(६२, ६३) ऐका, जे अल्लाहचे मित्र आहेत, ज्यांनी श्रद्धा ठेवली व ज्यांनी ईशपरायण वर्तन (संयम व ईशभय) अंगीकारले, त्यांच्याकरिता कसलेच भय अथवा दु:खाचा प्रसंग नाही.
(६४) या जगात व परलोक दोन्ही जीवनांत त्यांच्याकरिता आनंदाच्या वार्ता आहेत. अल्लाहची वचने बदलू शकत नाहीत, हेच मोठे यश आहे.
(६५) हे पैगंबर (स.)! ज्या गोष्टी हे तुझ्यावर रचतात, त्या तुला दु:खी करू नयेत, प्रतिष्ठा सर्वस्वी अल्लाहच्या अधिकारात आहे आणि तो सर्वकाही ऐकतो व जाणतो.
(६६) सावधान! आकाशात वास्तव्य करणारे असोत अथवा पृथ्वीवर, सर्वचे सर्व अल्लाहच्या मालकीचे आहेत. आणि जे लोक अल्लाहशिवाय काही (आपले स्वरचित) बनावटी भागीदारांचा धावा करीत आहेत, ते निव्वळ मिथ्या व भ्रामक कल्पनेचे अनुयायी आहेत, व केवळ कल्पनाविलास करीत आहेत.
(६७) तो अल्लाहच आहे ज्याने तुमच्यासाठी रात्र बनविली की तिच्यात संतोष प्राप्त करावा, व दिवसाला प्रकाशमान बनविले, यात संकेत आहेत त्या लोकांकरिता जे (उघड्या कानांनी पैगंबराचे आवाहन) ऐकतात.६५
६५) हा एक असा विषय आहे ज्यासाठी तपशीलात जाणे आवश्यक आहे. येथे अत्यंत संिप्तिरक्षत्या वर्णन केले गेले आहे. दार्शनिक जिज्ञासा म्हणजे या सृष्टीत जे काही आम्ही पाहातो आणि अनुभव करतो त्यामागे काही वास्तविकता आहे किंवा नाही? आणि असेल तर कोणती? जगात त्या सर्व लोकांसाठी जे दिव्यप्रकटनाद्वारे सत्यज्ञान प्राप्त् करीत नाहीत ते या एकमात्र ज्ञानाच्या साधनापासून वंचित राहातात. कोणतीही व्यक्ती मग ती नास्तिक असो की अनेकेश्वरवादी किंवा ईश्वरवादी असोत, तात्त्विक जिज्ञासा ठेवूनच जीवनधर्माविषयी एखाद्या निर्णयाप्रत पोहचू शकते. सर्व पैगंबरांनी जो धर्म प्रस्तुत केला आहे त्याची पारखसुद्धा तात्त्विक चिंतन मनन करूनच होते. पैगंबर लोकांना सृष्टीच्या प्रत्यक्ष वस्तंूमागे ज्या वास्तविकतेच्या अस्तित्वाचा पत्ता देत आहे ते मनाला भिडते किंवा नाही; या जिज्ञासेचे योग्य अथवा अयोग्य असणे पूर्णत: जिज्ञासाविधीवर अवलंबून आहे. याचे चुकीचे असल्याने चुकीचे मत आणि बरोबर असल्याने योग्य मत बनते. जगात या जिज्ञासेसाठी वेगवेगळया लोक समुदायांनी कोणकोणत्या पद्धती स्वीकारल्या त्या आता आपण पाहू या. अनेकेश्वरवाद्यांनी पूर्णत: अंधविश्वासावर आधारित आपल्या शोधकार्याचा पाया रचला आहे. योगी लोकांनी ध्यान मग्नतेचे ढोंग रचून खोटा दावा केला की आम्ही प्रत्यक्षाच्या मागे पाहून आंतरिकाचे अवलोकन करतो. परंतु सत्य हे आहे की त्यांनी आपल्या शोधकार्याचा पाया अनुमानांवर रचला आहे. ते ध्यान आपल्या अनुमानांवर करतात. ते म्हणतात की आम्हाला आंतरिक ज्ञान आहे. ते याशिवाय काहीही नाही जे ते अनुमान करून एक विचार बनवितात आणि त्यावरच ध्यानमग्न होतात आणि त्यावर मनाचा दबाव पाडून त्यांना तोच विचार चालताना व फिरताना दिसतो. पारिभाषिक तत्त्वज्ञांनीनी गृहिताला शोधाचा आधार बनविला. ते तर एक अनुमान आहे; परंतु या अनुमानाच्या पांगळेपणाला जाणून त्यांनी तार्किक प्रमाण आणि कृत्रिम बौद्धिकतेच्या आधारे त्यास चालविण्याचा प्रयत्न केला आणि त्यास `गृहित' असे नाव दिले. वैज्ञानिकांनी विज्ञानाच्या क्षेत्रात शोधकार्यासाठी ज्ञानात्मक विधी स्वीकारली. परंतु अनैसर्गिक सीमेत पाऊल ठेवताच ते ज्ञानात्मक विधींना सोडून गृहित, अनुमान आणि तार्किक प्रमाणामागे कार्यरत राहतात. या सर्व समुदायांचे अंधविश्वास आणि अनुमान पक्षपाताने रोगग्रस्त झाले. त्यामुळे दुसऱ्याचे ऐकणे आणि आपल्याच प्रिय मार्गावर पुन्हा वळणे आणि वळल्यानंतर वळण्यासाठी विवश बनवून ठेवले गेले.
कुरआन या जिज्ञासेच्या विधीला मूलत: चुकीची समजतो. कुरआननुसार लोकांच्या मार्गभ्रष्टतेचे मूळ कारण म्हणजे तुम्ही सत्याचा शोध घेण्यासाठीचा आधार अनुमान आणि अंधविश्वासावर ठेवता. नंतर पक्षपातीपणामुळे दुसऱ्याचे म्हणणे ऐकण्यास तयार नसता. याच दोन्ही चुकांचा परिणाम म्हणजे तुमच्यासाठी स्वत: सत्याला प्राप्त् करणे असंभव होते; परंतु पैगंबरांनी आणलेल्या जीवनधर्माला पारखून तुम्हाला योग्य मत बनविणेसुद्धा अशक्य झाले. याविरुद्ध कुरआन दार्शनिक शोध घेण्यासाठी सत्य, ज्ञानात्मक आणि बुद्धीपरक मार्ग दाखवितो की, प्रथमत: तुम्ही वास्तविकतेविषयी त्या लोकांचे म्हणणे खुल्या मनाने ऐका. त्यांचा दावा आहे की ते अनुमान आणि अंधविश्वासावर नव्हे तर ज्ञानाच्या आधारावर तुम्हाला दाखवित आहेत की वास्तविकता ही आहे. सृष्टीत ज्या निशाण्या तुम्ही पाहाता आणि अनुभवत असता, त्यावर विचार करा. त्यांच्या ग्वाहींना एका क्रमात ठेवून विचार करा आणि शोधा की या प्रत्यक्षामागे ज्या वास्तविकतेचा संकेत हे लोक देत आहेत त्याच्याकडे या प्रत्यक्षाचा संकेत तुम्हाला सापडतो किंवा नाही. जर अशा निशाण्या सापडल्या आणि त्यांचे संकेतसुद्धा स्पष्ट आहेत मग तुम्ही त्या लोकांना खोटे ठरविण्याचे काहीच कारण नाही. हीच विधी तुम्ही इस्लाम तत्त्वज्ञानासाठी आधार बनवू शकता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात जिज्ञासाविधीला सोडून मुस्लिम तत्त्ववेत्ता गण अरिस्टॉटल आणि सॉक्रेट्सच्या मागे लागले आहेत. कुरआनमध्ये अनेक ठिकाणी या विचारप्रणालीवर भर देऊन सृष्टी निशाण्यांना प्रस्तूत केले आहे. त्यांच्यापासून निष्कर्षापर्यंत आणि वास्तविकतेपर्यंत पोहचण्यास विधिवत प्रशिक्षण कुरआन देत आहे जेणेकरून चितंन मनन करून या शोधकर्त्याचा विधी मनात घर करून बसावा. या आयतमध्ये दोन निशाण्यांकडे लक्ष वेधले आहे, त्या म्हणजे रात्र व दिवस. रात्र व दिवसाचे हे चक्र सूर्य आणि पृथ्वीतील संबंधात अत्यंत विधीवत परिवर्तनामुळे घडून येते. ही एक विश्वव्यापी व्यवस्थापक व सृष्टीचा सत्ताधारी शासकाच्या अस्तित्वाची उघड निशाणी आहे. यात उघड तत्त्वज्ञान आणि स्पष्ट उद्देशसुद्धा दिसून येतो. पृथ्वीवर असलेल्या सर्व वस्तूंचे हित याच रात्र आणि दिवसाच्या येण्याजाण्यावर अवलंबून आहे. यात पालनहारी, दयाशीलता आणि प्रभुत्वशीलतेच्या स्पष्ट निशाण्या आहेत. या ने हे प्रमाण मिळते की ज्याने पृथ्वीवर या सर्व वस्तू निर्माण केल्या आहेत, तो स्वत: यांच्या अस्तित्वाच्या गरजा पूर्ण करीत आहे. याने हे माहीत होते की तो विश्वव्यापी व्यवस्थापक एक आहे आणि तो तत्त्वदर्शी आहे. तो उद्देशपूर्ण काम करतो आणि तोच उपकारक आणि प्रशिक्षक आहे. म्हणून आज्ञापालनाचा एकमेव अधिकारी तोच आहे. रात्र दिवसाच्या येण्या-जाण्यांमुळे सृष्टीत जे कोणी अस्तित्व ठेवून आहेत, ते पालनहार नाही तर पलित आहेत, स्वामी नाही तर दास आहेत तसेच निर्माणकर्ता नाही तर निर्मिती आहे. या स्पष्ट ग्वाहीविरुद्ध अनेकेश्वरवाद्यांनी अनुमानाने आणि अंधविश्वासाने जे धर्म रचले ते शेवटी सत्य कसे असणार?
Post a Comment