चिपळून (फेरोजा तस्बीह)
कोकणातले सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर नजीर जुवाले व पेठमाप ,चिपळूण ची सुकन्या डॉक्टर नर्गिस यांचा सुपुत्र डॉक्टर नवीद जुवाले यांनी ऊछइ मेडीसिन च्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
डीप्लोमेट ऑफ नॅशनल बोर्ड (ऊछइ) ही चऊ मेडीसिन ची समतुल्य डिग्री आहे. नवीद ने ही डिग्री फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथून संपादित केली. ऊछइ चा अभ्यास करताना डॉक्टर नवीद याने कोव्हीड रुग्णांची सेवा करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला.चिपळूण मधील रुग्णांना अमूल्य सल्ला देऊन नवीदने अनेकांचे प्राण वाचवले आहेत. नवीदने चइइड ची डिग्री सोमय्या कॉलेज मुंबई येथून संपादित केली. नवीद च्या तिन्ही मोठ्या बहिणी डॉक्टर आहेत. मोठी बहीण अंबरीन अमेरिकेत शिकागोला स्थायिक आहे.अंबरीन चे पती डॉक्टर तौसिफ सरगुरोह शिकागो मध्ये प्रसिद्ध (नेफरोलोजिस्ट) किडनी रोग तज्ञ आहेत. समरीन ही डेंटिस्ट आहे,तिचे पती डॉक्टर आबिद रावल हे मुंबई मध्ये युरोलॉजीस्ट आहेत.डॉक्टर निहा ही नेत्ररोग तज्ञ आहे. निहा ही रटायनल सर्जरी मध्ये प्रावीण्य संपादन करत आहे. तिचे पती झैन खतीब मुंबईला नेत्र रोग तज्ञ आहेत.
डॉक्टर नवीद हे चिपळूण चे माजी नगराध्यक्ष अब्दुल कादीर मुकादम तसेच कडवई चे इस्माईल जुवाले यांचे नातू व पद्मश्री कॅप्टन फकीर महम्मद जुवाले यांचे पणतू आहेत. नवीद चा आपल्या वडीलांप्रमाणे (कार्डियोलोजिस्ट) हृदयरोग तज्ज्ञ होण्याचा मानस आहे.त्यासाठी ते प्रयत्नरत आहे. नवीद च्या या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post a Comment