Halloween Costume ideas 2015

‘तुम्ही स्वतःसाठी जे पसंत करता ते भावांसाठीही पसंत करा’

जमीर कादरी : महाड पूरग्रस्तांच्या आर्थिक स्थैर्यासाठी आयडियल रिलीफ कमिटी ट्रस्टचा आधार


महाड (प्रतिनिधी) 

आम्ही पूरग्रस्तांसाठी जी मदत करतो ती सेवा म्हणून. जेणेकरून आम्ही अल्लाहला उत्तर देऊ शकू की आपण दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा  आम्ही प्रयत्न केला आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांची शिकवण अशी आहे की, ‘’तुम्ही स्वतःसाठी जे पसंत करता ते आपल्या भावांसाठीही पसंत करा’’ जर आपण या शिकवणीचे पालन केले तर एक आदर्श समाज तयार होईल, समृद्धी येईल आणि समस्या संपतील, असे प्रतिपादन आयआरडब्ल्यू ट्रस्टचे अध्यक्ष सय्यद जमीर कादरी यांनी केले. 

24 सप्टेंबर रोजी कोकण पूरग्रस्त भागातील व्यवसायाचे पुनर्वसन आणि आर्थिक विकासासाठी महाड (रायगड) मध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  याचेे आयोजन आयडियल रिलीफ विंगचे सचिव मजहर फारूक, अशरफ असिफ, संघटक जमात-ए-इस्लामी कोकण, स्थानिक अध्यक्ष गोरे गाव अमानुद्दीन इनामदार आणि रेहान देशमुख यांनी केले. हा प्रोजे्नट आयडियल रिलीफ कमिटी ट्रस्ट अंतर्गत जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र यांच्या सहकार्याने सुरू आहे.

आयआरडब्ल्यू च्या आपत्ती नियमन समिती ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, 65 छोट्या व्यापाऱ्यांना त्यांच्या आर्थिक विकासासाठी धनादेश आणि विविध वस्तू आणि मशीन्स देण्यात आल्या.  आईआरडब्ल्यूने यावर 28 लाख रूपये खर्च केले. 14 लोकांना मशीन आणि अत्यावश्यक वस्तू देण्यात आल्या तर बाकीच्यांना 10,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंतचे धनादेश देण्यात आले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सय्यद जमीर कादरी  होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अस्लम पंसारी उपस्थित होते. विशेष अतिथी पत्रकार दिलदार पोरकर म्हणाले की, आयआरडब्ल्यूच्या कार्यकर्त्यांनी पूर आल्यानंतर तातडीने मदतकार्य केले. आम्ही पाहिले कि, आयआरडब्ल्यूचे कार्यकर्ते सतत मदत आणि सर्वेक्षण कार्यात गुंतलेले होते. अल्लाह त्यांच्या सेवा स्वीकारो.

महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार  म्हणाले, आयडियल रिलीफ कमिटी ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद आहे. सामाजिक कार्यकर्ते अस्लम पंसारी यांनी सांगितले की, ’’या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी या उपक्रमांमध्येही भाग घेतला. जमात आणि आयडियल रिलीफ विंगचे कार्यकर्ते सतत काम करतात. कोकण विभाग अनेक वर्षांपासून पुरामुळे उद्ध्वस्त झाला आहे, परंतु सरकारने अद्याप त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. 

सय्यद जमीर कादरी  यांनी मागणी केली की, ’ 2007 पासून आतापर्यंत स्थापन केलेल्या समित्यांनी पूर प्रतिबंधक उपाय योजनांसाठी दिलेले सल्ले आणि सूचना सरकारने अमलात आणाव्यात. 

मजहर फारूक  म्हणाले की, जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राच्या सहकार्याने आयडियल रिलीफ कमिटी ट्रस्टने कोकणातील चिपळूण आणि महाडमध्ये 250 पूरग्रस्तांसाठी व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची आणि 50 घरांची दुरुस्ती करण्याची योजना आखली आहे. त्याची किंमत सुमारे 1.5 कोटी आहे. या योजनेची अंमलबजावणी 15 सप्टेंबर 2021 पासून सुरू झाली आहे. यावेळी व्यावसायिक, नागरिक उपस्थित होते. 


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget