Halloween Costume ideas 2015

क़तरने खेळाचे पावित्र्य जपले

जगासाठी दिर्शादर्शक : घाणीतून पावित्र्याकडे; जर्मनीतून कतरकडे


प्रत्येक वाचकाने ईश्वराने जी त्याला बुद्धी दिलेली आहे त्याचा उपयोग करून चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणावे. कतरच्या या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनादरम्यान लादण्यात आलेली बंधने ही नैतिक आहेत का अनैतिक आहेत? चांगली आहेत का वाईट आहेत? महिलांच्या दृष्टीने उपयोगी आहेत का अनुपयोगी आहेत? याचा प्रत्येकाने विचार करावा. ही बंधने लादण्यामागे कतरचा हेतू चांगला आहे का वाईट याचाही विचारही करावा.

जगातील सर्वात लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे. चार वर्षातून एकदा फिफाद्वारे याच्या जागतिक स्पर्धा भरविल्या जातात. फुटबॉल खेळणारा प्रत्येक देश वर्ल्डकप आपल्या देशात भरविल्या जाण्यासाठी आग्रही असतो. त्यासाठी फिफाच्या सदस्यांना मोठी लाच देण्याचीही प्रत्येकाची तयारी असते. कारण फुटबॉल वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठी जगातून किमान 15 लक्ष लोक जमा होतात. वर्ल्डकपचे आयोजन हे यजमान देशासाठी कमाईची मोठी संधी घेऊन येते. 

ते जर्मनीचे कोलोन नावाचे शहर होते जेथे 2006 साली वर्ल्डकप फुटबॉलचे सामने भरविण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली होती. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. जगाच्या विविध देशातून येणाऱ्या खेळाडू आणि दर्शकांच्या आवडी निवडीचा विचार करून जगाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या रंग, वय, वंश आणि शारीरिक बनावटीच्या जवळ-जवळ 40 हजार वेश्यांना बोलावण्यात आलेले होते. त्या वर्षातील ती ह्युमन ट्रॅफिकिंगची सर्वात मोठी घटना होती. कोलोन  शहराच्या मधोमध एक 12 मजल्याचे नवीन -(उर्वरित पान 7 वर) 

वेश्यालय सुरू करण्यात आले होते. ज्याचे नाव ’पाश्चा’ असे होते. या वेश्यालयाचे उद्घाटन वर्ल्डकपच्या उद्घाटनासोबतच म्हणजे 9 जून 2006 रोजी केले गेले. या पाश्चा प्लाझाच्या इमारतीला वेगवेगळ्या रंगाच्या काचेने सजवण्यात आले होते. त्यात एक विशेष दालान बनविण्यात आले होते ज्यात निवडक 120 वेश्यांना बसविण्यात आले होते. हे फक्त एक शहर आणि एकच अड्ड्याची कथा झाली. बाकी 40 हजार वेश्यांना त्या प्रत्येक ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती ज्या ठिकाणी वर्ल्डकपचे 32 संघ आपसात भिडणार होते. विशेष बाब म्हणजे पाश्चाने आपल्या या वेश्यालयाच्या इमारतीवर त्या 32 राष्ट्रांचे राष्ट्रध्वज लावले होते जे या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार होते. वेगवेगळ्या वेश्यांच्या मोठ्या छायाचित्रांसोबत एका हिजाबधारी महिलेचाही फोटो लावण्यात आला होता. याच्या विरोधात जवळ जवळ 30 मुस्लिम तरूणांनी चाकू आणि लाठ्या घेऊन पाश्चा समोर प्रदर्शन करून वेश्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे घाबरून पाश्चाच्या आयोजकांनी सऊदी अरब आणि इराणच्या राष्ट्रध्वजांना काळे रंग फासले होते आणि हिजाबवाल्या महिलेचे छायाचित्रही काढून टाकले होते. 

जर्मनीमध्ये आयोजित या जागतिक स्पर्धेसाठी महिलांची मोठ्या संख्येने जी चोरटी वाहतूक केली गेली त्या घटनेमुळे क्रीडा विश्व हादरून गेले होते. स्वतःला सभ्य समजणारे पश्चिमी देश, मजुरीसाठी चोरटी वाहतूक करणाऱ्या देशांवर आर्थिक निर्बंध मोठ्या हिरहिरीने लावतात. ते कसे काय अशा या लैंगिक स्वैराचारासाठीच्या चोरट्या वाहतुकीबाबत गप्प बसले. एक महिना या महिलांचा बाजार भरविला गेला आणि हे ढोंगी युरोपियन देश गप्प राहिले. 

या घटनेनंतर फुटबॉल वर्ल्डकपबरोबर सुरू होणाऱ्या वेश्या व्यवसायासंबंधी मोठ्या प्रमाणात चर्चा आणि अभ्यासपूर्ण चौकश्या सुरू झाल्या. अमेरिकेच्या नेब्रास्का विद्यापीठाने या विषयावर आंतरराष्ट्रीय अभ्यास परिषद आयोजित केली. ज्यात अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्हच्या जागतिक संपर्क समितीने एक सविस्तर अहवाल सादर केला. ज्याचे शिर्षक 40 ढर्हेीीरपवी थोशप । उहळश्रवीशप रीं ठळीज्ञेष एुश्रिेळींरींळेपींहीेु ढीरषषळलज्ञळपस असे होते. याशिवाय, नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी ऑफ लॉ तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या 2008 च्या मॅ्निझनमध्येही अ‍ॅनी मॅरिटवॅला या लेखिकेचा एक लेख प्रकाशित झाला होता. ज्यात जर्मनीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक फुटबॉल स्पर्धेमध्ये मानवी तस्करीचा आढावा घेण्यात आला होता. ज्या देशात हे सामने भरविले जातात. त्या देशातील हॉटेल आणि पर्यटन उद्योग समृद्ध होऊन जातो. स्पर्धेदरम्यान, फक्त वेश्या व्यवसायच वधारतो असे नाही तर विविध महिलांना तिथपर्यंत आणणाऱ्यांचा व्यवसायही बहरतो. असे या अहवालामध्ये अ‍ॅनीमेरिट वेला यांनी म्हटले होते. याच रिपोर्टमध्ये त्यांनी असाही खुलासा केला होता की, युरोपमध्ये पाच देश असे आहेत जेथून देह व्यापारासाठी जगभरातून महिलांची तस्करी केली जाते. 1990 साली युरोपीय देशांमध्ये वेश्यावृत्ती करण्यासाठी तीन लाख तरूण मुलींची चोरटी वाहतूक करण्यात आली होती. या रिपोर्टमध्ये असेही नमूद आहे की, दरवर्षी सरासरी एक हजार मुलींना जर्मनीमध्ये याच कामासाठी चोरटी आयात करून बोलाविले जाते. जर्मनीमध्ये या व्यवसायातून वार्षिक 19 अब्ज डॉलरची कमाई होते. 2006 साली जर्मनीमध्ये उघडकीस आलेल्या या घटनेनंतर क्रीडाविश्वामध्ये खळबळ माजली होती. तरीही 2008 मध्ये चीनमध्ये झालेल्या ऑलम्पिकच्या सामन्यामध्ये आणि 2010 साली झालेल्या फुटबॉल वर्ल्डकपच्या दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धेमध्ये ही मोठ्या प्रमाणात हे प्रकार राजरोसपणे सुरू होते. फक्त एवढी खबरदारी घेण्यात आली होती की, जर्मनीप्रमाणे या व्यवसायाची चर्चा मीडियामध्ये होऊ नये. 

या उलट कतरमध्ये सध्या सुरू असलेल्या फुटबॉलच्या वर्ल्डकप सामन्यामध्ये किती पावित्र्य राखले गेले आहे, याची माहिती एव्हाना सगळ्या वाचकांना झालेली आहे. या स्पर्धेदरम्यान, एकही वेश्या कतरमध्ये येऊ शकलेली नाही. तसेच दारू आणि बिअर सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध नाही. याचा किती राग युरोपियन देशांना आलेला आहे हे मीडियातील यासंबंधी आलेल्या बातम्यावरून वाचकांच्या लक्षात येईल. कतरने ’शराब आणि शबाब’ यांना प्रतिबंधच केले नाही तर जगातून आलेल्या 15 लाख पाहुण्यांचे स्वागत सुगंध देऊन केले. त्यांच्या राहण्यासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध केल्या. कतरी मुलं त्यांच्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभा राहून गरम- गरम जेवण, सरबत आणि पाणी देत असल्याचे व्हिडीओज वाचकांनी पाहिलेलेच आहेत. एलजीबीटीक्यू समुदायासाठी वर्ल्डकपचे सामने जणू एक आगळी वेगळी पर्वनीच घेऊन येतात. मात्र याच स्पर्धेमध्ये त्यांच्या चाळ्यांना प्रतिबंध करून कतरने एक मोठा नैतिक निर्णय घेतला असून, जगासमोर स्वच्छ क्रीडा स्पर्धा कशा असतात याचे एक मापदंडच ठरवून दिलेले आहे. 

दारू आणि बिअर कंपन्या या स्पर्धेदरम्यान मोठ्या प्रमाणात जाहिरात करतात. आणि एका टोर्नामेंटसाठी 75 मिलियन डॉलरची कमाई यजमान देशाला होते. कतरने त्या कमाईवरसुद्धा पाणी सोडलेले आहे. निश्चितपणे असे सांगता येईल की, कतरमध्ये आयोजित करण्यात आलेले हे सामने कतरसाठी तोट्याचा व्यवसाय ठरणार आहेत. एवढा मोठा तोटा सहन करूनही केवळ इस्लामी नीतिमुल्यांची जपणूक करून कतरने इतर 55 मुस्लिम देशांच्या डोळयामध्ये झणझणीत अंजन घातले आहे. राहता राहिला प्रश्न या आयोजनादरम्यान इस्लामी मुल्यांच्या प्रभावाचा तर त्याचे उत्तर एवढेच आहे की, ज्या देशात या स्पर्धा भरविल्या जातात त्या देशाच्या सांस्कृतिक मुल्यांची छाप आयोजनावर नक्कीच पडलेली असते. उद्या समजा वॅटिकन सिटीमध्ये ही स्पर्धा आयोजित केली गेली तर तिथे निश्चितच ख्रिश्चन संस्कृतीच्या मुल्यांची छाप पडेल किंवा भारताला तशी संधी मिळाली तर आपल्या देशाच्या संस्कृतीची छाप त्या स्पर्धांवर नक्कीच पडेल. त्यामुळे इस्लामी संस्कृतीची छाप या स्पर्धेवर पडली आहे. या संबंधी तक्रार करण्याचे काहीच कारण नाही आणि कोणी करत असेल तर त्या तक्रारीकडे लक्ष देण्याची मुळीच गरज नाही. 

हा लेख लिहिण्यामागचा उद्देश  कतरचे मोठेपण दाखविणे हा मुळीच नसून या लेखा मागचा उद्देश असा आहे की, प्रत्येक वाचकाने ईश्वराने जी त्याला बुद्धी दिलेली आहे त्याचा उपयोग करून चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणावे. कतरच्या या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनादरम्यान लादण्यात आलेली बंधने ही नैतिक आहेत का अनैतिक आहेत? चांगली आहेत का वाईट आहेत? महिलांच्या दृष्टीने उपयोगी आहेत का अनुपयोगी आहेत? याचा प्रत्येकाने विचार करावा. ही बंधने लादण्यामागे कतरचा हेतू चांगला आहे का वाईट याचाही विचारही करावा. केवळ इस्लाम विषयी असलेल्या दुषित पूर्वग्रहाचा उपयोग करून टिका करून आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करू नये. जगातील अन्य देश या स्पर्धेतून कमाई करतात आणि कतरने जाणून बुजून तोटा सहन करून मानवतेची सेवा केली आहे का हानी केली आहे? याचा शांत डोक्याने विचार करावा आणि मगच त्याचे समर्थन किंवा विरोध करावा. 

- एम.आय. शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget