि मन अनियंत्रित, अनावश्यक कुरकुर करणे, स्वतःशिवाय इतरांना महत्त्व न देणे, स्वत:मध्ये हरवणे, व्यसनासाठी चोरी करणे किंवा खोटे बोलणे, नाट्यमय देखावे करणे आणि सर्वात मोठा दोष नशेच्या अवस्थेत अयोग्य निर्णय घेणे हा आहे. जगातील बहुतांश गुन्हे हे नशेमुळे किंवा नशेच्या अवस्थेत होतात. अंमली पदार्थं माणसाच्या भावना, मन, निर्णय क्षमता, शिकवण आणि स्मरणशक्तीवर परिणाम करतात. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे मेंदूमध्ये दीर्घकाळ होणारे बदल म्हणजे डिप्रेशन, आक्रमकता आणि मतिभ्रम सारखे विकार होऊ शकतात. अंमली पदार्थांचे व्यसन शरीराच्या जवळजवळ प्रत्येक भागावर दुष्परिणाम करते. तसेच इतर आरोग्य समस्या जसे की कर्करोग, हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार, मानसिक विकार आणि संसर्गजन्य रोग जसे की एचआईवी / एड्स, हिपॅटायटीस आणि क्षयरोग होऊ शकतात. 

चांगले संस्कार, चांगले संगोपन आणि प्रत्येक पावलावर मुलांना योग्य मार्गदर्शन करणे ही पालकांची सर्वात मोठी जबाबदारी असते, ही जबाबदारी पैसे खर्चून किंवा लाड पुरवून पूर्ण होत नाही. त्यांनी वेळीच मुलांची काळजी घेतली नाही तर ही मुले मोठी होऊन समाजासाठी नासूर बनतात आणि त्या पालकांच्या निष्काळजीपणाची शिक्षा संपूर्ण समाजाला भोगावी लागते. कळत-नकळत आपण अनेकदा आपल्या आजूबाजूला अंमली पदार्थं संबंधित अनैतिक कृत्ये पाहतो, परंतु आपल्यापैकी बहुतेकजण लक्ष देत नाहीत आणि आपल्या सामाजिक जबाबदाऱ्यांपासून दूर पळतात, परंतु आपला हा मूर्खपणा देशासाठी आणि जगासाठी अत्यंत घातक ठरतो. जीवन उध्वस्त करण्यासाठी आणि वाढत्या गुन्ह्यांसाठी व्यसन सर्वाधिक जबाबदार आहेत, जे सातत्याने वाढत आहे. समाजातील बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या तस्करीच्या समस्येबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी सर्वांच्या मदतीने आपण एकत्रितपणे जगातील ह्या समस्येचा सामना करू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला नशा संबंधित समस्या आहे, तर ताबडतोब मदत घ्यावे. व्यसनी व्यक्तीला जितक्या लवकर उपचार मिळतील तितके चांगले. मन की बात सत्रादरम्यान, पंतप्रधान मोदींनी व्यसनमुक्तीसाठी उपाय शोधत असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइन १८००-११-००३१ सुरू केली आहे. तुम्हाला अमली पदार्थांची तस्करी/अपघात किंवा गंभीर घटनांबद्दल काही माहिती असल्यास, कृपया नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोशी +९१-११-२६७६१००० या दूरध्वनी क्रमांकावर त्वरित संपर्क साधावे. व्यसनमुक्तीसाठी रुग्णालये, स्वयंसेवी संस्था, व्यसनमुक्ती केंद्रे आणि इतर मदत गट संस्था आपल्यासोबत नेहमीच तत्पर आहेत. व्यसनाधीनता माणसाला मानसिक गुलाम बनवते, कोणत्याही गोष्टीचे अतिरेकी व्यसन विध्वंस आणते. आज आपल्या आधुनिक समाजात विषारी औषधांसोबतच शॉपिंगचे व्यसन, फास्ट फूडचे व्यसन, टीव्हीचे व्यसन, सोशल मीडियाचे व्यसन, इंटरनेट गेमिंगचे व्यसन हे देखील अतिशय घातक पातळीवर वाढले आहे, ज्यामुळे मानसिक तणाव आणि घरगुती कलह निर्माण होत आहे. जीवनाचे मूल्य समजून घ्या, स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या, जबाबदार व्हा, स्वाभिमानी आणि समाधानी बना, तणावमुक्त आणि व्यसनमुक्त जीवन जगा.

- डॉ. प्रितम भी. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041

(जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन - २६ जून)


''सुख म्हणजे नक्की काय असतं?'' या शीर्षकाची दूरदर्शनच्या वाहिनीवर मालिका सध्या सुरू आहे. सुख नेमके कशात आहे किंवा सुख कशाला म्हणावे, असे प्रश्न यच्ययावत सर्वच मानव मनाला पडलेला असतो, त्यातूनच आपल्या स्वतःच्या जीवनात चांगला बदल घडावा, असे प्रत्येकाला वाटत असते; प्रत्येक माणसाच्या वाट्याला आलेले जीवन, संघर्षमय, कष्टमय असले तरी त्यातही सुखासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. याच वाटचालीत अपार कष्ट, अविश्रांत परिश्रम आणि प्रचंड चिकाटी या जोरावर सुखाचा ज्यांनी ज्यांनी शोध घेतला त्यांच्या जीवनात सुखाचा सूर्य उगवला असल्याचे आपल्याला दिसून येते.

खरं तर प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या जीवनात चांगलं सकारात्मक, आनंददायी बदल व्हावा, असे मनापासून  वाटत असते; अर्थात तशी अत्यंतिक जरुरी व मनापासून तळमळ त्याच्या ठिकाणी असली पाहिजे, मनातल्या मनात अर्थात अंतर्मनात आपल्या मनाजोगं व्हावं असं सत्य त्याला वाटलं पाहिजे; तशी तळमळ त्याच्या कृतीतूनही दिसली पाहिजे; अर्थात अंतर्मन हे प्रत्येकाच्या जीवनात सुपरिणाम घडवून आणत असते; एखाद्या गहन परिस्थितीला तोंड देत असताना देखील मनातून केवळ सकारात्मक विचारांमुळे नेहमी तुम्ही आनंदी होऊ शकता.गहन परिस्थितीतून मी सहीसलामत बाहेर पडणार आहे, माझी तशी कुवतच आहे, माझ्या समोर उभ्या राहिलेल्या गहन परिस्थितीशी मी अत्यंत सहजपणे लढणार आहे; त्यातून मी आनंदाच्या, यशस्वी वाटेकडे निश्चित अगदी नजीकच्या काळात मार्गत्क्रमण करणार आहे, असा आत्मविश्वास जागृत केला तरी अर्धी लढाई जिंकली म्हणून समजा.

तुमचं कुणाशी बिनसलं असेल, किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीपासून बचाव करायचा असेल आणि त्याच्यापासून दूर जाणे कठीण होत असेल अर्थात 

‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं’ अशी मनाची भावना झाली असेल तर अशा गंभीर अवस्थांतून सुटण्यासाठी एक सहज साधा उपाय आपण अवलंबायला हवा, तो म्हणजे  स्वतःचा स्वाभिमान जागृत करून “मी कुठेही चुकत नाही; माझा हेतू पूर्ण प्रामाणिक आहे. समोरच्याच्या मनात वाईट असेल, त्याची नियत खराब असेल किंवा त्याला आपण जे करतो आहे ते चुकीचे आहे याची जाणीव होत नसेल तर आपल्या स्वतःचा आत्मसन्मान जागृत करून, सकारात्मक दृष्टिकोनातून त्याचा त्याग करा; आपल्यामुळे होणाऱ्या लाभाला आजपासून तो मुकला आहे, असे आपल्या मनाला समजवा.आपण मनातून चांगले वागत असताना मी त्रास सहन  का करू? असा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारला तर अशा गंभीर परिस्थितीतून सहज मार्ग काढू शकता. यानंतर मात्र आपली गाडी सुसाट वेगाने अपेक्षित ध्येयाकडे नेता येते.

सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे संगीत साधनेतील तंबोरा. तंबोऱ्यावरच्या तारा जुळवून घेणे जसे महत्त्वाचे असते किंवा तबला डग्गा यांचे आणि हार्मोनियमचे सूर लावून घेणे जसे महत्त्वाचे असते तसेच जीवनात सकारात्मक विचार आणि दृष्टीकोन महत्वाचा असतो, तंबोरा व तबला डग्गा हार्मोनियमच्या  स्वरांच्या पट्टी बरोबर जमला की गायकाचे सूरही जमून जातात आणि उत्तरोत्तर मैफल  रंगत जाते, तसेच आपल्या जीवनाचा हा सूर एकदा का सकारात्मक सुरांशी जुळला की, जीवन आनंदमय आणि सुखमय झालेच म्हणून समजा. त्यात ही थोडीशी विनोद बुद्धी व हजरजबाबीपणा असला की, मानवाच्या मनात प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतोच.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनेकांना आपले काही खरे नाही, हे माझ्याच वाट्याला का आले! मी यातून लवकरात लवकर बरे होईल का, अशा प्रकारचे असंख्य प्रश्न मनाला घेरून टाकतात; या सर्व प्रश्नांना पुरून उरणार उत्तर नक्कीच आहे, ते म्हणजे 

‘आत्मविश्वास’. माझ्या जवळच्या परिचयातील  एका व्यक्तीला पॅरालेसीसचा अटॅक आला. अत्यंत उमेदीच्या काळात त्याला या रोगाने पछाडले, सुरुवातीला तो खचून गेला, वरीलप्रमाणे असंख्य प्रश्नांचे जाळे त्याच्या मनाला जेरबंद करू लागले. पण थोड्याच दिवसात वैद्यकीय उपचारांबरोबरच त्याने आपला आत्मविश्वास वाढवला. आपल्या अंतर्मनाला "मी पूर्णपणे पहिल्यासारखा बरा होऊ शकतो, ह्या आजारातून मला लवकरात लवकर मुक्त व्हायचे आहे.'' अशा प्रकारच्या स्वंयसूचना देऊन त्याने अत्यंत आत्मविश्वासाने हळूहळू या आजारातून बाहेर पडून, थोडाफार शारीरिक व्यायामाला  सुरुवात केली आणि आश्चर्य म्हणजे काही महिन्यातच तो या जीवघेण्या आजारातून सहीसलामत बाहेर पडला. जगातील  मानसशास्त्र, ऋषी मुनी यांनी स्वतःच्या मनाच्या ताकदीबद्दल सांगितले आहे. “जे जे म्हणून अंतर्मनात किंवा सुप्त मनात, ते ते अनुभवायला मिळते", हाच मानवी जीवनातील मोठा नियम सांगितला आहे. मानवी जीवनातील अंतर्मनातील अथवा सुप्त मनातील ताकद प्रभावीपणे काम करते ते स्पष्टपणे सांगितले आहे. तुमच्या अंतर्मनात अर्थात सुप्त मनात आनंदी विचार व भावना याची पेरणी करीत रहा. आणि मग फरक पाहा, तुमच्या मनातील सर्व नकारार्थी विचार कुठल्या कुठे लुप्त होतात.

चौथी पास शिकलेल्या कोल्हापुरातील एका प्रचंड यशस्वी उद्योगपतींची मुलाखत घेताना मी सहज विचारले, ''तुमचे मोठे होण्याचे रहस्य काय?" त्यावर ते गालातल्या गालात हसले आणि मला म्हणाले, ''मला एखादी गोष्ट करता येणार नाही असे मला माझ्या मनाला माहितीच नव्हतं किंवा तसं कधी वाटलंच नाही." या त्यांच्या उत्तरातच त्यांचे यशाचे रहस्य लपलेले आहे, या अल्पशिक्षित उद्योगपतींना अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशात पाचारण केले जायचे,तिथेही त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले होते. औद्योगीक विश्वात त्यांना यश मिळाले, तात्पर्य काय तर आपण मनात आणले तर मोठमोठी कामं लिलया हाताळू शकतो. संतश्रेष्ठ जगत्गुरू तुकोबाराय यांनी म्हटल्याप्रमाणे “अशक्य ते शक्य करता सायास...”  हा मंत्र प्रत्यक्षात उतरलेला दिसून येतो.

अंतर्मनाला दिलेल्या सूचना निश्चितपणे कृतीत उतरलेल्या अनुभवायला मिळतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनेक यशस्वी व्यक्तींचा जवळून अभ्यास केला तर आपणास अंतर्मनाच्या ताकदीचा प्रत्यय दिसून येतो, शिवाय प्रचंड आत्मविश्वास निर्माण करायचे फार मोठे काम हे अंतर्मनच करीत असते. तेव्हा तुम्ही एखाद्या गहन परिस्थितीला तोंड देत असला? तुमचं कुणाशी वैरअसेल? तुम्हाला सतत अपयश येत असेल? एखादी कला साधत नसेल? प्रकृती अस्वस्थेमुळे तुम्ही त्रासला असाल, अनेक गंभीर प्रश्नांनी तुमचे दैनंदिन जीवन व्यापून उरले असेल तर त्यावर एकच सहज सोपा उपाय म्हणजे “या प्रश्नातून मी मला सहजपणे सोडवणार आहे,आजच्या क्षणापासून माझ्या परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल होत आहे, माझा इथून पुढचा प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस आनंददायी जाणार आहे” अशा सकारात्मक सूचना अंतर्मनाला दिल्यातर बघता बघता तुमचे अंतर्मनच तुमच्या प्रश्नापासून तुमची सुटका करणार आहे; सकारात्मक दृष्टिकोन व्यक्तीला नेभळट, बावळट किंवा भित्रा करत नाही हे निश्चित लक्षात ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन असेल तर व्यक्ती कधीच परिस्थितीला घाबरून पळून जात नाही. तिला मनापासून वाटत असते की, आपण सगळं यशस्वीपणे सांभाळून यातून पार पडू. प्रचंड आत्मविश्वास असल्यामुळे अशा व्यक्ती अपयशाकडून यशाकडे झेप घेतात, अर्थात इतरांना ही अशा व्यक्ती प्रेरणादायी ठरतात..!

-सुनीलकुमार सरनाईक

   भ्रमणध्वनी : ९४२०३१६३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत)गरिबी आणि अन्याय्य अर्थव्यवस्थेनं केवळ भारतातच नव्हे तर साऱ्या जगात थैमान घातलेलं आहे. गरीब आणि उपासमारीने ग्रस्त जगातील सर्व देशांमध्ये भारताचा नंबर खालून तिसरा-चौथा लागतो. भारताच्या ३० टक्के संपत्तीवर केवळ दहा टक्के लोक काबीज आहेत, तर २० टक्के संपत्तीवर एक टक्का श्रीमंतांचा कबजा आहे. ही देशातील स्थिती जागतिक अन्याय्य अर्थव्यवस्थेशी भिन्न नाही. महामारीच्या काळात जगातल्या श्रीमंतांनी दर सेकंदाला ३० अब्जोपती वाढत होते, त्या वेळेला जागातील ९९ टक्के लोक गरिबीशी झुंज देत होते. भारतात बेरोजगारीची समस्या सर्वोच्च स्थानावर पोहोचली आहे. सरकारकडे लाखो रिक्त जागा असताना त्या भरल्या जात नाहीत. नवीन रोजगार, शासकीय नोकऱ्यांच्या संधी निर्माण केल्या जात नाहीत, ही चिंतेची बाब आहे. जगातून दारिद्र्याचे उच्चाटन करण्यासाठी नवनव्या राजकीय आर्थिक संकल्पना व विचार विकसित केले गेले. लोकशाही अर्थव्यवस्थेद्वारे जगातल्या सर्व नागरिकांना म्हणजेच ज्या राष्ट्रांनी ही विचारधारा स्वीकारली त्यांनी सुरुवातीला यशस्वीपणे ती राबविली. परिणामी या राष्ट्रांतील राहणीमानाचा दर्जा सर्वच नागरिकांचा उंचावला. सर्वांना रोजगाराच्या, आर्थिक विकासाच्या समान संधी मिळाल्या त्या देशांमध्ये सुबत्ता नांदली. देखादेखी इतर तिसऱ्या जगतातल्या राष्ट्रांनीही ही व्यवस्था अंमलात आणली. जगभर लोकशाही व्यवस्थेला मानवतेचे तारणहार म्हणून प्रसिद्धी दिली. अमेरिकेने लोकशाहीचा ध्वज हातात घेऊन अरब देशांमध्ये ती रुजविण्याची मोहीम हाती घेलती. सबंध युरोप आणि इतर देशांनीही अमेरिकेपुढे नतमस्तक होऊन तिची लाचारी स्वीकारत या अरब देशांत मानवतेचा इतकं रक्त सांडलं की त्यांच्या लोकशाहीवादीच्या पिढ्यान् पिढ्यांचे चेहरे या रक्तानं माखलेलेच राहणार आहेत. जुन्या भांडवलदारांनी लोकशाहीच्या या ताफ्याला भिऊन आपले चेहरे पडद्याआड लपवले. पण पाहता पाहता याच लोकशाही व्यवस्थेला आपल्या दावणीला बांधून घेण्यात त्यांना यश मिळाले. ते परतले आणि इतक्या जोमाने परतले की सध्या जगातील ८० टक्के संपत्ती मूठभर धनदांडग्यांनी असा ताबा घेतला की त्यांच्या विळख्यातून लोकशाहीला सुटणे शक्य नाही. जगातली मानवता हे सर्व आपल्या डोळ्यांनी पाहत असून ती हतबल आहे, पण सदासर्वदा अन्याय-अत्याचार जगात कुणीही माजवू शकत नाही. यांचा पापांचा घडा भरणार त्या वेळेपर्यंत अब्जावधी जनतेला वाट पाहावी लागणार. या काळात कोट्यवधी लोकांचे प्राण भुकेने ग्रस्त होऊन जगाचा निरोप घेतील. पण त्यांचे प्राण वाया जाणार नाहीत. शेवटी एक शक्ती हे सर्व पाहत आहे आणि तिचा न्याय झाल्याशिवाय राहणार नाही. भारतात एकीकडे बेरोजगारीने कोट्यवधी तरुणांचे हाल झालेले असताना त्या संधीची वाट पाहत ज्या तरुणांनी सैन्यभर्तीसाठी तयारी करून ठेवली, दोन वर्षांनी भर्ती होईल याची अपेक्षाच नव्हे तर ती स्वप्ने उराशी घेऊन कित्येक रात्री त्यांनी जागूनच काढल्या असतील, ती संधी आली, पण एक नवीनच. देशात अग्नीपथ योजनेद्वारे फक्त चार वर्षांची नोकरी तोकडा पगार, कोणत्याच सोयी-सुविधा नाहीत. त्यांचे स्वप्न मातीत मिळाले. कितीही या योजनेचा विरोध केला तरी ती लागू करणारच, असा शासनाचा निर्धार. मग आता पुढची वाट काय हे कुणाला कळेना. या योजनेद्वारे जी बेरोजगारी सध्या आहे तशीच ती पुढच्या काळातदेखील चालू राहावी, त्यात आणखीन भर पडावी अशी तरतूद केलेली आहे. यापुढे काय होणार हे सरकारला माहीत असले तरी कोट्यवधींना काहीच माहीत नाही, ही दुर्दैवाची बाब. या योजनेचा तरुणांनी स्वीकार करावा यासाठी भाजपचे नेते शर्थीचे प्रयत्न करत आहेत. एवढेच नव्हे तर तिन्ही सेनाप्रमुखांनी सुद्धा ही जबाबदारी स्वीकारली. पण भाजपच्या नेत्यांना धड तरुणांना पटवून देता येत नाही. कुणी म्हणतो आमच्या ऑफिसमध्ये त्यांना चौकीदाराची नोकरी देऊ, कुणी म्हणतात त्यांना न्हावी, धोबी वगैरेचे प्रशिक्षण देऊ. म्हणजे जखमांवर मीट चोळण्याचा हा प्रकार. इतर काही मंडळींना अशी भीती लागून आहे की सैनिकी प्रशिक्षण घेतल्यावर चार वर्षांनी बेरोजगार होणाऱ्या तरुणांना इतर कोणत्या समाजाविरुद्ध वापरले जाईल. पण अशी कोण योजना आखत असतील तर भविष्य त्यांच्या हाती नाही. ज्या क्षणी आज जगतो आहोत त्यानंतर आपण कुठे राहू हे कोणत्याही प्राण्याला माहीत नाही, तर भविष्यात काय होणार अशी चिंता कुणी करू नये आणि जे भविष्यात कोणती योजना राबवण्याचा विचार करत असतात तर भविष्यावर कुणाचाच अधिकार नसतो, हे तथ्य आहे.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की या जगात जे काही प्रेषित पूर्वी होऊन गेले आहेत त्यांच्या शिकवणीत असे म्हटले आहे की ‘‘जर तुम्हाला लाज वाटत नसेल तर मग तुम्ही वाटेल ते करा.’’

(अबु उकबा, अम्रो अन्सारी, बुखारी)

याचा अर्थ असा की ज्या माणसाला कोणतेही कृत्य करताना लाज वाटत नसेल तर तो काहीही करू शकतो. कुकर्म करताना ज्या माणसाला लाज वाटत असेल तर तो असे कृत्य करणार नाही.

दुसऱ्या एके ठिकाणी प्रेषित (स.) म्हणाले की, जेव्हा अल्लाह एखाद्या माणसाला नष्ट करू इच्छितो तेव्हा तो त्याच्याकडून लाज-लज्जा हिरावून घेतो. आणि ज्या माणसाकडून हे काढून घेतले ते तर अशा माणसाला कुणी पसंत करत नाही. इतर लोक त्याची घृणा करतात. आणि जेव्हा तो माणूस या दशेला पोहोचतो तेव्हा अल्लाह त्याच्याकडून प्रामाणिकता हिरावून घेतो. तेव्हा तो इतरांशी प्रामाणिक राहत नाही. छल-कपट करतो. जेव्हा अशी व्यक्ती या दशेपर्यंत पोहोचते तेव्हा अल्लाह त्याच्याकडून दयाभावना हिरावून घेतो. अशा अवस्थेत तो भ्रष्टाचार आणि अनैतिकतेत गुरफटून जातो. या दशेपर्यंत पोहोचल्यावर अल्लाह त्याच्याकडून श्रद्धा हिरावून घेतो. आणि या अवस्थेत तो सैतानासारखा होऊन जातो.

प्रेषित (स.) म्हणतात, ‘‘लाज माणसाला भलाईकडे नेते. ज्या माणसामध्ये हे दोन गुण असतात त्याला अल्लाह पसंत करतो.’’

त्यांच्या अनुयायींनी विचारले, ‘ते दोन गुण कोणते?’

प्रेषित (स.) म्हणाले, ‘‘शालीनता आणि लज्जा.’’

अनुयायींनी पुन्हा विचारले, ‘ह्या गोष्टी आधीपासूनच आहेत की आताच आहेत.’

प्रेषित (स.) यांनी उत्तर दिले, ‘‘हे पूर्वीपासूनच आहेत.’’

प्रेषित (स.) यांनी आणखी एके ठिकाणी असे म्हटले आहे, ‘‘अल्लाहशी अशा प्रकारे लज्जा बाळगा जसे तुम्ही घरातल्या वडीलधारी माणसांसमोर लज्जा बाळगता. अल्लाहपासून लाजण्याचा अर्थ असा की आपल्या डोक्यामध्ये आणि पोटात वाईट आणि निषिद्ध गोष्टी जाऊ देऊ नका. आणि सदैव मृत्यू आणि परीक्षेची आठवण ठेवत राहा.’’

एक अनुयायी प्रेषित (स.) यांच्याकडे ज्ञानाच्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आले आणि त्यांच्यासमोर उभे राहिले आणि म्हणाले, ‘आपण मला कोणत्या गोष्टीचे आचरण करण्याची शिकवण देता?’

प्रेषित (स.) यांनी उत्तर दिले, ‘‘नेकी करा. वाईटांपासून अलिप्त राहा आणि लोकांना तुमच्यमधील कोणत्या गोष्टी आवडतील ते पाहा आणि त्यानुसारच कार्य करत राहा. लोकांना तुमच्या काही गोष्टी आवडल्या नसतील तर त्या सोडून द्या.’’

प्रेषित मुहम्मद (स.) नेहमी अशी प्रार्थना करत होते की ‘‘हे अल्लाह, आमच्यामध्ये आपली इतकी भीती निर्माण कर जी आपत्तीपासून आम्हाला वाचवील आणि अशा प्रकारे आचरण करण्याची आम्हास क्षमता प्रदान कर जी तुझ्यावर प्रेम करण्यापर्यंत आम्हाला पोहोचविण्यात आमची मदत करील.’’

(संदर्भ- ह. अब्दुल्लाह बिन उमर (र.))

संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद(६)...आणि तुला गोष्टींच्या तळापर्यंत पोहोचण्याचे शिकवील. आणि तुझ्यावर व याकूब (अ.) च्या संततीवर आपली देणगी त्याचप्रकारे पूर्ण करील ज्याप्रकारे यापूर्वी त्याने तुझे वाडवडिल इब्राहीम (अ.) व इसहाक (अ.) यांच्यावर केलेली आहे. निश्चितच तुझा पालनकर्ता सर्वज्ञ व बुद्धिमान आहे.’’ 

(७) वस्तुस्थिती अशी आहे की यूसुफ (अ.) आणि त्याच्या भावांच्या या वृत्तान्तामध्ये प्रश्न करणाऱ्यांकरिता मोठा संकेत आहे. 

(८) हा वृत्तान्त असा सुरू होतो की, त्याच्या बांधवांनी आपापसांत सांगितले, ‘‘हा यूसुफ (अ.) आणि याचा भाऊ दोघे आमच्या वडिलांना आम्हा सर्वांपेक्षा अधिक प्रिय आहेत, वास्तविक पाहता आम्ही एक पूर्ण जथ्था आहोत, खरी गोष्ट अशी आहे की आमचे वडील पूर्णपणे बहकले आहेत.६) मूळ अरबी भाषेत `तावीलुल अहादीस' शब्द प्रयोग झाला आहे. याचा अर्थ स्वप्नाचे फळ दाखविणे हाच अर्थ नाही तर एक अर्थ असाही होतो की अल्लाह तुला परिस्थितीचे ज्ञान आणि सत्यापर्यंत पोहचण्यासाठी मार्गदर्शन करील आणि ती वैचारिक दृढता तुला देईल ज्यामुळे प्रत्येक स्थितीत तू खोलात शिरून तळ गाठण्याची योग्यता प्राप्त् करशील.

७) बायबल आणि तलमूदचे वर्णन कुरआन वर्णनापासून वेगळे आहे. त्यांचे वर्णन असे आहे की पैगंबर याकूब (अ.) यांनी स्पष्ट ऐकून मुलाला रागवले आणि म्हणाले की तू असे स्वप्नसुद्धा पाहात आहेस, की मी आणि तुझी आई आणि सर्व मिळून तुला सजदा (नतमस्तक) करतील. परंतु विचारांती ही गोष्ट त्वरित समजते की पैगंबर याकूब (अ.) यांच्या पैगंबरत्वाच्या आचरणाने कुरआन स्पष्टीकरण अधिक जवळचे वाटते, बायबल आणि तल्मूदचे वर्णन मेळ खात नाही. पैगंबर यूसुफ (अ.) यांनी स्वप्न सांगितले होते. त्यांनी आपली इच्छा आणि आकाक्षांचे वर्णन काही केले नव्हते. स्वप्न जर खरे होते आणि पैगंबर याकूब (अ.) यांनी त्याचा जो अर्थ काढला त्यावरून स्पष्ट होते की ते एक खरे स्वप्न होते, म्हणूनच याचा स्पष्ट अर्थ होतो की पैगंबर यूसुफ (अ.) यांचीही इच्छा नव्हती तर अल्लाहचा तो निर्णय होता की उत्कर्ष प्राप्त् होईल. एक पैगंबराची तर लांबची गोष्ट आहे, एका समजूतदार माणसाचेसुद्धा हे काम होऊ शकते की अशा गोष्टीने वाईट वाटून घेऊन स्वप्न पहाणाऱ्याला रागवावे? काय एखादा सज्जन पिता असा होऊ शकतो काय जो आपल्या पुत्राच्या भावी प्रगतीची शुभसूचना ऐकून खूश होण्याऐवजी त्याचा द्वेष करू लागेल?

८) म्हणजे पैगंबर यूसुफ (अ.) यांचे सख्खे भाऊ बिन यामिन आहे जे यूसुफ (अ.) पासून काही वर्षानी लहान होते. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या आईचे निधन झाले होते. याच कारणामुळे पैगंबर याकूब (अ.) या दोन्ही विना आईच्या मुलांची जास्त काळजी घेत होते. याव्यतिरिक्त या प्रेमाचे आणखी एक कारण म्हणजे त्यांच्या सर्व मुलांमध्ये पैगंबर यूसुफ (अ.) हाच  समजदार आणि सौभाग्यशील असा पुत्र होता. पैगंबर यूसुफ (अ.) यांचे स्वप्न ऐकून त्यांनी जे काही सांगितले त्यावरून स्पष्ट झाले होते की ते आपल्या या पुत्राच्या असाधारण क्षमतांना चांगल्या प्रकारे जाणून होते. दुसरीकडे त्या दहा मोठ्या मुलांच्या आचरणांचा अंदाज पुढील घटनांनी होतो. मग असे आपण कसे म्हणू शकता की एक सदाचारी मनुष्य अशा दुराचारी पुत्रांशी खुश राहील? परंतु बायबलमध्ये यूसुफ (अ.) यांच्या भावांच्या द्वेषाचे एक कारण हे दाखविले गेले की ज्याने उलटा आरोप यूसुफ (अ.) यांच्यावर येतो. ही एक विटंबना आहे. बायबलमध्ये उल्लेख आहे की पैगंबर यूसुफ (अ.) भावांच्या चहाड्या वडिलांजवळ करीत होते, त्यामुळे त्यांचे भाऊ त्यांच्याशी नाराज होते.

९) या वाक्याचा भावार्थ समजण्यासाठी खेडुतांच्या भटक्या जमातीच्या जीवनाला डोळयांपुढे ठेवले पाहिजे. जेथे राज्य नसते आणि एकमेकांच्या मदतीने टोळया आपापली वसाहत करतात. तिथे एका माणसाची शक्ती त्याच्या मुलांवर, नातीपोती, भाऊ इ. वर अवलंबून असते. हे सर्व वेळेवर त्याच्या पाठीमागे उभे राहणारे `हिमायती'  असतात.  अशा  स्थितीत  स्त्रिया, मुले  यांच्यापेक्षा  माणसाला  ती  जवान मुले अधिक कामाची  वाटतात. कारण  ते वेळप्रसंगी त्याच्या पाठीशी उभे राहातात. यामुळेच या भावांनी सांगितले की आमचा बाप म्हातारपणी बावचळलेला आहे. आम्ही तरुण पुत्रांचा मजबूत गट त्यांच्या मागे वाईट प्रसंगी उभा राहू शकतो. परंतु त्याना आम्ही तरूण मुलं प्रिय नाहीत तर हे लहान दोन पुत्र प्रिय आहेत जी त्यांच्या काहीच कामी येऊ शकत नाहीत. ते तर स्वत: दुसऱ्यावर आश्रित आहेत.


कुरआन ज्या अरबी समुदायासाठी अवतरित करण्यात आला तो समुदाय इतका उख्खड  आणि क्रूर होता की, कोणी राजा सुद्धा त्यांच्यावर शासन करण्यास इच्छुक नव्हता. अशा या रानटी प्रवृत्तीच्या लोकांसमोर केवळ सुभाषितवजा सल्ला देऊन चांगले वागा! चांगले वागा! म्हणून उपयोगी ठरणारे नव्हते. तर अशा असंस्कृत समाजाला सुसंस्कृत करण्यासाठी त्यांच्याशी प्रत्यक्ष नातेसंबंध स्थापन करणे गरजेचे होते. म्हणून प्रेषित सल्ल. यांना हे विवाह करावे लागले. अशा प्रकारच्या सामाजिक आणि राजकीय कारणासाठी केवळ प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनीच असे विवाह केले होते असे नव्हे तर जगात त्या काळात तशी रीतच होती.

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या वैवाहिक जीवनावर नुपूर शर्मा यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर जो जागतिक स्तरावर गदारोळ उडाला त्यामुळे प्रसार आणि समाज माध्यमांचे अवकाश अक्षर: ढवळून निघाले. अशा परिस्थितीत त्यांचे वैवाहिक जीवन कसे होते या संबंधी माहिती घेणे उद्बोधक ठरेल. त्यानिमित्ताने मराठी भाषिक वाचकांना हे ही कळेल की, अरबी लोकांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या आयुष्याच्या सर्वच पैलूंचे दस्ताऐवजीकरण (डाक्युमेंटेशन) केलेले असून त्यात त्यांच्या वैवाहिक जीवनाचाही समावेश आहे.

या संबंधात माध्यमांमधून ज्या उलट-सूलट चर्चा सुरू आहेत त्या अर्धवट किंवा चुकीच्या माहितीवर आधारित आहेत. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर त्यांच्या हयातीतच टिका करण्यात आली होती, जगात सर्वाधिक बदनामीकारक पुस्तके त्यांच्याच विरूद्ध लिहिण्यात आलेली आहेत. त्यांच्या अचंभित करणाऱ्या विजयामुळे चिडून लोक त्यांची बदनामी करत होते. कोणी त्यांना जादूगर म्हणत होता तर कोणी वेडा. मक्का शहरामध्ये 13 वर्षे कष्ट करूनही शे-दोनशे समर्थक सुद्धा गोळा न करू शकलेल्या प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी पुढच्या दहा वर्षात अवघा अरबस्थान आपल्या कवेत कसा घेतला? याचेच त्यांच्या विरोधकांना आश्चर्य वाटत असे. तत्कालीन प्रस्थापित मूर्तीपूजक, अग्नीपूजक आणि ज्यू लोकांनी प्रेषित सल्ल. यांच्या यशस्वी जीवनाकडे पाहून त्यातून निर्माण झालेल्या आसुयेमुळे त्यांना बदनाम करण्याची एकही संधी सोडलेली नव्हती. प्रेषित सल्ल. यांचे वैवाहिक जीवन तर त्यांच्या निशाण्यावर अव्वलस्थानी होते. प्रेषित सल्ल. यांचे जीवन एक आदर्श जीवन होते. त्या जीवनातून प्रलयाच्या दिवसापर्यंत जन्माला येणाऱ्या प्रत्येक मानवाचे मार्गदर्शन व्हावे म्हणून त्या जीवनाचे दस्तऐवजीकरण करून जपून ठेवण्यात आलेले आहे. 

पहिला विवाह

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा पहिला विवाह वयाच्या 25 व्या वर्षी हजरत खतिजा रजि. यांच्या सोबत झाला. त्यावेळेस हजरत खतिजा रजि. यांचे वय 40 वर्षे होते व त्या दोन वेळेस विधवा झालेल्या होत्या. हे लग्न तेव्हाच नव्हे तर आज 21 व्या शतकातही क्रांतीकारक ठरू शकेल असेच आहे. कारण ऐन पंचेविशतील अविवाहित तरूण दोन वेळा विधवा झालेल्या व आपल्यापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या असलेल्या महिलेशी विवाह करतो, ही गोष्ट त्यावेळेसही साधारण नव्हती आणि आजही साधारण नाही. दूसरी गोष्ट म्हणजे हजरत खतिजा रजि. जीवंत असेपर्यंत प्रेषित सल्ल. यांनी दूसरा विवाह केलेला नव्हता. त्यांना त्यांच्यापासून चार मुली- 1. हजरत जैनब रजि, 2. रूकैय्या रजि., 3. उम्मे कुलसूम रजि. 4. फातिमा रजि. झाल्या. 

दूसरा विवाह 

हजरत खतिजा रजि. यांच्या मृत्यूपरांत प्रेषितत्वाच्या दहाव्या वर्षी शव्वाल महिन्यामध्ये त्यांनी हजरत सौदा रजि. यांच्याशी विवाह केला. त्यापण विधवा होत्या. त्यांचे पती सुक्रान बिन उमरू यांचा नैसर्गिक मृत्यू झालेला होता. 

तिसरा विवाह 

प्रेषितत्वाच्या अकराव्या वर्षी शव्वाल महिन्यातच त्यांनी हजरत आएशा यांच्या बरोबर विवाह केला. त्या हजरत अबुबकर रजि. यांच्या कन्या होत. लग्नाच्या वेळेस त्यांचे वय किती होते. याबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. एक विचार प्रवाह असा आहे की, लग्नाच्या वेळेस त्यांचे वय 6 वर्ष होते आणि रूख्सती (सासुरवाडीला जाणे) 9 वर्षे झाल्यावर झाली. तर दूसरा विचार प्रवाह असा आहे की त्यांच्या रूख्सतीच्या वेळेचे वय 19 वर्षे होते. यांच्याच वयाच्या मुद्यावरून अनेक टिकाकारांनी ज्यात नुपूर शर्माही सामील आहे टिका केलेली आहे. वास्तविक पाहता  त्यांचे वय 9 वर्षे जरी गृहित धरले तरी हिजाज (आताचा सऊदी अरेबिया) हा अतिशय उष्ण कटिबंधीय प्रदेश असून, नवव्या वर्षी मुली आजही वयात येतात. त्यामुळे 1400 वर्षापूर्वी हे लग्न बालविवाह होता म्हणून टिका करण्यात काही हाशिल नाही. बालविवाह हा काही अपवाद नाही. आज 21 व्या शतकातही आपल्या अवतीभोवती शेकडो बालविवाह होतात. तेव्हा इतिहासामध्ये झालेल्या महापुरूषांच्या बालविवाहावर विकृत टिप्पणी करणे स्वस्थ मानसिकतेचे लक्षण खचितच नाही. 

कारण प्रेषित सल्ल. यांचे जीवन हे जागतिक नितीमत्तेचे सर्वोच्च मापदंड असल्याचे प्रशस्तीपत्र स्व: कुरआनने दिलेले आहे. या संदर्भात कुरआन म्हणतो की,’’आणि :संशय तुम्ही नीतिमत्तेच्या उच्च दर्जावर आहात. ’’ (सुरे अलकलम : 68 : आयत नं.4). त्यामुळे आता दुसऱ्या कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. ज्यांचा विश्वास कुरआनवर नाही अशा नुपूर शर्मा आणि इतर लोक या संबंधी कितीही आलोचना करोत, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचेवरील आमचे प्रेम तुसभरही कमी होणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. 

चौथा विवाह

प्रेषित सल्ल. यांनी 3 हिजरीमध्ये हजरत हफ्सा बिन्ते उमर बिन खत्ताब रजि. या मातब्बर सरदाराच्या मुलीबरोबर केला. त्याही विधवा होत्या. त्यांचे पूर्व पती खनीस बिन हजाफा सहमी रजि. हे बदर आणि ओहदच्या युद्धा दरम्यान नैसर्गिकरित्या मृत्यू पावले होते. 

पाचवा विवाह

प्रेषित सल्ल. यांनी चौथ्या हिजरीमध्ये हजरत जैनब बिन खजिमा रजि. यांच्याबरोबर पाचवा विवाह केला. त्या बनू हिलाल कबिल्याशी संबंधित होत्या. ह्या ही विधवा होत्या. त्यांचे पती अब्दुल्लाह बिन हजश रजि. हे ओहदच्या युद्धामध्ये शहीद झालेले होते. त्या फक्त 8 महिने प्रेषित सल्ल. यांच्या विवाह बंधनात राहिल्या. त्यानंतर त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. त्यांचे पती अब्दुल्लाह बिन हजश रजि. शहीद झाल्यामुळे त्या निराधार झाल्या होत्या व आजारीही राहत होत्या. त्यांना सन्मानाने आश्रय देण्यासाठी प्रेषित सल्ल. यांनी हा विवाह केला होता. 

सहावा विवाह

प्रेषित सल्ल. यांनी सन 4 हिजरीमध्ये उम्मे सलमा हिंद बिन्ते अबि उमैय्या रजि. यांच्याशी विवाह केला. ह्या सुद्धा विधवा होत्या. त्यांचे पती अबु सलमा रजि. यांचाही 4 हिजरीमध्येच नैसर्गिक मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यूनंतर त्या निराधार झाल्या होत्या. त्यांना सन्मान आणि आधार देण्यासाठी प्रेषित सल्ल. यांनी हा विवाह केला होता. 

सातवा विवाह

हजरत जैनब बिन्ते हजश बिन रियाब रजि. ह्या कबिला बनू असदशी संंबंधित होत्या. यांचे लग्न हजरत जैद बिन हारिस रजि. यांच्याबरोबर झाले होते. ते लहानपणापासूनच प्रेषित सल्ल. यांच्यासोबत राहत असल्यामुळे लोक त्यांना प्रेषित सल्ल. यांचा मुलगा समजत होते. विवाहानंतर पती-पत्नींमध्ये तीव्र मतभेद झाल्यामुळे हजरत जैद रजि यांनी हजरत जैनब रजि. यांना घटस्फोट दिला होता. त्यानंतर प्रेषित सल्ल. यांनी ईश्वरीय आदेशावरून हजरत जैनब यांच्याशी लग्न केले. प्रेषित सल्ल. यांचे हे लग्न 4 हिजरीमध्ये झाले होते. या संदर्भातही मोठा वाद झाला होता. कारण अरबी समाजामध्ये त्यावेळेस मुलगा दत्तक घेण्याची परंपरा होती. ईश्वराला ही परंपरा मान्य नव्हती म्हणून ती तोडण्यासाठी ईश्वरीय आदेशाने हे लग्न झाले होते. याचा मोठा इतिहास आहे. या संबंधाची कारणमिमांसा ही किचकट स्वरूपाची आहे. ज्यांना या संबंधी अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा असेल त्यांनी कुरआनच्या सुरा क्रमांक 37 च्या आयत क्र. 33 संबंधिच्या तफसीर (स्पष्टीकरण) चे अवलोकन करावे.

आठवा विवाह

हजरत ज्युवेरिया बिन्ते हारिस रजि. यांचा संबंध अलमस्तलक या मातब्बर अरबी घराण्याशी होता. युद्धात त्यांना कैदी बनवून आणले गेले होते आणि त्या हजरत साबत बिन कैस बिन शमास रजि. यांच्या वाट्यात आल्या होत्या. त्यांनी एका ठराविक रकमेच्या मोबदल्यात ज्युवेरिया यांना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याकडे सोपविले होते. उच्च कुळातील एका कैदी महिलेला स्वतंत्र करून सन्मानाने जीवन जगण्याची संधी द्यावी म्हणून प्रेषित सल्ल. यांनी हे लग्न केले होते. हे लग्न 5 किंवा 6 हिजरीच्या शाबान महिन्यात झाले होते. 

नववा विवाह

उम्मे हबीबा रमल्ला बिन्ते अबि सुफियान रजि. या मक्का शहराच्या अत्यंत उच्चकुलीन सुफियान घराण्याच्या कन्या होत. त्यांचे लग्न अब्दुल्लाह बिन हजश यांच्याबरोबर झाले होते. त्यांनी आपल्या पतीसोबत हबश येथे हिजरतही केली होती. मात्र हबश येथे गेल्यानंतर त्यांच्या पतीने इस्लाम धर्माचा त्याग करून ख्रिश्चन धर्माची दिक्षा घेतली होती आणि त्याच अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. मात्र उम्मे हबीबा रजि. यांनी धर्मांतर केलेले नव्हते.    उम्मे हबीबा ह्या विधवा होत्या. प्रेषित सल्ल. यांनी त्यांना आश्रय देण्यासाठी म्हणून हा विवाह केला. 

दहावा विवाह

हजरत सफिया बिन अख्तब रजि. यांचा संबंध बनी इसराईल या प्रसिद्ध कुळाशी होता आणि खैबरच्या युद्धात युद्ध बंदी म्हणून त्या कैद केल्या गेल्या होत्या. त्यांना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्वतंत्र करून त्यांच्याशी विवाह केला. हा विवाह 7 हिजरी नंतर झाला. 

अकरावा विवाह

हजरत मैमुना बिन्ते हारिस रजि. यांच्याशी प्रेषित सल्ल. यांनी सातव्या हिजरीमध्येच लग्न केले. त्या सुद्धा घटस्फोटित होत्या.

 या विवाहांचे विश्लेषण

येणेप्रमाणे प्रेषित सल्ल. यांचे अकरा विवाह झाल्याबद्दल इतिहासकारांचे एकमत आहे. या ठिकाणी वाचकांना एक प्रश्न पडणे साहजिक आहे की, कुरआनमध्ये चार विवाहांची परवानगी असतांना प्रेषित सल्ल. यांनी अकरा विवाह कसे केले? या संदर्भात स्पष्टीकरण असे की, मुस्लिम पुरूषांना चार विवाहांची परवानगी नव्हे तरतूद आहे. विशिष्ट परिस्थितीमध्ये अपवाद म्हणून ते चार लग्न करू शकतात. प्रेषित सल्ल. यांंची स्थिती मात्र सामान्य मुुस्लिम पुरूषांपेक्षा वेगळी होती, त्यांच्या जीवनाचे मिशन वेगळे होते. ते मिशन पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांना अकरा विवाहाची परवानगी देण्यात आली होती. या संदर्भात अधिक विवेचन खालीलप्रमाणे -

हजरत खतिजा रजि. आणि हजरत जैनब रजि. या दोन पत्नींचा मृत्यू प्रेषित सल्ल. यांच्या हयातीत झाला व शेवटपर्यंत 9 पत्नी हयात होत्या. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे 25 व्या वर्षी लग्न झाल्यानंतर त्या पुढील तारूण्याची 30 वर्षे त्यांनी फक्त एका पत्नीसोबत म्हणजे हजरत खतिजा रजि. यांच्यासोबत घालविले. ज्या की, त्यांच्यापेक्षा 15 वर्षांनी ज्येष्ठ होत्या. अशा परिस्थितीमध्ये असे कसे गृहित धरता येईल की, तारूण्य संपल्यावर उतारवयाला लागल्यानंतर प्रेषित सल्ल. यांनी जी लग्ने केली ती (ईश्वर क्षमा करो) लैंगिक सुखासाठी केली होती. त्यातही हजरत आएशा रजि. या एकट्या कुमारिका होत्या. ही गोष्टही लक्षात घेण्याजोगी आहे. प्रेषित सल्ल. यांनी वेगवेगळ्या मातब्बर घराण्यांशी व शूरवीरांशी नातेसंबंध जोडण्यासाठी, शहीदांच्या पत्नींना आश्रय आणि सन्मान देण्यासाठी म्हणून बाकीचे विवाह केले. हजरत आएशा रजि. यांचे वडिल हे मक्का शहरातील प्रतिष्ठित कापड व्यापारी होते तर हजरत उमर बिन खत्ताब रजि. हे मक्का शहरातील अत्यंत धाडसी आणि शूर लढवय्ये होते. या दोघा सरदारांच्या मुलींशी लग्न करून प्रेषित सल्ल. यांनी त्यांच्याशी नातेसंबंध प्रस्थापित केले. अरबी समाजामध्ये जावयाला अतिशय सन्मानाच्या नजरेने पाहण्याचा प्रघात होता. जावई म्हणजे त्यांचा जीव का प्राण होता. हेच कारण होते ज्यामुळे की, प्रेषित सल्ल. यांनी मातब्बर घराण्यांशी जावाई म्हणून संबंध स्थापन केले नाही तर आपल्या मुलीसुद्धा मातब्बर सरदारांना देऊन त्यांच्याशी नातेसंबंध दृढ केले. उदा. हजरत उस्मान रजि. या श्रीमंत परंतू दानशूर सरदाराशी एका नंतर एक दोन मुली हजरत रुकैय्या रजि. आणि त्यांच्या मृत्यूनंतर हजरत कुलसुम रजि. यांचा विवाह केला. या सर्व लग्नांचे उद्देश स्व:ला राजकीय दृष्ट्या मजबूत करण्यासाठी किंवा स्व:ची राजेशाही स्थापन करण्याचा नव्हता तर ईश्वराने त्यांची इस्लामचा पैगंबर म्हणून जी निवड केली होती ती निवड सार्थ ठरविण्यासाठी व पृथ्वीवर इस्लामचा संदेश सार्वजनिक करण्यासाठी तसेच या संदेशावर आधारित एक राज्य स्थापन करण्यासाठी व त्याद्वारे प्रलयाच्या दिवसापर्यंत जन्मणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी जे ईश्वरीय मिशन त्यांना देण्यात आले होते ते मिशन पूर्ण करण्याचा मार्ग सुलभ व्हावा, यासाठी स्व:ची आणि स्व:च्या मुलींची लग्ने त्यांनी विशिष्ट अशा मातब्बर घराण्यांमध्ये केली होती आणि त्याचा परिणामही झाला. हजरत उम्मे सलमा रजि. यांच्याबरोबर लग्न होताच त्यांचा कबिला ज्यात अबु जहेल व खालीद बिन वलिद सारख्या मातब्बरांचा समावेश होता प्रेषित सल्ल. यांच्या समर्थनात आला. 

खालीद बिन वलिद एक श्रेष्ठ यौद्धे होते. इतके श्रेष्ठ की ओहदच्या युद्धामध्ये ज्याचे नेतृत्व दस्तुरखुद्द प्रेषित मुहम्मद सल्ल. करत होते, मध्ये त्यांनी मुस्लिम सैन्याचा अंश: पराभव केला होता. तसे हे खालिद बिन वलिद प्रेषित सल्ल. यांच्या विषयी फक्त नम्रच झाले नाहीत तर त्यांनी प्रेषित सल्ल. यांच्या हातावर विनाअट इस्लामचा स्वीकार केला आणि भविष्यात अनेक लढायांमध्ये नेतृत्व करून इस्लामचा झेंडा समुद्रापार नेला. हजरत जवेरिया रजि. ह्या जेव्हा प्रेषित सल्ल. यांच्या पत्नी झाल्या तेव्हा सहाबा रजि. यांनी त्यांच्या कबिल्याच्या शंभर घराण्यांना जे की युद्ध कैदी म्हणून आणले गेले होते, केवळ प्रेषित सल्ल. यांचे सासरवाडीचे लोक आहेत म्हणून स्वतंत्र करून टाकले. याचा सकारात्मक परिणाम निश्चितच इस्लामच्या प्रसारामध्ये झाला. ती सर्व घराणी भविष्यात प्रेषित सल्ल. यांच्या बाजूने ठामपणे उभी राहिली. कुरआन ज्या अरबी समुदायासाठी अवतरित करण्यात आला तो समुदाय इतका उख्खड  आणि क्रूर होता की, कोणी राजा सुद्धा त्यांच्यावर शासन करण्यास इच्छुक नव्हता. अशा या रानटी प्रवृत्तीच्या लोकांसमोर केवळ सुभाषितवजा सल्ला देऊन चांगले वागा! चांगले वागा! म्हणून उपयोगी ठरणारे नव्हते. तर अशा असंस्कृत समाजाला सुसंस्कृत करण्यासाठी त्यांच्याशी प्रत्यक्ष नातेसंबंध स्थापन करणे गरजेचे होते. म्हणून प्रेषित सल्ल. यांना हे विवाह करावे लागले. अशा प्रकारच्या सामाजिक आणि राजकीय कारणासाठी केवळ प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनीच असे विवाह केले होते असे नव्हे तर जगात त्या काळात तशी रीतच होती. अगदी आपल्या जवळचेच उदाहरण घ्यायचे म्हटल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण घेता येईल. महाराजांचेही एकूण 8 विवाह उच्च घराण्यातील मुलींशी झाले होते. ज्यात सईबाई -निंबाळकर घराणे यांच्याशी लग्न बालपणीच (1640) झाले. सगुणाबाई - शिरके घराणे (1641), सोयराबाई - मोहिते घराणे (1650), पुतळाबाई-पालकर घराणे (1653), लक्ष्मीबाई-विचारे घराणे (1656), सकवारबाई-गायकवाड घराणे (1657), काशिबाई- जाधव घराणे (1657) आणि गुणवंतबाई- इंगळे घराणे (1657) यांच्याबरोबर झाले होते. येणेप्रमाणे इतिहासामधील महापुरूषांच्या लग्नांचे विषय 21 व्या शतकात आजच्या परिस्थितीमध्ये उकरून काढून त्यावर उलट-सूलट चर्चा करत बसणे म्हणजे राष्ट्रीय वेळेचा अपव्यय आहे दूसरे काहीही नाही. म्हणून वाचकांनी अशा विषयांकडे दुर्लक्ष करून देशाच्या विकासाच्या मुद्यांवर लक्ष केंद्रीत करावे. 

- एम.आय.शेख


समाज माध्यमांवर ज्या चित्रफिती फिरत आहेत त्या पाहता हे सर्व प्रकार एका व्यापक षडयंत्राचाच भाग असावा, असे समजण्यास जागा आहे. या सर्व घटनांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. जमाअते इस्लामी हिंदची अशी धारणा आहे की, प्रयागराजमधील प्रसिद्ध सामाजिक आणि मानवाधिकार कार्यकर्ते जावेद मुहम्मद यांच्याविरूद्ध केली गेलेली कारवाईसुद्धा सूडाच्याच्या राजकारणाचे उघड उदाहरण आहे. 


नवी दिल्ली 

10 जून रोजी झारखंडच्या रांची, उत्तरप्रदेशच्या प्रयागराज आणि देशातील इतर ठिकाणावर पैगंबर मुहम्म्द सल्ल. यांच्या अवमाननासंबंधी निघालेल्या मोर्चांवर क्रूर लाठीहल्ला आणि गोळीबार केला आणि ज्यात किमान दोघांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक जखमी झाले. अनेकांना अटक करण्यात आली. पैकी काही लोकांना कोठडीमध्ये बेदम मारहाण करण्यात आल्याच्या चित्रफिती पुढे आल्या आहेत. तसेच अनेकांची घरे जेसीबीनीे उध्वस्त करण्यात आली आहेत. जमाअते इस्लामी हिंद या सर्व बाबींचा निषेध करते व हे सर्व बेकायदेशीर कृत्य करणार्यांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करते. उध्वस्त केलेली घरे पुन्हा बांधून द्यावीत अशी सरकारकडे मागणी करते. या संबंधी खरोखर ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांच्या विरूद्ध कारवाई करण्याचीही मागणी करते. 

गेल्या 10 जूनला अनेक ठिकाणच्या मुस्लिमांनी आपल्या लोकशाही अधिकारांचा वापर करीत प्रदर्शने केली होती. त्यात विशेष करून उत्तर प्रदेश आणि झारखंडच्या पोलिसांनी जो काय अत्याचार  केला तो देशाच्या लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार होता. 

या संदर्भात अमीरे जमाअत सआदतुल्लाह हुसैनी यांनी मुस्लिम समाजाकडे ही अपील केलेली आहे की, लोकांनी आपल्या संवैधानिक अधिकाराचा वापर करून प्रदर्शन जरूर करावे पण शांततेच्या मार्गाने. त्यांच्या शांतपणे सुरू असलेल्या प्रदर्शनाचे निमित्त साधून शांतताभंग करणार्या तत्वांपासून समाजाने सावध रहावे. त्यांनी प्रयागराजमधील मुहम्मद जावेद यांच्या घराला उध्वस्त करण्याच्या प्रशासनाच्या कारवाईवरही नाराजी व्यक्त केली. या संदर्भात ते म्हणाले की, ज्या घटनेची सभ्य समाजामध्ये कल्पनाही केला जावू शकत नाही अशी घटना प्रत्यक्ष प्रयागराजमध्ये घडलेली आहे. हे त्या ठिकाणी नागरी प्रशासन व पोलीस स्व:च गुन्हेगारी कृत्य करून कायदा भंग करत आहे. विषेश म्हणजे जे काही प्रशासन करत आहे ते उघडपणे करत आहे.  कोणाच्या घराला फक्त याचसाठी उध्वस्त करणे की ते प्रदर्शन करत आहेत व ती प्रदर्शने सरकार आपल्या विरोधी आहे असा समज करून घेते व त्यातून अशी कारवाई होते हे चुकीचे आहे. अशा शांततापूर्ण प्रदर्शन करणार्यांना गोळ्या घालणे कुठल्याही सभ्य समाजामध्ये याची कल्पनाच केली जावू शकत नाही. हे बदल्याचे राजकारण वाटते. ते पुढे म्हणाले की, आम्ही या गोष्टींचा तीव्र शब्दात निषेध करतो. आमची अशी धारणा आहे की, प्रशासनाच्या अशा कृत्यामुळे देश आणि विदेशात आपल्या देशासंबंधी चुकीची प्रतीमा उभी राहत आहे. पोलिसांच्या अशा कृत्यामुळे समाजाच्या भावना आणखीन तीव्र होतील. त्यांच्यामध्ये बेचैनी वाढेल. अशामुळे त्यांचा प्रशासनावरील विश्वासही कमी होईल. उत्तर प्रदेश सरकारला कायद्याची थोडीजरी बूज असेल तर त्यांनी उध्वस्त घरांची नुकसानभरपाई द्यावी आणि यासाठी जबाबदार लोकांविरूद्ध कायदेशीर कारवाई करावी.

सआदतुल्लाह हुसैनी यांनी रांची मध्ये झालेल्या गोळीबाराची न्यायालयीन चौकशीचीही मागणी केली. ते पुढे म्हणाले की, प्रेषित सल्ल. यांच्या अपमानासाठी जबाबदार असणार्या लोकांवर वेळीच आणि योग्य कायदेशीर कारवाई केली गेली असती तर या सगळ्या अप्रिय घटना घडल्याच नसत्या. समाज माध्यमांवर ज्या चित्रफिती फिरत आहेत त्या पाहता हे सर्व प्रकार एका व्यापक षडयंत्राचाच भाग असावा, असे समजण्यास जागा आहे. या सर्व घटनांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. जमाअते इस्लामी हिंदची अशी धारणा आहे की, प्रयागराजमधील प्रसिद्ध सामाजिक आणि मानवाधिकार कार्यकर्ते जावेद मुहम्मद यांच्याविरूद्ध केली गेलेली कारवाईसुद्धा सूडाच्याच्या राजकारणाचे उघड उदाहरण आहे. जावेद मुहम्मद आणि त्यांच्या घरातील सदस्यांनी 10 जूनच्या प्रदर्शनामध्ये सहभागच घेतला नव्हता. शिवाय तोडण्यात आलेले घर जावेद मुहम्मद यांच्या मालकीचे नसून त्यांच्या पत्नीच्या मालकीचे होते. म्हणून हे घर तोडणे तसेही बेकायदेशीरच असल्याचेही ते म्हणाले असल्याची माहिती प्रेस नोटद्वारे जमाअते इस्लामी हिंद मीडिया विभागाचे सय्यद तन्वीर अहेमद यांनी दिली. 


जेव्हा सरकार आपली जबाबदारी समर्थपणे पेलण्यास काही कारणामुळे असमर्थ ठरत असेल तर अशा वेळेस समाजातील श्रीमंत लोकांनी पुढे येऊन बेरोजगारीला दूर करण्याचा प्रयत्न करावयास हवा. परंतु दुर्दैवाने याची जाणीव नसल्यामुळे अनेक श्रीमंत मुसलमान असे आहेत ज्यांची संपत्ती त्यांच्या वैयक्तिक जीवनात भरभराटी आणण्यापूर्तीच उपयोगात आणली जात आहे. 


कॉलेज के सब बच्चे चुप हैं कागज की एक नाव लिए

चारों तरफ दरिया की सूरत फैली हुई बेकारी है

उर्दूमध्ये एक म्हण आहे, ’’कमाता बेटा और नांदती बेटी सबको अच्छे लगते हैं’’ एका विशिष्ट वयात आल्यानंतर प्रत्येक तरूणांकडून समाज कामधंद्याची अपेक्षा करतो.  ती अपेक्षा पूर्ण न झाल्यास तरूणांवर घरातून आणि बाहेरून इतका दबाव वाढतो की, त्याची अंतिम परिणीती बेरोजगार तरूणांच्या आत्महत्येमध्ये होते. बीबीसीच्या 11 फेब्रुवारी 2022 च्या बातमीपत्रात असे म्हटलेले आहे (जे की आजही त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे) की, राज्यसभेमध्ये गृहमंत्री नित्यानंद रॉय यांनी बेरोजगारीच्या कारणावरून तरूणांच्या आत्महत्येची माहिती देताना सांगितले की, 2018 मध्ये 2741 तर 2019 मध्ये 2851 तर 2020 मध्ये 3548 बेरोजगार तरूणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. या आकडेवारीवरून या प्रश्नाच्या भीषणतेची कल्पना येण्यास हरकत नाही. कमावते वय झाल्यानंतर बेरोजगार राहिल्यानंतर अनेक समस्यांना तरूणांना तोंड द्यावे लागते. लग्न वेळेवर होत नाही, झाले तरी अनुरूप स्थळ मिळत नाही, लग्नानंतर खर्च वाढतो, त्यामुळे त्याचा अतिरिक्त दबाव निर्माण होतो, लग्न केले नाही तर अनेक मानसिक समस्या उत्पन्न होतात, शारीरिक गरजा पूर्ण होत नसल्यामुळे पाय घसरण्याचा संभव असतो, त्यातून समाजात अनैतिकता वाढते त्यामुळे समाज नासतो, अनेक तरूण मनोरूग्ण होऊन जातात, एकांतप्रिय  होऊन जातात, परवडेल ते व्यसन करण्यास सुरूवात करतात. जे हे सर्व दबाव सहन करू शकत नाहीत ते शेवटी आत्महत्या करतात. 

तलाशे रिज्क का ये मरहला अजीब है के हम

घरों से दूर भी घर के लिए बसे हुए हैं

उर्दूत दूसरी एक म्हण आहे की, ’’सबसे बडा गम रोजगार का गम होता है’’ बेरोजगार तरूणांची न घरात किमत असते न बाहेर. फाटलेला किसा व फाटलेले नशीब घेऊन कोट्यावधी बेरोजगार तरूणांचे तांडे आज देशात भटकत आहेत. नुकतीच एक बातमी अशीही येऊन गेलेली आहे की, लाखो तरूणांनी वैफल्यग्रस्त होऊन रोजगार शोधणेच बंद केलेले आहे. असे तरूण समाजविघातक कामात सहभागी होण्याची जास्त शक्यता असते. आज याचाच अनुभव देशात होणाऱ्या जातीय दंगली, समाज माध्यमातील सांप्रदायिक मजकूर आणि टीव्हीवरील प्रक्षोभक आणि अनावश्यक चर्चांमधून येत आहे. गुन्हेगारी वाढत आहे. त्यात तरूणांचा सहभाग वाढत आहे. बेरोजगारीमुळे एक नव्हे अनेक संकटांनी भारतीय समाज चारीही बाजूंनी वेढला गेलेला आहे. 

बेरोजगारीची कारणे 

1. समाजात गरीबी मोठ्या प्रमाणात व्याप्त असून गरीबांमध्ये शिक्षण घेण्याची जाणीव प्रगल्भ नसते. त्यामुळे अशिक्षित आणि कौशल्यविहीन तरूणांचे समूह तयार होतात. जे की बेरोजगार राहतात. आज देशात नेमके हेच होत आहे. 

2. आरक्षण : आरक्षणामुळे अनेक तरूणांना पात्र असूनही नाईलाजाने बेरोजगार रहावे लागत आहे. त्यातल्या त्यात मुस्लिम तरूणांना या आरक्षणापासून जाणून बुजून काँग्रेसने वंंचित ठेवल्यामुळे बेरोजगार मुस्लिम तरूणांची संख्या बेसुमार वाढलेली आहे. 

3. शैक्षणिक दर्जा : देशात पदवीधारी तरूणांची कमतरता नाही परंतु त्या पदवी अनुरूप त्यांची योग्यता नसल्यामुळे त्यांना काम मिळत नाहीये. 

4. सरकारी उदासीनता : सर्वच सार्वजनिक क्षेत्रात आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये अघोषित नोकरकपातीच्या सरकारी धोरणामुळे सुद्धा बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 

5. नवनवीन कल्पनांचा अभाव : आज जगामध्ये संकल्पना विकल्या जातात. स्व:च्या मालकीचे एकही चारचाकी वाहन नसतांना ’ओला’ आणि ’उबर’ लाखो चारचाकी गाड्या भाड्यावर देऊन कोट्यावधी रूपये कमवित आहेत, स्व:च्या मालकीचे एकही हॉटेल नसतांना ’ओयो’ विविध शहरातील हजारो हॉटेलमधील लाखो खोल्या भाड्याने देऊन कोट्यावधींची कमाई करत आहे, स्व:चे कुठलेही उत्पादन नसतांना अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्या लाखो उत्पादने कोट्यावधी लोकांना विकून अब्जावधी रूपयांची उलाढाल करत आहेत आणि आपले भारतीय तरूण हॉटेल, पानपट्टी, किराणा दुकानच्या पलिकडे विचार करू शकत नाहीत. हे वैचारिक दारिद्रय भारतीय तरूणांना, त्यातल्या त्यात मुस्लिम तरूणांना बेरोजगार ठेवण्यामध्ये मोठी भूमीका अदा करत आहे. 

6. मोबाईल फोन : बापाच्या कमाईतून आईला इमोशनल ब्लॅकमेल करून घेतलेल्या स्मार्टफोनमधील अनावश्यक व्यस्ततेमुळे अनेक तरूण आज बेरोजगार झालेले आहेत. 

उपाय

असलम बडे वकार से डिग्री वसूल की

और उसके बाद शहर में ख्वांचा लगा लिया

वर दिलेली पाच कारणे व अशाच अनेक कारणांमुळे भारतीय तरूण विशेष: मुस्लिम तरूण मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. मुस्लिमेत्तर तरूणांची थोडीफार तरी काळजी सरकार आणि त्यांच्या समाजातील श्रीमंत लोक घेत असतांना दिसून येतात. परंतु पावलोपावली होत असलेल्या अघोषित भेदभाव व घोषित आर्थिक बहिष्काराच्या आव्हानांमुळे मुस्लिम तरूणांच्या बेरोजगारीची समस्या अधिक तीव्र झालेली आहे. जेव्हा सरकार आपली जबाबदारी समर्थपणे पेलण्यास काही कारणामुळे असमर्थ ठरत असेल तर अशा वेळेस समाजातील श्रीमंत लोकांनी पुढे येऊन बेरोजगारीला दूर करण्याचा प्रयत्न करावयास हवा. परंतु दुर्दैवाने याची जाणीव नसल्यामुळे अनेक श्रीमंत मुसलमान असे आहेत ज्यांची संपत्ती त्यांच्या वैयक्तिक जीवनात भरभराटी आणण्यापूर्तीच उपयोगात आणली जात आहे. 

वास्तविक पाहता छोटे-छोटे व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवणारे खाजगी सरकारमान्य किंवा बिगरसरकार मान्य आयटीआय आणि पॉलिटे्निनकच्या संस्थांचे जाळे देशाच्या प्रत्येक शहरात सहज विनता येऊ शकते. ज्यामुळे कारपेंटर, वेल्डर ते बिल्डर तरूण तयार होऊन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून बेरोजगारीच्या मगरमिठीतून सहज बाहेर पडू शकतात. 

तालीम, तरबियत और तिजारत


शिक्षणामुळे माणसाची बुद्धी प्रगल्भ होते, विचार करण्याची क्षमता वाढते. म्हणून मिळेल त्या माध्यमातून व शाखांमधून प्रत्येक मुस्लिम व बिगर मुस्लिम तरूणाने किमान पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याचे लक्ष्य समोर ठेवायला हवे. पालकांनी आपली मुलं किमान पदवीपर्यंत शिक्षण घेतील यासाठी आपले सर्वस्व पणाला लावायला हवे. या मिळालेल्या तालीम सोबत मुस्लिम तरूणांची दीनी तर्बियत म्हणजे इस्लामी शिक्षण सुद्धा पदवीबरोबर पूर्ण व्हायला हवे. ज्यामुळे मुस्लिम तरूणांच्या व्यक्तिमत्वाचा संतुलित विकास होईल. आज भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आपल्या इच्छेप्रमाणे जगण्याची एक फॅशन सुरू झालेली आहे, जी की अत्यंत चुकीची आहे. जीवन जगण्याची खरी पद्धती कोणती? याबाबतीत आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त प्रसिद्ध विचारवंत अबुल आला मौदुदी यांचे विचार खालीलप्रमाणे, 

’’जहालत का लफ्ज़ इस्लाम के मुकाबले में इस्तेमाल किया जाता है. इस्लाम का तरिक़ा सरासर इल्म है. क्यों की इसकी तरफ अल्लाह ने रहनुमाई की है जो तमाम  हक़ायक का इल्म रखता है. और इसके  बरअक्स हर वो तरीका जो इस्लाम से मुख्तलिफ है जहालियत का तरीका है. अरब मे जमाना-ए-कब्ल-ए- इस्लाम को जाहालत का दौर इसी माने में कहा गया है के इस जमाने में इल्मके बगैर महज़ वहम या कयास व गुमान या ख्वाहिशों की बुनियाद पर इंसान ने अपने लिए जिंदगी के तरीके मुकर्रर कर लिए थे. ये तर्ज-ए-अमल जहां जिस दौर में भी इंसान इख़्तियार करेंगे उसे बहर- हाल जिहालत ही कहा जाएगा. स्कूल और यूनिवर्सिटी में जो कुछ पढ़ाया जाता है वह महेज़ एक जुज़्वी इल्म (इल्मका एक ख़लिल हिस्सा) है और किसी माने में भी इंसान की रहनुमाई के लिए काफी नहीं है. लिहाज़ा  अल्लाह के दिए हुए इल्म से बेनियाज़ होकर जो निजाम-ए-जिंदगी इस जुज़्वी इल्म के साथ अवहाम, कयास और ख़्वाहिशात की आमेज़िश करके बना लिये गये हैं वो भी इसी तरह की ’जाहिलियत’ की तारीफ में आते हैं, जिस तरह कदीम जमाने की जाहिलीयत की तारीफ में आते हैं.’’ (तफहिमुल कुरआन).

अनेक लोक संपत्ती असूनसुद्धा जीवन जगण्याची खरी पद्धत माहित नसल्यामुळे जीवनात अपयशी होतात व अकाली मृत्यू पावतात. चित्रपट, संगीत सृष्टीतील अनेक सालस तरूण अकाली हृदयघात होऊन किंवा आत्महत्या करून मरत आहेत, ते यामुळेच. त्यांच्याकडे रोजगाराची किंवा पैशाची चणचण नाही फक्त त्यांना जीवन जगण्याची खरी पद्धत माहित नाही, म्हणून त्यांच्यावर अकाली जीवन संपविण्याची वेळ आलेली आहे. जीवन जगण्याची खरी पद्धत इस्लामी पद्धत आहे. या पद्धतीविरूद्ध जावून जे जगतील त्यांचे जीवन या लोकातही आणि परलोकातही यशस्वी ठरणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. इस्लाम विषयी असलेल्या पूर्वग्रहामुळे अनेक लोक या कल्याणकारी जीवन व्यवस्थेचा लाभ उठवू शकत नाहीत, हे इस्लामचे नव्हे तर त्यांचे दुर्दैव आहे. 

येणेप्रमाणे भौतिक शिक्षण (तालीम) इस्लामिक प्रशिक्षण (तरबियत) घेतल्यानंतर तिजारत (व्यापार) हे तीसरे उद्देश्य तरूणांनी आणि त्यांच्या पालकांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवायला हवे. आज व्यापारातूनच चीन जागतिक महासत्ता झालेला आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटलेले आहे की, ’’ व्यापारात गुंतून रहा कारण नऊ दशांश (90) टक्के उदरनिर्वाह त्यातून मिळतो.’’ (संदर्भ : कंजुल आमाला, हदीस क्र. 9342). 

येथे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी निसर्गाचा एक नियम उलगडून दाखविलेला आहे तो म्हणजे, ईश्वराच्या निर्मिती योजनेनुसार उदरनिर्वाहाचा सर्वात मोठा वाटा ईश्वराने व्यापारात ठेवलेला आहे. ही गोष्ट प्रत्येक माणसासाठी आशेचा एक खजीना आहे. (संदर्भ : युथ विंग, लातूर) जर एखाद्या माणसाला नोकरी मिळत नसेल किंवा त्याला वारसाहक्क मिळत नसेल किंवा इतर स्त्रोताकडून काहीही मिळण्याची शक्यता नसेल तरीही त्याने स्व:चा व्यावसाय सुरू करावा. त्या व्यावसायातून अर्थात व्यापारातून मोठी संपत्ती मिळण्याची शक्यता असते. आज अनेक असे व्यवसाय आहेत ज्यामुळे बिना भांडवली व्यापार करून मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावता येते. त्याचा तपशील या ठिकाणी सांगणे शक्य नाही. पूर्वी भारतात एक म्हण प्रसिद्ध होती, ’’उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी.’’ आज ही म्हण नेमकी उलट झालेली आहे. भ्रष्टाचाराची मोठी संधी असल्यामुळे उत्तम नोकरी, जोखीम असल्यामुळे मध्यम व्यापार आणि मातीत भ्रष्टाचार करणे शक्य नसल्यामुळे कनिष्ठ शेती अशी एकंदरित परिस्थिती निर्माण झालेली आहे. 

तरूणांनी त्यांना मिळणारी रोजगाराची पहिली संधी कधीच सोडू नये. काय माहित दुसरी संधी मिळणार सुद्धा नाही? नोकरीची संधी मिळत असेल तर ठीक नसेल तर केवळ नोकरीवरच विसंबून राहून आयुष्याची राखरांगोळी करून घेण्यात, व्यसनाधिन होऊन निरूद्देश जीवन जगण्यात काही हाशिल नाही. स्व:च्या मनगटाच्या बळावर व्यापार करून आयुष्याला संधी दिल्यास व नेकीने व्यापार केल्यास ईश्वराची मदत आल्याशिवाय राहणार नाही. याचा किमान मला तरी तेवढाच विश्वास आहे जेवढा विश्वास या गोष्टीवर आहे की सूर्य प्रकाश देतो. 

शेवटी जमाअते इस्लामी हिंदचे अध्यक्ष सआदतुल्लाह हुसैनी यांची संकल्पना स्पष्ट करून सदरचे लेखन थांबवितो. त्यांनी एक अशी संकल्पना मांडलेली आहे, जिचा मतीतार्थ असा की, प्रत्येक समाजाच्या जीवन प्रवाहामध्ये उतार आणि चढाव येतच असतात. उतारास लागलेल्या समाजामध्ये तीन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू शकतात. 

1. तो समाज पराभवामुळे खचून जाऊ शकतो. 

2. त्या समाजातील तरूण प्रतिक्रियावादी होऊन हिंसक होऊ शकतात. 

3. त्या समाजातील लोक परिस्थितीचे योग्य आकलन करून आपल्या वर्तनामध्ये थोडीशी लवचिकता निर्माण करून स्व:ला त्या विशिष्ट परिस्थितीतून सुद्धा ज्या संधी ईश्वराने लपवून ठेवलेल्या आहेत त्यांचा शोध घेऊन स्व:ला त्या अनुरूप करून पुन्हा यश प्राप्त करू शकतात. मुस्लिम समाज कुरआन आणि प्रेषितांच्या चरित्राचा अभ्यास करून आजच्या कठीण परिस्थितीत सुद्धा पराभूत मानसिकतेमध्ये न जाता यश प्राप्त करू शकतात व सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांनी दिलेल्या तीसऱ्या पर्यायाप्रमाणे पुन्हा उत्कर्ष प्राप्त करू शकतात. कारण प्रेषित सल्ल. यांच्या समोर जेवढ्या कठीण अडचणी आणि आव्हाने होती तेवढी आज आपल्यासमोर नाहीत. म्हणून प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे चरित्र प्रत्येक मुस्लिम व्यक्तिसाठी मोटीव्हेशन (प्रेरणेचे स्त्रोत) ठरू शकते. यापेक्षा प्रभावशाली प्रेरणेचे दूसरे स्त्रोत जगात अस्तित्वात नाही. याची खात्री प्रत्येक मुस्लिम तरूणाने बाळगावी व भौतिक शिक्षण आणि नैतिक (इस्लामिक) शिक्षणातून स्व:चा संतुलित विकास साधून मिळेल तो रोजगार प्राप्त करावा आणि देशाच्या उन्नतीमध्ये आपला वाटा उचलावा. जय हिंद !


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget