Halloween Costume ideas 2015

अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(३६) सत्याच्या आवाहनास तेच प्रतिसाद देतात जे ऐकणारे आहेत! मृतलोकांना२५ तर अल्लाह कबरीतूनच उठवील आणि नंतर ते (त्याच्या न्यायालयात सादर होण्यासाठी) परत आणले   जातील.
(३७) हे लोक म्हणतात की या पैगंबरावर त्याच्या पालनकर्त्याकडून एखादे संकेतवचन का अवतरले गेले नाही? सांगा, अल्लाह संकेतवचन अवतरण्याचे पूर्ण सामर्थ्य बाळगतो परंतु  यांच्यामधील बहुतेक लोक अज्ञानात गुरफटलेले आहेत.२६
(३८) जमिनीवर चालणाऱ्या एखाद्या प्राण्याला आणि हवेत पंखाने उडणाऱ्या एखाद्या पक्ष्याला पाहा, हे सर्व तुमच्यासारख्याच प्रजातींमध्ये मोडतात. आम्ही त्याच्या भाग्यलेखात  कोणतीही कसर ठेवली नाही, मग हे सर्व आपल्या पालनकर्त्याकडे एकवटले जातील.
(३९) पण जे लोक आमच्या संकेत वचनांना खोटे ठरवितात, ते बहिरे आणि मुके आहेत, अंधारात पडलेले आहेत.२७ अल्लाह इच्छितो त्याला पथभ्रष्ट करतो आणि ज्याला इच्छितो  त्याला सरळमार्गावर लावतो.२८
(४०) यांना सांगा, थोडे विचार करून सांगा, जेव्हा तुमच्यावर अल्लाहकडून एखादे मोठे संकट येऊन कोसळते अथवा अंतिम घटका येऊन ठेपते तर काय तेव्हा तुम्ही अल्लाहशिवाय इतर   कुणाचा धावा करता? सांगा, जर तुम्ही खरे असाल तर.


२५) ऐकणारे म्हणजे ते लोक ज्यांचा अंतरात्मा जिवंत आहे. ज्यांनी आपली बुद्धी आणि चेतना सोडून दिली नाही आणि ज्यांनी आपल्या मनावर वुंâठित वृत्तीचे आणि पक्षपाताचे कुलूप  लावलेले नाही, मृत लोकांनी अभिप्रेत ते लोक आहेत जे लकीरचे फकीर बनून आंधळयासारखे भरकटत आहेत. ते या लकीर (विधान) पासून दुसरी गोष्ट स्वीकारावयास तयार नाहीत,   मग ती स्पष्ट सत्यगोष्ट का असेना.
२६) येथे निशाणी म्हणजे स्पष्ट चमत्कार आहे. अल्लाहच्या कथनाचा अर्थ आहे की चमत्कार (मोजिजा) न दाखविण्याचे कारण हे नाही की आम्ही त्यास दाखविण्यास असमर्थ आहोत.  परंतु याचे कारण दुसरे आहे, ज्यास हे लोक केवळ आपल्या नादानीमुळे समजू शकणार नाहीत.
२७) म्हणजे तुम्हाला फक्त तमाशा पाहण्याचा शौक नसेल व वास्तविकपणे हे माहीत करून घेण्यासाठी चमत्कार पाहू इच्छिता की हे पैगंबर मुहम्मद (स.) ज्याकडे तुम्हाला बोलावित  आहेत ते सत्य आहे की नाही तर डोळे उघडून पाहा. तुमच्या चहुकडे चमत्कारच चमत्कार विखुरलेले आहेत. जमिनीवरील जनावरे व हवेतील पक्षी यापैकी एकाच्या प्रजातीला घेऊन  तिच्या जीवनावर गंभीरतेने विचार करा. कशाप्रकारे ती बनावट ठीक तिच्या दशेनुसार केली आहे. कशाप्रकारे त्यांच्या प्रकृतीमध्ये स्वाभाविक गरजांनुसार योग्य क्षमता आणि सामर्थ्य  ठेवले आहे. कशाप्रकारे आम्ही त्याला रोजी पाठविण्याचे नियोजन केले आहे. कशाप्रकारे त्याचे एक भाग्य निश्चित आहे ज्याच्या मर्यादेपासून तो पुढे व मागे जाऊ शकत नाही.  कशाप्रकारे त्यांच्यापैकी एक एक जनावर आणि सूक्ष्म किड्यांची त्याच स्थानावर जेथे ते आहेत तिथे देखरेख, देखभाल संरक्षण आणि मार्गदर्शन केले जात आहे. त्यांच्यापासून एका  निश्चित योजनेप्रमाणे काम घेतले जात आहे. तसेच कशा प्रकारे त्यांना एका नियमात नियमबद्ध केले आहे आणि कशा प्रकारे त्यांचा जन्म, प्रजनन व मृत्युचक्र व्यवस्थित विधीवत  चालू आहे. अल्लाहच्या अगणित निशाण्यांपैकी फक्त याच निशाणीवर विचार केला तर तुम्हाला माहीत होईल की अल्लाहचे एकत्व आणि त्याच्या गुणांची वास्तवत: हे पैगंबर मुहम्मद   (स.) तुमच्यासमोर सांगत आहेत. आणि या धारणेनुसार जगात आपले जीवनव्यवहार पार पाडण्यासाठीच्या ज्या पद्धतीकडे तुम्हाला बोलावित आहेत ते निखळ सत्य आहे. मात्र तुम्ही  तर स्वत: डोळे उघडून पाहात नाही की समजावून सांगणाऱ्याचेही ऐकत नाही. अज्ञानतेच्या अंधारात भरकटत आहात आणि तुम्हाला वाटते की निसर्गाच्या आश्चर्यकारक चमत्कारांना  दाखवून तुमची करमणूक करावी.
२८) अल्लाहने मार्गभ्रष्ट करणे म्हणजे एक अज्ञानताप्रिय मनुष्याला अल्लाहच्या आयतींच्या अध्ययनाचा योग मिळू दिला जाऊ नये आणि एक पक्षपाती, असत्याच्या मागे धावणारा  अभ्यासक जर अल्लाहच्या आयतींना पाहूनही तो वास्तविकतेपर्यंत पोहोचू शकत नाही व भ्रमात टाकणाऱ्या गोष्टी त्याला सत्यापासून दूरपर्यंत नेतात. या विपरीत अल्लाहचे मार्गदर्शन हे  आहे की सत्यशोधकांसाठी ज्ञानसाधनांद्वारे लाभान्वित होण्याचे सौभाग्य त्यांना प्राप्त् व्हावे आणि अल्लाहच्या आयतीमध्ये त्यांना वास्तविकतेपर्यंत पोहचण्याच्या  निशाण्या मिळाव्यात.  या तिन्ही प्रकारांची अनेक उदाहरणे आमच्यासमोर दररोज येत राहातात. अनेकजण असे आहेत ज्यांच्यासमोर निसर्गात आणि स्वत:च्या शरीरात अल्लाहच्या अगणित निशाण्या आहेत  परंतु ते जनावरांसारखे त्यांना पाहातात आणि काहीच बोध घेत नाहीत. तसेच अनेकजण प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र, भूशास्त्र, खगोल विज्ञान, शरीरविज्ञान, शरीररचनाविज्ञान  आणि विज्ञानाच्या दुसऱ्या शाखांचा अभ्यास करतात. इतिहास, पुरातत्व आणि समाजशास्त्राचे अनुसंधान करतात. त्यांच्या पाहण्यात अनेक अशा निशाण्या येतात ज्यामुळे मने श्रद्धेने  भरून यावीत. परंतु हे अध्ययन पक्षपातांवर आधारित असल्यामुळे आणि त्यांच्यासमोर ऐहिक फायद्याशिवाय दुसरा काही उद्देश नसतो. परिणामत: त्यांना (शोधकर्त्याना) आपल्या   शोधकार्यात सत्यापर्यंत पोहचण्यासाठी एकही निशाणी सापडत नाही. परंतु जी निशाणी समोर येते ती त्यांना उलटे अनिश्वरत्व, नास्तिकता, भौतिकवाद आणि नैसर्गिकवादाकडेच ओढून  नेते. अशा लोकांचा अभावसुद्धा नाही जे डोळे उघडे ठेवून या विश्वाचे अवलोकन करतात आणि त्यांची स्थिती अशी आहे, ‘‘बर्ग दरख्ताने सब्ज दर नजरे होशियार, हर वर के दफ्तरीस्त  मारफते किरदिगार’’ (म्हणजे हिरव्यागार वृक्षाची पल्लवीसुद्धा बुद्धिमान व्यक्तीला अतिमहत्त्वपूर्ण आहे आणि त्यांच्यापैकी प्रत्येक पानात निर्माणकर्त्याची ओळख होण्यासाठीच्या अगणित  निशाण्या आहेत.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget