Halloween Costume ideas 2015
September 2019

माननीय अबू ख़िजामा (वडिलांकडून प्राप्त माहितीवरून) यांच्या कथनानुसार, ते म्हणाले, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘ही दुआ (प्रार्थना) ‘तअवीज्’ (ताईत) जे आम्ही  आजारपणाच्या बाबतीत करतो आणि ज्या औषधांचा आम्ही आपला आजार दूर करण्यासाठी वापरतो आणि दु:ख व संकटांपासून वाचण्यासाठी जे उपाय करतो, हे सर्व उपाय अल्लाहच्या  भाग्यापासून वाचवू शकतात काय?’’ पैगंबरांनी उत्तर दिले, ‘‘या सर्व वस्तूदेखील अल्लाहच्या भाग्याचाच एक भाग आहेत.’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उत्तराचे स्पष्टीकरण असे आहे की ज्या अल्लाहने हा आजार आमच्यासाठी लिहिला आहे त्याच अल्लाहने हेदेखील निश्चित केले आहे की अमुक औषधाने   आणि अमुक उपायाद्वारे हा आजार बरा होऊ शकतो. आजार निर्माण करणारा अल्लाहच आहे आणि तो बरा करणारे औषधाचा निर्मातादेखील. सर्वकाही त्याने  बनविलेल्या कायदेकानू- नुसारच आहेत.

माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, एके दिवशी मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या मागे स्वारीवर बसलो होतो. पैगंबर म्हणाले, ‘‘हे मुला, मी तुला काही सांगत आहे (ते  लक्षपूर्वक ऐक). पाहा, तू अल्लाहचे स्मरण कर अल्लाह तुझे स्मरण करील. तू अल्लाहचे स्मरण कर, अल्लाहला समोर पाहशील. जेव्हा मागशील तेव्हा अल्लाहकडे माग. जर तुला   एखाद्या संकटात मदत हवी असेल तर अल्लाहकडे माग. अल्लाहला तुझा मदत करणारा बनव आणि या गोष्टीवर विश्वास ठेव की अल्लाहने तुझ्याकरिता जे काही लिहून ठेवले आहे  त्याव्यतिरिक्त लोक एकत्र येऊन तुला एखादा लाभ पोहोचवू इच्छित असतील तरी ते तुला लाभ पोहचवू शकणार नाहीत. (म्हणजे कोणाकडे देण्याकरिता काहीही नसल्यामुळे तो देऊ  शकणार नाही, सर्व काही अल्लाहचे आहे. तो जे काही देण्याचा एखाद्याबाबत निर्णय घेतो तेवढेच मिळेल, मग ते कोणत्याही माध्यमातून मिळो.) आणि अल्लाहने तुझ्या भाग्यात जे  काही लिहिले आहे त्याव्यतिरिक्त जर लोकांनी एकत्र येऊन तुला एखादे नुकसान पोहचवू इच्छिले तरी ते कसलेही नुकसान पोहोचवू शकणार नाहीत. (तर मग अल्लाहलाच आपला  एकमेव आधार बनविले पाहिजे.) (हदीस : मिश्कात)

माननीय अबु हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दुर्बल ‘मोमिन’ (ईमानधारक) च्या तुलनेत शक्तिशाली ‘मोमिन’ उत्तम आणि अल्लाह अधिक   पसंत आहे आणि दोघांमध्ये चांगुलपणा व लाभ आहे आणि तू (परलोकात) लाभ देणाऱ्या वस्तूचा लोभी बन आणि आपल्या संकटांत अल्लाहपाशी मदत माग आणि धैर्य खचू देऊ नकोस  आणि तुझ्यावर एखादे संकट कोसळल्यास मी असे केले तर असे होईल असा विचार न करता, अल्लाहने माझ्या नशिबी जे लिहिले, जे त्याने इच्छिले ते केले, असा विचार कर; कारण  ‘ओठ’ (कस्रfचत) शैतानाच्या अनुसरणाचे द्वार उघडतात. (मिश्कात)

स्पष्टीकरण
या हदीसच्या पहिल्या भागाचा अर्थ आहे की एक तर तो  मोमिन (ईमानधारक) आहे जो शारीरिक आणि काळजीवाहक क्षमता बाळगणारा असेल तर निश्चितच जेव्हा तो आपली सर्व  क्षमता अल्लाहच्या मार्गात खर्च करील तर ‘दीन’चे (जीवनधर्माचे) काम त्याच्या हातून अधिक होईल त्या व्यक्तीच्या तुलनेत जो दुर्बल आहे, ज्याची शारीरिक क्षमता चांगली नाही अथवा  काळजीवाहक नाही, तेव्हा अल्लाहच्या मार्गात तोदेखील आपल्या क्षमतांचा वापर करील मात्र तितके काम तो करू शकणार नाही जितके पहिल्या मनुष्य करतो. यासाठी त्याला  दुसऱ्याच्या तुलनेत बक्षीस अधिक मिळाले पाहिजे. दोघेही एकाच मार्गाचे म्हणजेच अल्लाहच्या मार्गाचे प्रवासी आहेत म्हणून या दुर्बल ‘मोमिन’ला कमी काम केल्यामुळे बक्षीसापासून  वंचित केले जाणार नाही. खरे तर शक्ती बाळगणाऱ्या ‘मोमिन’ला हे सांगण्याचा उद्देश असा की आपल्या शक्तीचा आदर करा, तिच्याद्वारे जितके पुढे जाऊ शकता तितके जा, दुर्बलता  आल्यानंतर मनुष्य काही करू इच्छित असेल तरीही करू शकत नाही. आणि हदीसच्या शेवटच्या भागाचा अर्थ आहे की मोमिन आपल्या प्रकृती, उपाय व क्षमतेला सहारा बनवत नाही  तर त्याच्यावर जेव्हा संकट कोसळते तेव्हा त्याच्या मनात विचार येतो की हे संकट माझ्या पालनकर्त्याकडून आले आहे, हा माझ्या सुधाराच्या प्रशिक्षणाचा एक भाग आहे. अशाप्रकारे
हे संकट त्याचे ईमानात (अल्लाहवरील श्रद्धेत) वाढ करण्याचे माध्यम बनते.

(२) हे श्रद्धावंतांनो, ईशपरायणतेच्या प्रतीकांचा अनादर करू नका. निषिद्ध महिन्यांपैकी एखाद्याला वैध करू नका, कुर्बानीच्या जनावरांवर हात टाकू नका. त्या जनावरांवर हात टाकू  नका ज्यांच्या गळ्यात ईश्वरार्पणाच्या खुणा म्हणून पट्टे घातले आहेत, त्या लोकांना छळू नका जे आपल्या पालनकर्त्याची कृपा आणि त्याच्या प्रसन्नतेच्या शोधात पवित्र गृहा (काबा) कडे जात असतील. मग जेव्हा एहरामची स्थिती संपेल तेव्हा तुम्ही शिकार करू शकता- आणि पाहा, एका गटाने तुमच्यासाठी माqस्जदेहराम (काबा माqस्जद) चा मार्ग रोखला आहे,  तर या गोष्टीवर तुमच्या रागाने तुम्हाला इतके भडकवू नये की तुम्हीदेखील त्यांच्या विरोधात अत्याचार कराल. नाही, जे कार्य पुण्याईचे व ईशपरायणतेचे आहे, त्यामध्ये सर्वांशी सहकार्य करा आणि जी पाप व अत्याचाराची कामे आहेत, त्यामध्ये कोणाशीही सहकार्य करू नका. अल्लाहचे भय बाळगा, त्याची शिक्षा फार कठोर आहे.
(३) तुम्हाकरिता निषिद्ध करण्यात आले आहेत मेलेले प्राणी, रक्त, डुकराचे मांस, ते जनावर जे अल्लाहशिवाय इतर कोणाच्या नावाने जुबाह केले असेल.१० ते जे गुदमरून अथवा मार  लागून अथवा उंचस्थानावरून पडून अथवा टक्कर लागून मेले असेल अथवा ज्याला एखाद्या हिंस्र प्राण्याने फाडले असेल त्याव्यतिरिक्त ज्याला जिवंत अवस्थेत असताना११ तुम्ही कापले असेल अथवा ते जे वेदीवर१२ बळी दिले असेल.१३
५) प्रत्येक ती गोष्ट जी एखाद्या रीतीचे, धारणेचे किंवा कार्यशैली, चिंतनशैलीचे तसेच व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करते ते त्याचे प्रतीक असते. कारण ते एक लक्षण किंवा निशाणी असते.  सरकारी ध्वज, फौजेचा किंवा पोलिसांचा गणवेश, शिक्के, नोट आणि स्टॅम्प इ. सर्व सरकारच्या निशाण्या आहेत आणि त्यांचा ज्यांच्यावर जोर चालतो त्यांच्याशी सन्मानपूर्वक  वागणुकीची अपेक्षा ठेवतात. चर्च, सूळी इ. खिस्ती धर्माची प्रतीके आहेत. शेंडी, जाणवे आणि मंदिरे हिंदुत्वाची प्रतीके आहेत. केश, कडा, कृपाण आणि पगडी शीख धर्माची प्रतीके आहेत. हातोडा आणि विळा कम्युनिझमचे प्रतीक आहे आणि स्वास्तिक आर्याचे प्रतीक. हे सर्व पंथ आपल्या अनुयायांना या प्रतीकांचा आदर सन्मान राखण्याचा आदेश देतात. जर एखादा  व्यक्ती एखाद्या विचारसरणीच्या प्रतीकांपैकी एखाद्याचा अनादर करतो तर हे याचा पुरावा आहे की ती व्यक्ती त्या व्यवस्थेचा शत्रू आहे. जर ती व्यक्ती त्याच व्यवस्थेशी संबंधित  असेल तर त्याचे हे कृत्य आपल्या व्यवस्थेशी विद्रोह करण्यासारखे आहे. अल्लाहचे `शआइर' (प्रतीके) म्हणजे ती समस्त लक्षणे आणि निशाण्या ज्या शिर्वâ आणि कुफ्र (अनेकेश्वरत्व  आणि नास्तिकता) आणि नास्तिकतेऐवजी विशुद्ध ईशपरायणता व एकेश्वरत्वाचे प्रतिनिधित्व करतात. अशा निशाण्या आणि प्रतीके ज्या रीतीत व व्यवस्थेत सापडतात. मुस्लिमांना  त्यांचा आदर करण्यास सांगितले गेले आहे. अट हीच आहे की त्यांची मनोवैज्ञानिक पाश्र्वभूमी विशुद्ध एकेश्वरत्वाची आणि ईशपरायणतेची असणे आवश्यक आहे. अल्लाहच्या निशाण्यांचा  आदर करण्याचा आदेश त्या वेळी देण्यात आला होता जेव्हा मुस्लिम आणि अरब अनेकेश्वरवादी लोकांत युद्ध सुरु होते. मक्का शहरावर अनेकेश्वरवादींचा कब्जा होता. अरबच्या प्रत्येक  भागातून अनेकेश्वरवादी लोक हजसाठी आणि काबागृहाच्या दर्शनासाठी (उमरा) काबागृहाकडे येत असत. अनेक कबिल्यांचे मार्ग हे मुस्लिमांच्या ताब्यातील प्रदेशातून जात. अशा वेळी   आदेश दिला गेला की हे लोक अनेकेश्वरवादी जरी असले तरी किंवा तुमच्या आणि त्यांच्यामध्ये युद्ध सुरु जरी असले तरी ते जेव्हा काबागृहाकडे जातात तेव्हा यांना त्रास देऊ नका.   कारण यांच्या बिघडलेल्या धर्मात खुदापरस्ती (धर्मपरायणता) चा जेवढा भाग शिल्लक आहे तो आदर करण्यास पात्र आहे. त्याचा अनादर होऊ शकत नाही.
६) `शआ इरुल्लाह' (अल्लाहच्या निशाण्या) चा आदर करण्यासाठी आदेश दिल्यानंतर अल्लाहच्या काही प्रतीकांचा (निशाण्या) नामोल्लेख करून त्यांचा पूर्ण आदर करण्याचा मुख्य आदेश  देण्यात आला. त्या वेळी युद्धरत स्थिती होती ज्यामुळे ही आशंका निर्माण झाली होती की युद्धाच्या नशेत मुस्लिमांच्या हातून त्या प्रतीकांचा अनादर होऊ नये.
७) `इहराम'सुद्धा अल्लाहच्या निशाण्यांपैकी (प्रतीक) एक निशाणी आहे आणि त्याच्या (इहराम) प्रतिबंधांपैकी कोणत्याही प्रतिबंधाला (अटीला) तोडणे म्हणजे अल्लाहच्या निशाणीचा   अनादर करणे आहे. म्हणून अल्लाहच्या `शआइर' (निशाण्या) विषयी याचा उल्लेख केला गेला की जोपर्यंत तुम्ही `इहराम'च्या स्थितीत असाल शिकार करणे त्या अल्लाहच्या निशाणीचा   (इहराम) अनादर करणे आहे. जेव्हा शरीयतनुसार `इहराम'चा काळ समाप्त् होतो तेव्हा शिकार करणे योग्य आहे.
८) विरोधकांनी त्या काळी मुस्लिमांना काबागृहाच्या परिक्रमेपासून रोखले होते आणि अरबांच्या पुरातन परंपरेनुसार हजपासूनसुद्धा मुस्लिमांना वंचित ठेवण्यात आले. म्हणून  मुस्लिमांमध्ये हा विचार निर्माण झाला की विरोधक कबिल्यांचा मार्ग इस्लामी राज्यापासून जातो त्यांनासुद्धा आम्ही हजला जाण्यापासून रोखावे आणि त्यांच्या काफिल्यावर हजच्या  काळात छापे मारण्यास सुरु करावे. परंतु अल्लाहने ही आयत अवतरित करून त्यांना असे करण्यापासून रोखले.
९) म्हणजे ते जनावर ज्याला नैसर्गिक मृत्यू आला आहे.
१०) म्हणजे ज्याला जुबह करतांना अल्लाहच्या नावाशिवाय इतर कोणाचे नाव घेतले गेले असेल किंवा ज्याला जुबह करण्याअगोदर हा संकल्प केला गेला असेल की हे जनावर अमुक   पीरसाहेबासाठी किंवा देवीदेवतासाठी भेट आहे. (नजर, नवस व मन्नत आहे) (पाहा सूरह २, टीप. १७१)
११) म्हणजे जे जनावर उपरोक्त दुर्घटनांपैकी ज्या एखाद्या दुर्घटनेत जखमी झाले आणि ते मृतावस्थेत जिवंत आहे तर त्याला जुबह केल्यास त्याला खाल्ले जाऊ शकते. यावरून हे   स्पष्ट होते की हलाल जनावराचे मांस फक्त जुबह केल्यानेच हलाल होते. दुसरा कोणताच प्रकार जनावराला हलाल करण्यास योग्य नाही. हे `जुबह' आणि `जक़ाह' इस्लामचे पारिभाषिक   शब्द आहेत. याने अभिप्रेत मानेचा (हलक) तितकाच भाग कापणे ज्याने शरीरातील रक्त चांगल्या प्रकारे बाहेर पडेल. झटका मारणे किंवा गळा दाबणे   व इतर अन्य प्रकाराने  जनावराला मारण्याचे नुकसान म्हणजे त्याच्या शरीरातच बहुतांश रक्त गोठले जाते आणि ते मासांबरोबर चिकटून जाते. याविरुद्ध `जुबह' केल्याने (हलाल पद्धत) मेंदू आणि शरीर या   दोहोत संबंध जास्त वेळ राहातो. यामुळे नसानसातून रक्त बाहेर फेकले जाते आणि अशाप्रकारे संपूर्ण शरीराचे पूर्ण मांस रक्ताने साफ होते. रक्ताविषयी वर उल्लेख आलाच आहे की ते  (रक्त) अवैध आहे. म्हणून मांस पवित्र आणि हलाल होण्यासाठी आवश्यक आहे की रक्त मांसापासून पूर्ण वेगळे झाले पाहिजे.
१२) अरबीमध्ये मूळ शब्द `नुसुब' आला आहे. याने तात्पर्य ती सर्व स्थळे किंवा देवस्थाने आहेत ज्यांना `आस्ताना' (वेदी)सुद्धा म्हटले जाते. जिथे अल्लाहव्यतिरिक्त इतरांच्या नावाने   मन्नत अथवा नैवेद्य दिला जातो. अशा स्थानावर दगडाची किंवा लाकडाची मूर्ती असो किंवा नसोत. या स्थानांना एखाद्या पीर, देवता किंवा संताच्या तसेच अनेकेश्वरवादी  विचारसरणीने जोडलेले असते. अशा अस्थान्यावर (वेदीवर) `जुबह' केलेले जनावर हराम आहे.
१३) येथे ही गोष्ट अगदी समजून घेणे अत्यावश्यक आहे की खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये हराम व हलालचे प्रतिबंध लावण्यात आले आहे. यामागे वैद्यकीय लाभ किंवा नुकसान नाही तर   त्याचे नैतिक फायदे आणि तोटे आहेत. वैद्यकशास्त्र आणि प्राकृतिक तथ्याविषयी संबंध अल्लाहने मनुष्याच्या स्वत:च्या प्रयत्नावर आणि शोधकार्यावर सोडून दिले आहे.

केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर, आपल्यामुळेच देश सर्व आघाड्यांवर उत्तम कामगिरी करीत असल्याच्या धुंदीत  सरकार वावरत असल्याचे दिसत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी नुकतीच जी चिंता व्यक्त केली आहे, त्यावर केंद्र सरकारने  गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. केवळ ते विरोधी पक्षातील नेते आहेत म्हणून त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करण्याचा कोतेपणा केंद्रातील भाजप सरकारने दाखवता कामा नये. देशाची अर्थव्यवस्था सध्या चिंताजनक असल्याचे सांगून, त्यातून बाहेर पडण्यासाठी विवेकी-विचारी लोकांशी चर्चा करावी आणि अर्थव्यवस्थेला या  संकटातून बाहेर काढावे, असे  माजी पंतप्रधान आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ म्हणत असतील तर त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे, हे लक्षात घ्यायला हवे. देशामध्ये असलेले मंदीचे वातावरण हे सर्वव्यापी गैरव्यवस्थापनामुळे  निर्माण झाले आहे. गेल्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनवाढीचा दर पाच टक्क्यांपर्यंत घसरला असल्याची सरकारी आकडेवारी आहे. एकीकडे उत्पादन क्षेत्रात घसरण, तर दुसरीकडे  मागणीही घसरत असल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीतून देशाला बाहेर काढायचे असेल तर सूडाचे राजकारण बाजूला ठेऊन सर्व विचारी-विवेकी व्यक्तींना बरोबर घेऊन मार्ग  काढायला हवा. नोटाबंदी आणि घाईघाईने वस्तू आणि सेवा कर लादण्याच्या ज्या चुका झाल्या त्यामधून आपली अर्थव्यवस्था अद्याप सावरली नसल्याकडे डॉ. मनमोहनसिंग यांनी लक्ष  वेधले आहे. देशाची अर्थव्यवस्था जागतिक दर्जाची करण्याच्या गप्पा मारण्याचे थांबवून, विद्यमान स्थितीतून देश कसा सावरेल, याकडे मोदी सरकारने गंभीरपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आर्थिक विकास दराने १५ वर्षांतील नीचांकी पातळी गाठली असल्याकडे, करमहसूल हवा तसा झाला नाही आणि देशामध्ये कर दहशतवाद फोफावला आहे. डॉ.  मनमोहनसिंग यांनी अर्थव्यवस्थेबद्दल ज्या गोष्टी लक्षात आणून दिल्या आहेत, त्या भाजपला मान्य नसल्याचे दिसून येत आहे. भ्रष्टाचार आणि वशिलेबाजी यांना प्रोत्साहन देऊ  इच्छिणाऱ्या मंडळीकडून मनमोहनसिंग यांचा वापर केला जात असल्याचे सांगून भाजपने हे सर्व म्हणणे अमान्य केले आहे. अर्थव्यवस्था का घसरत चालली आहे हे एखाद्या तज्ज्ञ  व्यक्तीने निदर्शनास आणून दिले तर नाकाला मिरच्या झोंबायचे काहीच कारण नाही. सातत्याने आपले उत्पादन किंवा मॅन्युपॅâक्चरिंग क्षेत्र मागे पडत असून, सेवाक्षेत्राचाच काय तो  आधार मिळत आहे. औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक घसरता आहे. देशातील उपभोग आणि गुंतवणूक अत्यल्प असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेस रेटा मिळत नाही. गेल्यावर्षी एकूण  गुंतवणुकीचा ३० टक्के असलेला दर जवळपास अर्ध्या टक्क्याने कमी झाला आहे. पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न दाखवणाऱ्या भाजप सरकारच्या काळातच देशावर आर्थिक मंदीचे सावट गडद होत चालले आहे. २०१८च्या चौथ्या तिमाहीत खरेदीच्या मागणीचे प्रमाण, जे सुमारे दहा टक्के होते, ते चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तीन टक्क्यांवर आले आहे.  पाच ट्रिलियनपर्यंत मजल मारायची झाल्यास, आपला विकासदर ७-८ टक्क्यांवर तरी गेला पाहिजे. निर्मितीक्षेत्राची वाढ वर्षभरापूर्वीच्या १२ टक्क्यांवरून ०.६ टक्क्यांवर, बांधकाम क्षेत्राची  ९.६ टक्क्यांवरून ५.७ टक्क्यांवर, तर शेतीची ५ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर अशी परागती झाली आहे. गुंतवणुकीचे प्रमाणही आटत चालले आहे. मोदी सरकारने ‘मेक इन इंडिया’ सारख्या  कायक्रमांची घोषणा केली होती; परंतु त्या दिशेने काहीही प्रगती झालेली नाही. केवळ बँकांच्या एकत्रीकरणामुळे देशातील नरमाईचे वातावरण बदलेल, असे  नाही असे तज्ज्ञांचे मत आहे. रिझव्र्ह बँकेकडून सरकारने जो अतिरिक्त निधी घेतला आहे, तो पायाभूत क्षेत्रात तातडीने खर्च केला पाहिजे. देशातील रेल्वेवरही मंदीचा परिणाम दिसू लागला आहे. कोळसा व सिमेंट  यांची मालवाहतूक अत्यंत कमी होऊ लागली आहे. आणि आता निर्यातही घसरू लागली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पामुळे घोर निराशा होऊन, भांडवली बाजारातील विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार निघून जाऊ लागले आणि त्यामुळे सेन्सेक्स ३ हजार अंशांनी आदळला होता. आपल्या अर्थसंकल्पाचा पंतप्रधानांनी गुणगौरव केला असला,  तरी देशात मात्र उदासीचे वातावरण कायम होते व आहे. याबद्दल बरीच ओरड झाल्यानंतर जागे होऊन अर्थमंत्र्यांनी दोन पत्रकार परिषदा घेऊन, नवीन पॅकेजेस घोषित केली. मात्र,  अर्थव्यवस्थेतील मूलभूत समस्या दूर केल्याशिवाय दीर्घकालीन विकास होण्याची शक्यता कमी आहे. दुबळ्या बँकांना सबळ बँकांबरोबर एकत्र आणण्याचा प्रयोग याआधीही झाला आहे व  तो फारसा यशस्वी झालेला नाही. पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) देशाचा आर्थिक विकास दर ५.८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर घसरल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सरकारवर  चोहोबाजूंनी टीका सुरू झाली होती. भारतातील महाविद्यालयीन शिक्षणाचा दर्जा अत्यंत वाईट आहे. कुशल मनुष्यबळाअभावी भारत मागे पडत आहे. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे.

-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४
Email: magdumshah@eshodhan.com

२१ राज्यातील ११००० पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या १२००० पोलीस आणि त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून ‘२०१९ स्टेट्स ऑफ पोलिसिंग इन इंडिया’ असा अहवाल तयार करण्यात आला. या अहवालात मुस्लिम समाजातील व्यक्तींच्या स्वभावातचं गुन्हा करण्याचा कल असतो, असा धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आला आहे. संपुर्ण मुस्लिम समाजालाच   आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करणाऱ्या या अहवालावर गांभिर्याने चर्चा व्हायला हवी. हा अहवाल तयार करण्यासाठीची सर्व्हेक्षण पध्दती, त्या सर्व्हेक्षणात घेतलेले एकक व त्याच्या प्रमाणिकरणासाठी वापरलेली पध्दती, त्यामागचा हेतु आणि त्यामागील शासनाची भुमिका हि अधिकृतरित्या समोर आली पाहिजे. मुस्लिमांविषयी नियोजनबध्दपणे पसरवलेली सामाजिक   समज आणि त्यामागच्या राजकीय प्रेरणा याचा विचार करुन अशा सर्व्हेक्षणाचे एकक घेतले जातात. अनेक खटल्यातुन खुद्द पोलिसांची मानसिकता समोर आली आहे. मुस्लिम   समाजाला राजकीयदृष्ट्या गुन्हेगार ठरवण्याच्या प्रक्रीयेत पोलिसांची भुमिकाही महत्त्वाची ठरली आहे. विभुतीनारायण राय यांच्या ‘भारतीय पोलिस आणि मुसलमान’ या पुस्तकात अशा   अनेक घटनांचा उल्लेख येतो. हाशिमपुराच्या घटनेने तर पोलिसाच्या माध्यमातुन कार्यरत असलेल्या सांप्रदायिकतेच्या झुंडीला बेनकाब केले आहे. ‘हु किल्ड करकरे’ , ‘व्हाय ज्युडिशिअरी   फेल्ड’ ’११ साल सलाखों के पिछे’, ‘अक्षरधाम केस’ जामिआ च्या प्राध्यपकांनी केलेले दहशतवादाच्या खटल्यांचे सत्यशोधन यातुन आरोपींपेक्षा पोलिसांच्या भुमिका संशयास्पद वाटल्या  आहेत. बकरी ईदच्या पाश्र्वभुमीवर हिंगोली शहरात तणाव निर्माण करण्यात आला. त्यावेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांनीच मुस्लिमांची वाहने फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संबधित   कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. इशरत जहां, सोहराबुद्दीन हत्याकांड, बाटला हाउस इनकाउंटर, भोपाळ इनकाउंटर, यामध्ये पोलिसांनी रचलेल्या कथा अत्यंत हास्यास्पद आहेत.
दहशतवादाच्या खटल्यातुन सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष सोडण्याचे प्रमाण ८० टक्क्याहून आधिक आहे. हैदराबादच्या मक्का मसजिद बाम्बस्फोट खटल्यात निर्दोष मुस्लिम तरुणांना   अनेक वर्ष तुरुंगात डांबण्यात आले. त्यानंतर असिमानंदने कबुली जबाब दिल्यानंतर शासनाने त्या तरुणांची माफी मागितली. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले. पण त्या आधिकाऱ्यांचे  काय? ज्यांनी कलिम, मोहसीन सारख्या निष्पाप तरुणांना बॉम्बस्फोटाच्या खटल्यात गोवले? ज्या असिमानंदाने न्यायालयासमोर कबुलीजबाब दिला त्याची देखील जामीनावर मुक्तता होते. मालेगाव खटल्यात मुळ आरोपी पकडल्यानंतरही चुकीच्या पध्दतीने त्या खटल्यात गोवलेल्या मुस्लिम तरुणांना सोडले जात नाही. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जात नाहीत.  त्यांना न केलेल्या गुन्ह्यात नाईलाजाने जामीन घ्यावा लागतो. त्या पाश्र्वभूमीवर असा अहवाल येणे सहाजिक आहे.मागील आठवड्यात कारी ओवेस नावाच्या तरुणाची झुंडीकडून हत्या  करण्यात आली. तो कारी ओवेस कसा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता, हे सांगण्याचे प्रयत्न आता केले जात आहेत. मृताला, पिडीताला गुन्हेगार ठरवणाऱ्या या मानसिकतेकडून पिडितांचा   समुह असलेल्या मुस्लिम समाजाने दुसरी अपेक्षा काय करावी? मृत्युनंतर नुकसान भरपाईऐवजी पहलु खानवर गुन्हा दाखल केला जातो. अशा मानसिकतेच्या व्यक्तींनी सर्व्हेक्षण केले   असेल आणि त्यांनी त्यांच्याच नातलगांचे एकक तपासले असतील तर या अहवालाच्या निष्कर्षिावषयी अचंबीत होण्याची गरज नाही. पोलीसांच्या पापामुळे निर्दोष असूनही आयुष्याचे २१   वर्ष तरुंगात खपवल्यानंतर हि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या निसार अहमद सारख्या शेकडो तरूणाच्या डोळ्यात जर तुम्हाला गुन्हेगार प्रवृत्ती दिसत असेल, आणि या देशातील अनेक   न्यायप्रेमी माणसे या प्रकरणांकडे पाठ फिरवून मुस्लिमांच्या चुका दाखवत राहणार असतील तर या देशाच्या भविष्यात आपण अंधार पेरतोय इतके मात्र नक्की.
केंद्रातले सरकार बदलल्यानंतर अवघ्या काही दिवसात पुण्यामध्ये मोहसीन शेख या तरुणाची झुंडीद्वारे हत्या केली जाते. पाच वर्ष पुर्ण झाल्यानंतरही त्याच्या मारेकऱ्यांना शिक्षा होत  नाही. त्याच्या आई वडीलांना नुकसान भरपाईची रक्कम मिळत नाही. त्याच्या हत्येनंतर मोहसीनच्याच परिवाराचीच उलटी चौकशी केली जाते. आपल्या मुलासाठी न्याय मागत   फिरणाऱ्या असहाय्य पित्याने अखेर मृत्यु जवळ केला, पण त्याची दखल किती जणांनी घेतली. पोटा, टाडा, युएपीए अंतर्गत हजारो मुस्लिम तरुणांना तुरूंगात टाकून त्यांच्या आयुष्याचे  १०-३० वर्ष कुणी बर्बाद केले. या कायदा अंतर्गत पोलिसांनी अटक केलेल्या किती तरूणांवरती आरोप न्यायालयात आरोप पोलिसांनी सिद्ध केले?
त्या उपरही मुस्लिम समाजाविषयी सर्व्हेक्षण केले जाते. उलट सर्व्हेक्षण पोलिस प्रशासनाविषयी व्हायले हवे. किती पोलिस कर्मचारी सांप्रदायिक प्रवृत्तीचे आहेत. किती जम धर्मप्रेरीत  अत्याचारात पक्षपाती भुमिका घेतात. किती जणांनी मुस्लिम असणाऱ्या आरोपींचे त्याच्या धर्मभेदामुळे छळ केला आहे. अशा प्रश्नांवर सर्व्हेक्षण व्हायला हवा. त्याचा अहवाल तयार  करायला हवा. पण इथे उलटपक्षी मस्लिम समाजाचे सर्व्हेक्षण केले जाते. मुस्लिम समाजाची प्रतिमा मलिन केली जाते. हा अहवाल तयार करण्याची आताचे प्रयोजन नेमके काय आहे?   याविषयी वेगळे सांगायची गरज नाही.

टाडा आणि पोटाची आकडेवारी
टाडा-१९८७ ला संपूर्ण देशात लागू झाला तो १० वर्ष देशात लागू राहिला. त्यातील ९ वर्षांचे टाडा कायद्याचे आकडे उपलब्ध आहेत,
अर्थात ३० जुन १९९४ पर्यंतचे हे आकडे आहेत. टाडा अंतर्गत ७६,१६६ व्यक्तींना अटक झाली. त्यात मुस्लिम ओरोपींचे प्रमाण सर्विाधक आहे. त्यातील फक्त -८१३ लोकांना शिक्षा झाली.   त्यानंतर दहशतवादाच्या वाढत्या घटनांचे संदर्भ देऊन २६ मार्च २००२ रोजी  पोटा कायदा करण्यात आला. राज्यसभा आणि लोकसभेत एकत्रित कामकाज घेऊन हा कायदा पारित केला   गेला. त्याअंतर्गत ४३४९ गुन्हे दाखल करण्यात आले. आणि १०३१ व्यक्तींना अटक करण्यात आली. त्यापैकी फक्त १३ लोकांना शिक्षा झाली. (हे आकडे राज्यसभेत तत्कालीन गृहमंत्र्यांनी १४ मे २००५ ला दिलेले आहेत)
दोन्ही कायद्यामध्ये गुन्हे दाखल होण्याची आकडेवारी त्यावर अटक होण्याची आकडेवारी आणि त्यानंतर गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा झालेल्यांची आकडेवारी यामधील तफावत मोठी आहे.  त्यामुळे हीच तफावत दोन्ही कायदे रद्द करण्यास कारणीभूत ठरली. पोलीसांनी गुन्हेगाराला समाजाशी व समाजाला गुन्हेगाराशी जोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा शेकडो तरूणांचे आयुष्य  कशाप्रकारे बर्बाद करण्यात आले यावर पण एखादा अहवाल सादर करावा. जर असा अहवाल सादर झाला तर त्या अहवालाचा जो निष्कर्ष निघेल त्यातुन पोलिस प्रशासनाची खरी  प्रतिमा समोर येईल
या अहवालातून गोहत्या, अपहरण, बलात्कार व रस्ते अपघातानंतर झुंडशाहीकडून एखाद्याला ठेचून मारणे, त्याचबरोबर एखाद्या गुन्हेगाराचे एन्काउंटर करणे अशा गुन्ह्यांना बहुतेक  पोलिसांचे समर्थन असल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर येतील. मध्यंतरी एका खाजगी संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणात सुमारे ३५ टक्के पोलिसांना गोहत्येवरून जमावाकडून संशयिताला  ठेचून मारणे योग्य वाटत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तर ४० टक्के पोलिसांना बलात्कार, अपहरण, रस्ते अपघातात वाहकाची चूक असेल तर अशांना जमावाकडून  मिळणारी शिक्षा किंवा जमावाकडून होणारा हिंसाचार योग्य वाटला. मुस्लिम समाजाविषयी आलेल्या अहवालाचे हे प्रकरण खुप गंभीर आहे. संबधित अहवाल तयार करणाऱ्याची व  त्यामाध्यमातून आपेल इप्सित साध्य करण्यात गुंतलेल्यांना रोखायला हवे. गेल्या कित्येक वर्षे जमातवादी इतिहासकारांनी, लेखकांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली लोकांच्या मनात   मुस्लिम समाजाच्या विरोधात चुकीचा प्रचार केला. गुजरात दंगलीचे समर्थन करणारे अनेक आधिकारी आजही गुजरातच्या प्रशासनात आहेत. ज्यांनी निरपेक्षपणे काम करण्याचा प्रयत्न  केला त्या संजीव भट यांच्यासारख्या आधिकाऱ्यांना तुरुंगात जावे लागले. मुस्लिम समाजासोबतच भारतीय समाजाच्या भविष्यासाठी हे अत्यंत घातक आहे. न्यायसंस्थेची, दंडव्यवस्थेची  निरपेक्षता अबाधित राहत नसेल तर राष्ट्राच्या अस्तित्वाला त्यामुळे धोका निर्माण होउ शकतो. त्यामुळे प्रत्येक सजग भारतीय व्यक्तीला राष्ट्राच्या भविष्यासाठी सावध होण्याची गरज  आहे. न्यायसंस्था आणि दंडव्यवस्थेला बहुसंख्याक राजकारणाच्या प्रभावातुन मुक्त करुन राष्ट्राच्या प्रतिमेला जपायला हवे. भारतीय राज्यघटनेची भारतीय समाजाविषयीची संकल्पना  राष्ट्राविषयीची सामाजिक भुमिका यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

-सुफियान मनियार
(बीड)
मो.: ८८३०३०२३७३

लोककशाही ही माहिती व माध्यमाच्या प्रक्रियेशी जोडलेली असते. लोकांची निर्णयप्रक्रिया याच माहितीतून तयार होत संवादाची परिसंस्था बनते. संवादाची माध्यमं रेडिओपासून सोशल मीडियापर्यंत आलेली आहेत. लोकशाहीदेखील त्याच्याबरोबर स्वतःची कात सोडत पुढे जाताना दिसते. 2010 नंतर लोकशाहीचे हे डिजिटल स्वरूप सर्वांनी कळत नकळत पहिले आहे. माहिती व तंत्रज्ञानकाळाची परिमाणे याच काळामध्ये दिसायला लागली. मानवी उत्क्रांतीमधील ही पहिली वेळ असेल, ज्यामध्ये एकाच काळात फायदे व परिणाम भोगता येत आहेत. राजकीय रणांगणे केवळ मतदान प्रक्रियेपुरती मर्यादित राहिली नसून माहिती-डेटा’ ही सत्ताकेंद्री आलेली आहेत किंबहुना माहिती हीच सत्ता झाली आहे. लोकांची इत्थंभूत माहिती सोशल मीडिया आणि By using our Services, you are agreeing to these terms' या प्रायव्हसी आणि टर्ममधून आपण दिलेली आहे. अलगोरिथम आणि सांख्यिकीय विश्‍लेषणांतून पुढील प्रक्रिया आणखी सोपी झाली आहे. जगातल्या कोणत्याही व्यक्तीची ओळख, त्याची आवडनिवड, राजकीय विचार, सामाजिक स्थान, कौटुंबिक माहिती एका क्लिकद्वारे मिळू शकणारी यंत्रणा उपलब्ध आहेत. एकूणच सामाजिक माध्यमं लोकांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठीच्या प्रयोगशाळा बनल्या आहेत. त्याची उदाहरणे ब्रेक्झिटपासून ते हाँगकाँगच्या सध्याच्या आंदोलनापर्यंत पाहता येतील.
    प्रत्यार्पण विधेयकाला विरोध करत सार्‍या जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या हाँगकाँग आंदोलनाच्या पद्धतीची चर्चा सर्वत्र होताना दिसतेय. लोकशाही हक्काच्या होणार्‍या पायमल्लीविरोधात हे आंदोलन पेटलेले आहे. पोलिस आणि राज्य संस्था आंदोलन दडपण्यासाठी हवे ते करताना दिसत असले तरी आंदोलक मागे हटताना दिसत नाहीत. पोलिंसाकडून पाण्याच्या फवार्‍याचा मारा होताना एक विशिष्ट प्रकारचा रंग आंदोलकांवर लेसरच्या माध्यमातून टाकला जातोय, जेणेकरून त्या आंदोलकांची ओळख पटू शकेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हाय डेफिनेशन कॅमेर्‍याद्वारे आंदोलकांचे चेहरे ओळखून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.आंदोलन फोडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न होत असताना आंदोलकही तितक्याच जोरदार पद्धतीने प्रत्युत्तर देत आहेत. हाय डेफिनेशन कॅमेर्‍यावर आंदोलकांकडून हिरव्या आणि निळ्या रंगाच्या लेसर किरणांचा मारा केला जातोय, ज्यामुळे कॅमेर्‍यातून फोटो घेता येत नाही. गेल्या काही दिवसांत अशा लेसर टॉर्चची मागणी वाढलेली दिसतेय. पोलिस लेसर टॉर्च विकणार्‍या आणि वापर करणार्‍यांना पकडत आहेत. अशा पद्धतीच्या कॅमेर्‍यांचा वापर करण्यासाठी हाय स्पीड इंटरनेट सेवा पोलिसांना दिली जात आहे, ज्यामधून आंदोलकांचे वर्तन, भाषा, पेहराव, चेहर्‍यावरील भाव ओळखून पुढील डावपेच आखले जातात. माहिती तंत्रज्ञान काळात अशी आंदोलने जगाच्या इतिहासात पहिल्यांदा होताना दिसत आहेत. हिंसा आणि हिंसेची भाषा बदलत असताना त्याचे प्रत्युत्तर हाँगकाँग आंदोलकांकडून तितक्याच आधुनिक पद्धतीने दिले जात आहे.
    आंदोलकांची तयारी,पोशाख, तंत्रज्ञानाचा वापर यामुळे आंदोलनाचे भविष्यातील स्वरूप कसे असू शकते याची प्रचिती येताना दिसतेय. राज्य संस्था आणि पोलिस वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत असताना आंदोलकांनी त्यावर उत्तर शोधलेले दिसते. सिम्बॉलिक किंवा चिन्हांच्या स्वरूपात बोलणे असेल, एका ठिकाणी जास्त वेळ न थांबता बी वॉटर’ या संकल्पनेचा वापर करत गर्दी दूर करणे असेल, पोलिसांच्या अश्रुधुराच्या गोळ्यापासून वाचण्याच्या नवीन पद्धती शोधणे असेल तसेच घरगुती वस्तू वापरून पोलिसांकडून होणार्‍या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव केला जातोय. चेहरा ओळखला जाऊ नये म्हणून मास्क वापरला जात आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर रंग पुसला जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सोशल मीडिया कम्युनिकेशन सिस्टिमद्वारे आंदोलकांची ओळख शोधली जात असल्याने आंदोलकांनी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि लोकल मोबाइल अ‍ॅप डिलीट केले आहे.
    भारतातली आंदोलने या तुलनेने कुठे आहेत, याचा अभ्यास यानिमित्ताने होऊ शकेल. भारतीय आंदोलनाची सामाजिक मानसशास्त्रद्वारा दिशा समजू शकते. काही अपवाद वगळता भारतीय आंदोलने ही जाती-वर्ग-लिंगभाव-धर्माच्या चौकटीत अडकलेली दिसतात. तात्पुरती संवेदनशीलता, प्रलोभनं, सातत्याचा अभाव अशी समान गुणवैशिष्ट्ये या आंदोलनात आहेत. गेल्या दशकातील आंदोलनांचा मागोवा घेतला तर लक्षात येऊ शकेल की, आंदोलनामध्ये भाग घेणारे लोकं कोण आहेत आणि त्यांची त्यामागची मानसिकता किती तात्पुरती आहे. जनलोकपाल बिल पास करण्यासाठी झालेले आंदोलन, निर्भया आंदोलन ही काही ताजी उदाहरणे. कोणतीही पूर्वतयारी नसलेले, इंटरनेट तंत्रज्ञानाचा कळेल तितका वापर करणारे लोक,पारंपरिक घोषणा आणि व्यक्तिकेंद्रित आंदोलने फार काळ टिकू शकत नाही हे याने सिद्ध झाले.
    किसान मार्च आंदोलनात शेतकर्‍यांनी नाशिक ते मुंबई असा काढलेला लॉँगमार्च हे भारतीय आंदोलनातील विषमतेचे उत्तम उदाहरण. सुरुवातीचे 2-3 दिवस माध्यमांनी दखल न घेतलेले आंदोलन काही वेळातच सोशल मीडियावर धडकले. लोक आंदोलनाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत पाठिंबा दर्शवत होते, काही आंदोलकांच्या पायांची कातडी निघालेले फोटो स्वतःची फेसबुक प्रोफाइल आणि कव्हर फोटो म्हणून लोकांनी वापरले. व्हर्च्युअल पाठिंबा आणि भासात्मक संवेदनशीलता ही आपल्या आंदोलनाच्या वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य. ’मी टू’ हे कामाच्या ठिकाणी महिलांसोबत होणारे अत्याचार समोर आणणारे असेच एक आंदोलन. यामध्ये अनेक दिग्गजांची नावे समोर आले. सोशल मीडियाद्वारे महिलांकडून आरोप होत होते, ज्याला सोशल मीडियावर पाठिंबादेखील मिळत होता.ऑनलाइन आंदोलनाचा हा प्रकार.भारतामधील ही आंदोलने जरी इंटरनेट तंत्र वापरत असली तरी त्याची तीव्रता खूप कमी आहे.
    कार्यात्मक लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष  सहभागाचे महत्त्व असते. हाँगकाँगसारख्या आंदोलनातून डिजिटल लोकशाही आणि इंटरनेट माहिती काळात आंदोलने कशी असायला हवीत याची प्रचिती सार्‍या जगाला मिळाली आणि आंदोलनाची व्याख्याच बदलली. काळानुसार लोकशाही बदलते आणि लोकशाहीला आकार देणारी आंदोलनेही बदलायला हवीत. इंटरनेट ज्याला मानवी इतिहासात स्वातंत्र्याचे बलस्थान मानले जात होते, त्याचे निरंकुश पद्धतीने धोकादायक तंत्रात रूपांतर केले जात आहे. इंटरनेट एकूणच मानवी सभ्यतेसाठी धोकादायक ठरत आहे. वास्तव/सत्य समजून घायच असेल तर सत्य कोणीच तुम्हाला सांगू शकणार नाही. सांगितले तर केवळ त्याची आवृत्ती सांगू शकतील.जर तुम्हाला सत्य जाणायचं आहे तर ते तुम्ही स्वतःला शोधावे लागेल. खरी सत्ता कोणत्याही घटनेच्या पलीकडे पाहण्यामध्ये असते. जोपर्यंत तुम्ही शोधात राहता, त्यांच्यासाठी तुम्ही धोकेदायक असता. हीच त्यांची भीती असते.’ आंदोलनाची गरज लोकशाहीमध्ये वास्तव शोधण्यासाठी असते. आणि आंदोलने

अक्रम ढालाईत
 akramdh068@gmail.com

काही टोकाची भूमिका घेणार्‍या राजकीय आणि सामाजिक पक्ष-संघटनांचा हा खास मुद्दा राहिला आहे की काँग्रेस आणि इतर काही राजकीय पक्ष मुसलमानांचा अनुनय करतात आणि त्यांना देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि साधन संपत्तीत उचित व देय हिश्श्यापेक्षा जास्त देतात. हा आरोप राजेंद्र सच्चर कमेटीच्या अहवालाद्वारे निराधार असल्याचे सिद्ध झाले आहे. ही सच्चर समिती इ.सन 2005 मध्ये केंद्र शासनाद्वारे मुस्लिम समुदायाच्या सद्यस्थितीतील सामाजिक आणि शैक्षणिक अवस्थेवर अहवाल तयार करण्याकरिता नेमली गेली होती. समितीने आपला अहवाल इ.सन 2006 मध्ये सादर केला. समितीने विरोधकांद्वारे मुस्लिमांची मनधरणी होत असल्याच्या नीतीचे बनावटी सत्य पसरविणार्‍यांचे तोंड बंद करण्यासाठी प्रामाणिक आकडे प्रस्तुत केले. समितीने हा निष्कर्ष मांडला की भारतातल्या मुसलमानांची अवस्था अनुसूचित जाती-जमातींपेक्षाही निकृष्ट दर्जाची आहे. समितीने सत्याचा पाठपुरावा करून आश्‍चर्यजनक आकडे प्रस्तुत केले आणि हे सांगितले की, शासकीय नोकर्‍या आणि इतर सामाजिक, आर्थिक क्षेत्रांमध्ये मुसलमानांची अवस्था हेच त्यांच्या सामाजिक अवस्था आणि अनुनयाला तपासून पाहण्यास पुरेसे आहे. आम्ही हे बघितले पाहिजे की या मापदंडानुसार मुसलमान कोणत्या जागी उभे आहेत? स्मरणात असावे की देशात मुसलमानांची लोकसंख्या सुमारे 15 टक्के आहे.
    1. मुसलमानांमध्ये साक्षरतेचे प्रमाण राष्ट्रीय स्तरावर सरासरी साक्षरता प्रमाणापेक्षा खूप खालावलेले आहे. 6 ते 14 वर्ष वयोगटातील 25 टक्के मुस्लिम मुले एक तर कधीच शाळेत जात नाहीत, किंवा मध्येच शाळा सोडून देतात. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शैक्षणिक संधीचा विस्तार भारतीय मुसलमानांकरिता लाभदायक ठरला नाही. प्रमुख महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी-स्तरावर एकूण 25 विद्यार्थ्यांमध्ये 1 मुस्लिम विद्यार्थी असतो. सर्व सामाजिक आणि धार्मिक सांप्रदायांमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांचा बेरोजगारीचा दर सर्वाधिक आहे. शिकत असलेल्या मुस्लिम मुलांपैकी केवळ 3 टक्के मुले मदरशात जातात. सच्चर कमिटीने या गोष्टीचाही उल्लेख केला आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या विकासाकरिता जी सकारात्मक पावले उचलली गेलीत. त्यापासून निदान या जाती-जमातींना काही संवैधानिक तरतुदी मिळाल्या आहेत. याचप्रकारे भारतीय मुसलमानांकरिता अशा सकारात्मक उपक्रमांची गरज आहे.
    2. शासकीय विभागातील उच्चस्तरीय नोकर्‍यांमध्ये त्यांचे प्रतिनिधीत्व मोठे करूणाजनक आहे. प्रथम श्रेणींच्या नोकर्‍यांमधील त्यांचा सहभाग 3.10 टक्के, द्वितीय श्रेणीत 4.3 टक्के, चतुर्थ श्रेणीत मात्र 8.16 टक्के आहे. खाजगी क्षेत्रात तर ही आकडेवारी याहून कमीच आहे.
    3. नोकरशाहीत एकंदरित मुसलमानांचे प्रमाण फक्त 2.5 आहे. वस्तुतः भारताच्या एकूण लोकसंख्येत मुसलमानांची संख्या 15 टक्के आहे.
    4. आय.ए.एस.मध्ये मुसलमानांचे प्रमाण 3 टक्के आय.एफ.एस.मध्ये 1.8 टक्के, रेल्वेत 4.5 टक्के, पोलीस दलात 6 टक्के, आरोग्य सेवा विभागात 4.4 टक्के आणि वाहतूक यंत्रणेत 6.5 टक्के आढळून आले. वास्तविक भारताच्या लोकसंख्येत मुसलमान 15 टक्के आहेत. भारतीय रेल्वेत मुसलमान फक्त 4.5 टक्के आणि यात 98.7 टक्के मुसलमान निम्नस्तरीय पातळीवर तैनात आहेत. विद्यापीठे आणि बँकांमध्ये मुसलमानांचा सहभाग फार कमी प्रमाणात आहे. कोणत्याही राज्यात शासकीय नोकर्‍यांमध्ये मुसलमानांचा सहभाग त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नाही. पोलीस शिपायांमध्ये यांचा सहभाग केवळ 6 टक्के आहे. आरोग्य विभागात 4.4 तर वाहतूक विभागात 6.5 टक्के आहे.
    5. उच्च न्यायालयामध्ये 310 न्यायाधीशांमध्ये (1 एप्रिल इ.सन. 1980 च्या रिपोर्टनुसार) फक्त 14 मुस्लिम न्यायाधीश होते.
    6. आर्थिक सहाय्यासंदर्भात कर्ज घेणारे मुसलमान 4.3 टक्के होते आणि मुसलमानांना दिले गेलेले कर्ज, एकूण वितरित केेलेल्या कर्जाच्या 2.02 टक्के होते. समग्र आर्थिक क्षेत्रात मुसलमानांना दिले गेलेले ’डिफ्रंन्शिअल इन्ट्रेस्ट रेट क्रेडिट’ केवळ 3.76 टक्के होते.
    7. उद्योगांमध्ये देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक घराण्यांमध्ये जास्त करून उद्योग मुसलमानांच्या मालकीचे किंवा नियंत्रणात नाहीत. मुसलमानांच्या ज्या उद्योगांना लायसेन्स दिले गेले. त्यांची संख्या 2 टक्क्यांहून कमी आहे.
    मुसलमान हस्तकला उद्योगात प्रामुख्याने कुशल कारागिराचे स्थान बाळगतात. या क्षेत्रात काम करणार्‍या कारागिरांपैकी 51.89 टक्के कारागीर मुसलमान होते. परंतु, या क्षेत्रात मुसलमानांचे स्वामित्व फक्त 4.4 टक्के होते.
    सर्वात जास्त चिंताजनक हकीगत अशी आहे की, सच्चर समितीला असेही आढळून आले की, भारतीय मुसलमानांना कोणत्याही अर्थपूर्ण राजकीय सहभागापासून वंचित राखण्याच्या योजनाबद्ध कट-कारस्थानाच्या आरोपात काही तथ्य आहे. उदाहरणार्थ, बिहार, उत्तर प्रदेश, प.बंगाल आणि अधिकतर राज्यांमध्ये अशा निवडणूक क्षेत्रांना रिजर्व घोषित केले जाते, जे मुस्लिम बहुल निवडणूक क्षेत्र असतात. तिथे केवळ अनुसूचित जातीचे उमेदवारच निवडणूक लढू शकतात. उघड आहे की मुसलमान अनुसुचित जातीवर्गात येत नाहीत.
    - सय्यद हामिद मोहसिन

लोकसभा निवडणुकांच्या निकालाची उत्सुकता संपूर्ण देशाला लागून राहिली होती. निकालाच्या पूर्वसंध्येला वृत्तवाहिन्यांपासून ते चहाच्या टपरीपर्यंत सगळीकडेच चर्चा झडत होत्या.  याचवेळी मुंबईतल्या नायरहॉस्पिटलमध्ये एम.डी. करणारी डॉ. पायल तडवी ही भिल्ल समाजातली मुलगी जातीय भेदभाव, सातत्यानं वरिष्ठांनी केलेली  छळवणूक यामुळे असहाय  घुसमटीचा सामना करत होती. २२ मेला घडलेल्या प्रकारामुळे ती इतकी असहाय झाली की तिनं मरणाला  कवटाळलं. पायलनं आत्महत्या करुन आयुष्य संपवलं.
पायलच्या आत्महत्येआधी तिच्या आईनं पायलसोबत केल्या जाणाऱ्या जातीय भेदभाव, छळवणुकीची माहिती देणारं एक पत्रही हॉस्पिटलच्या डीननालिहिलं होतं. इतकंच नाही तर या  पत्राच्या प्रती तिच्या आईनं आरोग्यमंत्र्यांना आणि आग्रीपाडा पोलिसांनाही दिल्या होत्या आणि याबाबत काहीकारवाई करण्याची विनंती केली होती, आपल्या मुलीचं युनिट हॉस्पिटलच्या  डीनने बदलून द्यावं अशी विनंती केली होती. या पत्रांकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आलं आणि पायलला आत्महत्या करायला भाग पाडलं गेलं. ज्या तीन वरिष्ठ महिला डॉक्टरांनी  पायलला जातीय भेदभावाची वागणूक देऊनतिचा छळ केल्याचा आरोप आहे, त्या तिघींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हेमा आहुजा, अंकिता खंडेलवाल आणि भक्ती मेहेरे या  तिघींवर पायलचा छळ केल्याचा आरोप आहे. यानंतर नायर हॉस्पिटलच्या अ‍ॅन्टी रॅगिंग कमिटीनं पायलसोबत ‘मोठ्या प्रमाणात’ जातीय भेदभाव, छळवणूक झाल्याचा निष्कर्षही तपासाअंती दिला.
या घटनेनंतर सोशल मीडियापासून रस्त्यावरच्या निदर्शनांपर्यंत सगळीकडे जातीय भेदभावाबाबतचा रोष, उद्विग्नता दिसून आली. पायलच्या आत्महत्येनं जातीय भेदभावाच्या, जातीवरुन  गंभीर छळवणूक करण्याच्या, आरक्षणाला कोणतंही निमित्त शोधून विरोध करण्याच्या घटना या कमी झाल्या नसून उलट त्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. त्यामुळेच शहरांमध्ये,   महानगरांमध्ये कुठे आहे जात? हा प्रश्न फसवा आणि राजकीय - सामाजिक वास्तवाकडे डोळेझाक करणारा आहे. त्यामुळेच महानगरी स्त्रियांना आजही जातीय भेदभावाचा जो अनुभव  येतो, त्याबद्दल चर्चा करणं महत्वाचं आहे. ही चर्चा करतानाच मुंबईत गोरेगावमध्ये राहणारी अनुराधा जाधव ही तरुणी तिचा अनुभव सांगते. ‘मी साठ्ये कॉलेजमधून बारावीपर्यंत शिकले.  त्यानंतर मालाडच्या कॉलेजमध्ये जाहिरातक्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी पदवीला प्रवेश घेतला. इथं गुजराती मुलींची संख्या जास्त होती. त्यांनी कधी जातीवरुन हिणवलं नाही मात्र जवळही केलं नाही. त्या मला आणि माझ्या ग्रुपमधल्या माझ्यासारख्या मुलींना एका अंतरावर ठेवत असत. आम्ही त्यांना नको आहोत हे कायम जाणवायचं. कॉलेजमध्ये डान्सची स्पर्धा  आणि इतर काही उपक्रमात या मुली आम्हाला सहभागी करुन घेत नसत. काही मुली त्यांच्याच जातीच्या, त्यांच्याच आर्थिक परिस्थितीच्या इतर मुलींना या उपक्रमांमध्ये भाग   घेण्यासाठी पुढे करत. खूप मुश्किलीनं आम्हालातिथपर्यंत जायला मिळालं.’
अनुराधासारखाच अनुभव माझाही आहे. मुंबई - पुण्यासारख्या शहरात आता कुणी कुणाला रोजच्या व्यवहारात थेट जात विचारत नाही, पण याचा अर्थ जातीभेद संपला आहे, असा नाही.  जातीभेदाचं स्वरुप बदलत चाललं आहे. महानगरात जगण्याचा वेग अधिक आहे. जागेचा, पायाभूत सुविधांचा लोकसंख्येच्या प्रमाणात अभाव या गोष्टींमुळे एकमेकांशी चांगलं आणि   सहकार्यानं वागल्याशिवाय पर्यायच नसतो. त्यामुळे पूर्वीसारखं थेट जात विचारुनकुणी वगळलं नाही, तरी जातिभेद संपला नाही तर त्याचं स्वरुप बदललं आहे. मी मुंबईतल्या सुप्रसिद्ध  अशा रुइऱ्या महाविद्यालयात शिकले. महाविद्यालयामधल्या विविध स्पर्धा, युथ फेस्टिवल असो की विद्यार्थीदशेत सर्वांगीण विकास करण्याच्या संधी असोत, या संधी मिळायच्या किंवा  दिल्या जायच्या त्या विशिष्ट आडनावांच्या मुला - मुलींना. आडनावं बघूनच या मुला - मुलींना हुशार, सर्वगुणसंपन्न समजलं जायचं आणि मला मात्र वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा  असला की आधी अमुक इतक्या स्पर्धांचा अनुभव घेऊन ये, मग विचार करु असं सांगण्यात यायचं. स्पष्टच बोलायचं झालं तर ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी हाच निकष नव्हता. स्पर्धेत भाग  घेण्यासाठी स्पर्धकांच्या संख्येची मर्यादा असेल आणि इच्छुक अशा सगळ्यांनाच भाग घेणं शक्य नसेल, तर शिक्षकांनी काही विषयांवर इच्छुकांना तयारी करायला लावून  चाचणी घ्यावी  आणि त्यातून निवड करावी, असंही मी सुचवलेलं होतं - मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे पदवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी मला या स्पर्धांमध्ये भाग घेता आला नाही.  दरम्यानच्या काळात मी निराश झाले तरीही शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे मी इतर लहान - मोठ्या स्पर्धा केल्या. त्यात माझ्या कॉलेजला मी पहिला/दुसरा क्रमांक मिळवून दिला.  त्यानंतर कुठे माझा रुइयाच्या राज्यस्तरीय जी.डी. पारीख या वक्तृत्व स्पर्धेत ‘पात्र ठरण्याचा’ मार्ग मोकळा झाला. मी मनानं खमकी होते म्हणून झगडून माझा हक्क मिळवला, परिश्रम  घेतले मात्र प्रत्येक विद्यार्थ्याकडे एवढी ऊर्जा असेलच असं नाही.
विविध स्पर्धा या आधीच सगळे गुण अवगत असलेल्या आणि ज्यांच्याकडे मुबलक सामाजिक-सांस्कृतिक भांडवल आहे  त्यांच्यासाठी असतात कीज्यांना हे गुण विकसित करण्याची
तळमळ आणि कष्टाची तयारी आहे पण तो अवकाशच कधी मिळाला नाही त्यांच्यासाठी असतात? आपल्यामहाविद्यालयाचं प्रतिनिधित्व करणारा विद्यार्थी ‘तेवढा’ तोडीचा हवा,  महाविद्यालयाचं नाव व्हावं हे महत्त्वाचं की सर्वांगीण विकासाच्या संधी सर्वांना समान मिळाव्यात, हे महत्त्वाचं? हे आता प्राध्यापकांना ठरवायला लागेल. महाविद्यालयाचं नाव व्हावं  यासाठी स्पर्धा नसतात तर त्या विद्यार्थ्यांचे कलागुण बहरावेत, त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी असतात. घरी मुबलक पुस्तकं, आई वडील शिक्षित, लहानपणापासून विविध  क्लासेसची रेलचेल, विविध शिबिरं हे ज्या उच्च जातवर्गीय विद्यार्थ्यांना मिळतं त्यांना स्पर्धा - उपक्रमांची जास्त गरज आहे की ज्यांना असा कुठलाच अवकाश उपलब्ध नाही, उलट  अभावांशी झगडावं लागतं त्यांना आहे? सूत्रसंचालन, निवेदन, अभिवाचन हे सगळं उच्चजातीय विद्यार्थ्यांनी करायचं आणि स्टेजवर तांब्या - भांडं ठेवणं, पाहुण्यांचं स्वागत करणं हे   बहुजन मुलांनी करायचं. दलित - आदिवासींनी तर नुसतं प्रेक्षकांत बसून रहायचं, हे कुठवर चालणार आहे? नि मग का करतो आपण समतेच्या, संविधानाच्या गप्पा?
असाच एक अनुभव सांगितला, विदुला सोनाग्रा या मैत्रिणीनं. विदुला संशोधक आहे. तिनं जे.एन.यू विद्यापीठात मास्टर्स केलं. तिथं तिला थेट जातीवरुन, आरक्षण घेण्यावरुन कोणी हिणवलं नव्हतं, मात्र तिच्यासोबतच्या उच्चजातवर्गीय विद्यार्थ्यांना जे वातावरण आणि सर्वांगीण विकासासाठी ज्या संधी मिळाल्या होत्या, त्यामुळे ते अभ्यासात, अवांतर गोष्टीत तिच्यापेक्षा खूप पुढे होते. चांगलं इंग्रजी बोलता येणं, उत्तम वाचन असणं या गोष्टी त्यांना अवगत होत्या, तिथं विदुलाला त्यांचा वावर बघूनच कमीपणा वाटायचा. न्यूनगंड यायचा. आपल्याला हे माहीत नाही, ते येत नाही पण आपल्या मित्र - मैत्रिणींना मात्र खूप येतं, याचं दडपण तिला यायचं. मात्र ती सांगते, ‘त्यांच्यात आणि माझ्यात वाचन, इंग्रजी बोलता येणं  आणि इतरही गोष्टींमध्ये जे अंतर होतं, ते अंतर नाहीसं किंवा कमी करण्याची कोणतीच व्यवस्था तिथं नव्हती. केवळ समुपदेशन पुरेसं नसतं, तर हे अंतरभरुन काढणारे पूल  आपल्याकडे नाहीत. शिवाय ज्या विद्यार्थ्यांना जातवर्गीय विशेषाधिकार, सामाजिक-राजकीय भांडवलामुळे सगळं अवगत आहे,त्यांच्यापैंकी अनेकांत एक  सुप्त अहंगंड असतो. तो कायम   त्यांच्या वागण्या बोलण्यात दिसतो, दुसऱ्याला दुखावण्याइतपत हा गंड असतो. आरक्षण घेणाऱ्यांबद्दल आधीच त्यांच्या मनात असलेली तुच्छता ‘मला सगळं येतं... ते लोक डिझर्व करत  नाहीत.’ असं मनात पक्कं होईपर्यंत बळावते.
विदुलाचा अनुभव आपल्याकडे ‘गुणवत्ता’ या मुद्द्यावरुन नेहमी जो मोठा वाद होतो, त्यावर प्रकाश टाकतो. एखाद्या कामासाठी, परीक्षेसाठी, स्पर्धा -उपक्रमांसाठी काही गुणवत्ता लागते,   तर ही गुणवत्ताही निर्वात पोकळीतून येत नाही. आजूबाजूचे भौतिक घटक - कृती यातून ती निर्माण होते, वाढवली जाते. ज्यांना हे भौतिक घटक, संसाधनं मिळत नाहीत, त्यांच्यामध्ये   ही गुणवत्ता कशी निर्माण होणार? त्यामुळे संसाधनं असलेली व्यक्तीआणि नसलेली व्यक्ती यांच्या गुणवत्तेची सरधोपट तुलना करणं यातूनच आरक्षणाबाबत तुच्छताभाव तयार होतो नि जोपासला जातो.
मुंबईत कायद्याचं शिक्षण घेणारी सामाजिक कार्यकर्ती अनुराधा नारकरही तिचा असाच अनुभव सांगते. ‘मला लहानपणी वाटायचं की माझेच आजोबाचपला शिवण्याचं काम का करतात?  आणि इतर लोक आजोबांना नोकर समजून त्यांच्या चपला रुबाबात आजोबांसमोर का टाकतात? मी जेव्हा विचार करायला लागले तेव्हा वाचन, विचार यामुळे इथलं जातीआधारित  सामाजिक वास्तव मला कळू लागलं. पुढे महाविद्यालयामध्ये गेल्यावर प्रवेशाची यादीलागल्यावर खुल्या प्रवर्गातल्या मुलांची फी आणि आमची फी यात जे अंतर होतं, त्यावरुन हिणवलं  जायचं. ‘तुम्हाला काय.. किती बरं आहे, इतक्या कमी फी मध्ये प्रवेश मिळतो’ असं बोललं जायचं. या लोकांना इतकी कमी  फी भरुन शिकायला लाज नाही वाटत का? हे काय रस्त्यावरचे भिकारी आहेत का? अशा टोमण्यांनी मानसिक खच्चीकरण केलं जायचं. हे अनुभव जवळच्याच उच्चजातीय मित्र - मैत्रिणींकडून यायचे. अकरावी कॉमर्सपासून ते एल.एल.बी.च्या शेवटच्या वर्षापर्यंत हे असे अनुभव आले.लॉ कॉलेजमध्ये संविधान अभ्यासणाऱ्या मुलामुलींकडूनही जर हे अनुभव येत असतील तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल?’
पुणे विद्यापीठात स्त्री अभ्यासात पदव्युत्तर शिक्षण घेतलेली आणि मुक्त पत्रकार असलेली मिनाज लाटकर सांगते, ‘आमच्या विद्यापीठात मालेगावहूनएक मुलगी शिकायला आली   होती. ती धार्मिक होती. तिला नमाज पढायला आवडायचं. पण त्यामुळे इतर मुली तिला हॉस्टेलच्या खोलीमध्ये त्यांच्यातसामावून घेत नव्हत्या. बहुसंख्याक समाजाचे सगळे सण अगदी   न्यू इयरही विद्यापीठात साजरं होत असे, कारण जगभरातले विविध धर्मीय विद्यार्थी शिक्षण घेतात पण मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी मात्र कोणतेही सण साजरे केले जात नाहीत आणि   सर्वांना त्यात सहभागी व्हावंसं वाटत नाही. अशा अनेक कारणांनी, मुस्लिमांच्या बाबतीतल्या स्टिरियोटाईप्समुळे वेगळेपणाची भावना विद्यार्थ्यांमध्ये येते. त्यामुळे येणाऱ्या नैराश्यामुळे,  ताणामुळे अनेक मुस्लिम मुली डिपार्टमेंट सोडतात, अनेकजणी तर शिक्षणच अध्र्यातून सोडून देतात. पुन्हा आपण हे म्हणायला तयार असतो की मुस्लिम समाजातमुलींच्या उच्च  शिक्षणाचं प्रमाण कमी आहे.’ विद्यार्थी जेव्हा जातीय, धार्मिक भेदांमुळे अशा मानसिक ताणतणावातून जात असतात, तेव्हा त्यांना यातून बाहेर पडण्याकरता काही व्यवस्था  महाविद्यालयामध्ये असते का? असं विचारल्यावर ती सांगते, ‘महाविद्यालयामध्ये, विद्यापीठांत अ‍ँवटी रॅगिंग कमिटी, ऍन्टीसेक्शुअल हरॅसमेंट कमिटी अशा समित्या असतात. पण या  समित्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात नाही. अनेकांना अशी कोणती समिती असते हेच माहीत नसतं.महाविद्यालयं, विद्यापीठं या समित्यांची माहिती असणारे फलकही  विद्यार्थ्यांना सहज दिसतील अशा दर्शनी भागांत आणि खूप ठिकाणी लावत नाहीत. कुठल्याशा कोपऱ्यात एखादा बोर्ड असतो, तेवढं पुरेसं नाही.’ विद्यापीठांपासून कोणत्याही शैक्षणिक  संस्थेमध्ये अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं अकादमिक वर्षाच्या सुरुवातीला एक ओरिंएटेशन होतं. त्यामध्ये अ‍ॅन्टी रॅगिंग कमिटी, अ‍ॅन्टी सेक्शुअल हरॅसमेंट कमिटी आपल्या  संस्थेत आहे, तुम्हाला काही समस्या आली, तर त्यांच्याशी संपर्क करा, असं एका वाक्यात सांगितलं जातं. मात्र यासाठी वेगळा वेळ काढून यासमित्यांचं महत्व, तिथे का गेलं पाहिजे,  त्यांचे प्रमुख कोण आहेत, त्यांचे संपर्क क्रमांक ही इत्यंभूत माहिती देणारं एक वेगळं सेशन हवं, याची गरजच शैक्षणिक संस्थांना वाटत नाही. शिवाय अ‍ॅन्टी रॅगिंग कमिटी, अ‍ॅटी  सेक्शुअल हरॅसमेंट कमिटी, इक्वल अपॉर्चुनिटी सेल या कमिट्या सबंध शैक्षणिक वर्षात एकदाही स्वत: प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद करुन आढावा घेत नाहीत. स्वत: या  समित्यांनी ठराविक काळाने जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद करणं, आढावा घेणं हे त्यांच्या कार्यपद्धतीला बंधनकारक नसलं तरी जोवर या कमिट्यांकडून हा पुढाकार घेतला जाणार नाही,   तोवर याची माहिती विद्यार्थ्यांना मिळणार नाही आणि या समित्यांबाबत विद्यार्थी आश्वस्तही होणार नाहीत. 
(पूर्वार्ध)
 
–प्रियांका तुपे

अरबस्थानच्या जवळपास 1 लाखाच्या मुस्लिम अल्पसंख्यांकांना पक्षपाती व अत्याचारी बहुसंख्यांक कुरैशनी संपविण्याचा विडा उचललेला होता. मात्र त्या मुठभर मुस्लिमांनी इस्लामची खरी साक्ष दिल्याने दहा वर्षाच्या आत ते अल्पसंख्यांक न राहता शंभर टक्के बहुसंख्यांक बनवून गेले. मग जेव्हा हे इस्लामचे खरे साक्षीदार अरबस्थानच्या बाहेर निघाले तेव्हा 25 वर्षाच्या आत तुर्कस्थान ते मोरक्को पर्यंत राहणारे लोक त्यांच्या या साक्षीवर श्रद्धा ठेवत गेले आणि जेथे 100 टक्के अग्नीपूजक, मूर्तीपूजक आणि ख्रिश्‍चन राहत होते त्यांचे रूपांतर 100 टक्के मुस्लिमांमध्ये  झाले. कोणताच पक्षपात, कोणताच हट्ट , कोणतीच धार्मिक संकिर्णता एवढी मजबूत ठरू शकली नाही की जी इस्लामच्या जीवंत आणि खर्‍या साक्षी देणार्‍यांच्या समोर टिकू शकेल. आज तुम्ही जेव्हा परास्त होत आहात आणि पुढे यापेक्षा जास्त परास्त होण्याची भीती बाळगून आहात तर त्याचे एकमेव कारण इस्लामची सत्याची साक्ष लपवून खोटी साक्ष देण्याशिवाय दूसरे कोणते कारण असू शकेल?
    खरे पाहता ही तर गुन्ह्याची शिक्षा आहे, जी तुम्हाला या जगात मिळत आहे. आखिरतमध्ये तर यापेक्षा जास्त शिक्षा होण्याची आशंका आहे. जोपर्यंत तुम्ही सत्याचे साक्षीदार या नात्याने आपल्या कर्तव्याचे निर्वाहन करणार नाही तोपर्यंत जगात जी काही पथभ्रष्टता पसरेल, जे अत्याचार होतील, जे दंगे होतील, ज्या वाईट गोष्टी वाढतील आणि जी चरित्रहिनता वाढेल त्या सर्वांचे जबाबदार तुम्ही सुद्धा असाल. जरी तुम्ही या वाईट कृत्यांना जन्म देण्यासाठी जबाबदार नसलात तरी त्यांच्या जन्मासाठी अनुकूल अशी साधणे शिल्लक ठेवणे आणि त्यांचा प्रसार होऊ देण्यासाठी तुम्ही नक्कीच जबाबदार आहात.
    बंधूनों ! जे काही मी आपल्यासमोर नमूद केलेले आहे त्यावरून तुमच्या लक्षात आलेलेच असेलच की मुस्लिम असण्याच्या नात्याने आपल्याला काय करायला हवे होते आणि आप काय करत आहोत? आणि जे काही आपण करत आहोत त्याचेच तर फळ आपण भोगत आहोत. या दृष्टीकोणातून जर का आपण या सगळ्या वस्तूस्थितीवर नजर टाकली तर एक गोष्ट ठळकपणे उघडकीस येईल की, मुस्लिमांनी भारत आणि जगामध्ये ज्या काही समस्यांना आपल्या खर्‍या समस्या समजून ठेवलेल्या आहेत आणि त्यांच्या निवारणासाठी ते जे काही आपल्या बुद्धीने तयार करून त्या उपायांवर अंमलबजावणी करीत आहेत ते उपाय सुद्धा त्यांनी दुसर्‍यांनी तयार केलेल्या उपायांना पाहून तयार केलेले आहेत आणि त्याच उपायांना लागू करण्यासाठी आपणही आपली सगळी शक्ती पणाला लावत आहात. वास्तविक पाहता या समस्या मुस्लिमांच्या खर्‍या समस्या नाहीतच आणि त्यांचे उपाय करण्यामध्ये जो वेळ, शक्ती आणि संपत्ती खर्च होत आहे तो केवळ नुकसानच नुकसान आहे. आता एक प्रश्‍न असा विचारला जाऊ शकतो की, एखादा अल्पसंख्यांक समाज मोठ्या बहुसंख्य समाजामध्ये राहून आपले अस्तित्व, हित आणि अधिकारांना कसे सुरक्षित ठेऊ शकेल ?आणि कोणताही बहुसंख्य समाज आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ती शक्ती कशी प्राप्त करू शकेल जी बहुसंख्य असण्याच्या नात्याने त्यांना मिळायला हवी आणि एक अल्पसंख्यांक समाज कोणत्याही वर्चस्व असलेल्या बहुसंख्य समाजाच्या ताब्यात कसा काय सुरक्षित राहू शकेल आणि एक कमकुवत समाज कशा प्रकारे शक्तीशाली समाजाच्या हाताने नष्ट होण्यापासून स्वतःला वाचवू शकेल? एवढेच नव्हे तर दलित आणि मागासवर्गीय समाज आपला विकास कसा करू शकेल? आपल्या समाजामध्ये सुख आणि शक्ती कशा प्रकारे प्राप्त करू शकेल? त्या शक्ती ज्या की जगातील इतर शक्तीशाली समाजांना प्राप्त आहेत? ह्या आणि अशाच प्रकारच्या अनेक समस्या बिगर मुसलमानांसाठी तर महत्त्वाच्या असू शकतात, ज्यांना प्राधान्यांने सोडविण्यासाठी ते समाज आपली सर्व शक्ती पणाला लावू शकतील. परंतु मुस्लिमांसाठी ह्या काही स्थायी समस्या नाहीत. ह्या तर त्या गफलतीचा परिणाम आहे जी आपण आपल्या मूळ कर्तव्याच्या प्रती करत आहोत. जर आपण ते काम (सत्याची साक्ष) केले असते तर एवढ्या जटील आणि तापदायक समस्या उत्पन्नच झाल्या नसत्या आणि आजही जर आपण या समस्यांच्या जंगलाला साफ करण्यामध्ये आपली शक्ती लावण्याऐवजी याच कामावर लक्ष केंद्रीत केले आणि तन, मन, धन लावून इस्लामची साक्ष दिली तर आपल्या देशात नव्हे तर जगात अस्तित्वात असलेले तापदायक समस्यांचे हे जंगल स्वतःच साफ होवून जाईल. कारण  जगाच्या सफाई आणि सुधारणेची जबाबदारी आमच्यावर होती. आपण आपले कर्तव्य विसरून गेलो त्यामुळे जग काटेरी जंगलाने व्यापले आहे आणि त्यातील सर्वात जास्त काटेरी भाग आपल्या वाट्याला आलेला आहे.
    मला या गोष्टीचे दुःख आहे की, मुस्लिमांचे धर्मगुरू आणि राजकीय नेते या खर्‍या समस्येला समजण्याचे प्रयत्नच करत नाहीत. प्रत्येक ठिकाणी लोकांना विश्‍वास दिला जात आहे की, तुमच्या खर्‍या समस्या ह्या अल्पसंख्यांक विरूद्ध बहुसंख्यांक, आपल्या समाजाची सुरक्षितता तसेच भौतिक प्रगतीच्या समस्या आहेत. आणि परत हे लोक या समस्यांच्या निराकरणाचे उपायही मुस्लिमांना तेच सुचवित आहेत जे त्यांनी बिगर मुस्लिमांकडून शिकून घेतलेले आहेत. मात्र माझा जेवढा अल्लाहवर विश्‍वास आहे तेवढाच या गोष्टीवरही विश्‍वास आहे की तुमचे नेते आणि धर्मगुरू तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवित आहेत. आणि ते दाखवत असलेल्या मार्गावर चालून तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकणार नाही.

ताख़ीर का मौका ना तजबजुब का अमल है
ये वक्ते अमल वक्ते अमल वक्ते अमल है
    आजपासून 1441 वर्षापूर्वी जेव्हा जगातील बहुतेक लोक मागासलेले होते त्यावेळी इस्लामने जगाला ’नफ्सीयात’ अर्थात मानसशास्त्राचा परिचय करून दिला. या व्यापक शास्त्रातील एक छोटासा अंश ’एकमेकांना भेटण्याचे शिष्टाचार’ याबद्दल आज आपण थोडीसी माहिती घेऊ. विषय थोडासा वेगळा आहे मात्र उपयोगी आहे. वाचकांना कदाचित वाटेल की, एकमेकांना भेटण्यामधील शिष्टाचारामध्ये असे काय असामान्य आहे की त्याची चर्चा करण्याची गरज भासावी? तर त्यांना मी सांगू इच्छितो की, कधी-कधी सामान्य गोष्टीमधूनच एखादी अशी असामान्य गोष्ट पुढे येते की माणसाच्या जीवनाला कलाटणी मिळून जाते.
लक्षात ठेवा मित्रांनों ! कोणालाही भेटताना आपण भेटणार्‍या व्यक्तिशी काय बोलतोय यापेक्षा अधिक महत्त्व आपण त्याच्याशी बोलताना कसे वागतो याला आहे. या संबंधीची जी शिकवण इस्लाम आपल्याला देतो ती अशी की, भेटणार्‍या प्रत्येक व्यक्तीसमोर तुमची देहबोली अशी असावी की, त्या  व्यक्तिला या गोष्टीची जाणीव व्हावी की त्याला भेटताना तुम्हाला कोण आनंद झालेला आहे. तुमचा चेहरा भेटी दरम्यान प्रफुल्लित असावयास हवा. यासाठी अभिनय करण्याची गरज तुम्हाला भासू नये. आपण स्वतःमध्ये अशी सवय रूजवावी की, प्रत्येक भेटणार्‍याला वाटावे की, आपल्या भेटीमुळे ही व्यक्ती खूपच आनंदीत झालेली आहे. असे करणे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुमचा कुरआनच्या खालील आयातींवर आणि प्रेषितांच्या हदीसवर विश्‍वास असेल.
    ”लोकहो! आम्ही तुम्हाला एका पुरूष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकतः अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्‍चित अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.’ (संदर्भ ः कुरआन-अल्हुजरात आयत नं. 13).
    या आयाती शिवाय प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांची एक हदीस अतिशय महत्त्वाची जी या संदर्भात नोंद घेण्यासारखी आहे. ते फरमावतात, ”जगातील लोक हे अल्लाहचा कुंबा (कुटुंब) आहे. या कुटुंबामध्ये अल्लाहला सर्वात प्रिय तो आहे जो या कुटुंबाशी चांगली वर्तणूक ठेवेल.”
    साधारणपणे आपण प्रत्येक भेटणार्‍या व्यक्तिला सारख्याच उत्साहाने प्रतिसाद देत नाहीत. श्रीमंत, मोठ्या हुद्यावरील लोकांव्यतिरिक्त आपण सामान्य लोकांना भेटताना एक तर तिरके बसतो, त्यांच्याकडे चेहरा करत नाही, लक्ष दूसरीकडेच कुठेतरी असते, आता तर सर्वात वाईट गोष्टी अशी सुरू झालेली आहे की, समोरील व्यक्ति बोलत असताना अनेक लोक हे व्हॉटस्अ‍ॅप आणि फेसबुकमध्ये व्यस्त असतात. भेटायला आलेल्या व्यक्तीचा यापेक्षा मोठा अपमान तो कोणता? असे नाही की समोरच्याला तुमचे हे वर्तन कळत नाही. त्याला तुमच्याकडून अशा वर्तनाची अपेक्षा नसते. आपल्याकडून असे वर्तन घडल्यास तो मनोमन स्वतःला दोष देत काही न बोलता निघून जातो. मात्र तुम्ही केलेला आपण आयुष्यभर लक्षात ठेवतो आणि संधी मिळेल तेव्हा वचपा काढल्याशिवाय राहत नाही.
    आजकाल ज्याच्याकडे काम असेल, जो श्रीमंत असेल, मोठ्या पदावर असेल किंवा भविष्यात ज्याची गरज पडू शकेल,अशाच लोकांशी बोलतांना लक्षपूर्वक वार्तालाप करण्याची, देहबोली नम्र ठेवण्याची आपल्याला सवय जडलेली आहे. परंतु इस्लाम ठीक याच्या उलट आपल्याला निर्देश देतो की, प्रत्येक व्यक्तीशी बोलताना त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐका, देहबोली नम्र ठेवा, चेहरा प्रफुल्लित ठेवा, आज एवढे जरी करण्याचा आपण निश्‍चय केला तरी अल्पावधीतच आपण लोकप्रिय व्हाल, समाजामध्ये तुमचा सन्मान वाढेल.
    तुमच्याकडे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचा हेतू प्रत्येक वेळेस साध्य होईलच असे नाही. मात्र तुम्ही त्याला दिलेली वागणूक तो कधीच विसरणार नाही. तुमची भेट घेऊनही त्याचे काम न झाल्याचे दुःख तुमच्या चांगल्या प्रतिसादामुळे सुसह्य होईल. त्यातच जर का तुम्ही त्याला सहानुभूतीपूर्वक हे समजावण्यामध्ये यशस्वी झालात की त्याचे काम करणे तुमच्या अखत्यारित नाही तेव्हा तर त्याचे दुःख आणखीन कमी होईल.
    आज अनेक लोक हा साधा शिष्टाचार पाळताना दिसत नाहीत. किमान मुस्लिमांनी तरी या इस्लामी शिष्टाचाराचे कटाक्षाने पालन करावे, जेणेकरून आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती समाधानी होऊन जाईल. लक्षात ठेवा मित्रानों ! शब्दापेक्षा तुमची देहबोली आणि तुमच्या चेहर्‍यावरील भाव यावरून भेटायला आलेली व्यक्ती चटकन ओळखते की तुम्ही त्याला किती महत्त्व देत आहात ते. म्हणून जोपर्यंत वर नमूद आयात आणि हदीसवर तुमची गाढी श्रद्धा असणार नाही तोपर्यंत तुम्ही प्रत्येकाला समान महत्व देऊन भेटू शकणार नाही.
    दूसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, भेटणार्‍या प्रत्येक व्यक्तिशी नम्रपणे बोलून, ”नेकी” अर्थात पुण्य कमाविण्याची संधी तुमच्याकडे स्वतः होऊन चालत आलेली आहे, याची जाणीव ठेवणे हा आहे. यासंदर्भात एक हदीस खूपच मार्गदर्शक आहे. सय्यदना हजरत अबुजर रजि. यांनी म्हटलेले आहे की, प्रेषित सल्ल. यांनी फरमाविले की, ”नेकी के एक छोटेसे काम को भी हकीर (तुच्छ) न जानो अगरचे ये नेकी का काम सिर्फ अपने भाईसे खंदा पेशानी (प्रफुल्लितपणे) से मिलना ही क्यूं न हो.” (मुस्लिम).
    अनेक सहाबी रजि. यांनी सांगितलेले आहे की, ”प्रेषित मुहम्मद (सल्ल.) हम सबसे ज्यादा मुस्कुरानेवाले थे.” याचाच अर्थ प्रत्येक भेटणार्‍या व्यक्तीचे मग त्याची ओळख असो की नसो स्वागत प्रेषित सल्ल. स्मितहास्याने करत. ही गोष्ट छोटी आहे मात्र याचे महत्व फार मोठे आहे. सय्यदना अबुजर (रजि.) यांनी म्हटलेले आहे की, प्रेषित सल्ल. यांनी फरमाविले की, ”अपने भाई की तरफ मुस्कुराकर देखना तेरे लिए सदका (दान) है, नेक काम का हुक्म और बुरे काम से रोकना भी सदका है, भटके हुए को रास्ता दिखाना सदका है, रास्ते से पत्थर, कांटा और ऐसीही नुकसान देह चीज हटाना सदका है, अपने बरतन से अपने भाई के बरतन में पाणी डालना भी तेरे लिए सदका है.”
    या हदीसमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. रस्त्यात पडलेल्या नुकसानदायक वस्तू हटविणे, विहिरीतून उपसलेले पाणी दुसर्‍याच्या भांड्यामध्ये ओतणे, एखादी व्यक्ती वाईट गोष्ट करीत असेल तर त्यापासून त्याला परावृत्त करणे या सगळ्या गोष्टी प्रेषितांनी पुण्य कर्म असल्याचे म्हटलेले आहे.
    आजकाल आपण नेमकी याउलट परिस्थिती पाहतो. रस्त्यामधील पिडादायक वस्तू हटविणे तर दूर, रस्त्यात कचरा टाकणे, चालता चालता पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फेकणे, केळी खाऊन त्याच्या साली फेकणे, सार्वजनिक उत्सवासाठी रस्त्यात खड्डे करणे, वाईट गोष्टी आपल्या डोळ्यादेखत घडत असतांना त्याकडे दुर्लक्ष करणे या सामान्य बाबी झालेल्या आहेत. विहिरीतून पाणी उपसून दुसर्‍याच्या भांड्यामध्ये ओतणे याचा तर आता विचारसुद्धा करता येत नाही, कारण पाण्यासारखी गरजेची वस्तू विकण्यापर्यंत आपण भौतिक प्रगती केेेलेली आहे.
    मित्रांनों ! या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या आपल्याला पूर्वीपासूनच माहिती होत्या. परंतु, ”दुनिया की चमक दमक”मुळे या गोष्टी विस्मृतीमध्ये गेलेल्या आहेत. मला आनंद होईल, माझा हा लेख वाचून आपण इस्लामच्या या  शिष्टाचाराचा अवलंब करण्याचा निश्‍चय केला तर. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, ”ऐ अल्लाह! एकमेकांना भेटताना आम्हाला या शिष्टाचारांच्या अंमलबजावणीची समज प्रदान कर.” आमीन.


- एम आय शेख
9764000737

NRC
अलिकडे समाज माध्यमामधून मोठ्या प्रमाणात प्रवाहित होणारा विषय म्हणजे एनआरसी आहे. एनआरसीचा अर्थ नॅशनल रजिस्टर फॉर सिटीझन्स असा होतो. या आठवड्याच्या 31 तारखेला आसाममध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या नागरिक छाननी प्रक्रिया (एनआरसीची) समाप्ती झाली आणि 19 लाख घुसखोर असल्याचा निर्वाळा देण्यात आला. हे अनेक अर्थांनी धक्कादायक वास्तव आहे. ज्या कोट्यावधी बांग्लादेशी घुसखोर मुसलमानांना घुसखोर ठरवून त्यांचे नागरी अधिकार गोठावण्यासाठी कोट्यावधी रूपयांचा चुराडा करून ही प्रक्रिया राबविण्यात आली. त्याची अवस्था ’खोदा पहाड निकली चुहिया वो भी मरी हुई’ अशी झाली. 19 लाख तथाकथित घुसखोरांमध्येही हिंदू नागरिकांची संख्या जास्त असल्याने केंद्र सरकारला आसामी लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ज्या कोट्यावधी मुसलमानांना घुसखोर ठरविण्यासाठी हा सगळा आटापिटा केला गेला ते घुसखोर अस्तित्वातच नसल्याचे वास्तव समोर आल्याने भाजप आणि तिचे समर्थक गांगारून गेलेले आहेत. आणि केंद्र सरकारवर त्यांची नाराजी उघडपणे व्यक्त होत आहे.
    मुळात 1971 चे वर्ष गृहित धरून ही जी प्रक्रिया राबविण्यात आली त्या पाठिमागे एक इतिहास आहे. 1971 हे वर्ष बांग्लादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी दुसर्‍या शब्दात सांगायचे तर पाकिस्तानचा एक तुकडा वेगळा पाडण्यासाठी इंदिरा गांधी यांच्या महत्वकांक्षेतून सुरू करण्यात आलेली सैनिक कारवाई होती. बंग बंधू शेख मुर्जीबुर्रहेमान यांच्या समर्थनार्थ मुक्तीबाहिनीच्या समर्थनाने पूर्व पाकिस्तानला तोडून त्याचे बांग्लादेशमध्ये रूपांतर करण्यात आले. या काळात पाकिस्तान आर्मी बरोबर जे युद्ध झाले त्यातून बांग्लादेश आसाम सीमेवरील लाखो लोक विस्थापित झाले. त्यांना आसाममध्ये सामावून घेण्यासाठी केंद्र सरकारने विशेष प्रयत्न केले. त्यांना आसाममध्ये थांबण्यासाठी आश्रयस्थाने तयार करण्यात आली. त्यांच्या गरजा पुरविण्यासाठी पाच पैशाचे विशेष असे पोस्टाचे तिकीट जारी करण्यात आले. हे सर्व बांग्लाभाषीय शरणार्थी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाचे लोक होते. त्या सर्वांना काँग्रेसच्या छत्रछायेखाली शिधापत्रिका, ओळखपत्रे, मतदान कार्ड आदी इत्यादी सर्व कागदपत्रे तयार करून देण्यात आली. आज त्या लोकांची तिसरी पिढी आसाममध्ये राहत आहेत. भाजपला हे सर्व माहित नाही असे नाही. केवळ मुस्लिम द्वेषापोटी त्या सर्वांना घुसखोर ठरविण्यासाठी हा सगळा द्राविडी प्राणायाम करण्यात आला. परंतु, ईश्‍वर कृपेने तो सरकारवरच उलटला.
    1971 साली आलेले हे बांग्लादेशी नागरिक आसाममध्ये स्थायिक झाले आणि त्यांनी त्या ठिकाणच्या सामाजिक चालरिती आणि आसामी भाषा आत्मसात केल्या. विशेष म्हणजे आसाम गण परिषद जी की घुसखोरांचा कट्टर विरोधक मानले जाते तिचीही भूमिका बांग्लाभाषा बोलणार्‍यांच्या विरूद्ध आहे. आसामी भाषा बोलणार्‍या मुस्लिमांबद्दल त्यांना फारसा राग नाही. एकंदरित अंतिम यादीत मुसलमानांची संख्या कमी असल्यामुळे भाजपची निराशा झालेली आहे.
    2015 साली भारतीय नागरिकत्वाच्या कायद्यात केलेल्या बदलानुसार घुसखोर ठरलेल्या या सर्व हिंदूंना भारतीय नागरिक बनविण्याची तरतूद अगोदरच करून ठेवण्यात आलेली आहे. राहता राहिला प्रश्‍न मुस्लिमांचा तर त्यांच्यासाठी अपिलाची 120 दिवसाची मुदत असून, त्यात त्यांचे साह्य करण्यासाठी जमाअते इस्लामी हिंद आणि तत्सम अनेक संस्था ह्या मदतीला पुढे येत असून, अंतिमतः त्यांनाही घुसखोरांच्या यादीतून वगळले जाईल, अशीच शक्यता आहे. कारण मूळच्या बंगाली असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांना बांग्लादेशनी घेण्यासाठी जी टाळाटाळ केली त्यावरून ही गोष्ट स्पष्ट आहे की, आसाममधील ज्या काही बांग्लाभाषिकांना घुसखोर ठरविण्यात येईल, त्यांना बांग्लादेश कदापि स्विकारणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. अशा परिस्थितीमध्ये कोट्यावधी रूपये खर्च करून एनआरसीची ही जी कार्यवाही करण्यता आली. ती अंतिमतः अयशस्वी होईल, याबद्दल शंका राहिलेली नाही. राहता राहिला प्रश्‍न याच योजनेला देशभर लागू करण्याचा तर ते कदापि शक्य नाही.
    आसाममध्ये लागू करण्यासाठी कोट्यावधींचा चुराडा झाला. तर मंदीच्या या काळामध्ये देशामध्ये तो लागू करण्यासाठी किती खर्च येईल, याचा केवळ अंदाजच केलेला बरा आणि केवळ नागरिकांचे रजिस्टर तयार करण्यासाठी एवढा खर्च झेपेल असे वाटत नाही. शिवाय, ते ही अशा परिस्थितीत की 2021 ची जनगणना समोरच आहे.

एनडीटीव्ही हिंदीचे पत्रकार रविश कुमार झुंडी द्वारा केल्या जाणार्‍या हिंसेसंदर्भात कार्यक्रम सादर करताना नेहमी म्हणत असतात की, हा सांप्रदायिक उन्माद कधीही तुमच्या तरूण मुलांना खूनी बनवू शकेल. रविश कुमारची ही भविष्यवाणी मागच्या आठवड्यात दुर्दैवाने खरी ठरली. दिल्लीच्या मौजपूर भागामध्ये पंडितांच्या एका गल्लीमध्ये साहिल सिंह नावाच्या 23 वर्षाच्या हिंदू तरूणाला त्याच्या प्रथम नावावरून मुस्लिम समजून हिंदू पंडित तरूणांनी बेदम मारहाण केली. इतकी की त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संदर्भात साहिलची आई संगिता सिंह यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले की, ’तो स्कूटरवरून आपल्या मित्रांबरोबर घरी परत येत होता. पंडितांच्या मौजपूर येथील गल्लीमध्ये आला असता त्याच्या मित्रांनी हिंदीमध्ये साहिल चलना यार ! असे म्हणून हाक मारली. ती त्या ठिकाणी असलेल्या पंडितांनी ऐकली. त्यावरून त्यांना राग आला की एक मुसलमान आपल्या गल्लीत कसा काय येवू शकतो. त्यावरून त्यांनी साहिलला बेदम मारहाण केली.’
    साहिल हा सुनिल आणि संगीता सिंह यांचा तरूण मुलगा होता. त्याच्या वडिलांची तब्येत ठिक राहत नसल्यामुळे बिल्डींग मटेरियलचा व्यवसाय तो सांभाळत होता. दूसरा एक भाउ आदित्य सिंह अवघ्या 13 वर्षाचा असून, बहीण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. कमवता मुलगा असा अचानक मरण पावल्यामुळे या दाम्पत्याच्या दुःखाला कुठलीच सीमा राहिलेली नाही. या संदर्भात बोलताना मयताचे वडील सुनिल सिंह यांनी सांगितले की, आपल्या देशात जी घृणेची भावना पसरविली जात आहे ती देशासाठी अत्यंत खतरनाक आहे. माझ्या मुलाचे नाव साहिल होते. गल्ली पंडितांची होती आणि त्यांनी साहिलला मुस्लिम समजून मारून टाकले आहे. आश्‍चर्य म्हणजे पोलीस याबाबतीत माझ्या बाजूने उभे राहण्याऐवजी आरोपीतांना वाचविण्यामध्ये आपली शक्ती खर्च करीत आहे. त्यांनी पत्रकारांना प्रश्‍न विचारला की तुम्हाला विश्‍वास बसेल का की, साहिल सारखा 6 फुट 1 इंच उंच आणि 80 किलो वजनाच्या तरूणाला फक्त दोन लोक जीवे मारू शकतात. त्याला मारण्यासाठी एकपूर्ण झुंड सामील होती. मात्र पोलिसांनी फक्त दोघांना अटक केलेली आहे. बाकींना अटक करण्यामध्ये पोलीस टाळाटाळ करत आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजसुद्धा लपवित आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, सीसीटीव्हीमध्ये काहीच रेकॉर्ड झालेले नाही.
    सुनिल सिंह पुढे म्हणतात की, साहिलला जेव्हा झुंडीद्वारे मारहाण केली जात होती तेव्हा पंडितांची पूर्ण गल्ली जमा झाली होती आणि त्यांना आनंद होत होता की, त्यांच्या लोकांना एका मुसलमानाला ठार मारले आहे. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आले की तो एक ठाकूर तरूण होता तेव्हा ते म्हणायला लागले, ” ये बहोत गलत काम हुआ”.
    शुक्रवारी घडलेल्या या घटनेसंबंधी तपशील असा की, साहिल हा आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून परत येत होता आणि त्याच्या मित्रांनी त्याला साहिल म्हणून जेव्हा हाक मारली. तेव्हा गल्लीमध्ये उभा असलेला तसेच दारूच्या नशेमध्ये असलेला चंद्रभान नावाचा एक इसम त्याला आडवा आला आणि त्याने त्याच्याशी वाद घातला. तो म्हणत होता की, आमच्या गल्लीत येण्याची तुझी हिम्मत कशी झाली. तेवढ्यात चंद्रभानचा मुलगाही मित्रांसह तेथे आला आणि लाठा काठ्यांनी सर्वांनी मिळून साहिलला मारहाण करण्यास सुरूवात केली. साहिल ओरडत होता, मदत मागत होता पण कोणीही त्याच्या मदतीला पुढे आले नाही. कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करून स्कूटर घेऊन घरी आला आणि आईच्या कुशीत कोसळला. तात्काळ त्याला रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.    

- बशीर शेख

कोल्हापूर
जमीयत उलेमा ए हिंदतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्त गावामधील नागरिकांना भेट दिली. शहरातील अनेक भागात सर्व सदस्यांनी दौरा केला. तसेच मुस्लिम बोर्डिंगमधील  पुरग्रस्तांनाही भेट देत संवाद साधला.
याबाबत जमीयत उलेमा ए हिंदचे राष्ट्रीय सचिव आणि माजी खासदार मौलाना मेहमुद मदनी म्हणाले, ‘‘जो मानवाची, पशुपक्ष्यांची सेवा करतो. त्यांनाच परमेश्वर पसंत करतो.  परमेश्वर हा कधीही धर्मभेद, मनभेद करत नाही. तो सर्वांना मदत करतो. अनेकजण जन्नत (स्वर्ग) मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. अनेकजण भीतीने जन्नत मागत असतात. काही   लोक पुण्य घेऊन जन्नत मागतात; पण संकटसमयी जे लोक मानवाला, पशुपक्ष्यांना मदत करतात, त्यांना परमेश्वर जन्नतमध्ये स्थान देतो. जिथे पूरग्रस्त नागरिक आहेत. तिथे तुम्ही   सर्वजण सर्वेक्षण करा. सर्व मुस्लिम संघटनांनी मिळून एकत्रितपणे काम करा. प्रत्यक्षात पूरग्रस्तांच्या ठिकाणी जा. ज्याला खरीच गरज आहे. अशा व्यक्तीला मदत करा. रिपोर्ट तयार  करा. धर्म, जातपात काही पाळू नका. सर्वांना मदत मिळेल, असे कार्य करा.''
मुस्लिम बोर्डिंग येथे सदर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमानंतर पूरग्रस्तांसाठी दुआ केली. जमीयत उलेमा ए हिंद महाराष्ट्रचे अध्यक्ष मौलाना हाफिज नदीम सिद्दीकी, जमीयत उलेमा ए  हिंद कोल्हापूरचे अध्यक्ष मौलाना इरफान खान कासमी, जमीयत उलेमा ए हिंद कोल्हापूरचे जनरल सेव्रेâटरी हाजी इम्तियाज पन्हाळकर, मौलाना अब्दुर रऊफ, हाफिज जुबेर सर्जेखान,  काझी अशरफ साहब, हाफिज फैजुल्ला साहब, मुफ्ती इरशाद कोन्नूर, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणीभाई आजरेकर, मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादरभाई मलबारी आदी उपस्थित होते.

कोल्हापूर
पंचगंगेच्या महाप्रलयकारी पूरपरिस्थिती नंतर कोल्हापूर शहरात साथीचे रोग - संसर्गजन्य आजार पसरू नये यासाठी कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य प्रशासन काळजी   घेत आहे.मनपाच्या या उपक्रमाला मुस्लिम बोर्डिंगने सहकार्य केले आहे. या अंतर्गत मुस्लिम बोर्डिंगने पूरग्रस्तावर उपचारासाठी जमा केलेली दोन लाख रुपयांपेक्षा अधिक औषधे आयुक्त  मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे सोपविण्यात आली. यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, डॉ.पावरा, मुबारक मुल्लाणी, कादर मलबारी, मौलाना मुबिन बागवान, आशपाक  आजरेकर रियाज नाईकवाडी, फैय्याज शिकलगार, ऐजाज मोमीन मौलाना अब्दुल वाहीद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर शहरात साथीच्या आजार वरील अँटी बायोटिक औषधे, लहान मुलांसाठीची औषधे स्त्रियांच्या विविध आजार वरील ऑषधे  त्याचबरोबर सॅनिटरी पॉडस् नवीन   गाऊन लहान मुलांना सकस आहार हाँड वॉश रूम फेशनर आणी अन्य सामुग्रीचा समावेश आहे साथीचे पसरू नयेत. यासाठी शहरातील पुरबाधित भागात कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य शिबीरे घेण्यात येणार आहेत. यावेळी रुग्णांना मुस्लिम बोर्डिंगकडून प्रदान करण्यात आलेली औषधे रूग्णांना देण्यात येतील असे सांगून आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी  मुस्लिम बोर्डिंगचे आभार मानले. शहरात नागरिकांनी प्लास्टिक मुक्त जीवन जगावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

रेवती लौल यांच्या Anatomy Of Hate (दी अ‍ॅनाटॉमी ऑफ हेट -वेस्टलँड बुक्स) या पुस्तकात दंगलखोर वृत्तीच्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून विद्वेषातून उद्भवणाऱ्या हिंसेच्या रचनाशास्त्राची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष  उकल करण्यात आली आहे. यातली बातमी ही आहे, की हे पुस्तक ‘क्राऊड फण्डिंग'च्या बळावर वाचकांपर्यंत पोहोचलेलं आहे. सामान्यजन, कलावंत, पत्रकार आदींकडून पैसे गोळा करून  पुस्तकं प्रकाशित करावं लागणं, हे वर्तमानावरचं एकप्रकारचं भाष्यच आहे.


जर्मन-ज्युईश तत्वज्ञ वॉल्टर बेंजामिन यांनी मानवी हिंसेची दोन प्रकारांत विभागणी केली होती. एकमिथकीय हिंसा आणि दोन-अलौकिक हिंसा. जी तत्पर आणि रक्तलांच्छित हिंसा असते, जी तिच्या अस्तित्वासाठी सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर सत्ता गाजवते, असे मिथकीय हिंसेबाबतचे त्यांचे म्हणणे होते. तर अलौकिक हिंसा न्यायासाठी त्याग आणि  समर्पण मान्य करते असे त्यांना सांगायचे होते. याबाबतचे चित्तवेधक विवेचन गेल्या वर्षी प्रकाशित डॉ. आंबेडकर, दलित आणि माक्र्सवाद’ या डॉ. उद्धव कांबळे यांच्या पुस्तकात   विस्ताराने आले आहेच, परंतु नुकत्याच प्रकाशित झालेल्या रेवती लाल यांच्या ऊप Anatomy Of Hate (दी अ‍ॅनाटॉमी ऑफ हेट -वेस्टलँड बुक्स) या पुस्तकात दंगलखोर वृत्तीच्या  व्यक्तिरेखांच्या माध्यमातून विद्वेषातून उद्भवणाऱ्या हिंसेच्या रचनाशास्त्राची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उकल करण्यात आली आहे. यातली बातमी ही आहे, की हे पुस्तक ‘क्राऊड फण्डिंग’च्या  बळावर वाचकांपर्यंत पोहोचलेलं आहे. सामान्यजन, कलावंत, पत्रकार आदींकडून पैसे गोळा करून पुस्तकं प्रकाशित करावं लागणं, हे वर्तमानावरचं एकप्रकारचं भाष्यच आहे. ((Hate) हेट   अर्थात विद्वेष, तिरस्कार माणसाच्या मनात असतोच. तो कुणाला तरी नामशेष करण्याच्या इराद्याने आकारास येतो. विद्वेषाची पुढची पायरी हिंसा असते. परंतु, या पायरीपर्यंत  पोहोचण्यासाठी पोषक घटकही आवश्यक असतात, ते नसतील तर प्रत्यक्ष हिंसा आपलं अस्तित्व दाखवत नाही. जेव्हा ते असतात, ते पद्धतशीरपणे, कुणाच्याही नकळत हिंसेचंही  रचनाशास्त्र रचत असतात. ते कसं रचलं जातं, यात बळी कोण असतो, हत्यार कोण आणि ते हत्यार वापरणारा कोण असतो, हे अत्यंत संयमाने रेवती लाल यांनी तीन केस स्टडींच्या  माध्यमातून वाचकांपुढ्यात आणलं आहे. प्रस्तुत पुस्तकासाठी त्यांनी गोध्रा हत्याकांडानंतर उफाळून आलेल्या दंगलीत प्रत्यक्ष हिंसा करणाऱ्या जवळपास ४०-५० जणांच्या तब्बल १० वर्षं  प्रदीर्घ मुलाखती घेतल्या. हेतू, माणसाच्या मनात दडलेल्या हिंसक मनोवृत्तीचा माग काढणे हा होता. त्यातली भीषणता, निष्ठूरपणा, हिंस्रता अधोरेखित करण्यासाठीच रेवती लाल यांनी   मुलाखत घेतलेल्यांपैकी तीन जणांचा सविस्तर आयुष्यपट मांडून हिंसक मानसिकतेची उकल केली आहे.
यातला सगळ्यात मनोवृत्तीने हिंसक आहे तो, सुरेश. हा अहमदाबादेतली बदनाम वस्ती अशी ओळख असलेल्या छारा नगरातला भरकटलेला युवक आहे. याचं शिक्षण शून्य.चोरी करणे,  दहशत माजवणे, पुरुषार्थाचं दर्शन घडवण्यासाठी वस्तीतल्या पोरीबाळींवर वाईट नजर ठेवणे, त्यांचा शारीरिक उपभोग घेणे यात तो माहीर आहे. त्याचा बापही परंपरेने चोर. आईला  दारु   पिऊन बेदम मारहाण करणारा आहे. सुरेशने दहशतीच्या बळावरच वस्तीबाहेरच्या मुस्लिम मुलीशी लग्न केलेलं आहे. बापाचेच संस्कार असल्यामुळे तोही बायकोवर चारित्र्याच्या  संशयावरून वारंवार अत्याचार करणारा आहे आणि एका टप्प्यावर बायकोचा सूड घेण्यासाठी त्याने बायकोवर बलात्कारही केलेला आहे. असा हा पूर्णपणे गुन्हेगारी वृत्तीचा तरुण दंगलीचे  नियोजन करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकतो आणि ओळखीतल्याच मुस्लिमांना जिवंत जाळण्याचे, मुस्लिम स्त्रियांवर बलात्कार करण्याचे अक्षम्य गुन्हे करत जातो.
यातली दुसरी   व्यक्तिरेखा आहे,डुंगर. हा भील जमातीतला तरुण. त्याचीही कौटुंबिक पाश्र्वभूमी थोडीफार सुरेशसारखीच. निरक्षरता, व्यसनांनी वेढलेली. आपण भील असल्याचा त्याच्यामध्ये न्यूनगंड  मोठा. परंतु कर्मधर्मसंयोगाने तो पवित्र आणि देशभक्त’ आणि धर्मिाभमानी शिक्षकाच्या संपर्कात येतो. हा शिक्षक त्यांची संपूर्ण जबाबदारी घेतो आणि इथून पुढे डुंगरचं स्वत:च्या  आयुष्यावरचं नियंत्रण कायमस्वरुपी सुटतं. तो परधर्मद्वेषातून राजकारण साधणाऱ्यांच्या हाती लागतो. गावपातळीवर कारसेवेत सामील होतो. एकोप्याने राहिलेल्या गावातल्या मुस्लिमांचीच दुकानं जाळतो. फसवणूक करून भेदरलेल्या मुस्लिमांना एका घरात आश्रय देतो आणि इतर धर्मांधांना हाताशी धरून बाहेरून ते घर जाळून टाकतो. सत्तेत सामील असलेले  गावपातळीवरचे नेते, आमदार होण्याची स्वप्न पाहणाऱ्या डुंगरचा वापर करत राहतात. धर्मकेंद्री स्वयंसेवी संस्था त्याचा पुरेपूर गैरफायदा उठवत राहतात.
पुस्तकातली तिसरी व्यक्तिरेखा प्रणवची. सुरेश आणि डुंगरपेक्षा भिन्न. सामाजिक उतरंडीत वरच्या स्तरावरची. प्रणववर लहानपणापासून संस्कार सनातन धर्म, सत्संग आदींचे. तो वडिलांचा विरोध पत्करून समाजविज्ञानात पदवी घेण्याच्या इराद्याने गाव सोडून शहरात येतो. पण शहरात दंगल पेटली असताना, हॉस्टेलमधल्या इतर मित्रांसह एक थ्रील म्हणून    मुस्लिमांची दुकानं लुटायला जातो. त्याचं शिक्षण पूर्ण होतं. तो भूजच्या भूकंपानंतर रा. स्व. संघाचा कार्यकर्ता म्हणून मदतकार्यात जातो. तो भारावून जातो. पण त्यानंतर त्याला एक  आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या एनजीओसोबत काम करण्याची संधी मिळते. इथेच त्याला दंगलीत मुस्लिमांनी अनुभवलेल्या वेदनेची प्रथम जाणीव होतो. तो त्याच्यासाठी आत्मज्ञानाचा क्षण  ठरतो.  त्या अर्थाने प्रणव ही यातली पश्चाताप झालेली आणि स्वत:ला चांगल्या मार्गावर नेणारी व्यक्तिरेखा. पण उरलेल्या दोघांनी हिंसेची दिलेली कबुली वाचक म्हणून सून्न करणारी.  माणूस जनावराहून हिंस्र होऊ शकतो, याचा दाखला देणारी. पुस्तक वाचून संपतं तेव्हा सुरेश, हिंसा सहन करत गेलेली त्याची कमालीची सोशिक बायको फरझाना, वाट चुकलेला डुंगर  यांना भेटण्याची इच्छा अनावर होते. हे या पुस्तकाचं यश. पुस्तकातल्या तिन्ही व्यक्तिरेखा हिंदुत्ववादी संघटनांकडून ‘ब्रेन वॉशिंग’ झालेल्या आहेत. तिघांनीही आडपडदा न ठेवता,  दुष्कृत्यांची कबुली दिलेली आहे. विद्यमान सत्ताधाऱ्यांचे समर्थक म्हणतील, हा सरकारविरोधातला प्रोपागंडा आहे. तसा तो एका पातळीवर आहे सुद्धा, पण त्याहीपेक्षा माणसाच्या ठायी  दडलेल्या हिंसक मानसाचा तो महत्त्वाचा दस्तऐवजही आहे.
गुजरात दंगलीत बजरंग दलाच्या बाबू बजरंगीची भूमिका जाहीर होती. प्रस्तुत पुस्तकातही तो अनेकदा आलेला आहे. या बजरंगीवर ९७ जणांच्या हत्येचा आरोप होता. कोर्टात  त्याच्यावरचे आरोप सिद्ध होऊन त्याला २१ वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली होती. परंतु, काही महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाने मानवतेच्या दृष्टिकोनातून बाबू बजरंगीला जामीन मंजूर  केला. कारण, तीव्र आजारपणामुळे त्याची दृष्टी गेलीय आणि तो बहिराही झालेला आहे. म्हणजे, ज्या बजरंगीने हिंदू धर्माचं नाव घेऊन हिंसा घडवून आणली आज तो आजाराने   गलितगात्र झालेला आहे. पण, हा काव्यगत न्याय आहे, असं म्हणणंसुद्धा मनातल्या हिंसेकडे नेणाऱ्या विद्वेषाचं दर्शन घडवणारं आहे.

(साभार : द वायर मराठी)

–शेखर देशमुख

आज आपल्या देशातील युवा पिढीवर व्यसनांचा इतका पक्का विळखा बसलाय की व्यसन करणे म्हणजे फॅशन, चैन, अनुकरण प्रतिष्ठेचं झालं आहे. सिगारेट, दारू, तंबाखू, गुटखा,  मावा, चरस, गांजा, ड्रग्स, खर्रा, कोकेन इत्यादींसह नशायुक्त अन्य अंमली पदार्थाचं व्यसन देशातील जवळपास ७० टक्के तरुणांपर्यंत पोहाचलं आहे. तसेच आयुष्यात कधीही कसलेही  व्यसन न केलेल्या तरुणांचे प्रमाण १० टक्के इतके आहे. तसेच ज्याची जेवढी कमाई तो त्याप्रमाणे व्यसन करतो. आज सगळीच युवापिढी बिघडलीय असं अजिबात नाही. कुठेतरी  गणित चुकतंय बहुतांश तरुणवर्गाला व्यसनांनी आपल्या जाळ्यात ओढून घेतलेलं दिसून येते. आज भारताची ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षाच्या आतील आहे. युवापिढीला व्यसनाधिन  बनवून भारताला महासत्ता बनण्यापासून अनेक परदेशी षङ्यंत्र करीत असल्याचे दिसते. देशाच्या प्रगतीचा कणा म्हणजे तरुणच या व्यसनांचे लक्ष्य बनला आहे. एका सर्व्हेनुसार सध्या  दररोज ५५०० तरुण व्यसनाच्या आहारी जात असल्याचे दिसते.

व्यसन म्हणजे काय
एखादी गोष्ट वारंवार करण्याची सवय तसेच सवयीसोबत असणारी सशर्तता. आपण एखादी गोष्ट करतोच त्या वेळी बरे वाटते अशी सवय म्हणजे व्यसन आहे. एखादी गोष्ट केल्याविना   बरे वाटत नाही अशी सवय म्हणजे व्यसन आहे. एखाद्या सवयीच्या आहारी जाणे म्हणजे व्यसन आहे. एखादी गोष्ट केल्याविना करमत नाही, जमत नाही, ताजेतवाने व तरतरीतपणा  जाणवत नाही म्हणजे व्यसन आहे. सिगारेट व मद्यपानामुळे होणारे नुकसान सिगारेट पिल्याने केवळ पिणाऱ्या माणसाच्या आरोग्यवरच परिणाम होत नाही तर याचा परिणाम जमीन  आणि पर्यावरणावरही होत असतो. सिगारेट हे प्लॅस्टिकपेक्षाही जास्त धोकादायक असल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. सिगारेट पिऊन फेकून देण्यात येणारे फिल्टर हे  जमिनीबरोबरच पर्यावरणालाही हानी पोहचविते. सिगारेटमधील फिल्टर हे ‘सेल्युलोज एसिटेट फायबर'पासून तयार केले जाते. जे एक प्रकारचे ‘बायोप्लास्टिकच’ असते. हे कुजण्यासाठी  अनेक दशकांचा कालावधी लागतो. त्यामुळे मोठा काळ जमिनीत राहिल्याने जमिनीची उपजाऊ क्षमता कमी होत जाते. यामुळे बिबियाणे अंकुरित होत नाहीत. जर झालेच तर त्या  अंकुराचा विकास होत नाही. एका अंदाजानुसार जगभरात एका वर्षात ४:५० लाख कोटी सिगारेट पिल्यानंतर त्याचे फिल्टर फेकून दिले जातात. या फिल्टरांच्या संपर्कात आल्यास झाडांची   उंची २८ टक्के घटते. यामुळे प्लास्टिकपेक्षाही सिगारेट धोकादायक असल्याचा अहवाल एका संशोधनात करण्यात आला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने तयार केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील एल.सी.ओ.एल. आणि अंमली पदार्थाचे व्यसन ही गंभीर चिंता बनत आहे. तर मद्यपान केल्यामुळे दर ९६ मिनिटांत एका भारतीयाचा मृत्यू होतो. मद्यपानाच्या प्रभावाखाली महिलांवरील ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुन्हे केले जातात. अंमली पदार्थाच्या वापराशी संबंधित समस्यांमुळे दररोज भारतभरात १० टक्क्यांपेक्षा जास्त लोक   आत्महत्या करतात. भारतात १३ टक्के लोक मादक पदार्थाच्या आणि अशा पदार्थांच्या गैरवापरात गुंतलेले आहेत, जे २० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. व्यसनी व्यक्तीच्या जीवनावर  खालील दुष्परिणाम होऊ शकतात

मानसिक परिणाम
सतत चिडचिड होणे, आपल्यावर अन्याय होतो असे वाटणे, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर ह्या विकारांचे प्रमाण वाढणे. एकलकोंडेपणा, अनामिक भीती, वैफल्यग्रस्तता, संशय,  आपल्याला कोणी समजून घेत नाही असे वाटणे आदी. शारीरिक दुष्परिणाम शरीरातील सर्व इंद्रियांची हळूहळू क्षमता कमी होणे, रक्तवाहिन्या कमकुवत होणे, स्नायू, सांध्यांची   कार्यक्षमता कमी होत जाणे, लैंगिक क्षमता नष्ट होणे किंवा नपुंसकता निर्माण होणे, शुक्राणूंचा नाश, मज्जासंस्थेशी संबंधित कार्यात बिघाड, पचनशक्ती क्षीण होणे, यकृत आणि किडनी  खराब होणे, मधुमेह, रक्तदाब इ. विकार होणे.

आर्थिक दुष्परिणाम
व्यसनावर जास्तीतजास्त पैसे उडवणे, नोकरी-व्यवसाय यांकडे दुर्लक्ष, कार्यक्षमता कमी झाल्याने आळशीपणा वाढणे, घरातील आर्थिक गरजांकडे दुर्लक्ष, उधाऱ्या करणे किंवा कर्जे काढणे,  नोकरी व्यवसाय बंद पडणे वगैरे. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय व्यसन दिन संयुक्त राष्ट्र महासभेने ७ डिसेंबर १९८७ रोजी एक ठराव संमत केल्यानंतर २६ जून हा दरवर्षी संपूर्ण जगात   अंमली पदार्थाचे गैरवर्तन आणि तस्करीविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळला जातो. तर भारतात दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी व्यसन दिन साजरा केला  जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे भारत ड्रग्सपासून मुक्त करणे आणि प्रतिभा जपणे. तसेच महाराष्ट् शासनाच्या वतीनेही आतापर्यंत सहा वेळा (पुणे- २०१२, नागपूर-२०१३, मुंबई- २०१५, गोंदिया-२०१६, अमरावती-२०१७ आणि बीड-२०१८) आदी ठिकाणी व्यसनमुक्ती साहित्य संमेलन घेण्यात आले. जागतिक आरोग्य संस्थेच्या माहितीप्रमाणे अंमली पदार्थाच्या पहिल्या  अनुभवाचे वय भारतात १९९० मध्ये १९ वर्षापासून तर २००६ मध्ये १६ व्या वर्षापर्यत घसरले होते. भारतीय लोकसंख्येच्या जवळजवळ २५ टक्के मुले १० ते १४ वर्ष वयोगटातील आहेत.  सध्या जगभर १२ ते १९ या वयोगटातील तरुण मुलामुलीमध्ये अंमली पदार्थाबद्दल जाणीव, कुतूहल आणि वापर वाढत चालला आहे. आपला देशही याला अपवाद नाही.

विद्यार्थ्यांची जबाबदारी

इतर विद्यार्थ्यांच्या अंमली पदार्थाच्या सेवनाला बळी पडू नये, अंमली पदार्थ सेवन अत्यंत घातक आहे. त्यामुळे याच्या सेवनापासून दूर रहावे. मुलींनी द्रव पदार्थ सेवन करताना काळजी  घ्यावी कारण त्यामध्ये ‘रोहयप्नोल'सारखे डेट रेप ड्रग्स असू शकतात. आपल्या शाळा, महाविद्यालयात, परिसरात, गावात होणाऱ्या अंमली पदार्थाच्या वापर व विक्रीबद्दल शाळेचे   मुख्याध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्य, सरपंच किंवा पोलीस पाटील, पोलिसांना कळवावे जेणेकरून यावर आळा बसेल.

-प्रा. मोहसीन खान
संस्थापक अध्यक्ष, अल इम्रान प्रतिष्ठान,
बिलोली, जि.नांदेड, मो.९८६०२०१०९९

मानवी मेंदू एकीकडे जग पादाक्रांत करतोय. अस्तित्वावर या विश्‍वावर विजय मिळवू पाहतोय; पण प्रगतीसोबतच डोकेदुखीही वाढलीय. ती एक साखळीच आहे. प्रगती झाली, मग त्या ताणापायी डोकेदुखी इतर आजारही वाढले अन् त्यावरील इलाज मग अत्याधुनिक आलेत. तपासण्या, सीटी, एमआरआय स्कॅन आलेत... सारं सारं अत्याधुनिक.
           काही आजार हे अतिमहत्त्वाकांक्षी, घोडदौड करणार्‍या, थांबता न येणार्‍या मनाच्या तळाशी ठाण मारून बसलेले असतात. ताण, चिंता, दबाव सहन करण्याची मेंदू, मनाची एक क्षमता असते. त्यापल्याड मन, मेंदू सहन करू शकत नाही. मांसपेशी मज्जातंतूवर ताण येतो. मग रबर ओढल्यासारख्या किंवा कपडे पिळल्यासारख्या वेदना पूर्ण डोक्याला कपाळाला मानेच्या भागाला घेरून टाकतात. टेंशन हेडेक (ढशपीळेप हशरवलहश) हा असाच अतिदुर्लक्षित डोकेदुखीचा प्रकार. डोकं म्हटलं की, सर्वांत जास्त सजग होण्याची गरज. थोडंसं छातीत दुखलं की, माणूस ईसीजी, इकोपासून तर टीएमटी अँजीओग्राफीपर्यंत सारं करून घेतो. पण, त्या हार्टवरही नियंत्रण असणार्‍या मनाच्या दुखण्याला मेंदूच्या कार्याला तो दुर्लक्षित करतो. त्यात काय डॉक्टरला दाखवायचं. डिस्प्रीन, क्रोसिन वगैरे घेऊन टाक; आराम कर थोडा, ठीक होऊन जाईल वगैरे. पटकन पेनकिलर घेता यावी, नेहमीच इतकीही सोपी, साधी नसते डोकेदुखी. त्याला शारीरिक, भावनिक, मानसिक, कौटुंबिक, न्यूरॉलॉजिकल, सोशल असे कितीतरी पैलू असतात.
    बरेचदा फक्त औषधांनी बरे होणारे आजार नसतात. सोबत मनाला निरोगी करण्याच्या पद्धतीही वापरायच्या असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातल्या अर्ध्या लोकांना आयुष्यात कधी न कधी डोकेदुखीने ग्रासलंय. मुख्यत्वे मायग्रेन अन् टेंशन हेडेक हेच दोन प्रकार आपल्याला बघावयास मिळतात. त्यातही 20 ते 25 टक्के डोकेदुखी मेंदूतल्या रक्तवाहिन्यांशी संबंधित असते. योग्य निदान करायला तज्ज्ञ आवश्यक असतात.
    उरलेला 60 ते 70 टक्के हा मोठा वर्ग ताण-तणावातून येणार्‍या डोकेदुखीच्या विळख्यात असतो. पण, जनजागृती नसल्यानं आपण सायकियाट्रिस्टला भेटत नाही. चार-दोन महिने औषधं अन् सायकोथेरपी कौन्सिलिंग सत्र झाल्यावर लक्षात येतं की, विनाकारणच इतक्या वर्षांपासून टेंशन डोकेदुखी घेऊन आपण जगत होतो. डोकेदुखीचे प्राथमिक आणि दुय्यम असे दोन प्रकार आहेत. प्राथमिक डोकेदुखी म्हणजे डायरेक्ट मेंदूतल्या रचनेत, रक्तवाहिन्या वा मांसपेशी, मज्जातंतूंमध्ये बदल झाल्यामुळे होणारी डोकेदुखी. बरेचदा रासायनिक बदलांमुळे पण असे होते. मायग्रेन, टेंशन हेडेक, क्लस्टर हेडेक ही प्रामुख्याने महत्त्वाची. दुय्यम डोकेदुखीत इतर शारीरिक कारणं असतात. त्यामुळं डोकेदुखी हे फक्त लक्षण असतं दुसर्‍या कुठल्यातरी आजाराचं. ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, उच्च रक्तदाब, नशा, अल्कोहोल हँगओव्हर, स्ट्रोक, आईसक्रीम हेडेक अशी कितीतरी कारणं.
    आपण प्रामुख्यानं टेंशन हेडेक अन् मायग्रेन या दोन मुख्य डोकेदुखी कारणांच्या लक्षणांवरच चर्चा करू. या दोनमधे बरेचदा गोंधळ असतो. मायग्रेन आहे की नाही? किंवा टेंशन हेडेक आहे का? बरेचदा मिश्र लक्षणं असतात. मायग्रेन व्हॅस्कुलर हेडेकमध्ये साधारणपणे मळमळ, उलटी फोटोफोबिया-लाइट उजेडाचा त्रास होणे, फोनोफोबिया- आवाजाचा त्रास अन मग चिडचिड होणे, डोक्याच्या अर्ध्या भागात दुखणे, सहन होणारच नाही इतपत दुखणे. यात ऑरा’ असतो. म्हणजे रीींंरलज्ञ आल्यासारखं महिन्यातून ठराविक तीन-चार दिवस भयंकर वेदना होतात. मग हळूहळू ते पूर्ववत होतं. मेंदूतल्या रक्तवाहिन्या फुगतात आणि त्या अवतीभवतीच्या मज्जातंतूंवर, मांसपेशींवर दबाव आणतात. यामुळे असह्य वेदना होतात.
    याउलट टेंशन हेडेक हा सततच्या डोकेदुखीचा प्रकार. म्हणजे सहन होऊ शकणारी; पण कधीच ब्रेक’ न घेणारी डोकेदुखी. डॉक्टरांच्या दैनंदिन पेशंट पाहणीतल्या अनुभवानुसार डोकेदुखीच्या शंभरातल्या 60 ते 70 केसेसमधे ताण-तणाव, चिंता, नैराश्य, हीच प्राथमिक कारणं. यात मायग्रेनसारखं तीव्रतेनं डोकं दुखत नाही. दिवसभरच हलकं हलकं दुखत राहतं. टेंशन हेडेकची कारणं शोधणं महत्त्वाचं. कारण त्यावरच उपचार अवलंबून आहे. आतमध्ये धुमसत जाणारं मन ओळखणं गरजेचं. बरेचदा दैनंदिन जगण्यातला ताण, टार्गेट, नात्यातली अस्थिरता, आयुष्याकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा अन् त्या पूर्णत्वास न गेल्यामुळं मनाची होणारी पडझड अन् विचारांची घालमेल अस्वस्थ करते. मेंदूच्या मांसपेशी अशा चिंतेनं ताणल्या जातात. कपाळ किंवा संपूर्ण डोक्याचा भाग ठणकल्यासारखा किंवा आतून कुणीतरी ठोके मारल्यागत दुखतं.
    डोकं बधीर झाल्यासारखं वाटणं, मुंग्या आल्यासारखं, पूर्ण शरीर थकल्यासारखं गळून पडल्यासारखं वाटतं. नीटशी झोप होत नाही. पूर्ण कपाळावरच्या मांसपेशी ओढल्यासारख्या वाटतात.
    उपचार : धकाधकीच्या जीवनात आपण क्षणभरासाठीही शांत राहून काही न करता निसर्गासोबत राहणं. आपले छंद जोपासणं विसरलो आहोत. फक्त काम आणि भौतिक सुखाच्या मागे माणूस धावत सुटलाय. आपण गर्दीत मागे राहता कामा नये, ही भावना प्रत्येकाच्याच मनात घर करून बसलीयं. प्रत्येक जण नुसता धावतोय. अँटीडिप्रेसंट किंवा चिंता, बेचैनी कमी करणारी काही औषधं यात प्रभावी ठरतात. आधुनिक औषधांचे फार साइड इफेक्टसुद्धा नसतात. ताण कमी झाला की, छान झोप येते. अन् छान झोप आली की, मग डोकं पण दुखत नाही. योग, विपश्यना माइंडफुलनेस किंवा ध्यान पद्धतीनेसुद्धा मन शांत ठेवता येतं.
    कधीकधी जगण्याची गती थोडी मंद करून शांत निसर्ग अन् त्याची गोड अनुभूती एंजॉय’ करणंही जमायला हवं. निव्वळ अर्थार्जनाच्या धडपडीत हातात असलेलं सुख, छोट्या छोट्या गोष्टीतल्या तरल आनंदाला मुकता कामा नये. हे सुंदर जगणं एकदाच मिळालंय. त्याचा पुरेपूर आनंद घ्यायलाच हवा. काम, कुटुंब अन् विरंगुळा, छंद यांची योग्य सांगड घालता यायला हवी. टेंशन हेडेक नक्कीच कमी करता येण्यासारखं आहे. अन् मानवी मनाच्या निकोप, निरोगी आरोग्यासाठी ते अत्यंत गरजेचंही आहे!

- डॉ.श्यामल सराडकर
8975163024

माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) म्हणाले, ‘‘जो मनुष्य अल्लाहच्या ग्रंथाची उपासना करेल तो न या जगात मार्गभ्रष्ट होईल आणि न परलोकात त्याच्या वाट्याला वंचितता  येईल.’’ मग त्यांनी या आयतीचे पठण केले, ‘‘जो मनुष्य माझ्या आदेशपत्राचे आज्ञापालन करील तो न या जगात मार्गभ्रष्ट होईल आणि न परलोकात दुर्भागी असेल.’’ (हदीस :   मिश्कात)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘पवित्र कुरआनमध्ये पाच गोष्टी आहेत. ‘हलाल’, ‘हराम’, ‘मुहकम’, ‘मुतशाबेह’ आणि ‘इमसाल’.  ‘हलाल’ (वैध) ला वैध समजा, ‘हराम’ (अवैध) ला अवैध माना, ‘मुहकम’ (पवित्र कुरआनचा तो भाग ज्यात धर्मनिष्ठा आणि कायदा वगैरेची शिकवण दिली गेली आहे) चे अनुसरण  करा, ‘मुतशाबेह’ (कुरआनचा तो भाग ज्यात परोक्षाच्या गोष्टींचे वर्णन करण्यात आले आहे जसे- ‘जन्नत’ (नंदनवन), ‘दोजख’ (नरक), ‘अर्श’ (सिंहासन), ‘कुर्सी’ (खुर्ची) वगैरे) वर ईमान  बाळगा (आणि त्याची अवहेलना करू नका) आणि ‘इमसाल’ (लोकसमुदायांच्या विध्वंसाच्या धडा शिकविणाऱ्या कथा) पासून उपदेश प्राप्त करा. ` (हदीस : मिश्कात)
माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहने काही अनिवार्य बाबी निश्चित केल्या आहेत त्या नष्ट करू नये आणि काही गोष्टी निषिद्ध  केल्या आहेत त्या करू नयेत आणि सीमा निश्चित केल्या आहेत त्यांचे उल्लंघन करू नका आणि काहींच्या बाबतीत त्याने न सांगता मौन बाळगले आहे तुम्ही त्यांच्या भानगडीत जाऊ
नका. (हदीस : मिश्कात)
माननीय जियाद बिन लबीद यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एका भयानक गोष्ट सांगितली आणि मग म्हणाले, ‘‘असे तेव्हा घडेल जेव्हा ‘दीन’ (जीवनधर्मा) चे ज्ञान  संपुष्टात येईल.’’ यावर मी म्हणालो, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! आम्ही पवित्र कुरआनचे पठण करतो आणि आमच्या अपत्यांना पठण करण्यास शिकवितो आणि आमची मुले त्यांच्या  अपत्यांना पठण करण्यास शिकवतील; तर मग ज्ञान कसे नष्ट होईल?’’
पैगंबरांनी सांगितले, ‘‘अति उत्तम! मी तुम्हाला मदीनेतील सर्वांत समजदार मनुष्य समजत होतो. ज्यू व खिश्चन तौरात आणि इंजीलचे किती अधिक प्रमाणात पठण करतात, परंतु   त्यांच्या शिकवणींचे जरादेखील अनुसरण करीत नाहीत, हे तुम्ही पाहात नाही काय?’’ (हदीस : इब्ने माजा)

भाग्यावर ईमान
माननीय अली (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्तीचे स्वर्ग आणि नरक लिहिले गेलेले आहे.’’ लोकांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे  पैगंबर! मग आम्ही आमच्या लिहिलेल्याचा का लाभ घेऊ नये आणि कर्म सोडून द्यावे?’’ पैगंबरांनी सांगितले, ‘‘नाही, कर्म करा, कारण प्रत्येक व्यक्तीला तीच ईशकृपा लाभते ज्यासाठी  त्यास जन्माला घालण्यात आले आहे, जो दैववान आहे त्याला स्वर्गातील कामांची ईशकृपा मिळते आणि जो दुर्दैवी (नरकवासी) आहे त्याला नरकातील कामांची ईशकृपा मिळते.’’
यानंतर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ‘सूरह अल-लैल’च्या या दोन आयतींचे पठण केले (ज्या वरील हदीसमध्ये लिहिलेल्या आहेत, त्यांचा अर्थ असा की) ज्याने संपत्ती खर्च केली आणि  ईशपरायणतेच्या मार्गाचा अवलंब केला आणि उत्कृष्ट गोष्टीचा स्वीकार केला (म्हणजे इस्लामचे अनुसरण केले) तर आम्ही त्याला उत्तम जीवन म्हणजे स्वर्गाची ईशकृपा देऊन आणि  ज्याने  आपली संपत्ती खर्च करण्यात वंâजूषपणा दाखविला आणि (अल्लाहशी) अनभिज्ञ आणि उत्तम जीवनास खोटे ठरविले तर आम्ही त्याला त्रासदायक जीवनाची (नरक) ईशकृपा देऊ.

(१७२) इसा मसीहने, तो अल्लाहचा एक दास आहे. याबदल कधीही स्वत: साठी अपमान समजले नाही आणि निकटवर्ती ईशदूतांना आपल्यासाठी अपमान कारक वाटले नाही. जो कोणी  अल्लाहच्या दास्यत्वास स्वत:साठी अपमान समजतो आणि गर्व करतो तर अल्लाह सर्वांना आपल्या समोर हजर करण्याची वेळ लवकरच आणील.
(१७३) तेव्हा ज्या लोकांनी श्रद्धा ठेवून सदाचरण अंगीकारले आहे, ते आपला मोबदला पुरेपूर प्राप्त करतील आणि अल्लाह आपल्या कृपेने त्यांना जादा मोबदला प्रदान करील आणि ज्या   लोकांनी बंदगीला स्वत:साठी अपमानास्पद मानले व गर्व बाळगला, त्यांना अल्लाह यातनादायक शिक्षा देईल आणि अल्लाहव्यतिरिक्त ज्याच्या ज्याच्या पालकत्वावर व मदतीवर ते   विश्वास ठेवतात त्यांच्यापैकी कोणीच त्यांना तेथे आढळणार नाही.
(१७४) लोकहो, तुमच्या पालनकर्त्याकडून तुमच्याजवळ उज्ज्वल प्रमाण आले आहे आणि आम्ही तुमच्याकडे असा प्रकाश पाठविला आहे जो तुम्हाला स्पष्ट मार्गदर्शन करणारा आहे. (१७५) मग जे लोक अल्लाहची गोष्ट मान्य करतील व त्याचा आश्रय शोधतील, त्यांना अल्लाह आपल्या दया व कृपेच्या छत्राखाली घेईल आणि आपल्याकडे येण्याचा सरळमार्ग त्यांना  दाखवील.
(१७६) हे नबी (स.)!२१९ लोक तुम्हाला कलालासंबंधी२२० आदेश  विचारतात, सांगा, अल्लाह तुम्हाला आदेश देतो. जर एखादा मनुष्य नि:संतान मेला असेल आणि त्याची एक बहीण   असेल२२१ तर तिला त्याच्या ठेवलेल्या मालमत्ते (वारसा) तून निम्मा हिस्सा मिळेल, आणि जर बहीण नि:संतान वारली असेल तर भाऊ तिचा वारस ठरेल.२२२ जर मृताचे वारस दोन  बहिणी असतील तर त्या सोडलेल्या मालमत्तेतून दोन तृतीयांशच्या हक्कदार ठरतील,२२३ आणि जर अनेक भाऊ-बहिणी असतील तर स्त्रियांचा एकेरी व पुरुषांचा दुप्पट वाटा असेल.   अल्लाह तुमच्यासाठी आदेशांचे स्पष्टीकरण करीत आहे, जेणेकरून तुम्ही भटकत फिरू नये आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीचे ज्ञान बाळगतो.

अल्माइदा (मदीनाकालीन, एकूण आयती १२०)

अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे.
(१) हे श्रद्धावंतांनो! मर्यादांचे पुरेपूर पालन करा. तुमच्याकरिता चरणारे चतुष्पाद मवेशी वर्गातील सर्व जनावरे वैध केली गेली आहेत त्यांच्या व्यतिरिक्त ज्यांच्याबद्दल पुढे तुम्हाला  सांगण्यात येईल. परंतु एहराम (हजकरिता परिधान केलेली वस्त्रे) च्या अवस्थेत शिकारीला आपल्याकरिता वैध ठरवू नका. नि:संशय अल्लाह जे इच्छितो ती आज्ञा देतो.२१९) ही आयत हा सूरह अवतरण झाल्यानंतर बऱ्याच काळानंतर अवतरित झाली आहे. काही कथनांद्वारा माहीत होते की कुरआनची ही  शेवटची आयत आहे. हे जरी सत्य नसले तरी  हे मात्र सिद्ध आहे की ही आयत हि.स. ०९ मध्ये अवतरित झाली आहे आणि सूरह निसा याच्या फार पूर्वीपासून एक पूर्ण सूरहच्या रूपात पठण केला जात होता. याच कारणाने या  आयतला त्या आयतीक्रमात जोडले गेले नाही ज्या वारसाहक्कासंबंधी सूरहच्या आरंभी आले आहेत, तर यास परिशिष्टाच्या रूपात शेवटी सामील केले आहे.
२२०) `कलाला'च्या अर्थात मतभेद आहेत. कुणाच्या मतानुसार `कलाला' ती व्यक्ती आहे जो नि:संतान आहे आणि ज्याचे बापदादा जिवंत नसावेत. काहींच्या मते `कलाला' त्या मृत  व्यक्तीला म्हटले जाते जो नि:संतान होता. माननीय उमर (रजि.) शेवटपर्यंत याविषयी आपले निश्चित मत बनवू शकले नाहीत. परंतु फिकहशास्त्रींनी माननीय अबू बकर (रजि.)  यांच्या मताला मान्य केले की `कलाला' केवळ पहिल्याच अर्थाने आहे. कुरआननुसारसुद्धा याची पुष्टी होते. कारण येथे कलालाच्या संपत्तीतून बहिणीला अर्ध्याचा वारसदार म्हटले आहे.  जर बाप जिवंत असेल तर बहिणीला काहीच मिळत नाही.
२२१) येथे त्या भाऊ बहिणीच्या वारसाचा उल्लेख आहे ज्याचे आई-वडील त्याच मयताचे असावेत किंवा केवळ वडील मृतकाचे आणि त्याचा एक असेल. माननीय अबू बकर (रजि.) यांनी  एकदा एका व्याख्यानात या अर्थाला स्पष्ट केले होते आणि सहाबानी मतभेद दाखविला नाही. सर्व एकमत या विषयी आहेत.
२२२) म्हणजे भाऊ त्याच्या पूर्ण संपत्तीचा वारस असेल. जर इतर कोणी हकदार नसेल किंवा एखादा वारस असेल जसे पती, तर त्याचा वाटा दिल्यानंतर शिल्लक संपत्ती भावाला मिळेल.
२२३) हाच आदेश दोन पेक्षा जास्त बहिणींसाठीसुद्धा आहे.

१) म्हणजे त्या मर्यादांचे आणि अटींचे पालन करा जे या अध्यायात तुमच्यावर लागू करण्यात आले आहेत आणि सामान्यत: अल्लाहच्या शरीयतने तुमच्यावर लागू केले आहेत. या  प्रस्तावनेच्या संक्षिप्त् वाक्यानंतर त्या अटींचे वर्णन सुरु होते ज्यांच्या पालनाचा आदेश देण्यात आला आहे.
२) अन् आम (चतुष्पाद) हा शब्द अरबी भाषेत उंट, गाय, मेंढा आणि बकरीसाठी वापरला जातो आणि `बहिमा' प्रत्येक चरणाऱ्या चतुष्पादला म्हटले जाते. `जनावरांपैकी चरणारे चतुष्पाद  तुमच्यासाठी वैध ठरविण्यात आले आहेत.' म्हणजे ते सर्व चरणारे चतुष्पाद वैध ठरविले आहे जे मवेशी जातीचे असतील म्हणजे जे जीवजतुंचा आहार घेण्याऐवजी घासपाला खातात  आणि जे चतुष्यादासारखे गुण राखतात. यावरून सांकेतिक दृष्ट्या ही गोष्ट समोर येते, की मांसाहारी, दुसऱ्या जनावरांना मारून खाणारे जनावर तुमच्यासाठी अवैध (हराम) आहेत. याच  संकेताला (आयत) पैगंबर मुहम्मद (स.) यांनी स्पष्ट करून हदीसमध्ये स्पष्ट आदेश दिला की हिसंक पशु हराम (अवैध) आहेत. याच प्रमाणे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्या  पक्षांनासुद्धा हराम ठरविले ज्यांचे पंजे असतात आणि जे दुसऱ्या जनावराचे शिकार करतात व खातात व मृत जनावरे खातात.
३) `इहराम' त्या फकीरी पोषाखाला म्हणतात जे काबागृहाची परिक्रमा करण्यासाठी परिधान केले जाते. या पोषाखात केवळ एक लुंगी असते आणि एक चादर जी अंगावर घेतली जाते.  याला `इहराम' यासाठी म्हटले जाते की यास बांधल्यानंतर मनुष्यावर अनेक वस्तू हराम (अवैध) होतात ज्या साधारण स्थितीत हलाल (वैध) असतात. उदा. केशकर्तन, सुवासिक वस्तूंचा वापर, प्रत्येक प्रकारचा शृंगार, वासनापूर्ती इ. याच प्रतिबंधांपैकी एक हा आहे की कोणत्याही जीवाची हत्या करणे अवैध आहे. शिकार निषिद्ध आहे आणि शिकारीसाठीचा पत्ता कोणाला  दिला जाऊ शकत नाही.
४) म्हणजे अल्लाह निरंकुश शासक आहे. त्याला पूर्ण अधिकार आहे की जे काही आदेश त्याने द्यावे, त्यांत दासाला त्याच्या आदेशांत कमी-जास्त करण्याचा मुळीच अधिकार नाही.  त्याचे सर्व आदेश उत्तमवर्तन आणि निहित हितावर आधारित आहेत. परंतु मुस्लिम त्या आदेशांचे पालन यासाठीच करीत नाही, की तो त्यांना उचित व हितकारक समजतो तर  आदेशांचे पालन फक्त स्वामीचे आज्ञापालन करण्याच्या आधारावर करतो. कुरआन पूर्ण जोर देऊन हा नियम स्थापित करत आहे की वस्तूंना हराम व हलाल (वैद-अवैध) बनविण्यासाठी  निर्माणकर्त्या अल्लाहची अनुमतीशिवाय किंवा अनुमतीहीनतेशिवाय इतर कोणत्याच आधाराची आवश्यकता नाही. अशाचप्रकारे दासासाठी एखाद्या कार्याचे वैध किंवा अवैध होणे हेसुद्धा अल्लाह ज्याला हलाल (वैध) करतो ते हलाल (वैध) आहे आणि ज्याला हराम (अवैध) ठरवितो ते अवैध आहे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget