Halloween Costume ideas 2015

सत्याची साक्ष - भाग-5

अरबस्थानच्या जवळपास 1 लाखाच्या मुस्लिम अल्पसंख्यांकांना पक्षपाती व अत्याचारी बहुसंख्यांक कुरैशनी संपविण्याचा विडा उचललेला होता. मात्र त्या मुठभर मुस्लिमांनी इस्लामची खरी साक्ष दिल्याने दहा वर्षाच्या आत ते अल्पसंख्यांक न राहता शंभर टक्के बहुसंख्यांक बनवून गेले. मग जेव्हा हे इस्लामचे खरे साक्षीदार अरबस्थानच्या बाहेर निघाले तेव्हा 25 वर्षाच्या आत तुर्कस्थान ते मोरक्को पर्यंत राहणारे लोक त्यांच्या या साक्षीवर श्रद्धा ठेवत गेले आणि जेथे 100 टक्के अग्नीपूजक, मूर्तीपूजक आणि ख्रिश्‍चन राहत होते त्यांचे रूपांतर 100 टक्के मुस्लिमांमध्ये  झाले. कोणताच पक्षपात, कोणताच हट्ट , कोणतीच धार्मिक संकिर्णता एवढी मजबूत ठरू शकली नाही की जी इस्लामच्या जीवंत आणि खर्‍या साक्षी देणार्‍यांच्या समोर टिकू शकेल. आज तुम्ही जेव्हा परास्त होत आहात आणि पुढे यापेक्षा जास्त परास्त होण्याची भीती बाळगून आहात तर त्याचे एकमेव कारण इस्लामची सत्याची साक्ष लपवून खोटी साक्ष देण्याशिवाय दूसरे कोणते कारण असू शकेल?
    खरे पाहता ही तर गुन्ह्याची शिक्षा आहे, जी तुम्हाला या जगात मिळत आहे. आखिरतमध्ये तर यापेक्षा जास्त शिक्षा होण्याची आशंका आहे. जोपर्यंत तुम्ही सत्याचे साक्षीदार या नात्याने आपल्या कर्तव्याचे निर्वाहन करणार नाही तोपर्यंत जगात जी काही पथभ्रष्टता पसरेल, जे अत्याचार होतील, जे दंगे होतील, ज्या वाईट गोष्टी वाढतील आणि जी चरित्रहिनता वाढेल त्या सर्वांचे जबाबदार तुम्ही सुद्धा असाल. जरी तुम्ही या वाईट कृत्यांना जन्म देण्यासाठी जबाबदार नसलात तरी त्यांच्या जन्मासाठी अनुकूल अशी साधणे शिल्लक ठेवणे आणि त्यांचा प्रसार होऊ देण्यासाठी तुम्ही नक्कीच जबाबदार आहात.
    बंधूनों ! जे काही मी आपल्यासमोर नमूद केलेले आहे त्यावरून तुमच्या लक्षात आलेलेच असेलच की मुस्लिम असण्याच्या नात्याने आपल्याला काय करायला हवे होते आणि आप काय करत आहोत? आणि जे काही आपण करत आहोत त्याचेच तर फळ आपण भोगत आहोत. या दृष्टीकोणातून जर का आपण या सगळ्या वस्तूस्थितीवर नजर टाकली तर एक गोष्ट ठळकपणे उघडकीस येईल की, मुस्लिमांनी भारत आणि जगामध्ये ज्या काही समस्यांना आपल्या खर्‍या समस्या समजून ठेवलेल्या आहेत आणि त्यांच्या निवारणासाठी ते जे काही आपल्या बुद्धीने तयार करून त्या उपायांवर अंमलबजावणी करीत आहेत ते उपाय सुद्धा त्यांनी दुसर्‍यांनी तयार केलेल्या उपायांना पाहून तयार केलेले आहेत आणि त्याच उपायांना लागू करण्यासाठी आपणही आपली सगळी शक्ती पणाला लावत आहात. वास्तविक पाहता या समस्या मुस्लिमांच्या खर्‍या समस्या नाहीतच आणि त्यांचे उपाय करण्यामध्ये जो वेळ, शक्ती आणि संपत्ती खर्च होत आहे तो केवळ नुकसानच नुकसान आहे. आता एक प्रश्‍न असा विचारला जाऊ शकतो की, एखादा अल्पसंख्यांक समाज मोठ्या बहुसंख्य समाजामध्ये राहून आपले अस्तित्व, हित आणि अधिकारांना कसे सुरक्षित ठेऊ शकेल ?आणि कोणताही बहुसंख्य समाज आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ती शक्ती कशी प्राप्त करू शकेल जी बहुसंख्य असण्याच्या नात्याने त्यांना मिळायला हवी आणि एक अल्पसंख्यांक समाज कोणत्याही वर्चस्व असलेल्या बहुसंख्य समाजाच्या ताब्यात कसा काय सुरक्षित राहू शकेल आणि एक कमकुवत समाज कशा प्रकारे शक्तीशाली समाजाच्या हाताने नष्ट होण्यापासून स्वतःला वाचवू शकेल? एवढेच नव्हे तर दलित आणि मागासवर्गीय समाज आपला विकास कसा करू शकेल? आपल्या समाजामध्ये सुख आणि शक्ती कशा प्रकारे प्राप्त करू शकेल? त्या शक्ती ज्या की जगातील इतर शक्तीशाली समाजांना प्राप्त आहेत? ह्या आणि अशाच प्रकारच्या अनेक समस्या बिगर मुसलमानांसाठी तर महत्त्वाच्या असू शकतात, ज्यांना प्राधान्यांने सोडविण्यासाठी ते समाज आपली सर्व शक्ती पणाला लावू शकतील. परंतु मुस्लिमांसाठी ह्या काही स्थायी समस्या नाहीत. ह्या तर त्या गफलतीचा परिणाम आहे जी आपण आपल्या मूळ कर्तव्याच्या प्रती करत आहोत. जर आपण ते काम (सत्याची साक्ष) केले असते तर एवढ्या जटील आणि तापदायक समस्या उत्पन्नच झाल्या नसत्या आणि आजही जर आपण या समस्यांच्या जंगलाला साफ करण्यामध्ये आपली शक्ती लावण्याऐवजी याच कामावर लक्ष केंद्रीत केले आणि तन, मन, धन लावून इस्लामची साक्ष दिली तर आपल्या देशात नव्हे तर जगात अस्तित्वात असलेले तापदायक समस्यांचे हे जंगल स्वतःच साफ होवून जाईल. कारण  जगाच्या सफाई आणि सुधारणेची जबाबदारी आमच्यावर होती. आपण आपले कर्तव्य विसरून गेलो त्यामुळे जग काटेरी जंगलाने व्यापले आहे आणि त्यातील सर्वात जास्त काटेरी भाग आपल्या वाट्याला आलेला आहे.
    मला या गोष्टीचे दुःख आहे की, मुस्लिमांचे धर्मगुरू आणि राजकीय नेते या खर्‍या समस्येला समजण्याचे प्रयत्नच करत नाहीत. प्रत्येक ठिकाणी लोकांना विश्‍वास दिला जात आहे की, तुमच्या खर्‍या समस्या ह्या अल्पसंख्यांक विरूद्ध बहुसंख्यांक, आपल्या समाजाची सुरक्षितता तसेच भौतिक प्रगतीच्या समस्या आहेत. आणि परत हे लोक या समस्यांच्या निराकरणाचे उपायही मुस्लिमांना तेच सुचवित आहेत जे त्यांनी बिगर मुस्लिमांकडून शिकून घेतलेले आहेत. मात्र माझा जेवढा अल्लाहवर विश्‍वास आहे तेवढाच या गोष्टीवरही विश्‍वास आहे की तुमचे नेते आणि धर्मगुरू तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवित आहेत. आणि ते दाखवत असलेल्या मार्गावर चालून तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकणार नाही.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget