Halloween Costume ideas 2015

पालघर प्रकरण : राज्याच्या महासंचालकांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून नोटीस

मुंबई
पालघर प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना नोटीस बजावली आहे. चार आठवड्यात पालघरमधील घटनेसंदर्भात स्पष्टीकरण द्यावे, असे नोटिसीत म्हटलंय. लॉकडाऊनच्या परिस्थितीत पोलिसांच्या उपस्थितीत जमावानं एखाद्याला ठेचू मारावं हे भयानक कृत्य असल्याचे सांगत मानवअधिकार आयोगाने ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणातील संबंधितांवर काय कारवाई केली ? कुणाला काय दिलासा दिला ? याचा तपशील चार आठवड्यात सादर करण्याचे पोलीस महासंचालकांना निर्देश देण्यात आले आहेत.
चोर असल्याच्या अफवेतून प्रवास करणाऱ्या तिघांची जमावाने निर्घृण हत्या केली. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात गुरुवारी रात्री हा प्रकार घडला होता. यात दोन साधूंसह एका चालकाचा समावेश होता. जामावाने तिघांवर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यात 16 एप्रिल रोजी दोन साधूंसह तिघांना जमावाने मारहाण केली होती. या प्रकरणात शंभरहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. पालघर प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी व्हावी, असे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले होते. राज्य सरकारने या प्रकरणाचा अहवाल तयार करून सविस्तर माहिती द्यावी, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सांप्रदायिक अफवा पसरवणाऱ्यावर सरकार नजर ठेवून आहे. या प्रकरणाचे राजकारण होता कामा नये. कोणीही समाजात तेढ निर्माण करमारी माहिती पसरवू नका, अशे गृहमंत्री देशमुख यांनी ट्विट करून म्हटले आहे.
पालघरमध्ये नमकं काय घटलं ?
डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर असल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केल्याची घटना मागील आठवड्यात गुरुवारी रात्री घडली. यावळी समजूत घालण्यासाठी आलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. या प्रकरणी कासा पोलिसांनी 110 जणांना अटक केली आहे. हा हल्ला गावात चोर आल्याच्या अफवेमुळे झाला. या हल्ल्यात सुशीलगिरी महाराज (वय-30) चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (वय-70 रा. कांदिवली आश्रम) व चालक नीलेश तेलगडे (वय-30) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget