Halloween Costume ideas 2015
October 2021


‘गांधीजी होते म्हणून’ लिहितांना लेखकाने ‘माझ्या डोळ्यासमोर सामान्य जिज्ञासू नागरिक आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात वावरणारे सर्वसामान्य कार्यकर्ते होते असे म्हटले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्योत्तर काळात महात्मा गांधी यांना मिळाली अफाट लोकप्रियता हा ज्या दुष्टप्रवृत्तींना अडसर वाटू लागला. त्यांनी महात्मा गांधीजींच्या विरोधात गरळ ओकून त्यांच्याबद्दल द्वेश पसरविण्याचे उद्योग सातत्याने सुरू ठेवले आहेत, अलिकडे तर त्यांच्या प्रतिमेवर गोळी झाडून त्यातून भळाभळा रक्त येणारा व्हिडीओ समाजमाघ्यमांवर व्हायरल झालेला आपण पाहिला आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधीजींच्या एकूणच व्यापक कार्याचा समर्थपणे प्रतिवाद करता यावा अशा उद्देशाने कोल्हापुरातील सामाजिक चळवळीत अग्रभागी असणारे कार्यकर्ते (कै.) बाळ पोतदार यांनी गांधीजी होते म्हणून पुस्तक लिहिले आहे, त्यांचा उद्देश निश्चितच अनाठायी तर नाहीच पण योग्य वेळी त्यांनी या पुस्तकाद्वारे केलेला विवेचनात्मक प्रतिवाद निश्चित स्वागतार्ह आहे.

सध्या गांधीजींचे विरोधक नथुराम गोडसेला हुतात्मा ठरवू पाहत आहेत. मात्र हे विरोधक गांधीजींचे विचार संपूर्णपणे पुसून ही टाकू शकत नाहीत ही त्यांची खरी अडचण झाली आहे. मग हे सनातनी विरोधक गाधींजींच्या बद्दल खोटेनाटे विपर्यास्त व बिनबुडाचे आरोप करून गांधीजींच्या विषयी मोठ्या प्रमाणात संभ्रम व द्वेश पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत, तरुण पिढीला गांधीयुगाचा सखोल अभ्यास नसल्यामुळे त्यांचा गैरसमज होईल अशी धादांत खोटी विधाने करण्यात ही सनातनी टाळकी मश्गूल आहेत. त्यांना श्री. पोतदार यांनी या पुस्तकातून थेट व बिनचूक उत्तर देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये ज्येष्ठ लेखक व विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस म्हणतात, “लोकशाहीच्या पराभवाचा पराक्रम असंख्य संवेदनाशून्य नागरिक पेरत असताना लेखकाची संवेदना मात्र गांधीजींच्या उमाळ्याने ओतप्रोत भरून वाहते आहे.” पोतदार यांचे विचार ज्यांनी जवळून ऐकले आहेत त्यांना डॉ. सबनीस यांचे वरील उद्गार तंतोतंत पटल्याशिवाय राहणार नाही.

पोतदार यांचे पूर्वायुष्य मार्क्सवादी विचाराने भारलेले होते. मार्क्सवादाचा त्यांचा सुक्ष्म अभ्यास होता. त्या अंगाने ते खरे व्यासंगी मार्क्सवादी होते, त्यामुळे या ग्रंथात त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक प्रकरणाला विश्लेषणात्मक तसेच मूल्यमापनदृष्ट्या उंची प्राप्त झाली आहे. अत्यंत संयत व सविस्तर लेखनशैलीच्या खूणा पानापानांवर दिसून येतात.

1857 सालच्या ब्रिटीश सत्तेच्या विरोधात झोलल्या बंडात हिंदू-मुस्लिमांच्या ऐक्याचा संदर्भ महत्वाचा ठरतो. दिल्लीचा मोगल बादशहा बहाद्दूरशहा जफरच्या नेतृत्वाखाली झालेल्या स्वातंत्र्यांच्या संघर्ष पर्वात हिंदू-मुस्लिम ऐक्याची साक्ष ब्रिटीश सरकारने अनुभवली. हा इतिहास या पुस्तकात पोतदार यांनी अधोरेखित केला आहे. या पार्श्वभूमीवर 1858 च्या अगोदर भारतीय जनतेमध्ये हिंदू-मुस्लिम असा भेदभाव नव्हता, असा ऐतिहासिक निष्कर्ष या पुस्तकांमुळे नोंदला गेला आहे. या नोंदीला आजच्या जातीयवादी संदर्भात फार मौलीक महत्त्व असून हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या दृष्टीने तो पुरेसा अर्थपूर्ण आहे. खर्‍या अर्थाने अशा ऐतिहासिक पुराव्यांची गरज आजच्या काळात प्रत्कर्षाने जाणवत आहे, पोतदार यांच्या या पुस्तकाने ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.

हिंदू-मुस्लिम वर्गाच्या ऐतिहासिक वास्तवाच्या शोधात 1870 नंतर ब्रिटीश राजवट मुस्लिमांच्या पक्षपातात उतरल्याचे सत्य या ग्रंथाने या पूर्वार्धातच मांडले आहे. हिंदू-मुस्लिम व ब्रिटीश या त्रिकोणातील ऐतिहासिक अनुबंधनाचा सूक्ष्म अभ्यास हे बाळ पोतदार यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य आहे. या विषयाच्या मांडणीतील लेखक पोतदार यांनी पुढील प्रमाणे काही सुत्रे अधोरेखित केलेली आहेत. ती म्हणजे 1) 1920 ते 1925 हा काळ हिंदू-मुसलमानांच्या राष्ट्रीय भावनेच्या उत्कर्षाचा काळ होता. 2) 1925ते 35 या कालखंडात हिंदू-मुस्लिमांच्या राष्ट्रीय वृत्तीला दूराभिमानाने विकृत स्वरुप आले. 3) याच विकृतीतून हिंदू राष्ट्रवाद आणि मुस्लिम हिटलर मुसोलिनीचा उदय झाला. 4) 1933 नंतर याच द्विराष्ट्रावादाला हिटलर मुसोलीनीच्या फॅसिझमचे आकर्षण वाटू लागले. 1937 नंतर ही भावना वाढली आणि 1940 मध्ये लिगने पाकिस्तानचे ध्येय ठरवून विभागणीचे राजकारण केले. 5) या सर्वांचा परिणाम म्हणजे क्रांतिकारक राष्ट्रीय भावना दूभंगली व द्विराष्ट्रवादाची विकृती जन्माला आली. ताचेच रुप म्हणजे फाळणी लेखकाने या सर्वांची अभ्यासपूर्ण मांडणी केली. ही मांडणीच ऐतिहासिक वास्तवाचे अंतरंग अभिव्यक्त करणारी आहे.

पोतदार यांच्या इतिहासाच्या अभ्याबरोबरच वस्तूनिष्ठ सत्याचे विवेचन व विश्लेषण थक्क करून सोडते. त्यांनी टिळक व गांधीजींच्या राजकीय भूमिकांचे केलेले मूल्यमापन ही महत्त्वाचे ठरते. गीतेचा प्रभाव टिळक व गांधीजींच्यावर असला तरी दोघांच्या राजकारणची पद्धती भिन्न होती हे लेखकाने अनेक पुरावे देऊन नोंदवले आहे.

मुस्लिम समाजातील सुशिक्षीत वर्गाला खिलपतीबद्दल आस्था नव्हती, त्यामुळे खिलापत चळवळीचे नेतृत्व मुल्ला मौलवी यांचेकडेच राहीले तसेच देशातील काही भूभागावर आपले राज्य निर्माण करता यावे असे स्वार्थी राजकारण मुस्लिम लिगचे होते, ही सूत्रे अभ्यासपूर्व मांडतांना लेखकाचा राजकीय व्यासंग किती व्यापक होता ही दिसून येते. या ग्रंथात इस्लामचा उदय नावाचे एक प्रकरण आहे. गांधीजींचे राष्ट्रप्रेम व मानतवादी दृष्टीकोन समजून घेताना त्यांच्या कर्तृत्वाला हिंदू-मुस्लिम प्रश्न व फाळणीचे आव्हान निर्णायक ठरते. तेवहा लेखक केवळ भारतीय मुस्लिमांचा इतिहास न अभ्यासता ते देशाचा परिप्रेक्ष ओलांडून मध्ययुगीन इस्लामच्या उदयापर्यंत थेट भिडतात. अरबस्थानच्या वाळवंटातील अरंबांची जीवनपद्धती, इस्लामचा दिग्वीजय, युरोप आशियातील परिस्थिती, मोहम्मद पैगंबर (स.) यांचे अरब टोळ्यांना एकजीनसी बनवण्याचे कार्य, त्यांच्या मृत्यूनंतरची अबू बकर-उमर (र.) या खलिफांची कारकिर्द अशा इस्लामी इतिहासाची धार्मिक सामाजिक व राजकीय मांडणी समर्थपणे करतात. अरबी इस्लाम भारतात आल्यावर बाबर अकबर परंपारही तपशीलाने मांडली आहे.

गांधींच्या आकलनासाठी इस्लामचा पूर्वेइतिहास आवश्यक आहे, ही पोतदार यांची धारणास सर्वार्थाने योग्य आहे. 20 पानांचा इस्लामविषयक तपशील गांधींच्या कर्तृत्वासमोरील आव्हाने समजूनस घेण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

मोतीलाल नेहरूप्रणीत स्वराज्यपक्षाची स्थापना, 1923 च्या कायदे मंडळाच्या निवडणुका, कौन्सिल प्रवेशाचे राजकारण, काँग्रेसमधील मतभेद, शासनाची दडपशाही, हिंदू-मुस्लिम दंगली, हिंदू महासभेचा उदय, धर्मांतरीत हिंदूच्या शुद्धीकरणाची मोहीम, मुस्लिमांच्या तंजीम व तबलीक चळवळी, सायमन कमिशनचा विरोध, मोतीलाल नेहरूप्रणीत राज्यघटना मसुदा, वसातीचे स्वराज्य भेदभंगाची चळवळ, पुणे करार अशा असंख्य घटना ऐतिहासिक सूत्रामध्ये वस्तूनिष्ठ पद्धतीने मांडल्या आहेत.

सध्याच्या दूषित आणि दिशाहीन राजकीय पर्यावरणात या पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित होणारे आहे, भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात व महात्मा गांधींचे महात्म्य या विषयांवर अनेकांनी भरभरून लिहिले आहे, परंतु सूक्ष्म अवलोकन करून तपशीलवार मांडणी केलेले व तत्कालीन भारतीय राजकारणाचे वस्तूनिष्ठ व सर्वस्पर्शी विचारवंत लेखकांच्या यादीत स्वत:चा नामोल्लेख होत्यास भाग पाडावे आहे. लेखकाच्या चिंतनात्मक, मूल्यमापनात्मक आणि विश्लेषणात्मक लेखणीचा गौरव होणे अपरिहार्य आहे.

- सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२


नाव : गांधीजी होते म्हणून....

प्रकाशक : किसान शक्ती प्रकाशन, 1403 ई, शाहूनगर, कोल्हापूर-416 008

पृष्ठे : 288, मूल्य : 250/-



कोळसा संकटाने देशात डोके वर काढले असून त्यामुळे वीज टंचाईच्या तोंडावर भारत उभा आहे. भुकेच्या निर्देशांकात देश १०० च्याही खाली गेला आहे. अर्थव्यवस्थेची तर केव्हाच वाट लागलीय. लडाखचा मोठा भाग चीनने ताब्यात घेऊन उत्तराखंडमध्येही हैदोस घातला. त्यामुळे ‘१८-१८ तास काम’ करून देशाचा सारा भार आपल्या खांद्यावर घेण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भारनियमन’ करीत आराम करून आपल्या मंत्रीमंडळातील इतरांना काम करण्याचे स्वातंत्र्य द्यावे व देशावर उपकार करावे, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे.

देशात सध्या भीषण कोळसा टंचाई आहे. देशात निर्माण होणा-या वीजेच्या जवळपास ७० टक्के वीज ही कोळसा प्रकल्पांमधून निर्माण होते. त्यामुळे कोळसाच नाही म्हटल्यावर वीज निर्माण कशी करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. पंजाब, बिहार व राजस्थानसह अनेक राज्यात भारनियमन केले जात आहे. कोरोनोत्तर काळात अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येत असताना अचानक झालेल्या या वीज टंचाईने पुन्हा एकदा देशाच्या अर्थव्यवस्थेला ब्रेक लावले आहेत.

या विषयावर केंद्र आणि राज्ये एकमेकांवर आरोप करीत आहेत. राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी राज्याने केंद्राचे पैसे थकविले म्हणून राज्याला कोळसा मिळाला नसल्याचा जावईशोध लावला आहे. भाजपच्या या जावईशोधाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. महाराष्ट्राने दोन-तीन हजार कोटी थकविले म्हणून आरोप करणारे केंद्र सरकारने जीएसटीचे ३५ हजार कोटी थकविले याबाबत एक शब्दही बोलायला तयार नाहीत, असा भीमटोला पवारांनी लगावला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावणकुळे आदी नेते जीएसटीच्या थकबाकीवर काहीही बोलायला तयार नाहीत.

मुख्यमंत्री असल्यासारखे वाटत असेल तर..

‘मला मुख्यमंत्री असल्यासारखे वाटतेय’ असे वक्तव्य करून आपले हसू करून घेणारे फडणविसही ३५ हजार कोटी केंद्राकडून आणण्यासाठी काहीही करताना दिसत नाही. विरोधी पक्ष नेते म्हणून मंत्रीपदाचा दर्जा, प्रथेप्रमाणे मंत्रालयासमोर बंगला न मिळता मलबारहिलवरच बंगला मिळावा म्हणून आग्रही असलेले फडणविस राज्याला संकटात मदत करण्यासाठी मात्र केंद्राकडे धावताना दिसत नाही. त्यांनी पुढाकार घेऊन ही थकबाकी खेचून आणली तर केवळ त्यांनाच नव्हे तर राज्यातील जनतेलाही तेच ‘मुख्यमंत्री’ असल्याचे वाटेल. स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेण्यापेक्षा जनतेकडून शाबासकी मिळविण्याला फडणविसांनी प्राधान्य देणे अपेक्षित आहे. केंद्राने राज्याच्या हक्काचे हे ३५ हजार कोटी दिले तर राज्यातील कितीतरी विकास प्रकल्प मार्गी लागतील.

शेतक-यांना मदत करायला निधी उपलब्ध होईल. भाजपच्या गैरकारभारामुळे थकबाकीच्या डोंगराखाली दबलेल्या महावितरणला वीज खरेदीसाठी, कोळसा खरेदीसाठी पैसे उपलब्ध होतील.

डॉ. राऊत यांनी केले केंद्राचे वस्त्रहरण

राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी १२ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेऊन या विषयावर केंद्राचे पितळ उघडे पाडले आहे. या संकटाचा अंदाज फार पूर्वीच आल्याने त्यांनी केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांना ५ ऑगस्ट रोजीच पत्र पाठवून या कोळसा टंचाईच्या संकटाचा इशारा दिला. मात्र केंद्र सरकारने या विषयावर काहीही केले नाही. राऊत यांनी या विषयावर नियमित बैठका घेऊन परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही यावर लक्ष केंद्रित केले. ते एव्हढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी ऊर्जा सचिव, संचालक (संचालन), संचालक(कोळसा) यांच्यासह उच्चपदस्थ अधिका-यांना कोल इंडिया, केंद्रीय ऊर्जा मंत्रालय यांच्याकडे पाठपुरावा घ्यायला पाठवले. ६० हून अधिक अधिकारी विविध रेल्वे स्थानकांवर तैनात करण्यात आले. कोळसा घेऊन येणा-या रेल्वेगाड्यातील कोळसा वीज निर्मिती केंद्रापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल यावर देखरेख ठेवण्यासाठी त्यांनी प्रभावी यंत्रणाही उभारली. ते स्वतः केंद्रीय ऊर्जा मंत्री व कोळसा मंत्री यांच्याशी फोनवर बोलले. डॉ. राऊत यांनी हे संकट टाळण्यासाठी प्रभावी पावले उचलली.

केंद्रीय कोळसा मंत्रालयाचे सचिव अनिलकुमार जैन यांनी २७ सप्टेंबर २०२१ रोजी कोल इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रमोद अग्रवाल यांना पाठविलेले पत्रच त्यांनी माध्यमांसमोर वाचून दाखवत केंद्र सरकारचे पितळ उघडे पाडले. काय म्हटलेय या पत्रात?

“देशातील औष्णिक विद्युत प्रकल्पांना कोळशाची भीषण टंचाई जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर मी हे पत्र आपणास लिहित आहे. २०२४ पर्यंत १ बिलीयन टन कोळसा उत्पादनाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. चालू वर्षासाठी ७०० मेट्रिक टन कोळसा उत्पादनाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. मात्र तुमच्या विनंतीवरून ते ६६० मेट्रिक टन इतके खाली आणण्यात आले. चालू वर्षात २१ सप्टेंबरपर्यंत कोल इंडियाने २६०.६४ मेट्रिक टन कोळसा उत्पादन करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात २३७.३५ मेट्रिक टन कोळसा उत्पादित केला. याशिवाय आतापर्यंत ३५१ मेट्रिक टन कोळसा विविध प्रकल्पांना पाठविले जाणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात २९३ मेट्रिक टन म्हणजेच ५८ मेट्रिक टन असा प्रचंड कमी कोळसा रवाना करण्यात आला. त्यामुळे देशातील १३५ पैकी १०० औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये केवळ तीन ते सात दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा उरला आहे. कोल इंडियाच्या सुमार कामगिरीची गंभीर दखल कोळसा मंत्रालयाने घेतली आहे,” असे केंद्रीय कोळसा सचिव अनिल जैन यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

राज्याचा विचार केला तर कोल इंडियाची उपकंपनी असलेल्या वेस्टर्न कोलफिल्डस् लिमिटेड (डब्लूसीएल) कडून राज्य सरकारच्या वीज प्रकल्पांना आवश्यक कोळशाच्या ७० टक्के कोळसा घेतला जातो. यासाठी इंधन पुरवठा करार(एफएसए) केला आहे. या करारानुसार राज्यातील कोळसा खाणींमधून उत्पादन होणा-या एकूण कोळशापैकी ६५ टक्के कोळसा राज्याला मिळणे अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.

महानिर्मितीला दररोज १.३५ लाख मेट्रिक टन कोळशाची गरज आहे. मात्र डब्लूसीएलकडून कधीही पुरेसा कोळसा मिळत नाही. एवढेच नव्हे तर कोल इंडियाच्या इतर उपकंपन्यांपेक्षा डब्लूसीएलतर्फे आकारली जाणारी कोळशाची मूळ किंमत ही २० टक्के अधिक आहे. केवळ कोळशामुळे राज्याला २०२०-२१ या आर्थिक वर्षात बाराशे कोटींचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला,याकडेही ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी ५ ऑगस्टच्या पत्रात लक्ष वेधले आहे.

खासगी वीज विक्रेत्यांची चांदी

खासगी वीज कंपन्यांनीकोळसा टंचाईची ही संधी साधली. १२ ते १४ ऑक्टोबर या तीन दिवसात वीजेची खरेदी-विक्रीचे माध्यम म्हणून काम करणा-या इंडियन एनर्जी एक्स्चेंजच्या माध्यमातून वीज विक्री करून खासगी वीज कंपन्यांनी तब्बल ८४० कोटी रूपये कमावले आहेत. यापैकी भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशाला या तीन दिवसात ८० कोटी खर्चून ही महागडी वीज घ्यावी लागली. महाराष्ट्राला सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या काळात जवळपास ३४० कोटी अतिरिक्त खर्चून वीज १४ ते २० प्रति युनिट या दराने घ्यावी लागली.

उत्तर प्रदेशातील वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष अवधेश कुमार वर्मा यांनी याला आक्षेप वीज विक्रीचे कमाल दर निश्चित करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय वीज अधिनियमानुसार वीजेचा व्यापार करणारी कोणतीही संस्था ४ पैसे प्रति युनिटहून अधिक नफा एका युनिटमागे कमावू शकत नाही. मात्र या वीज संकटात ६ रूपये प्रति युनिट उत्पादन खर्च असलेली वीज ७ ते २० रूपये अशा अतिशय महागड्या दराने विकण्यात आली.

कोल इंडियाकडे ४४ मिलीयन टन एवढा मुबलक कोळसा साठा असतानाही कोळसा टंचाई असल्याचे कृत्रिम चित्र निर्माण करण्यात आले. अदानी, जिंदाल, जेपी ग्रुप या खाजगी वीज कंपन्यांना मुबलक प्रमाणात कोळसा उपलब्ध होऊ शकला व ४-६ रुपये प्रति युनिट असा वीजेचा दर असताना या कंपन्यांची १७ रुपये प्रती युनिट प्रमाणे वीज विकून बेकायदेशीपणे अफाट नफा कमावला व मालामाल झाले, असा आरोप काँग्रेसचे राज्यातील नेते राजेश शर्मा यांनी केला आहे. त्यामुळे काही मूठभर वीज उद्योजकांना फायदा मिळावा म्हणून हे कोळसा संकट निर्माण करण्यात आले का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. यात राज्य आणि केंद्रातील शासकीय वीज उत्पादक कंपन्या सामील होत्या का, ही शंका निर्माण होते. त्यामुळे संयुक्त संसदीय समितीमार्फत या कोळसा टंचाईची चौकशी होणे गरजेचे आहे!

देशात कोळसा टंचाईचे भीषण संकट उभे ठाकले असताना पंतप्रधान या संकटावर बोलायला वा बैठका घेऊन प्रश्न सोडवायलाही तयार नाहीत. पुलवामाच्या स्फोटाच्यावेळेस ते जसे कार्बेट नॅशनल पार्कमध्ये गडप झाले होते तसे कोळसा टंचाईच्यावेळेस ते कुठे गडप झालेत हे तरी किमान देशाला कळायला हवे.

पंतप्रधान १८ -१८ तास काम करीत असूनही कोरोना काळात लाखो माणसे का मेली? ऑक्सिजनची भीषण टंचाई का जाणवली? वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता पडेल हे जाणवून त्याची निर्मिती वाढविण्यासाठी नियोजन करूनही त्याची अंमलबजावणी अनेक महिने झाली नाही तेव्हा पंतप्रधान १८-१८ तास काय काम करीत होते? मोदींच्या काळात पेट्रोल-डिझेलने शंभरी पार केली.आणि २०१३ साली जागतिक भूक निर्देशांकात ६३ व्या क्रमांकावर असलेला भारत २०२१ मध्ये तब्बल १०१ क्रमांकावर घसरला. देशात कुपोषण असे भयानक वाढत असताना मोदी कुणाच्या आर्थिक पोषणात व्यग्र होते? आणि देशाच्या अर्थकारणारणाचा प्राण ऊर्जा क्षेत्र आहे. जर वीजच नसेल तर उद्योग सुरू राहणार नाही, वाहतूक, संवाद सारे काही बंद होईल. असे असताना गेल्या २ महिन्यांपासून देशात कोळसा टंचाई निर्माण झाली असताना पंतप्रधान नेमके काय करीत होते? हे प्रश्न जनतेला पडत असून त्यांची उत्तरे मिळणे हे अच्छे दिनच म्हणावे लागतील.

- प्रमोद चुंचूवार

०९८७०९०११८५

(लेखक ‘अजिंक्य भारत’चे राजकीय संपादक आहेत)



(१) माननीय मुआज बिन जबल (रजि.) यांच्या कथनानुसार, (एका प्रवासादरम्यान) मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या मागे उंटावर बसलो होतो आणि माझ्या आणि पैगंबरांच्या दरम्यान 'कज़ावा' (उंटाच्या पाठीवर घालावयाचा लाकडी हौदा. याच्या दोन्ही बाजूंस माणसे बसतात.) चा फक्त मागील भाग होता.

पैगंबर (स.) म्हणाले, ''हे मुआज़ बिन जबल!'' मी म्हणालो, ''हुजूर, गुलाम हजर आहे, आदेश द्यावा.'' पैगंबर (स.) काही बोललेच नाहीत. मग काही अंतर पुढे गेल्यानंतर ते म्हणाले, ''हे मुआज़ बिन जबल!'' मी तेच शब्द पुन्हा उच्चारले जे पहिल्यांदा म्हटले होते. (परंतु पैगंबर काहीच बोलले नाहीत.) मग काही अंतर पुढे गेल्यानंतर पैगंबर म्हणाले, ''दासांवर अल्लाहचा कोणता अधिकार आहे हे तुम्हाला माहीत आहे काय?'' मी म्हणालो, ''अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांनाच खरे काय ते माहीत.'' पैगंबर (स.) म्हणाले, ''अल्लाहचा अधिकार दासांवर असा आहे की त्याने (दासाने) त्याचीच उपासना करावी आणि त्याच्या उपासनेत कोणा दुसऱ्याला अजिबात भागीदार बनवू नये.'' मग काही अंतर चालल्यानंतर पैगंबर (स.) म्हणाले, ''हे मुआज!'' मी म्हणालो, ''बोला. हा गुलाम आपले वक्तव्य लक्षपूर्वक ऐकून घेईल आणि प्रामाणिकपणे आपले आज्ञापालन करील.'' पैगंबर (स.) म्हणाले, ''तुम्हाला ठाऊक आहे काय की दासांचा अल्लाहवर कोणता अधिकार (हक्क) आहे?'' मी म्हणालो, ''अल्लाह आणि त्याचे पैगंबरांनाच उत्तमप्रकारे ठाऊक.'' पैगंबर (स.) म्हणाले, ''अल्लाहचे दासत्व करणाऱ्या दासांचा अल्लाहवर असा हक्क आहे की अल्लाहने त्यांची शिक्षा माफ करावी.'' (हदीस : बुखारी व मुस्लिम)

स्पष्टीकरण : माननीय मुआज यांच्या कथनाचे स्पष्टीकरण असे आहे की मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या अगदी जवळ बसलो होतो, ऐकणे व ऐकवण्यास कसलाही अडथळा नव्हता, पैगंबरांचे वक्तव्य अगदी सहजतेने मी ऐकू शकत होतो परंतु जी गोष्ट पैगंबर (स.) ऐकवू इच्छित होते ती अत्यंत महत्त्वाची होती, म्हणून पैगंबरांनी तीन वेळा हाक दिली आणि ती गोष्ट सांगितली. असे यासाठी केले जेणेकरून मला या गोष्टीचे महत्त्व चांगल्या प्रकारे कळावे आणि मी अगदी लक्ष्यपूर्वक कान देऊन ऐकावे. पैगंबरांच्या वक्तव्याद्वारे 'एकेश्वरत्वा'चे महत्त्व स्पष्ट झाले की ते नरकाच्या यातनांपासून वाचविणार आहे. जी गोष्ट अल्लाहच्या क्रोधापासून वाचविणारी असेल आणि स्वर्गाचा (जन्नतचा) हक्कदार बनविणारी असेल, तिच्यापेक्षा अधिक मौल्यवान गोष्ट दासालाच्या दृष्टीने दुसरी कोणती असू शकते?

(२) पैगंबर मुहम्मद (स.) यांनी (अब्दुल कैस यांच्या कबिल्याची देखभाल करणाऱ्यांना) विचारले, ''एक अल्लाहवर ईमान बाळगण्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे काय?'' त्यांनी उत्तर दिले, ''अल्लाह आणि त्याचे पैगंबरच उत्तमप्रकारे जाणतात.'' पैगंबर (स.) म्हणाले, ''ईमान म्हणजे मानवाने या सत्याची ग्वाही द्यावी की अल्लाहशिवाय कोणीही उपास्य नाही आणि मुहम्मद अल्लाहचे पैगंबर आहेत आणि नमाज (प्रार्थना) योग्य पद्धतीने अदा करावी आणि जकात (दानधर्म) द्यावी आणि रमजान महिन्याचे रोजे (उपवास) करावेत.'' (हदीस : मिश्कात)

(३) माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जेव्हा जेव्हा प्रवचन दिले, त्यात हे अवश्य सांगितले की ''ज्याच्यात ठेव नाही त्याच्यात ईमान नाही आणि ज्याच्यात वचनाचे संरक्षण व आदर नाही त्याच्याकडे दीन (जीवनधर्म) नाही.'' (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वक्तव्याचा अर्थ असा की जो मनुष्य अल्लाहचे हक्क आणि दासांचे हक्क, ज्यांची पूर्ण यादी अल्लाहच्या ग्रंथात आहे, अदा करीत नाही त्याचा ईमान परिपूर्ण नाही आणि जो मनुष्य एखादी गोष्ट पूर्ण करण्याचे वचन देतो, मग ती गोष्ट पूर्ण करीत नाही आणि ते वचन पाळत नाही, तो धर्मपरायणतेच्या ईशदेणगीपासून वंचित राहतो. ज्याच्या मनात ईमानची मुळे दृढ रुतलेली असतात तो सर्व प्रकारचे हक्क प्रामाणिकपणे अदा करतो. कोणताही हक्क अदा करण्यात कुचराई करीत नाही. अशाप्रकारे ज्या मनुष्यात धर्मपराणता असेल तो मरेपर्यंत वचनाचे पालन करील. लक्षात असू द्या की सर्वांत मोठा हक्क अल्लाहचा आहे, त्याच्या पैगंबरांचा आहे, त्याने अवतरित केलेल्या ग्रंथाचा आहे आणि एखाद्या मनुष्याने आपल्या अल्लाहशी आणि त्याने पाठविलेल्या पैगंबराशी आणि पैगंबरांनी आणलेल्या जीवनधर्माशी केलेला करार सर्वांत मोठा करार असतो.

(४) माननीय अमर बिन अबसा (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ''ईमान म्हणजे काय?'' पैगंबरांनी उत्तर दिले, ''संयम आणि दानशूरता म्हणजेच ईमान होय.'' (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण : याचा अर्थ असा की ईमान म्हणजे मनुष्याने अल्लाहचा मार्ग स्वत:साठी पसंत करावा आणि त्या मार्गात जी काही संकटे येतील ती सहन करावीत आणि अल्लाहच्या आधारे पुढे पुढे जावे (हा संयम आहे) आणि मनुष्याने आपली मिळकत अल्लाहच्या वंचित व निराश्रित दासांवर अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी खर्च करावी आणि खर्च करून खुशी अनुभवावी (ही दानशूरता आहे).


 


(६२, ६३) ऐका, जे अल्लाहचे मित्र आहेत, ज्यांनी श्रद्धा ठेवली व ज्यांनी ईशपरायण वर्तन (संयम व ईशभय) अंगीकारले, त्यांच्याकरिता कसलेच भय अथवा दु:खाचा प्रसंग नाही. 

(६४) या जगात व परलोक दोन्ही जीवनांत त्यांच्याकरिता आनंदाच्या वार्ता आहेत. अल्लाहची वचने बदलू शकत नाहीत, हेच मोठे यश आहे. 

(६५) हे पैगंबर (स.)! ज्या गोष्टी हे तुझ्यावर रचतात, त्या तुला दु:खी करू नयेत, प्रतिष्ठा सर्वस्वी अल्लाहच्या अधिकारात आहे आणि तो सर्वकाही ऐकतो व जाणतो. 

(६६) सावधान! आकाशात वास्तव्य करणारे असोत अथवा पृथ्वीवर, सर्वचे सर्व अल्लाहच्या मालकीचे आहेत. आणि जे लोक अल्लाहशिवाय काही (आपले स्वरचित) बनावटी भागीदारांचा धावा करीत आहेत, ते निव्वळ मिथ्या व भ्रामक कल्पनेचे अनुयायी आहेत, व केवळ कल्पनाविलास करीत आहेत. 

(६७) तो अल्लाहच आहे ज्याने तुमच्यासाठी रात्र बनविली की तिच्यात संतोष प्राप्त करावा, व दिवसाला प्रकाशमान बनविले, यात संकेत आहेत त्या लोकांकरिता जे (उघड्या कानांनी पैगंबराचे आवाहन) ऐकतात.६५



६५) हा एक असा विषय आहे ज्यासाठी तपशीलात जाणे आवश्यक आहे. येथे अत्यंत संिप्तिरक्षत्या वर्णन केले गेले आहे. दार्शनिक जिज्ञासा म्हणजे या सृष्टीत जे काही आम्ही पाहातो आणि अनुभव करतो त्यामागे काही वास्तविकता आहे किंवा नाही? आणि असेल तर कोणती? जगात त्या सर्व लोकांसाठी जे दिव्यप्रकटनाद्वारे सत्यज्ञान प्राप्त् करीत नाहीत ते या एकमात्र ज्ञानाच्या साधनापासून वंचित राहातात. कोणतीही व्यक्ती मग ती नास्तिक असो की अनेकेश्वरवादी किंवा ईश्वरवादी असोत, तात्त्विक जिज्ञासा ठेवूनच जीवनधर्माविषयी एखाद्या निर्णयाप्रत पोहचू शकते. सर्व पैगंबरांनी जो धर्म प्रस्तुत केला आहे त्याची पारखसुद्धा तात्त्विक चिंतन मनन करूनच होते. पैगंबर लोकांना सृष्टीच्या प्रत्यक्ष वस्तंूमागे ज्या वास्तविकतेच्या अस्तित्वाचा पत्ता देत आहे ते मनाला भिडते किंवा नाही; या जिज्ञासेचे योग्य अथवा अयोग्य असणे पूर्णत: जिज्ञासाविधीवर अवलंबून आहे. याचे चुकीचे असल्याने चुकीचे मत आणि बरोबर असल्याने योग्य मत बनते. जगात या जिज्ञासेसाठी वेगवेगळया लोक समुदायांनी कोणकोणत्या पद्धती स्वीकारल्या त्या आता आपण पाहू या. अनेकेश्वरवाद्यांनी पूर्णत: अंधविश्वासावर आधारित आपल्या  शोधकार्याचा  पाया रचला आहे. योगी लोकांनी ध्यान मग्नतेचे ढोंग रचून खोटा  दावा केला  की आम्ही प्रत्यक्षाच्या मागे पाहून आंतरिकाचे अवलोकन करतो. परंतु सत्य हे आहे की त्यांनी आपल्या शोधकार्याचा पाया अनुमानांवर रचला आहे. ते ध्यान आपल्या अनुमानांवर करतात. ते म्हणतात की आम्हाला आंतरिक ज्ञान आहे. ते याशिवाय काहीही नाही जे ते अनुमान करून एक विचार बनवितात आणि त्यावरच ध्यानमग्न होतात आणि त्यावर मनाचा दबाव पाडून त्यांना तोच विचार चालताना व फिरताना दिसतो.  पारिभाषिक तत्त्वज्ञांनीनी गृहिताला शोधाचा आधार बनविला. ते तर एक अनुमान आहे; परंतु या अनुमानाच्या पांगळेपणाला जाणून त्यांनी तार्किक प्रमाण आणि कृत्रिम बौद्धिकतेच्या आधारे त्यास चालविण्याचा प्रयत्न केला आणि त्यास `गृहित' असे नाव दिले. वैज्ञानिकांनी विज्ञानाच्या क्षेत्रात शोधकार्यासाठी ज्ञानात्मक विधी स्वीकारली. परंतु अनैसर्गिक सीमेत पाऊल ठेवताच ते ज्ञानात्मक विधींना सोडून गृहित, अनुमान आणि तार्किक प्रमाणामागे कार्यरत राहतात. या सर्व समुदायांचे अंधविश्वास आणि अनुमान पक्षपाताने रोगग्रस्त झाले. त्यामुळे दुसऱ्याचे ऐकणे आणि आपल्याच प्रिय मार्गावर पुन्हा वळणे आणि वळल्यानंतर वळण्यासाठी विवश बनवून ठेवले गेले.

कुरआन या जिज्ञासेच्या विधीला मूलत: चुकीची समजतो. कुरआननुसार लोकांच्या मार्गभ्रष्टतेचे मूळ कारण म्हणजे तुम्ही सत्याचा शोध घेण्यासाठीचा आधार अनुमान आणि अंधविश्वासावर ठेवता. नंतर पक्षपातीपणामुळे दुसऱ्याचे म्हणणे ऐकण्यास तयार नसता. याच दोन्ही चुकांचा परिणाम म्हणजे तुमच्यासाठी स्वत: सत्याला प्राप्त् करणे असंभव होते; परंतु पैगंबरांनी आणलेल्या जीवनधर्माला पारखून तुम्हाला योग्य मत बनविणेसुद्धा अशक्य झाले. याविरुद्ध कुरआन दार्शनिक शोध घेण्यासाठी सत्य, ज्ञानात्मक आणि बुद्धीपरक मार्ग दाखवितो की, प्रथमत: तुम्ही वास्तविकतेविषयी त्या लोकांचे म्हणणे खुल्या मनाने ऐका. त्यांचा दावा आहे की ते अनुमान आणि अंधविश्वासावर नव्हे तर ज्ञानाच्या आधारावर तुम्हाला दाखवित आहेत की वास्तविकता ही आहे. सृष्टीत ज्या निशाण्या तुम्ही पाहाता आणि अनुभवत असता, त्यावर विचार करा. त्यांच्या ग्वाहींना एका क्रमात ठेवून विचार करा आणि शोधा की या प्रत्यक्षामागे ज्या वास्तविकतेचा संकेत हे लोक देत आहेत त्याच्याकडे या प्रत्यक्षाचा संकेत तुम्हाला सापडतो किंवा नाही. जर अशा निशाण्या सापडल्या आणि त्यांचे संकेतसुद्धा स्पष्ट आहेत मग तुम्ही त्या लोकांना खोटे ठरविण्याचे काहीच कारण नाही. हीच विधी तुम्ही इस्लाम तत्त्वज्ञानासाठी आधार बनवू शकता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात जिज्ञासाविधीला सोडून मुस्लिम तत्त्ववेत्ता गण अरिस्टॉटल आणि सॉक्रेट्सच्या मागे लागले आहेत. कुरआनमध्ये अनेक ठिकाणी या विचारप्रणालीवर भर देऊन सृष्टी निशाण्यांना प्रस्तूत केले आहे. त्यांच्यापासून निष्कर्षापर्यंत आणि वास्तविकतेपर्यंत पोहचण्यास विधिवत प्रशिक्षण कुरआन देत आहे जेणेकरून चितंन मनन करून या शोधकर्त्याचा विधी मनात घर करून बसावा. या आयतमध्ये दोन निशाण्यांकडे लक्ष वेधले आहे, त्या म्हणजे रात्र व दिवस. रात्र व दिवसाचे हे चक्र सूर्य आणि पृथ्वीतील संबंधात अत्यंत विधीवत परिवर्तनामुळे घडून येते. ही एक विश्वव्यापी व्यवस्थापक व सृष्टीचा सत्ताधारी शासकाच्या अस्तित्वाची उघड निशाणी आहे. यात उघड तत्त्वज्ञान आणि स्पष्ट उद्देशसुद्धा दिसून येतो. पृथ्वीवर असलेल्या सर्व वस्तूंचे हित याच रात्र आणि दिवसाच्या येण्याजाण्यावर अवलंबून आहे. यात पालनहारी, दयाशीलता आणि प्रभुत्वशीलतेच्या स्पष्ट निशाण्या आहेत. या ने हे प्रमाण मिळते की ज्याने पृथ्वीवर या सर्व वस्तू निर्माण केल्या आहेत, तो स्वत: यांच्या अस्तित्वाच्या गरजा  पूर्ण  करीत आहे. याने हे  माहीत होते की तो    विश्वव्यापी  व्यवस्थापक एक  आहे आणि तो  तत्त्वदर्शी आहे. तो  उद्देशपूर्ण काम करतो आणि तोच उपकारक आणि प्रशिक्षक आहे. म्हणून आज्ञापालनाचा एकमेव अधिकारी तोच आहे. रात्र दिवसाच्या येण्या-जाण्यांमुळे सृष्टीत जे कोणी अस्तित्व ठेवून आहेत, ते पालनहार नाही तर पलित आहेत, स्वामी नाही तर दास आहेत तसेच निर्माणकर्ता नाही तर निर्मिती आहे. या स्पष्ट ग्वाहीविरुद्ध अनेकेश्वरवाद्यांनी अनुमानाने आणि अंधविश्वासाने जे धर्म रचले ते शेवटी सत्य कसे असणार?  


एका प्रसिद्ध समाजवादी रूसोच्या उद्धरणापासून सुरुवात करण्यासाठी ते म्हणाले आणि मी उद्धृत करतो, "सत्ता भ्रष्ट करते आणि निरपेक्ष सत्ता पूर्णपणे भ्रष्ट होते." येथे नमूद करणे दुर्दैवी आहे की आपला समाज आणि त्याचा सामाजिक सेटअप म्हणजे प्रशासन वरील वाक्याच्या मूलभूत तत्त्वांनुसार डिझाइन केले गेले आहे. प्रशासनाच्या कोणत्याही वर्गाचा विचार न करता सत्तेचे वितरण पूर्णपणे भ्रष्टाचारावर डिझाइन केले गेले आहे. ज्या समाजात आपण राहतो तो समाज केवळ भ्रष्टाचाराच्या तत्त्वांवर चालतो. भ्रष्टाचार सर्वत्र दिसतो आणि जेव्हा सत्ता त्यात मिसळते, तेव्हा तो सत्तेला भ्रष्टाचारी बनवतो. एक विशाल क्रूर व्यवस्था ही त्याची प्रवृत्ती आणि ध्येय आहे. त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी आपल्या समाजाला तरुणांनी वर्ग आणि कृती निश्चित करण्याची गरज आहे. या संकटातून, द्वेषापासून आणि वाईटापासून स्वतःला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आपण स्वत:ला एकत्र केले पाहिजे आणि न्याय्य सामाजिक व्यवस्थेचा पाया स्थापित केला पाहिजे. जेव्हा आपण आपला स्व शोधतो तेव्हाच हे शक्य आहे. स्वत:ला जाणून घेणे किंवा स्वत:स शोधणे खूप महत्वाचे आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर "स्वतःचा शोध" म्हणजे जगातील सर्व रहस्ये शोधणे. जगातील सर्व चमत्कारांचा शोध घेण्यासाठी तरुणांनी खरी जाणीव निर्माण केली पाहिजे. तरुण ही आपल्या देशाची खरी शक्ती आहे. त्यांना स्वत:चा शोध घ्यायला लावणे आणि स्वत: ला कसे जाणून घ्यायचे हे माहित असणे आवश्यक आहे. स्वत:चा शोध घेण्यासाठी, आतमध्ये मजबूत इच्छाशक्ती आणि सकारात्मक ऊर्जा विकसित केली पाहिजे. आत्मभान हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा माल आहे. ज्याला आपल्या आत्मभानाची जाणीव आहे, तो जीवनातील अनेक खजिन्यांचा शोध घेण्यास सक्षम आहे. खरे बोलणे आणि अडथळे, फायदे - तोटे आणि दुःख हा जीवनाचा भाग आणि पार्सल आहे. पण स्वत:चा स्वार्थ जाणून घेतल्यास त्या सर्वांचा प्रतिकार होऊ शकतो. आपण प्रत्येक दयनीय परिस्थिती आपल्या दृष्टीकोनांच्या मदतीने हाताळू शकतो आणि हा केवळ आपल्या स्वत:चा आणि वर्तनाचा एक स्वच्छ भाग आहे. स्व-मान्यता आपल्याला मोठी उंची गाठण्यास मदत करू शकते. जे लोक स्वत:बद्दल अनभिज्ञ आहेत ते इतरांचे गुलाम आहेत आणि ते कधीही त्यांच्या स्वत:च्या निर्णय प्रक्रियेचा भाग असू शकत नाहीत. ते त्यांच्या मालकांवर अवलंबून असलेल्या प्राण्यांसारखे आहेत. मालक त्यांना पाहिजे तेथे ओढतो आणि ते डोळे बंद करून अनुसरण करतात. असे लोक भ्याडपणा आणि स्वत: अपुरे असल्याचे सिद्ध करतात, केवळ कायमचे मोहित केले जातात. अधीनता हे त्यांचे अंतिम गंतव्य स्थान आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, "मान्यता नसलेला स्व नेहमीच पिंजऱ्यात असतो आणि इतरांचा गुलाम असतो". गुलामगिरी आणि अधीनतेमुळे त्याला कधीही मनःशांती मिळू शकत नाही. म्हणूनच, स्वत:ची ओळख खरोखरच अर्थपूर्ण आणि मूल्यवान आहे. जगातील बहुतेक महान पुरुष मुक्त जन्माला आले आहेत, येथे मला सकारात्मक स्वातंत्र्य सहन करणारे पुरुष म्हणायचे होते, या वस्तुस्थितीने मी तुम्हा सर्वांना जागरूक करतो. पण, त्यांच्या आयुष्यातला बराचसा कठीण काळ त्यांना जाणवला. पण ते स्वत:ची विक्री कधीच करत नाहीत. ते असे पुरुष होते ज्यांनी असहिष्णुतेच्या व्यवस्थेशी कधीही तडजोड केली नाही जिथे लोकांच्या आत्मओळखीला त्रास दिला जात आहे आणि मोहित केले जात आहे. असे लोक खरोखरच सत्यता आणि न्यायाचे वैशिष्ट्य आहेत. ते आपले खरे नायक आणि प्रेरणा आहेत. कारण त्यांनी त्यांचा आंतरिक विवेक आणि स्वत्व ओळखले आहे. असे लोक मानवतेचे आणि शांततेचे प्रतीक आहेत. पण काळाच्या ओघात लोकांची स्वत:ची ओळख कमी होऊ लागली. अशा प्रकारच्या हरवलेल्या ओळखींची विविध कारणे असू शकतात, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेगाने वाढणारा भौतिकवाद व भौतिक दृष्टीकोन हे एक सर्वात मोठे कारण आहे ज्यामुळे लोकांनी काही पैशासाठी त्यांचे आत्मे विकण्यास सुरवात केली. हे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींदरम्यान केले जात आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर भौतिकवादामध्ये गुंतणे म्हणजे निःस्वार्थीपणाचे निर्मूलन होय. भौतिकवादाने आपल्या वर्तनाला एक कठीण आव्हान दिले आहे. यामुळे आपण बदलले आहोत परंतु नकारात्मक पद्धतीने आणि अशा व्यवस्थेचे गुलाम बनले आहे जिथे प्रामाणिकपणा, सत्यता आणि आंतरिक शांती यांना मूल्य नाही. हे केवळ ओळखपत्र आणि वाईट तत्त्वांवर कार्य करते. दुर्दैवाने, आपण ज्या वर्तमान युगात राहतो ते केवळ भौतिकवादाचे युग आहे. जेथे प्रत्येक निर्णय भौतिक पैलूंच्या तत्त्वांवर कार्य करतो. सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे सुरुवातीपासूनच आपल्याला गळा कापण्याच्या स्पर्धा शिकवल्या गेल्या आहेत, केवळ भौतिकवाद. ज्यात मानवी मूल्यांना फारसा फरक पडत नाही. विचार करा की अशा शिक्षण क्षेत्रात काय संकट घडणार आहे जेथे तरुणांना इतरांना कापण्याची आणि पुढे जाण्यास तयार केले जात आहे. मानवी मूल्ये, चांगुलपणा आणि न्याय कधीही प्रबळ होणार नाहीत परंतु निश्चितच रानटीपणा होईल. आपल्या आजूबाजूला घडणारी ही सर्वात मोठी शोकांतिका आहे आणि अफसोस आपण सर्व त्याचे अनुयायी सुरक्षित किनाऱ्यावर शांतपणे पाहत आहोत आणि आनंद घेत आहोत. जेव्हा "स्व"ला नैतिकता आणि दया या अर्थपूर्ण भेटवस्तू दिल्या जातात तेव्हाच त्याला मान्यता दिली जाते. जीवनाच्या मूलभूत तत्त्वांचे अनुसरण केले पाहिजे ज्यात प्रामाणिकपणा, सत्यता, प्रेम, शांतता, चांगुलपणा इत्यादींचा समावेश आहे. स्वत:ची अशी मान्यता कधीही अनैतिक जीवनाशी तडजोड करत नाही जरी विषयाला समस्या किंवा त्रास सहन करावा लागला तरी. हे समर्पण आणि कल्याण या तत्त्वांवर कार्य करते जेथे दोष आणि चुका कधीही प्रवेश करू शकत नाहीत. शेवटी, या साहित्यिक तुकड्याचा सारांश म्हणून, मी आणखी काही सुंदर ओळी सामायिक करू इच्छितो. "स्वतःची ओळख" अनेक कठीण ट्रेल्स आणि चाचण्यांमधून जाण्यामुळे येते. आपण सुरक्षित झोनमध्ये बसणे हे साध्य करू शकता. याउलट एखाद्याला कठीण क्षेत्रात असणे आवश्यक आहे. ते साध्य करण्यासाठी जीवनाच्या कटुतेची चव चाखली पाहिजे. त्याचा मुख्य शत्रू, ज्याचा सामना करायचा आहे तो क्रूरतेचा छळ करणारा आहे. जर तुम्ही त्यांच्याआधी वाचले, तर तुम्ही स्वत:ला जाणून घेण्यात आणि ओळखण्यात नक्कीच यशस्वी होऊ शकता. शिवाय सत्तेचा आदर हा त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. जर तुमच्यात सत्तेचा आदर आला, तर ते तुमचे तुकडे करेल आणि एखादी व्यक्ती आपली सर्व क्षमता, आत्मओळख आणि चेतना गमावेल. म्हणून, आपण सर्वांनी सर्वशक्तिमान अल्लाहला अशी "आत्ममान्यता" देण्याची प्रार्थना केली पाहिजे जी त्याला प्रिय आहे.

(एसएम)



स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) सिलिंडरच्या किंमती एकसारख्या वाढत आहेत. नेहमीच्या १४.२ किलो सिलिंडरच्या चार महानगरांमधील सरासरी किंमत आता आश्चर्यकारक पणे ९०६.३८ रुपये आहे. एक वर्षापूर्वी ऑक्टोबर २०२० मध्ये सिलिंडरची सरासरी किंमत ६०४.६३ रुपये होती. केवळ एका वर्षात त्याची किंमत ३०१.७५ रुपयांनी वाढली आहे. केंद्र सरकारने गरीब कुटुंबांसाठीच्या ‘मोफत’ स्वयंपाक गॅस योजनेसाठी वारंवार सार्वजनिक मान्यता मागितली असली, तरी गॅस सबसिडीचा अंत आणि गॅसच्या किंमतीतील बेलगाम वाढ यामुळे सामान्य कुटुंबांना स्वयंपाकासाठी त्याचा वापर करणे कठीण झाले आहे.  गेल्या एका वर्षात जेव्हा साथीच्या (कोरोना) रोगाने आणि लॉकडाऊनमुळे नोकऱ्या हिरावून घेण्यात आल्या होत्या, कमाई कमी झाली होती आणि लाखो लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर ढकलले गेले होते तेव्हा चार महानगरांमधील सरासरी किंमती पेट्रोलसाठी २६ टक्क्यांनी आणि डिझेलसाठी ३१ टक्क्यांनी वाढल्या आहेत. याचा सर्व वस्तूंच्या किंमतींवर परिणाम होतो कारण वाहतुकीचा खर्च वाढत जातो आणि ग्राहकांना भाज्या, इतर खाद्यपदार्थांसाठी आणि विविध प्रकारच्या वापराच्या वस्तूंसाठी जास्त पैसे द्यावे लागतात. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होते. त्यामुळे शेतकरी आणखी कमी कमाईसह डबघाईला येतात. २०१४ मध्ये भाजप सत्तेवर आल्यापासून पेट्रोलच्या दरात तब्बल ७९ टक्के आणि डिझेलच्या दरात १०१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमती वाढो अथवा कमी होवोत, केंद्र सरकार पेट्रोलियम उत्पादनांवरील उत्पादन शुल्कात सतत वाढ करत आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने पेट्रोलियम पदार्थांवर ३.७३ लाख कोटी रुपयांचे उत्पादन शुल्क वसूल मोडण्याचा विक्रम केला. मागील वर्षाच्या तुलनेत ही १.५ लाख कोटी रुपये किंवा ६७ टक्के वाढ होती. २०१४ मध्ये मोदी सत्तेवर आल्यापासून पेट्रोलियम उत्पादनांमधून उत्पादन शुल्क संकलन सुमारे ९९,००० कोटी रुपयांवरून ३.७३ लाख कोटी रुपयांवर गेले आहे - सात वर्षांत सुमारे २७७ टक्के वाढ! केंद्र सरकार द्वारे आकारल्या जाणाऱ्या उत्पादन शुल्काव्यतिरिक्त, जीएसटी इत्यादींसह इतर विविध करही वसूल केले जातात. या काळात तेही वाढले आहेत परंतु त्याच प्रमाणात नाहीत. पेट्रोलियम उत्पादनांमधून एकूण कर संकलन २०२०-२१ मध्ये ४.२ लाख कोटी रुपये आहे, त्यापैकी ३.७३ लाख कोटी रुपये किंवा सुमारे ९० टक्के केवळ उत्पादन शुल्कापोटी आहेत. केंद्र सरकारने केलेल्या या मोठ्या करआकारणीव्यतिरिक्त राज्य सरकारेही विक्री कर/व्हॅट, राज्य जीएसटी, ऑक्ट्राय, प्रवेश कर इत्यादी विविध कर आकारतात. तथापि, पेट्रोलियम उत्पादनांवरील उत्पादन शुल्काच्या रूपात केंद्र सरकार जे आकारले त्याच्या निम्म्याहून कमी प्रमाणात हे जोडले जाते. २०२०-२१ मध्ये या गणनेवर राज्य सरकारांनी एकूण कर वसुलीत २.१७ लाख कोटी रुपयांची भर घातली. गेल्या १८ महिन्यांपासून विशेषत: गरीब आणि निम्न मध्यमवर्गीय भारतीयांना दोन्ही टोकांची पूर्तता करताना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागत आहे, विशेषत: गरीब, हतबल आणि आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या विभागांना इंधन, भाज्या, डाळी, खाद्य तेल आणि इतरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत - काही दुप्पट आणि इतर तिपटीने. अलीकडच्या काही आठवड्यांत आणि महिन्यांत पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती सतत वाढत आहेत. त्यामुळे ते सामूहिक लुटीची सरकारी शस्त्रे बनली आहेत. नुकतेच ग्लोबल हंगर रिपोर्ट, २०२१ ने ११६ देशांच्या निर्देशांकात (जीएचआय) भारताला १०१ वे स्थान दिले आहे. त्याचे निष्कर्ष सत्ताधारी भाजपच्या व्यवस्थेला घातक ठरले आहेत. अपेक्षेप्रमाणे, भारत सरकारने या अहवालाचे जोरदार शब्दांत खंडन केले आणि म्हटले की ही माहिती दूरध्वनीद्वारे गोळा केल्यामुळे हे जनमत सर्वेक्षणासारखे आहे. असे असले तरी निरोगी लोकसंख्या ही सध्याच्या आणि भविष्यासाठी देशाची संपत्ती आहे.  बेरोजगारीत वाढ होत आहे. आपले नव्वद टक्के कर्मचारी अनौपचारिक क्षेत्रांमध्ये गुंतलेले आहेत जे तुटपुंज्या वेतनासाठी त्यांच्या उपजीविकेसाठी काम करतात. जेव्हा बेरोजगारी वाढते; जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती आणि उदरनिर्वाहाच्या गरजा वाढतात, तेव्हा दोन्ही टोकांना पूर्ण करण्यासाठी पैसे नसल्यामुळे लाखो लोक उपासमार आणि दारिद्र्याकडे ढकलले जातात. गरीब आणि मध्यमवर्गीयांवर अत्यावश्यक वस्तूंवर कर लावणे पुरोगामी नाही, तर प्रतिगामी आहे. आजारी लोकसंख्या ही एक जबाबदारी आणि प्रति-उत्पादक आहे. ग्लोबल हंगर रिपोटमध्ये वापरलेल्या पद्धतींवर आणि गोळा केलेल्या डेटावर आक्षेप घेण्याऐवजी स्वतःलाच प्रश्न विचारायला हवा की सांख्यिकी मंत्रालय आणि त्याची एजन्सी नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस (एनएसएसओ) काय करीत आहे? जेव्हा जेव्हा डेटा सरकारच्या राजकीय हेतूंना अनुकूल असतो, तेव्हा एनएसएसओ आपले निष्कर्ष प्रकाशित करते, अन्यथा अहवाल गुंडाळला जातो. दारिद्र्य आणि उपासमार ही खरी आणि वास्तविक आहे. आपण कार्यपद्धती आणि संख्यांशी खेळू शकतो, परंतु भूक आणि दारिद्र्याची तीव्रता नाही.

- शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक, 

मो.:८९७६५३३४०४


माननीय उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, 

येणाऱ्या मनुष्याने (जे वास्तवात जिब्रिल (अ.) होते आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याजवळ मानवरूपात आले होते) पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ''सांगा, ईमान काय आहे?'' पैगंबरांनी उत्तर दिले, ''ईमान म्हणजे, तुम्ही अल्लाहला, त्याच्या देवदूतांना, त्याने पाठविलेल्या ग्रंथांना, त्याच्या पैगंबरांना आणि परलोकाला सत्य समजा आणि सत्य माना आणि या गोष्टीचाही स्वीकार करा की जगात जे काही घडते ते अल्लाहकडून होत असते, मग तो सदाचार असो वा दुराचार.''

हा एका मोठ्या हदीसवचनाचा एक भाग आहे. ते हदीसवचन 'जिब्रिल' या नावाने प्रसिद्ध आहे आणि त्याचा खुलासा असा की माननीय जिब्रिल (अ.) एक दिवस पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे मानवरूपात आले आणि इस्लाम, ईमान, एहसान आणि कयामतच्या बाबतीत प्रश्न विचारले. पैगंबरांनी सर्वांची उत्तरे दिली. त्यापैकी ईमानच्या बाबतीत प्रश्नोत्तर येथे देण्यात आले आहे. (हदीस : सही मुस्लिम)

स्पष्टीकरण

ईमानचा खरा अर्थ आहे एखाद्यावर विश्वास ठेवणे आणि त्यामुळे त्याच्या सर्व गोष्टींना खरे मानणे. जेव्हा मनुष्याला एखाद्याच्या सत्यतेवर विश्वास बसतो तेव्हाच त्याची गोष्ट मानतो. विश्वास आणि भरवसा हाच ईमानचा खरा आत्मा आहे आणि मनुष्याला मोमिन (श्रद्धावंत) होण्यासाठी आवश्यक आहे की अल्लाहकडून पैगंबरांद्वारे येणाऱ्या सर्व गोष्टींना सत्य मानून त्यांवर श्रद्धा बाळगावी. त्यापैकी 'ईमानियात' (श्रद्धाशीलता) बाबतचा उल्लेख या हदीसवचनात आला आहे त्यांचे वेगवेगळे थोडक्यात स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे-

(१) ईमान बिल्लाह-

अल्लाहवर ईमान बाळगण्याचा अर्थ असा आहे की त्याचे निरंतर अस्तित्व मान्य करणे, त्याला जगाचा निर्माणकर्ता आणि जगाचा एकमेव पालनकर्ता मान्य करणे आणि या गोष्टीचा स्वीकार करणे की जगाच्या निर्मितीत आणि जगातील कायदा प्रस्थापित करण्यात त्याचा कोणीही भागीदार नाही. सर्व प्रकारचे दुर्गुण आणि सर्व प्रकारच्या कमतरतेपासून तो पवित्र असल्याचे आणि तो सर्व प्रकारच्या उत्तम सवयींचा मालक आणि सर्वगुणसंपन्न असल्याचे मान्य करणे.

(२) देवदूतांवर ईमान बाळगणे-

त्यांचे अस्तित्व मान्य करणे आणि ते पवित्र लोक आहेत, ते अल्लाहची अवज्ञा करीत नाहीत, प्रत्येक समयी अल्लाहची उपासना करण्यात मग्न असतात, प्रामाणिक सेवकाप्रमाणे मालकाचा प्रत्येक आदेश पूर्ण करण्यासाठी हात बांधून त्याच्या समोर उपस्थित असतात आणि जगात सत्कर्म करण्याऱ्यासाठी 'दुआ' (प्रार्थना) करतात, यावर विश्वास ठेवणे.

(३) ईशग्रंथांवर ईमान बाळगणे-

अल्लाहने आपल्या पैगंबरांद्वारे मानवांच्या आवश्यकतेनुसार जी उपदेशवचने पाठविली त्यांना सत्य मानणे, त्यापैकी अंतिम उपदेशवचन पवित्र कुरआन आहे. पूर्वीच्या लोकसमुदायांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये फेरबदल केला तेव्हा शेवटी अल्लाहने आपल्या पैगंबरांद्वारे अंतिम ईशग्रंथ पाठविला, तो स्वच्छ व स्पष्ट आहे, त्यात कसलीही कमतरता नाही आणि तो प्रत्येक प्रकारच्या फेरबदलापासून सुरक्षित आहे आणि आता या ग्रंथाव्यतिरिक्त जगात कोणताही असा ग्रंथ नाही ज्याद्वारे अल्लाहपर्यंत पोहोचणे शक्य आहे.

(४) पैगंबरांवर ईमान बाळगणे-

अल्लाहकडून आलेल्या सर्व पैगंबरांना सत्य मानणे, त्या सर्व पैगंबरांनी कोणत्याही फेरबदल न करता अल्लाहचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविला, या शृंखलेची अंतिम कडी पैगंबर मुहम्मद (स.) आहेत. आता फक्त पैगंबरांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्यातच मानवांची मुक्ती आहे.

(५) परलोकावर ईमान बाळगणे-

मनुष्याने ही हकीकत मान्य करावी की एक असा दिवस येणार आहे ज्यात मानवांच्या जीवनातील सर्व रेकॉर्डची चौकशी केली जाईल तेव्हा ज्याचे कर्म उत्तम असतील त्यांना बक्षीस मिळेल आणि ज्याचे कर्म तुच्छ असतील त्यांना शिक्षा भोगावी लागेल. शिक्षा किती असेल आणि बक्षीस काय मिळेल हे सांगता येणार नाही.

(६) भाग्यावर ईमान बाळगणे-

ही गोष्ट मान्य करणे की जगात जे काही घडत आहे अल्लाहच्या आदेशाने होत आहे. येथे फक्त त्याचाच आदेश चालतो. त्याला जे हवे आहे त्याऐवजी जगाचा कारखाना वेगळयाच पद्धतीने चालत आहे, असे कधी घडत नाही. प्रत्येक सदाचार व दुराचार उपदेश आणि मार्गभ्रष्टतेचा एक नियम आहे, जो त्याने अगोदरच बनवून ठेवला आहे. अल्लाहचे आभार मानणाऱ्या दासांवर जे संकट येते, ज्या अडथळयांचा सामना करावा लागतो आणि ज्या कसोटीला त्यांना सामोरे जावे लागते, ही सर्व परिस्थिती आणि त्यांच्या पालनकर्त्याचा आदेश आणि अगोदरच निश्चित करण्यात आलेल्या कायद्यानुसार आहे.



लखीमपूर येथील हत्याकांड या देशात घडतंय असे पहिल्यांदाच पाहाण्यात आले. माणुसकी इतकी खालावेल आणि सत्तेचा नशा इतका भयंकर असेल असे आजवर या देशातील कुणी साध्या नागरिकाने विचारही केला नसेल. राजकारणी सत्ताधाऱ्यांची गोष्ट वेगळी. त्यांनी असे कारस्थान घडवण्याचे देखील ठरवले असेल, कुणाला माहीत. ज्यांना लिंचिंगच्या रक्ताची सवय झाली ते अशा पाशवी हिंसक घटना एक ना एक दिवस घडवूनच आणणार होते. कुणी साध्या माणसाने गुन्हेगारी वृत्तीच्या तत्त्वांनी नव्हे तर हे हत्याकांड स्वतः गृहराज्य मंत्रीपुत्राने घडवून आणल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केलेला आहे.  

आपल्या मोटारीने रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांना चिरडण्यासाठी असे धैर्य आणि हिंमत लागते. साधी माणसं असा विचार सुद्धा करू शकत नाहीत. गुंड प्रवृत्तीचे लोक देखील अशी घटना घडवण्याआधी शंभरदा विचार करतील. एक दोन माणसांना पैसे घेऊन  गोळ्या घालणे वेगळे आणि रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना ज्यांच्याशी त्यांचा काहीही संबंध नसतो, त्यांच्या अंगावरून गाडी चालवण्याचा विचार आणि धाडस गुंड लोक सुद्धा करत नाहीत. पण मंत्रीपुत्राने ते करून दाखवलं तर त्याला धैर्य आणि हिंमत कुणाची होती? एक तर आपण  सध्या मंत्र्यांचेच नाही तर ज्यांच्या हाताखाली पोलीस यंत्रणा राबते अशा गृहराज्य मंत्र्याचे पुत्र आहोत, मग त्याला यासाठी जाब विचारण्याची हिंमत कुणाकडे असणार! ही सध्या एक घटना दिसली असली तरी पुढच्या काळात अशा घटना घड़णार नाहीत, याची खात्री आज तर कुणी देऊ शकत नाली. कारण जोपर्यंत सत्ता आपल्या हातात आहे तोपर्यंत माणसांच्या जिवावर सुद्धा आपला ताबा आहे अशी मानसिकताच सध्या निर्माण झालेली दिसते. आज शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून त्यांना बेदखल करण्याचे कायदे केलेत, उद्या ते सडकेवर येणार, त्यांची मालमत्ता आधीच गेली, नंतर त्यांच्या जिवांचा सौदा कुणी केला तर? हा आजचा प्रश्न आहे. याचे उत्तर भविष्यात मिळेल. कारण जगात जी कोणती घटना घडते ती एकदा घडून कायमची नष्ट होत नसते. त्या घटनेचे पडसाद उमटतातच. मग त्या पडसादांचे चेन रियाक्शन चालूच राहील. अशी पाळी या देशाच्या नागरिकांवर न आलेलीच बरी. चूक झाली असेल मंत्रीपुत्राकडून किंवा जाणूनबुजून केलेले ते कृत्य असेल, पण काहीही झाले तरी कायद्याला आपले कर्तव्य पार पाडायला इतके दिवस का व कसे लागले? कायद्याचे राज्य जर आल्या संविधानाने प्रस्थापित केले असेल तर ते कायदे अंमलात आणण्यासाठी इतका उशीर कशामुळे? नक्कीच सत्तेची लाचारी. एखाद्या गुन्हेगाराला तोही असा गुन्हेगार ज्याने आपल्या गाडीखाली चिरडून निष्पाप लोकांची हत्या केली, त्याविरूद्ध कारवाई करण्यासाठी किती किती विचार केला जातो! विचार या गोष्टीचा नाही की ज्यांना ठार करण्यात आले त्यांच्यासाठी काय काय करता येईल, त्यांना न्याय किती जलद गतीने देता येईल! नव्हे तर या गोष्टीशी सत्ताधाऱ्यांना काहीही देणेघेणे नव्हते. विचार या घटनेचा की राजकीय पडसाद कसे उमटतील, कुणाला या घटनेचा लाभ होणार, कुणाला तोटा होणार! येत्या काळात राज्याच्या निवडणुकीचे राजकीय समीकरण, निवडणूक आणि नंतरची बेरीज-वजाबाकी. हा सगळा विचार करूनच मग मंत्रीपुत्राविरूद्ध कारवाई केली गेली. म्हणजे माणसांच्या जिवांपेक्षा निवडणुकीची बेरीज-वजाबाकी आणि राजकीय समीकरण जास्त महत्त्वाचे होते. लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेची पुनरावृत्ती दुसऱ्याच दिवशी हरियाणात करण्यात आली. यात भाजपनेत्याने एका शेतकऱ्याला आपल्या मोटारीने धक्का दिला. सुदैवाने तो वचावला. पण इथल्या भाजपनेत्याला हे साहस कुणी दिले? नक्कीच लखीमपूर येथील घटनेने.

उत्तर प्रदेशात ही घटना घडली, तिथे 2022 मध्ये निवणुका होणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही घटना नक्कीच तिथल्या मुख्यमंत्र्यांसाठी धोक्याची आहे. त्यांनी या घटनेचे इतरत्र पड़साद उमटू नयेत आणि शेतकऱ्यांनी हिंसेचा मार्ग अवलंबू नये म्हणून मयताच्या नातेवाईकांना 45 लाख आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरीचे आमिष दाखवले. शेतकऱ्यांनी विचारले, आज 45 लाख देऊन हत्या करणारे उद्या 50 लाख देऊन माणसांच्या कत्तली का करणार नाहीत? याचे उत्तर कुणापाशीच नाही. तसे पाहता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसाठी पुढच्या निवडणुकीची वाट सोपी नाही. ते राज्याचे मुख्यमंत्री जरी असले तरी भाजपच्या दैनंदिन कार्यात त्यांना विचारले जात नाही. जिल्हास्तरावरील भाजपची सूत्रे दिल्लीतून हाताळली जात आहेत. त्यांच्यासमोर दिल्लीतल्या केंद्र सरकारच्या गृहराज्य मंत्र्याच्या पुत्राविरूद्ध काही कारवाई करणे सोपे नव्हते. म्हणून त्यांनी विचार  करत तीन दिवस घालवले असतील. शेवटी त्यांच्यावर जनतेचा दबाव आल्याने त्यांचा नाविलाज झाला असावा. कारवाई सुरू केली, पण मंत्रीपुत्राला साजेसा सन्मान देऊन घरी जाऊन इतर नागरिकांप्रमाणे पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणले नाही. घराच्या दारावर पोलीस ठाण्यात हजर राहाण्याचे निमंत्रण देऊन सुद्धा तो दोन दिवस तरी ठाण्यात आला नाही. तिसऱ्या दिवशी तो आपल्या वकिलासह हजर झाला. चौकशी सुरू झाली, ती पूर्ण पाहुणचारासह. 

आरोपी मंत्रीपुत्राला अधूनमधून चहा-बिस्किटे खावयास दिली गेली. जनतेच्या मनात हे सगळं पाहून अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. ज्या आरोपीला अटक करण्यासाठी सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आली, नंतर समन्सवजा आमंत्रण देऊन त्याला चौकशीस बोलावले. पूर्ण आदरातिथ्यासह त्याची चौकशी केली. इतका सौम्य व्यवहार एका हत्येच्या आरोपीशी केला जात असेल तर उद्या कोर्टात त्याचा खटला किती सौम्यपणाने व सन्मानाने चालू होईल? खरेच त्याच्याविरूद्ध पुरावे गोळा केले जातील की गोळा केलेले पुरावे  कोर्टात सादर न करता इतर सौम्य पुरावे सादर केले गेले तरी त्याला शिक्षा होईल? झालीच तरी किती सौम्य असणार ती, कारण शेवटी लोकांच्या जिवांशी खेळणं त्याच्यासाठी राजकारणाचाच खेळ आणि सत्तेची नशा!

- सय्यद इफ्तिखार अहमद



काँग्रेस नेत्यांना भाजपाची भीती वाटते त्यांना पक्षातून  बाहेर काढले गेले पाहिजे आणि पक्षाबाहेरच्या त्या नेत्यांना पक्षात आणले गेले पाहिजे ज्यांना भाजपाची भीती वाटत नाही. आम्हाला धाडसी नेत्यांची गरज आहे जे आमच्या विचारधारेमध्ये विश्वास ठेवतात. 16 जुलै 2021 रोजी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेल व्हॉलिंटियर्सच्या एका मेळाव्यात वरील उद्गार काढले होते. या उद्गारानंतर अलिकडेच काँग्रेस पक्षामध्ये कन्हैय्या कुमार यांचा झालेला प्रवेश लक्षणीय ठरला आहे. कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवाणी सारख्या दोन तरूण मागासवर्गीय नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित पक्षाच्या आरोग्याला शक्तीवर्धक ठरेल. मात्र त्यांच्या या प्रवेशाने काँग्रेसला उर्जित अवस्था मिळेल का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्याच्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. म्हणूनच या आठवड्यात हा विषय चर्चे साठी निवडला आहे. 

कन्हैय्या कुमार राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठी सर्वात मोठा गुण म्हणून भाषण कलेकडे पाहिले जाते. या एकाच गुणाच्या बळावर अटल बिहारी वाजपेयी यांनी भाजपाचे राजकारण अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा जीवंत ठेवले होते. काँग्रेसमध्ये एकेकाळी विलासराव देशमुखांपासून माधवराव सिंधीया पर्यंत भाषणामध्ये पारंगत असलेल्या नेत्यांची एक मोठी फळी होती. अलिकडे प्रभावशालीपणे बोलणाऱ्यांची संख्या काँग्रेसमध्ये नाही. कन्हैय्या कुमार बोलण्यामध्येच नव्हे तर प्रसारमाध्यमांना हाताळण्यामध्येही त्यांच्या समकालीन नेत्यांमध्ये सर्वात पुढे आहेत. संदीप पात्रा सारख्या वाचाळ प्रव्नत्याला निरूत्तर करणारा त्यांचा वादविवाद  आजही युट्यूबवर उपलब्ध आहे. कन्हैय्याकुमारने आपल्या अंगभूत भाषणकला आणि तर्कशक्तीच्या आधारे भल्याभल्यांना नामोहरम करत  कुठलीही फारशी राजकीय कुमक नसतांना राष्ट्रीय पातळीवर स्वतःला प्रस्थापित केलेले आहे, यात शंका नाही. ’’काँग्रेसला जीवंत ठेवावे लागेल’’ या उद्गारासह काँग्रेसचे महत्त्व विशद करत त्यांनी आपली पहिलीच प्रेस कॉन्फरन्स अत्यंत संयतरित्या हाताळत सर्वांवर छाप सोडलेली आहे. म्हणूनच कन्हैय्याकुमार यांच्या प्रवेशानंतरची काँग्रेस कशी असेल याचा अंदाज लावण्यास सुरूवात झालेली आहे. आजमितीला काँग्रेसकडे नवज्योतसिंग सिद्धु वगळता जनतेवर मोहिनी घालणारा कुठलाही वक्ता नाही. राहूल गांधी यांच्या भाषण मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत. अशा वेळेस कन्हैय्याकुमारच्या प्रवेशाने पक्षाला एक राष्ट्रीय पातळीवर ओळख असणारा प्रभावशाली वक्ता मिळालेला आहे, एवढे निश्चित. 

वास्तविक पाहता भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कन्हैय्या कुमारला सांभाळले, मोठे केले, पण भाकपचा स्वतःचा प्रभाव अंकुंचन पावत असल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर भरारी घेण्यासाठी सज्ज असलेल्या आपल्या या युवा नेत्यास आवश्यक तेवढा अवकाश आपण उपलब्ध करून देऊ शकत नाही, हे भाकपला आणि आपल्याला भाकपमध्ये भविष्य नाही हे कन्हैय्या कुमार यांना कळून चुकले होते. त्यामुळेच कन्हैय्याकुमारच्या काँग्रेस प्रवेशानंतर भाकपमध्ये फारशी आदळआपट झाली नाही. स्वतःचा वैयक्तिक लाभ डोळ्यासमोर ठेवून संसदेमधील आपला मार्ग सुकर करण्याच्या आकांक्षेतून कन्हैय्याकुमार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, यात वाद नाही. 

आपल्या प्रत्येक सभेची सुरूवात लाल सलामने करणारे कन्हैय्याकुमार आता काँग्रेसचे नेते झालेले आहे. त्यांचे फायरब्रँड बोलणे हीच त्यांची सर्वात मोठी शक्ती आहे. त्यांची राष्ट्रीय मुद्यांची समज इतकी जबरदस्त आहे की कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना त्यांची तुलना सरळ पंतप्रधान मोदींशी केली जावू लागली होती; हा इतिहास जुना नाही. 

सीएए-एनआरसी विरूद्ध राष्ट्रव्यापी आंदोलनामध्ये राष्ट्रीय म्हणविल्या जाणाऱ्या काँग्रेसनेही उतरण्याचे धाडस केले नव्हते तेव्हा कन्हैय्याकुमार यांनी सीएएच्या विरोधात एक मोठे जनआंदोलन बिहारमध्ये स्वबळावर उभे केले होते. पूर्नियामध्ये तर झालेल्या त्यांच्या सभेला एक लाखापेक्षा जास्त लोक हजर होते. खरा नेता तोच असतो जो जनमताची नाडी ओळखून आंदोलनामध्ये उतरतो. सीएएमुळे उद्वेलित झालेल्या जनतेची नाडी ओळखून परिणामांची पर्वा न करता कन्हैय्याकुमार यांनी त्या आंदोलनात उडी घेतली आणि बघता-बघता राष्ट्रीय झाले. जेएनयूमधील एक विद्यार्थी नेता अल्पावधीतच राष्ट्रीय नेता कसा बनू शकतो याचे एकमेवाद्वितीय उदाहरण कन्हैय्या कुमारच्या स्वरूपाने तरूण पिढीसमोर आहे. 

काँग्रेसची अंतर्गत परिस्थिती

कन्हैय्याकुमार आणि जिग्नेश मेवाणी तरूण असले, भाषण कलेत पारंगत असले, त्यांचा जनतेवर मोठा प्रभाव जरी असला तरी काँग्रेसला गतवैभवापर्यंत नेण्यास ते यशस्वी ठरतील असे समजणे धाडसाचे ठरेल. कारण जो पक्ष राष्ट्रीय जरी असला तरी त्या पक्षाला स्वतःचा पक्षाध्यक्ष सुद्धा निवडता येत नाही ही भीषण वास्तविकता आहे. यावरून या पक्षाच्या राजकीय आरोग्याचा अंदाज येतो. राजकारणामध्ये कधी काय होईल हे जरी निश्चितपणे सांगता येत नसले तरी काँग्रेसचे दुखणे इतके विकोपाला गेलेले आहे की, डॉ. कन्हैय्या कुमार त्याच्यावर यशस्वी उपचार करू शकतील, याची शक्यता कमीच आहे. कन्हैय्या कुमार यांच्यावर कुठलेही भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत, सांप्रदायिकतेचा कुठलाही डाग त्यांच्यावर लागलेला नाही, ही त्यांची बलस्थाने जरी असली तरी स्वतःसोनिया गांधी आणि राहूल गांधी यांच्यातील मतभेद कन्हैय्या कुमार यांना मोकळेपणे काम करू देतील, याची शक्यता कमीच आहे. शिवाय जुने काँग्रेसी नेते जे की अत्यंत सांप्रदायिक मानसिकतेचे आहेत ते एका मागासवर्गीय नेत्याला मागून येवून आपल्या पुढे जाऊ देतील, याची शक्यता देखील कमीच आहे. असे म्हटले जाते की, काँग्रेसला कुठलाही विरोधी पक्ष हरवू शकत नाही. काँग्रेसला फक्त काँग्रेसच हरवू शकते. काही अंशी हे खरे असल्याची साक्ष पक्षाच्या इतिहासावर नजर टाकली तरी लक्षात येते. कन्हैय्या कुमार यांचे पाय तेच नेते खेचतील यात शंका नाही. राज्यसभेमध्ये आयुष्य घालवून पक्षात मोठी प्रतीष्ठा प्राप्त केलेल्या नेत्यांनी दस्तुरखुद्द राहुल गांधी यांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करू दिले नाही, ते कन्हैय्याकुमार यांना मोकळेपणे काम करू देतील, असे वाटत नाही. 

आज पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग विरूद्ध नवज्योतसिंग सिद्धू, राजस्थानमध्ये अशोक गहलोत  विरूद्ध सचिन पायलट यांच्यातील राजकीय द्वंद्व किती टोकापर्यंत गेले आहेत हे अवघ्या देशाने पाहिलेले आहे. इतर काँग्रेसशासित राज्यातील नेत्यामधील रूसवे फुगवे ही पक्ष नेतृत्वाला आवरता-आवरता नाकी नऊ येत असल्याचेही दिसून येते. काँग्रेसचे सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे त्याचे शिर्षनेतृत्व कमकुवत आहे आणि पक्षात दूसरा कुठलाही असा नेता नाही जो या कमजोर नेतृत्वाला आव्हान देऊ शकेल. सोनिया गांधी नामधारी अध्यक्ष आहेत. 

राहूल गांधी आणि प्रियंका गांधी पक्षाध्यक्ष बनण्यास तयार नाहीत. एकंदर परिस्थिती अशी आहे, ज्या राज्यात काँग्रेस कमकुवत आहे त्या राज्यात काँग्रेस नेतृत्व पक्षाला मजबुती प्रदान करू शकत नाही.  ज्या राज्यात काँग्रेस मजबूत आहे त्या ठिकाणी पक्ष कलह काँग्रेस नेतृत्व हाताळू शकत नाही आणि ज्या राज्यात भाजपा मजबूत आहे त्या ठिकाणी ती काँग्रेसला उभारी मिळू देत नाहीत. निवडणुका जिंकून देण्यामध्ये गांधी घराणे पहिल्यासारखे न राहिल्याने आपोआपच त्यांची पत घसरलेली आहे. येणेप्रमाणे काँग्रेसची चोही बाजूने कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये हा पक्ष राष्ट्रीय स्तरावर निवडणुका जिंकून केंद्रात सत्तेत येईल, असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. जो पक्ष स्वतःला पक्षाध्यक्ष देऊ शकत नाही तो देशाला पंतप्रधान कसा देऊ शकेल? 

सीएसडीएसचे अध्यक्ष अभय दुबे यांनी तर अशी शंका व्यक्त केलेली आहे की गांधी परिवार आणि भाजपच्या शिर्ष नेतृत्वामध्ये अशी सेटिंग झाली असावी की काँग्रेस नेतृत्व स्वतःच्या पक्षाला अशाच जर्जर अवस्थेत ठेवेल बदल्यात भाजपा नेतृत्वाने गांधी परिवाराला व्यक्तीगतरित्या कुठलेही नुकसान पोहोचवू नये.  ही शंका खरी असावी असे वाटण्याचे एक कारण रॉबर्ट वाड्रा यांना मिळालेले अभयसुद्धा आहे. 2014 पूर्वी भाजपाने रॉबर्ट वाड्रांच्या भ्रष्टाचारासंबंधी जे रान उठवले होते आणि पुराव्यानिशी माध्यमांमध्ये त्यांच्याविरूद्ध जी मोहीम सुरू केली होती ती 2014 नंतर अचानक अंतार्धन पावली व रॉबर्ट वाड्रांना अभय दिले गेले.  त्यांच्याविरूद्ध कुठलीही कायदेशीर कारवाई झाली नाही. अशी सेटिंग नसेल तर काय कारण आहे की पक्षाचे एवढे नुकसान सहन करूनही गांधी परिवार नेतृत्व सोडतही नाही आणि पक्षाची पुनर्बांधणीही करत नाही. जी-23 यांच्या मागण्या मान्य करत नाही. पुलाखालून प्रचंड पाणी वाहून गेल्यानंतर आता कुठे जी-23 नेत्यांची जुनी मागणी मान्य करून पक्ष नेतृत्वाने पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली असल्याचे समजले आहे. 

राहूल गांधी फक्त ट्विटरवर सक्रीय असतात. प्रियंका गांधी उत्तर प्रदेशाच्या प्रभारी असूनही, चार महिन्यावर विधानसभा निवडणुका आल्या असतांनासुद्धा उत्तर प्रदेशामध्ये पक्ष बांधणीसाठी पुरेसा वेळ देत नाहीत. उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनीच या संबंधीची नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांच्यापेक्षा जास्त सक्रीय तर वरूण गांधी आहेत. गांधी जयंतीच्या दिवशी गोडसेंच्या जयजयकाराचा विरोध काँग्रेसने नाही तर वरूण गांधी यांनी केला. त्यांनी किसान आंदोलनाला राहूल गांधी पेक्षाही आधी पाठिंबा दिला आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. राहूल गांधी आणि प्रियंका गांधी ही जोडी लखीमपूर खिरीच्या घटनेनंतर रस्त्यावर उतरली. पोलिसांचा विरोध धुडकावून हे दोघेही मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना जाऊन भेटून आले. परंतु त्यापूर्वी आसामच्या दरांग जिल्ह्यात पोलिसांनी गोळीबार करून मारलेल्या दोन मुस्लिम व्यक्ती आणि त्यांच्यापैकी एकाच्या प्रेतावर उड्या मारलेल्या फोटोग्राफरची घटना अंतरराष्ट्रीय पातळीवर गाजूनही त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची गरज राहूल गांधी यांना वाटली नाही. त्याचे काय कारण आहे याचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. काँग्रेस नेतृत्वाचा हा ढोंगीपणा अल्पसंख्यांकांसाठी नवीन नाही. 

कन्हैय्या कुमार यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसच्या  पेल्यामध्ये वादळ जरूर उठेल तरी परंतु पक्षाच्या मुलभूत संरचनेतच अनेक दोष असल्यामुळे कन्हैय्याकुमार यांना फारसा वाव नाही. काँग्रेसमधील सर्वात मोठा दोष हा की, पक्षात लोकशाही उरली नाही. पक्षातील शेवटचा निर्णय हा राहुल गांधी घेत असतात. परंतु ते पक्षाध्यक्ष नाहीत. 

निर्णय घ्यायचे पण अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यायची नाही हा बेजबाबदारपणाचा कळस आहे. दूसरा सर्वात मोठा दोष पक्ष आपल्या धर्मनिरपेक्ष विचारधारेपासून कैक योजने दूर गेलेला आहे. खरे पाहता नेहरू आणि शास्त्रीनंतर पक्षातील धर्मनिरपेक्ष विचार मागे पडला आणि राजीव गांधी नंतर पक्षाने सौम्य हिंदुत्वाची कास धरली. 

80 टक्के बहुसंख्य मतदारांकडे दुर्लक्ष करून 20 टक्के अल्पसंख्यांक मतदारांचे लांगुलचालन करावे, असा मुर्खतापूर्ण विचार अल्पसंख्यांकांपैकी कोणीही करणार नाही. मुळात अल्पसंख्यांकांची समस्या ही आहे की, त्यांना विकास तर लांबच राहिला सुरक्षा देण्यात सुद्धा काँग्रेस पक्ष यशस्वी ठरला नाही. तेव्हा सुद्धा जेव्हा ते पूर्ण बहुमतानिशी केंद्र आणि राज्यांमध्ये सत्तेत होता. आजही काँग्रेसशासित राज्यात अल्पसंख्यांकांच्या कल्याणाचा विचार तर केलाच जात नाही उलट त्यांना सुरक्षाही पुरविली जात नाही, हे सत्य नाकारण्यासारखे नाही. काँग्रेसचा हा दुटप्पीपणा लक्षात यायला अल्पसंख्यांकांना उशीर जरी झाला असला तरी आता अल्पसंख्यांकांनी काँग्रेसला पुरते ओळखलेले आहे. त्यामुळे अल्पसंख्यांकांचा विश्वास जिंकण्याची पक्षाची क्षमताच लोप पावलेली आहे, असे वाटल्यास नवल ते काय? जुने काँग्रेसी नेते आणि नवीन काँग्रेसी नेते यांच्यातील प्रतीस्पर्धा सुद्धा टोकापर्यंत पोहोचलेली आहे. हा तिसरा दोष आहे. त्यावर अंकुश लावणे पक्षनेतृत्वाला जड जात आहे, हे सुद्धा एव्हाना लक्षात आलेले आहे.

एकंदरित कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांच्या प्रवेशामुळे पक्ष गतवैभवाला प्राप्त करील याची शक्यता कमीच आहे. कन्हैय्या कुमार यांच्या प्रवेशानंतर सुद्धा दस्तुरखुद्द राहुल गांधी यांच्या वायनाड (केरळ) मधील मतदार संघातील एक ज्येष्ठ नेते जे 52 वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रीय होते, पी.व्ही. बालचंद्र यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली आहे व पक्ष सोडतांना त्यांनी पक्षाने दिशा गमविल्यामुळे आगामी निवडणुकीत केरळची जनता पक्षाच्या सोबत उभी राहणार नाही असे कारण देऊन  काँग्रेस सोडली आहे. हे एकच कारण पक्षाच्या दुर्दशेचे आकलन करण्यासाठी पुरेसे आहे. देशामध्ये राष्ट्रीय पातळीवर एका धर्मनिरपेक्ष पक्षाची व्हॅकेन्सी असतांना काँग्रेस त्या व्हॅकेन्सीचा लाभ उठवू शकत नाही, हे भारतीय लोकशाहीचे खरे दुर्दैव आहे. 

- एम.आय.शेख



महागाईचा चढता आलेख जनतेच्या मुळावर उठला आहे. मुलभूत गरजा  भागविण्यासाठी लागणारे इंधन दिवसेंदिवस वाढतच आहे. एलपीजी गॅसच्या किमतीत 43.5 टक्क्यांनी वाढ करून सरकारने नागरिकांना पुन्हा चूल फुंकण्यास मजबूर केले आहे. घाईमिटीला आलेल्या सामान्य नागरिकांनी केंद्र व राज्य सरकारच्या ध्येय धोरणावर सक्त नापसंदी व्यक्त केली आहे. अशातच शेती धोरणांवर सरकारचे आडमुठे धोरण शेतकऱ्यांना उमेद हारण्यास विवश करत आहे.

सध्या सणासुदीचे दिवस सुरू झाले  आहेत. मात्र या सणांवर महागाईचे पूर्णपणे सावट दिसून येत आहे. खरेदीसाठी बाहेर  पडेलेले नागरिक महागाई पाहून सरकारविरूद्ध अपशब्द बोलत आहेत. महागाई वाढीस मुख्य कारण कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती आता पिंपामागे 80 डॉलरपर्यंत पोहोचल्या आहेत. ऑक्टोबर 2018 नंतर प्रथमच कच्चे तेल एवढे भडकले आहे. कोरोनाकाळात प्रचंड घटलेली कच्च्या तेलाची मागणी आता सुरळीत होत असताना तेल उत्पादक देशांची पुरवठा करताना दमछाक होत आहे. या वर्षअखेरीस  कच्चे तेल पिंपामागे 90 डॉलरपर्यंत मजल मारण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. परिणामी पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, सीएनजी आदी पुन्हा महागणार आहे. या इंधनावरील अधिभार हा राज्याच्या महसुलाचा चांगला आधार आहे. त्यामुळे अधिभार कमी होण्याची शक्यता नाही. पेट्रोल आणि डिझेलने केव्हाच लिटरमागे शंभरी पार केली आहे. आता त्यात आणखी भर पडणार आहे. हॉटेल व इतर व्यवसायांसाठी लागणाऱ्या 19 लिटरच्या एलपीजी गॅसच्या किमती सिलिंडरमागे 43.5 रुपयांनी वाढल्या आहेत. महागडे पेट्रोल, डिझेल, गॅस यामुळे वाहतूक खर्च वाढून महागाईत भर पडणार आहे. त्यातच अतिवृष्टी, पूर यामुळे बहुतांश राज्यांतील खरीप पाण्यात गेला आहे. त्याचाही फटका बसू शकतो. बाजारात अधिक पैसा खेळता राहण्यासाठी प्रमुख व्याज दरवाढीचे संकेत रिझर्व्ह बँकेकडून मिळताहेत. असे झाले तर स्वस्त कर्जाचा काळ संपून चलनवाढीचा काळ सुरू होईल. हे चक्र टाळण्यासाठी सरकार, अशा वित्तीय संस्था यांनी एकत्रित आणि एकमताने उपाय योजले तर सर्वसामान्यांचे सण गोड होतील. मात्र असे होताना दिसत नाही. सध्या सरकारच्या धोरणात महागाई कमी होवून दिलासा मिळेल असे कोणतेही चिन्ह दिसून येत नाही. येणार काळ कोणते दिवस दाखविल हे सांगता येत नाही. 



मनुष्यासोबत आजार हे त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सोबत असतात. काही बालकं जन्मताच रोगाने ग्रस्त जन्माला  येतात तर काहींना जन्माच्या काही तासानंतर रोगाची लागन होते. अनेक माणसं आजारांचा सामना करता-करता मरणाच्या दारापर्यंत पोहोचतात. आज वैद्यकीय सेवा, सेवा नसून व्यवसाय झालेला आहे. म्हणून ती अतिशय महाग झाली आहे. आपले किंवा आपल्या आप्ताचे जीव वाचविण्यासाठी प्रसंगी लोकांना कर्ज काढून उपचार करावे लागतात. आजार बरा न झाल्यास पैसा आणि जीव दोन्ही गमवावी लागतात. आजार बरा व्हायला लागणारा अधिक वेळ, अत्यधिक खर्च अनेकांना मानसिक व शारीरिकरित्या खचवून टाकतो. अशा अनेक समस्यांपासून लोकांना खरे समाधान व मार्गदर्शन मिळत नाही. सध्याचा काळ कुठलेही शुल्क न घेता नाडी तपासून आजार सांगणाऱ्या वैद्य, हकीम यांचा राहिलेला नाही. आता कुठल्याही वैद्यकीय सल्ल्यासाठी चिकित्सकाची फीस देणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत चिकित्सा ही साधी, स्वस्त आणि सोपी असायला हवी, ही काळाची गरज आहे. या बाबतीत प्रेषित हजरत मुहम्मद (सअव.) यांचे मार्गदर्शन अनुकरणीय आहे. या वैद्यकीय मार्गदर्शनाला तिब्बे नबवी असे म्हटले जाते. 

प्रेषित हजरत मुहम्मद (सअव) यांनी मध, कांद्याच्या फुलांच्या बिया, डाळिंब, मेथी, जांभुळ,  आबे जमजम ( पवित्र मक्का येथील पाणी ), मसूरीची डाळ, मुंगा,  मोती, उंबर, तुळस, काकडी, सिरका, ऊंट, बकरी व गायीचे दूध, मांस, मासोळी,  बीट, पनीर, संत्री, सुंठ, बोर, कापुर, दुधी भोपळा, खारिक, अंजीर, ऑलिव्ह, कोहळं, कस्तुरी, पाणी,  कांदा, पावसाचे पाणी आदींची मुबलक माहिती देत मानव जातीवर मोठे उपकार केले आहेत. आज याच वनस्पतींना खनीज शोधकर्त्यांद्वारे मानव जातीच्या सुदृढ आरोग्यासाठी महत्वपूर्ण मानले जात आहे. या औषधांना विशिष्ट अशा पद्धतीने तयार करून त्यांचे सेवन केल्याने  पित्त, डायबटिज, मुळव्याध, पोटातील जंत, कर्करोग, कोलेस्टेरॉल, मासिक पाळीच्या समस्या आदी अनेक आजारांमध्ये हमखास फायदा होतो आहे. प्रेषित मुहम्मद (सअव) यांनी अनेकानेक वस्तूंचे फायदे सांगून आरोग्य आणि वैद्यकीय उपचार विश्वात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यावरून हे सिद्ध होते की, प्रेषित हजरत मुहम्मद (सअव) मानवजातीसाठी महान वैद्यकीय सल्ल्यागाराच्या परमोच्च शिखरावर विराजमान आहेत.

प्रेषित हजरत मुहम्मद (सअव.) यांनी मानव जातीला श्रद्धा आणि भक्ती या सोबतच शारीरिक आणि आत्मीय शिक्षणाची मोलाची भेट दिली आहे. यात व्यक्तीचे उठने, बसने, आहार, निद्रा याचे स्पष्टीकरण दिले आहे. 

निरोगी विचार 

निरोगी शरीरात विचारही निरोगी असतात. या विशेषतेचा अंदाज प्रेषित हजरत मुहम्मद (सअव.) यांच्या या विचाराने लावता येईल  की, ’’परलोकात तुमच्या पुण्यकर्माची विचारणा करतांना सर्वात आधी आरोग्याची विचारणा केली जाणार.’’

पथ्य आणि स्वच्छता

उपचारापेक्षा काळजी बरी या तत्वानुसार वैद्यकीय क्षेत्रात ’पथ्या’ला महत्त्वाचे स्थान आहे. प्रेषित हजरत मोहम्मद सअव यांनी 1444 वर्षापूर्वी हे स्पष्ट केले की पथ्य पाळल्यास भविष्यात आरोग्याविषयी येणाऱ्या गोष्टीही बदलता येतात. प्रेषित हजरत मुहम्मद (सअव) यांनी स्वच्छतेला ईमानचा अर्धा भाग असल्याचे सांगितले. याचप्रकारे कुठल्याही प्रकारची इश्वरीय उपासना ही स्वच्छता व त्यांच्या अनिवार्यतेसोबतच पूर्ण होते. प्रेषित हजरत मुहम्मद (सअव.) यांनी सांगितले की,’’ शरीराची पवित्रता भक्तीतील विश्वासाचा भाग आहे.’’  

स्वच्छतेत शरीराला ’गुसल’ नावाच्या आंघोळीने पवित्र केले जाते. प्रत्येक नमाजच्या अगोदर ’वजू’ अनिवार्य आहे, हे सुद्धा स्वच्छतेचे सरळ, सोपे प्रात्यक्षिक आहे. ज्यामुळे अनेक आजारांपासून स्वतःला दूर ठेवता येते. पर्यावरणात झालेल्या प्रदुषणाने अनेक आजारांना जन्म दिला आहे, यापासून बचावासाठी रोज नवे उपाय शोधले जात आहेत. मात्र प्रेषित हजरत मुहम्मद (सअव) यांनी शेकडो वर्षांपूर्वी एक योजना अमलात आणून सांगितले होते की, ’’ स्वच्छता हीच अर्धी श्रद्धा, भक्ती व विश्वास (ईमान) आहे आणी कुणी आजारी पडला तर म्हणायचे की,  तुम्ही आजारी पडला असाल तर उपचार करून घ्या.’’ प्रेषित हजरत मुहम्मद (सअव.) म्हणतात,  ’’जेव्हा तुम्ही कुठे संसर्गजन्य आजाराविषयी ऐकाल तर त्या ठिकाणी जाऊ नका आणि ज्या ठिकाणी अशी महामारी पसरली आहे अशा ठिकाणी असाल तर तिथून बाहेर कुठे जाऊ नका.’’ 

ताप आल्यास जव आणि कधी चिकित्सकाच्या आवश्यकतेवर भर हजरत आयशा रजी. सांगायच्या की, ’’प्रेषित हजरत मुहम्मद सअव यांच्या कुटुंबितील कुणाला ताप आल्यावर प्रेषित (सअव.) त्यांच्यासाठी जवापासून तयार केलेली खिचडी बनवून द्यायचे आदेश देत होते. एकदा प्रेषित हजरत मुहम्मद (सअव.) आजारी व्यक्तीच्या देखभालीसाठी पोहोचले तेव्हा त्यांनी चिकित्सकाला बोलवायला सांगितले, तेव्हा कुणी तरी म्हटलं की, हे प्रेषित सअव हे आपण म्हणत आहात? त्यावर प्रेषित (सअव) म्हणाले, ’’हो अल्लाहने जर हा आजार दिला आहे तर निश्चितच यावर औषधही दिले आहे.’’ 

पोटाच्या आजाराचे मूळ

अनेक रोगांचे मुख्य कारण अत्याधिक जेवन करणे आहे. पवित्र कुरआनच्या सुरह आराफच्या 31 क्रमांकाच्या आयातीत अल्लाहचा आदेश आहे की, ’’खानपान करा मात्र अनावश्यक खर्च करू नका, कारण, अल्लाह/ईश्वर अनावश्यक खर्च करणाऱ्याला पसंत करीत नाही.’’ प्रेषित हजरत मुहम्मद (सअव.) यांनीही  अधिक जेवन करण्यास मनाई केली आहे. त्यांचा आदेश आहे की, व्यक्तीला ताठपणे चालण्यासाठी काही घास पर्याप्त आहेत, आणि जास्त जेवन करायचे असल्यास, पोटात एक तृतियांश अन्न, एक तृतियांश पाणी आणि एक  तृतियांश वायुसाठी जागा शिल्लक असावी. एका ठिकाणी असं सांगितलं आहे की, ’’अल्लाह भुकेल्या व्यक्ती  ऐवजी जास्त जेवन करणाऱ्याकडे तिरस्काराच्या नजरेने बघतो.’’ प्रेषित सल्ल. यांनी एकदा म्हटले होते की, माझा कालखंड सर्वोत्कृष्ट आहे. त्यानंतर माझ्या सहाबांचा, त्यानंतर त्यांच्या ताबेईन (अनुयायां)चा, त्यानंतर तबेताबाईन (त्यांच्या अनुयायां) चा, त्यानंतर जे लोक येतील त्यांचे पोट पुढे आलेले असेल आणि ते स्थूलतेला पसंत करणारे असतील.’’ 

दंत स्वच्छता 

दातांचा जेवनाशी घनिष्ठ संबंध आहे. जठरा संबंधित आजार रोखण्यासाठी दातांची स्वच्छता महत्त्वाची आहे. दातांच्या स्वच्छतेवर जोर देतांना प्रेषित हजरत मुहम्मद (सअव.) म्हणतात, ’’आपले तोंड स्वच्छ ठेवा. मी माझ्या समुदायाला प्रत्येक नमाजच्या आधी मिस्वाक (दातांची स्वच्छता) करण्याचा आदेश दिला आहे.’’ प्रेषित हजरत मुहम्मद (सअव.) सकाळी उठल्यावर दातुनने आपले दात घासायचे. हे दातुन पिलू नावाच्या वृक्षाचे असायचे. पिलू वृक्षात अनेक औषधीय गुणधर्म आहे. हे झाड साल्वाडोरेसी परिवारातील आहे. याचे शास्त्रीय नाव ’साल्वाडोरा पर्सिका’ आहे. याच्या चावता येणाऱ्या काड्या मुख स्वच्छता, धार्मिक आणि सामाजिक उद्देशाने उपयोगात आणल्या जातात. 

इंग्रजी भाषेत याला ’टूथब्रश ट्री’ , हिंदीत व उर्दूत पिलू, मराठीत व संस्कृत भाषेत कुम्भी नावाने ओळखले जाते. दातांची स्वच्छता आणि सुरक्षा आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. व्यक्तीमत्वावर याचा सकारात्मक प्रभाव दिसून येतो. पिवळे, घाणेरडे दात, श्वासातील वास असणाऱ्या व्यक्तीजवळ बसायला व बोलायला कुणालाच आवडत नाही. 

दंत चिकित्सकांनुसार मनुष्याला होणारे निम्मे आजार खराब दातामुळे होतात. दातांच्या माध्यमातूनच कोणतेही खाद्य आपल्या पोटात जातात. दातांची कीड, हिरड्यांमध्ये पस आल्यावर दूषित खाद्यपदार्थ पोटात प्रवेश करतात. यामुळे व्यक्ती विविध रोगांनी ग्रासला जातो. 

विविध आजारांपासून बचाव

स्वच्छता ठेवल्यास विविध आजारांपासून बचाव करता येतो त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञ स्वच्छतेवर अधिक जोर देतात. अल्लाहने प्रेषित हजरत मुहम्मद (सअव) यांना आदेश दिला,’’हे प्रेषित (सअव)! आपला   पेहराव स्वच्छ ठेवा आणि अस्वच्छतेचा संपूर्ण त्याग करा.’’ अल्लाह स्वतः पवित्र आहे, पवित्रता आणि स्वच्छतेला पसंत करणारा आहे. प्रेषित हजरत मुहम्मद (सअव.) यांनी तिरस्काराचे कारण असलेल्या तीन गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवण्याचा आदेश दिला, यात पाणी भरण्याचे घाट, सावली व रस्त्यावर मलमुत्र विसर्जन करण्यास मनाईचा आदेश आहे. स्थीर असलेल्या पाण्यात मलमुत्र विसर्जन केल्याने होणारी अस्वच्छता शरीरासाठी नुकसानकारक असते. प्रेषित हजरत मुहम्मद (सअव.) म्हणाले, ’’तुमच्यातील कोणताही व्यक्ती स्थीर पाण्यात मलमुत्र विसर्जन करणार नाही.’’ 

नवजात बाळाच्या कानात अजान आणि इकामत 

नवजात बाळाला आंघोळ (गुसल) दिल्यानंतर त्याच्या कानात अजान आणि इकामत बोलली पाहिजे. चिकित्सकीय सल्ल्यानुसार काही आजार असल्यास बाळाला आंघोळ घालने हानीकारक आहे. मात्र अस्वच्छता दूर केल्यानंतर अजान आणि इकामत मध्ये उशीर करू नये. 

मृत्युनंतरही स्वच्छतेचा आदेश 

प्रेषित हजरत मुहम्मद (सअव.) यांनी सांगितले की, ’’मुस्लिम व्यक्तीचे निधन झाल्यानंतर, त्याला अल्लाहच्या सुपूर्द करण्यापूर्वी त्याच्या पार्थिवाला बोरा पानांच्या कोमट पाण्याने आंघोळ घालून वजू दिला जावा. पवित्र कापडात लपेटून त्याचा लवकर दफनविधी केला जावा. दुर्गंध पसरू नये याकरिता या कार्यात उशीर होऊ देऊ नये.’’

मुळात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी आरोग्य विषयक केलेले जे मार्गदर्शन आहे याचे तंतोतंत पालन केल्या तसेच हराम गोष्टींपासून दूर राहिल्यास शारीरिक आरोग्याच्या समस्या सहसा उद्भवत नाहीत. उद्भवल्याच तर युनानी/ आयुर्वेदिक / होमिओपॅथिक उपचारांना  प्राधान्य द्यावे. कारण या उपचार पद्धतींमध्ये साईड इफे्नट होण्याची शक्यता फार कमी असते. 

हे झाले शारीरिक आजारांसंबंधीचे प्रेषित सल्ल. यांचे मार्गदर्शन. याशिवाय, आजच्या गुंतागुंतीच्या जीवनामध्ये लोकांनी अनावश्यक इच्छा, आकांक्षा, बाळगून स्वतःचे जीवन तणावग्रस्त आणि कठीण करून घेतलेले आहे. मानसिक आरोग्य राखणे ही शारीरिक आरोग्य राखण्याएवढेच महत्त्वपूर्ण आहे. याकडे दुर्दैवाने फारसे लक्ष दिले जात नाही. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी ज्या इस्लामी इबादती सांगितलेल्या आहेत त्या जर नियमितपणे केल्या व जीवनाला साधे ठेवले तर मानसिक आरोग्य ही उत्तम राहते. यात वाद नाही. म्हणूनच म्हटले जाते की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी जगाला जी आचारसंहिता दिलेली आहे ती परिपूर्ण जीवन पद्धती आहे. त्यात कुठलीही दुरूस्ती शक्य नाही. तसे करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे उलट परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत याची प्रत्येकाने खात्री बाळगावी. शिवाय प्रेषित सल्ल. यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यविषयक सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास रोगट आयुष्य जगून त्याचे मुल्य चुकवावे लागेल, यातही शंका नसावी. 

- डॉ.एम.ए. रशीद



(५९) हे पैगंबर (स.)! यांना सांगा, ‘‘तुम्ही लोकांनी कधी याचा विचार तरी केला आहे की जी उपजीविका अल्लाहने तुमच्याकरिता उतरविली होती त्यापैकी तुम्ही स्वत:च कुणाला निषिद्ध व कुणाला वैध ठरविले?’’६१ यांना विचारा, ``अल्लाहने याची तुम्हाला परवानगी दिली होती? की तुम्ही अल्लाहवर कुभांड रचीत आहात?''६२ 

(६०) जे लोक अल्लाहवर हे मिथ्या कुभांड रचीत आहेत त्यांची काय कल्पना आहे की पुनरुत्थानाच्या दिवशी यांच्याशी कसा व्यवहार होईल, अल्लाह तर लोकांवर कृपादृष्टी ठेवतो परंतु बहुतेक लोक असे आहेत जे कृतज्ञता दाखवीत नाहीत.६३ 

(६१) हे पैगंबर (स.)! तुम्ही ज्या अवस्थेत असता आणि कुरआनमधून जे काही ऐकविता आणि लोकहो! तुम्हीदेखील जे काही करता त्या सर्व काळात आम्ही तुम्हाला पाहात असतो. कोणतीही तिळमात्र वस्तू पृथ्वी व आकाशांत अशी नाही न लहान, न मोठी, जी तुझ्या पालनकत्र्याच्या दृष्टीपासून लपलेली आहे आणि एका स्पष्ट दप्तरात नोंद केलेली नाही.६४ 



६१) म्हणजे तुम्हाला याची जाण आहे की हा किती मोठा द्रोहपूर्ण अपराध तुम्ही करत आहात. उपजीविका देणारा अल्लाह आहे आणि तुम्ही स्वत: अल्लाहचे निर्मित आहात. मग हा अधिकार तुम्हाला कसा प्राप्त् झाला की अल्लाहच्या मालकी हक्कात आपल्या फायद्यासाठी आणि वापरासाठी स्वत: मर्यादा निश्चित कराव्यात? मामूली नोकर हा दावा करतो की स्वामीच्या संपत्तीत आपल्या वापरासाठी आणि अधिकारासाठीच्या सीमा निश्चितीचा अधिकार त्यालाच आहे आणि स्वामीला याविषयी काहीच बोलण्याचा अधिकार नाही, तर अशा नोकराविषयी तुमचे काय मत आहे? तुमचा स्वत:चा नोकर तुमच्या घरात असा अधिकार गाजविल तर तुम्ही त्याच्याशी कोणता व्यवहार कराल? त्या नोकराचा विषय वेगळाच आहे जो स्वत:ला नोकर मानत नाही आणि त्याचा कोणी स्वामी आहे, ही संपत्ती त्याची नाही तर दुसऱ्याची (स्वामीची) आहे असेसुद्धा तो मानत नाही, अशा बदमाश आणि डाकूविषयीचे हे विवरण नाही. येथे प्रश्न अशा नोकराविषयीचा आहे जो स्वत: मान्य करतो की तो कोणाचातरी नोकर आहे आणि हेसुद्धा मान्य करतो की संपत्तीसुद्धा मालकाचीच आहे, परंतु या संपत्तीच्या वापराचा अधिकार निश्चितीची सीमा ठरविण्याचा हक्क मालकाला नव्हे तर त्यालाच आहे. याविषयी स्वामीला विचारण्याची काहीच गरज नाही.

६२) म्हणजे तुमची ही स्थिती केवळ याच रूपात खरी असू शकते की स्वामीने स्वत: तुम्हाला तसा अधिकार दिला असता. म्हणजे स्वामीच्या संपत्तीचा उपयोग करण्याचा अधिकार, नोकराच्या कार्यप्रणालीची आणि उपयोगासाठीची सीमानिश्चिती तसेच विधीनियम बनविण्याचे सर्व अधिकार स्वामीने नोकराला दिले असते. आता प्रश्न पडतो की काय तुमच्याजवळ याविषयीचे प्रमाणपत्र आहे की स्वामीने हे अधिकार तुम्हाला देऊन टाकले आहेत? किंवा तुम्ही विनापरवाना हा दावा करीत आहात की स्वामीने सर्व अधिकार तुम्हाला देऊन टाकले आहेत? जर असे असेल तर ते प्रमाणपत्र दाखवा अन्यथा तुम्ही विनापरवाना हा दावा करीत आहात. म्हणजेच तुम्ही विद्रोहपूर्ण अपराध करीत आहात. खोट्या दाव्याचे (खोटारडेपणाचे) तीन प्रकार आहेत.

पहिला प्रकार, एखाद्या माणसाने सांगावे की हे अधिकार अल्लाहने मनुष्यांना दिले आहेत. दुसरा प्रकार, अल्लाहचे हे कामच नाही की आमच्यासाठी विधीनियम बनवावेत. तिसरा प्रकार, हलाल आणि हरामाच्या त्या आदेशांना अल्लाहशी जोडले जावेत परंतु प्रमाणात ते कोणतेही ईशग्रंथ देऊ शकत नाहीत.

६३) म्हणजे ही स्वामीची मोठी कृपा आहे, तो नोकरांना स्वत: दाखवितो की त्याच्या घरात, संपत्तीत आणि स्वत:विषयी नोकराने कोणत्या प्रकारची कार्यप्रणाली स्वीकारावी जेणेकरून स्वामीची प्रसन्नता प्राप्त् करून पुरस्कार आणि उन्नतीसंपन्न होईल. स्वामी नोकराला हेसुद्धा दाखवितो की त्याचा प्रकोप आणि दंड आणि नोकराच्या विनाशाचे कारण कोणत्या कार्यप्रणालीत (विद्रोही जीवनव्यवस्थेत) आहेत. परंतु अनेक मूर्ख नोकर असे आहेत जे कृपेवर आभार व्यक्त करीत नाही. याना वाटते की स्वामीने आपल्या घरात त्याची संपत्ती नोकराच्या स्वाधीन करावी आणि लपून पाहात राहावे. ज्याने विरुद्ध काम केले त्याला पकडून त्वरित शिक्षा द्यावी. स्वामीने आपल्या नोकरांना इतक्या कडक व कठीण परीक्षेत टाकले असते तर कोणत्याच नोकराला शिक्षेपासून आपला बचाव करता आला नसता.

६४) येथे या गोष्टीचा उल्लेख करण्याने अभिप्रेत पैगंबर मुहम्मद(स.) यांना धीर देणे आणि पैगंबरांच्या विरोधकांना सचेत करणे आहे. एकीकडे पैगंबर मुहम्मद (स.) यांना सांगितले जात आहे की सत्यसंदेश प्रचार आणि अल्लाहच्या दासांच्या जीवनात सुधारकार्यात तुम्ही ज्या तन्मयतेने, दृढतेने आणि ज्या धैर्याने आणि सहनशीलतेने काम करीत आहात, ते आमच्या नजरेत आहेत. असे नाही की या धोकादायक कामाला लावून आम्ही तुम्हाला तुमच्या स्थितीवर सोडून दिले आहे. जे काही तुम्ही करत आहात, तेसुद्धा आम्ही पाहात आहोत आणि तुमच्याशी जे घडत आहे त्याने आम्ही बेखबर मुळीच नाही. दुसरीकडे विरोधकांना सचेत केले जात आहे की सत्य आवाहक आणि मानवतेचे कल्याण करणाऱ्याच्या सुधारकार्यात तुम्ही अडथळे निर्माण करत आहात, परंतु तुम्ही असे समजून बसू नका की तुम्हाला कोणी पाहात नाही किंवा तुमच्या या कृत्यांचा हिशेब घेतला जाणार नाही. सावधान! तुम्ही जे काही करत आहात, ते सर्व अल्लाहच्या दफ्तरी नोंद होत आहे.


एक तेज:पुंज प्रकाश


इस्लामपूर्व काळाला इस्लामी परिभाषेत 'अज्ञानकाळ' संबोधले जाते. या अज्ञानकाळातील रानटीपणा, पशुहिनता, अत्याचार, अन्याय, हिंसा, लुटमार, बलत्कार, प्रतिशोध अशा सर्वप्रकारच्या असंस्कृत विचार-वर्तनांचे व अराजकतेचे तसेच सर्वदुर्गुणांचे प्रतिनिधित्त्व जणु काही अरबस्तानाच्याच वाट्याला आलेले होते, इतकी अमानविय, भयावह आणि कौर्याच्या सीमा पार करून गेलेली ती परिस्थिती होती. अशा महाभयानक अंध:कारात अल्लाहने प्रेषित्त्वाच्या शृंखलेतून आदरणीय मुहंमद (स.) याना अंतिम प्रेषित बनवून पाठविले आणि समस्त मानवजातीवर व तमाम जगवासियांवर फार मोठे उपकार केले. या मुळे अरब महाद्विपकल्पच नव्हे तर संपूर्ण विश्व इस्लामच्या महान शिकवणीचे उजळून निघाले. त्या प्रकाशाला पवित्र कुरआनने अशा प्रकारे वर्णन करून सांगितले आहे,

" तुमच्यापाशी अल्लाहकडून प्रकाश आणि असा एक सत्यदर्शी ग्रंथ (कुरआन) आला आहे ज्याच्या द्वारे सर्वश्रेष्ठ अल्लाह त्या लोकांना जे त्याच्या प्रसन्नतेचे इच्छुक आहेत, शांती व सुरक्षिततेच्या पध्दती दाखवितो आणि आपल्या आदेशाने त्यांना अंधारातून बाहेर काढून प्रकाशाकडे आणतो आणि सरळमार्गाकडे त्यांचे मार्गदर्शन करतो."  (सूरह् अल् माइदा-१५,१६).

आज निर्विवादपणे सिध्द झाले आहे की, जगात इस्लाम व्यतिरिक्त कुणाकडेही न्यायोचित जिवनधारा नाही, ना असा सत्यदर्शी ग्रंथ आहे जो त्यांच्या आयुष्यात क्रांतीकारक परिवर्तन घडवून आणिल, ना शांती - सुरक्षिततेच्या प्रभावी व प्रबळ उपाययोजना आहेत ज्या मुळे ईहलोकासह परलोकात ही अभय प्राप्त करू शकतील, ना काळोखात खितपत पडलेल्या लक्षावधी पीडित, दु:खी, वंचित व लाचारांसाठी आशेचा असा एक 'प्रकाश किरण' आहे की, ज्यामुळे त्यांच्या जिवनात उभारी व उत्साह येऊन त्यांचे जिवन ख-या अर्थी सार्थकी लागावे. आज इस्लाम सर्व जिवन पध्दतीला पुरून उरला आहे. याचा पुरावा अल्लाहच्या या फर्मानात आढळून येतो,

"जे लोक या प्रेषितावर (मुहंमद (स.) वर) ईमान राखतात आणि त्याचे समर्थन करतात आणि त्याला मदत करतात आणि त्या नूर (प्रकाश अर्थात कुरआन) चे अनुसरण करतात जो त्याच्या समवेत पाठविण्यात आला आहे, असेच लोक परिपूर्ण साफल्य प्राप्त करणारे आहेत." (सूरह् अल् आराफ-१५७).

या आयतीच्या अंतिम शब्दांनी स्पष्ट होते की, सफल तेच लोक आहेत जे अंतिम प्रेषित मुहंमद (स.) वर विश्र्वास ठेवतील आणि त्यांचे अनुसरण करतील. जे लोक प्रेषित मुहंमद (स.) आणि त्याच्या प्रेषितत्वाला दुर्लक्ष करतील ते अपयशी लोक आहेत आणि परलोकात देखिल हानीच भोगणारे आहेत, मग भलेही त्यांनी या नश्वर जगात कितीही प्रमाणात भौतिक प्रगती साधलेली का न असो!

सदर आयत (श्र्लोक) मध्ये "आणि त्या नूर (प्रकाश) चे अनुसरण करतात " असे शब्द आले आहेत. काही लोकांच्या मते 'नूर' ने अभिप्रेत अंतिम प्रेषित मुहंमद (स.) आहेत. परंतु या ठिकाणी आयतीनेच स्पष्ट होते की, 'नूर' ने अभिप्रेत 'पवित्र कुरआन' आहे. कारण आयतीत पुढे स्पष्ट आहे की, हा 'नूर' अल्लाहतर्फे  "त्याच्या (प्रेषित मुहंमद (स.) च्या ) समवेत पाठविण्यात आला आहे." तथापि ही वेगळी गोष्ट आहे की, विश्वनेते व जगतगुरू असलेले, अखंड विश्वासाठी करूणाकारी व दयानिधी असलेले आणि मानवहितपरायण  प्रेषित मुहंमद (स.) च्या अनेक विशेष नामात एक विशेषण 'नूर' सुध्दा आहे, ज्या मुळे 'कुफ्र' (इस्लामचा नकार) आणि 'शिर्क' (अनेकेवरवाद) चा अंध:कार लोप पावला आणि इस्लामचा प्रकाश विस्तारला. या अनुषंगाने प्रेषित मुहंमद (स.) च्या व्यक्तीमत्वात आणि गुणवैशिष्ठ्यात 'नूर' (प्रकाश) चा जो स्वाभाविक गुणधर्म आहे ती एक उपमा असून प्रेषितांचा (स.) शारिरीक गुणधर्म नव्हे, जसे की प्रेषित मुहंमद (स.) यांना पवित्र कुरआनमध्ये 'सिराजुम्मुनिरा' (तेजस्वी दीपक) अशा उपमेने सुध्दा अलंकृत करण्यात आले आहे ज्याच्या प्रकाशात गेल्या चौदाशे वर्षांपासून ईमानवंत 'अल्लाहचे भक्त' होऊन यशस्वी जिवन जगत आले आहेत. 

सरतेशेवटी एक व्यक्तीला जर मान - सन्मानाचे, सुख - समाधानाचे आणि चिंतारहित असे आत्मिक शांतीचे आयुष्य व्यतित करावयाचे असेल तर त्याला इस्लामवर ईमान पत्करल्याशिवाय अन्य पर्याय नाही. म्हणून पवित्र कुरआनची जगवासियांसाठी कळकळीची हाक आहे,

" ईमान राखा अल्लाहवर आणि त्याच्या प्रेषितावर (मुहंमद (स.) वर) आणि त्या प्रकाशावर (कुरआनवर) जो आम्ही उतरविला आहे." (सूरह् अत्तगाबून-८).

एक ईमानवंत अल्लाह आणि त्याचा अंतिम प्रेषित मुहंमद (स.) ची अवज्ञा करीत नाही, त्यामुळे त्याच्या आयुष्यात सदाचार, चारित्र्यसंपन्नता, नीतिमत्ता, प्रामाणिकपणा, सत्त्य आदी. सारखे समाजोपयोगी व समाजविधायक गुणवैशिष्ठ्ये विकसित होत असतात. पवित्र कुरआनने अशा मनुष्याला 'जिवंत' म्हटले आहे आणि तो ख-या अर्थी 'प्रकाशात' आहे. तर दुसरीकडे अल्लाह आणि त्याच्या अंतिम प्रेषिता(स.) च्या आदेशापासून दूर भटकणा-या काफिराच्या अंत:करणात दुराचार, मोह, मत्सर, कपट, निंदा, अविश्वास आदी. सारखे दुर्गुण व नैतिक अध:पतन ठाण मांडून बसलेले असतात. कुरआनच्या भाषेत अशी व्यक्ती 'मृत' आहे, ज्याचा परिणाम आत्मनाश व सर्वनाश आहे. सदर व्यक्ती सैतानाच्या प्रभावाखाली जाते. सैतान त्या व्यक्तीचे दुष्कृत्य सुंदर व आकर्षक बनवून सोडीत असतो, त्या व्यक्तीला वाटते की, आपण जे काही करीत आहोत ते योग्यच आहे. मोमीन व काफीरची हि परिस्थिती अंतिम विश्व ग्रंथ कुरआनने किती मार्मिकपणे, उद्बोधकपणे आणि स्पष्टपणे मांडली आहे,

"अशी व्यक्ती जी प्रथम मृत होती, मग आम्ही तिला जिवंत केले आणि असा प्रकाश दिला की, ती त्याला घेऊन माणसात चालत फिरत आहे , काय अशी व्यक्ती त्या माणसासारखी असू शकते जो अंधारातून निघूच शकत नसावा ? अशा प्रकारे काफीरांना त्यांची कर्मे शोभिवंत करून देण्यात आली आहेत." (सूरह् अल् अन्आम-१२२)

या ठिकाणी अल्लाहने काफिरांना 'अंध' आणि 'मृत' म्हटले आहे आणि ईमानवंतांना 'डोळस' आणि 'जिवंत' म्हटले आहे. यांचे कारण हे की, काफिरांनी इस्लामच्या दैवी संदेशांच्या इन्कार केला आहे, म्हणजे त्यांनी 'कुफ्र' केले आहे. त्यांच्या मनाजोगे वागणुकीमुळे या 'कुफ्र' च्या काळोखात  ते भरकटत चालले आहेत आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी ते प्रयत्नशील नाहीत. त्यांची दशा अशीच राहिल्यास त्यांचा शेवट निर्रथक मृत्यू आणि सर्वनाशाव्यतिरिक्त दुसरे काहीच नाही. परंतु एक मुसलमानाचे अंत:करण अल्लाह व त्याच्या अंतिम प्रेषित मुहंमद (स.) वर ईमान (विश्र्वास) राखल्यामुळे सदैव जिवंत राहते ज्यामुळे त्याच्या जीवनाचा मार्ग प्रकाशमान व दैदिप्यमान होऊन जातो. असा मनुष्य आपल्या जगण्याचा उद्द्येश्य काय आहे ? आपण या जगात कशाला आलो? यांचे परिपुर्ण भान राखतो आणि ईमान व अल्लाहच्या मार्गदर्शनाच्या स्वच्छ प्रकाशात अविरत मार्गक्रमण करीत असतो ज्याची परिणती इहलोक व परलोकाचे साफल्य आणि सद्भाग्य आहे. म्हणून पवित्र कुरआनमध्ये अल्लाह फर्मावितो,

" आणि आंधळा व डोळस सारखे नाहीत आणि ना अंधार व प्रकाश सारखे आहेत, ना सावली व उन सारखे आहेत, ना जिवंत व मृत एकसमान होऊ शकतात." (सूरह् अल् फातिर-१९ ते २२) 

या संपूर्ण चर्चेचा सारांश हा की, ज्या लोकांनी अल्लाहचा दिव्यबोध जो पवित्र कुरआन आणि प्रेषित मुहंमद (स.) यांच्या आचारविचार (हदिस/सुन्नत) मध्ये आहे त्याला नाकारले आहे. ते निश्चितच काळोखात आहेत आणि ज्यांनी त्याला स्वीकारून आपल्या जीवनात त्यास लागू केले आहे ते प्रकाशात आहेत.

- निसार मोमीन

पुणे




खरं तर एवढा खासगी नाजूक प्रश्न, या आधी कुणी विचारला नव्हता आणि मलाही कधी पडला नव्हता. कारण धर्म, वंश, जात, रंग आणि देश यांसारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण बाबी माणसाला विनासायास जन्मतःच मिळत असतात. त्यामुळे त्याचे आपल्याला फारसे मोल वाटत नाही. तसेच या बाबींपैकी कोणत्या बाबी कोणाला मिळाव्यात हे कुणाच्याच हाती नसते. मग कोणाच्या हाती असते, असा प्रश्न सहज आपल्या मनात निर्माण होतो. या प्रश्नाचे उत्तर भारतीय मातीत जन्मलेला कोणताही माणूस ‘परमेश्वर’ असेच देणार आहे. मी माझ्या समाजात अथवा प्रार्थनेसाठी मशिदीत जातो तेव्हा एक वाक्य कुठून तरी कसे तरी कानांवर पडतच असते. ‘करने कराने वाली जात सिर्फ एक अल्लाह की है।’ ईश्वर निर्माता आहे. माणूस त्याची सर्वोत्तम निर्मिती आहे. विज्ञान सांगते की विश्वनिर्मिती निरुद्देश आहे. पण इस्लाम म्हणतो की माणसाने ईशभक्ती करावी म्हणून ही विश्वनिर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणून दुबळ्या, अज्ञानी, संकुचित मनाच्या उतावीळ माणसाने आपल्या सैतानासम षड्‌विकारांशी झुंजत ईश्वराची एकमेवता, अदृश्यता, ईशग्रंथ, सर्व प्रेषित, सर्व देवदूत आणि अंतिम न्यायदिनावर विश्वास ठेवून ईश्वराची भक्ती करावी. माणसाच्या जगण्याचे ध्येय या अत्यंत अल्पकालीन दुनियेत जास्तीतजास्त सत्कर्मे करून कायमस्वरूपी जगात प्रवेश करण्याचेच असावे. ईशग्रंथ कुरआनमध्ये अल्लाहने सारेच सविस्तरपणे स्पष्ट करून माणसाला स्वातंत्र्य देऊन टाकलेले आहे की, ‘भक्तिमार्गाने गेलास तर स्वर्ग मिळेल अन्‌ नास्तिक झालास तर नरकात जाशील.’ यावर माझा अढळ विश्वास असणे म्हणजे माझा इस्लाममध्ये प्रवेश करणे आहे.

मी काही रीतसर धर्मशिक्षण घेतलेला माणूस नाहीय. माझ्या गावात तशी सोयही नव्हती. दहावीनंतर काम करून शिकावे लागल्याने मला तशी उसंतच मिळाली नाही. शिक्षणानंतर पुन्हा खेड्यातच नोकरी लागल्याने मी दारिद्र्यनिर्मूलनात, लेखन आणि वाचनात गुंतून पडल्याने माझे धर्मशिक्षण तसेच रेंगाळत राहिले. याशिवाय आधुनिक शिक्षणाचे वारेही डोक्यात शिरलेले होते. तसेच तेव्हा केवळ नावाचे मुसलमान असणाऱ्यांचीच संख्या जास्त होती. इस्लामपासून अनभिज्ञ असणारे सर्वाधिक मुसलमानच आहेत, असे मानवेंद्र रॉय यांनी म्हटलेले आहे ते खरे आहे. कारण घरीदारी, समाजात वावरताना जेवढे कळायचे तेवढ्यावर सामान्यांचे भागायचे. मीही सामान्य असल्याने माझेही धकून गेले. पण जेव्हा मुसलमान समाजाविषयी लिहायची वेळ आली तेव्हा माझ्या लेखनाचे घोडे अडून बसले. तेव्हा मी माझा धर्म समजून घेण्यासाठी पुरोगामी आणि सनातनी मुसलमानांच्या मराठी लेखनाबरोबर संघ परिवारातील मंडळींचेही इस्लामविषयक लेखन वाचून काढले. निवृत्तीनंतर वयाची गाडी उताराला लागल्याने माझे नेत्र पैलतीरी लागले आणि वेळही भरपूर असल्याने अनुवादित कुरआन, पैगंबरचरित्र आणि हदिस यांचे वाचन वाढले. तरी मी इस्लाम कळल्याचा दावा करणार नाही. जेवढे माझ्या पदरी पडलेले आहे तेवढ्यावरून माझ्या जाणिवा आणि नेणिवांना साक्षी ठेवून प्रस्तुत प्रश्नाचे उत्तर लिहीत आहे.

‘दहशतवाद’ म्हणजे गरिबांनी पुकारलेली लढाई, तर युद्ध म्हणजे ‘श्रीमंतांचा दहशतवाद’. नोबेल विजेता सर पिटर यांच्या या विधानाची आणि ‘इराक बेचिराख का झाला?’ या प्रश्नाची उकल केली तर हाताशी उच्च तंत्रज्ञानाची सभ्यता येते. या सभ्येतेने सर्वत्र दहशतवाद, सामाजिक भेदाभेद, हत्या, व्यभिचार आणि मद्यपान इत्यादींच्या सर्व सीमा ओलांडलेल्या आहेत. ही उच्च तंत्रज्ञानाची सभ्यता स्वतःच्याच नाशाला निमंत्रण देत आहे. तर दुसरीकडे मानवी कल्याणासाठी जन्माला आलेल्या धर्माला आणि विज्ञानाला छद्म धर्माचे व छद्म विज्ञानाचे रूप देण्याचे काम अहंकारी, दांभिक, संकुचित धर्म-अज्ञानी माणूसच करीत आहे. म्हणजे माणूसच दोन्हींकडून स्वतःच्याच अस्तित्वावर गदा आणत आहे. या पार्श्वभूमीवर माझ्या धर्माने मला काय दिले ते शोधावयाचे आहे.

इस्लाम म्हणजे शांती, इस्लाम म्हणजे पूर्ण शरणागती, इस्लाम म्हणजे नैतिकता, इस्लाम म्हणजे इमान-अढळ विश्वास, इस्लाम म्हणजे एक जगण्याची आदर्श रीत, इस्लाम म्हणजे समता, बंधुभाव आणि न्याय असे अनेक अर्थ सांगितले जाऊ शकतात. पण मला स्वतःला इस्लाम म्हणजे कोणत्याही मध्यस्थाशिवाय ईश्वर, ईश्वरी ग्रंथ आणि प्रेषितचरित्रासह प्रेषित वचनांशी आत्मिक पातळीवर संवाद करणे आहे, असे वाटते. या संवादातून माणसाच्या विवेकाचे संयमाचे आणि बुद्धीचे पोषण होत जाते. यातून माणूस आपले वर्तन ठरवत असतो. या संवादातूनच माझ्या जीवनातील साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळत नसेल तर या संवादाला नजरेसमोर ठेवून मी माझ्या बुद्धीचा वापर करून स्थल-काल-परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकतो. या बुद्धिवादामुळे इस्लाममध्ये समृद्ध ज्ञानपरंपरा निर्माण झाली. पण ती परंपरा मध्यस्थांच्या पुरोहितशाहीने, बुद्धिवादावर-इज्तिहादवर बंदी घातल्याने खुरटत गेली. नंतर ही ज्ञानपरंपरा भाषा, शैक्षणिक अभाव आणि भौगोलिक बदलांमुळे मागे पडत गेली. सर सय्यद, डॉ. इकबाल आणि मौलाना आझाद यांच्या स्थल-काल-परिस्थितीनुसार मांडलेल्या समाजहितकारक विचारांना मुस्लीम नेतृत्वाने नाकारून दुर्लक्षित ठेवले. द्विराष्ट्रवादातून निर्माण होणाऱ्या अलगाववादाला मुस्लीम नेतृत्वाने अनाठायी महत्त्व दिल्याने फाळणी झाली. फाळणीनंतरही इथे राहिलेल्या मुसलमानांना फाळणीने अक्षरशः ‘रामभरोसे’ - वाऱ्यावर सोडून दिले. त्यामुळे इस्लामचे संवादस्वरूप लोप पावून त्याला हट्टाग्रहाचे स्वरूप प्राप्त झाले. आणि सारेच मुसळ केरात गेले. इस्लामच्या मूळ तत्त्वज्ञानात किंचितही नसलेल्या पुरोहितशाहीने एवढे अनर्थ करून ठेवलेले आहेत.

ईश्वर-ईशग्रंथ-प्रेषितचरित्र आणि प्रेषितवचने यांच्याशी होणाऱ्या रोजच्या संवादातून अल्लाहने मला नेहमीच असे सांगितलेले आहे की, सत्याने, इमानाने राहा. प्रार्थना कर, कुणाला फसवू नकोस, कुणाला लुबाडू नकोस, जकात देे. गरिबांना जेऊ घाल, कुणावर अन्याय करू नकोस. अन्याय कुठे होत असेल तर त्याला विरोध कर. खोटी साक्ष देऊ नको. अराजक माजवू नकोस. प्रार्थना कर, व्यभिचाराकडे फिरकू नकोस, मद्यपान करू नको, बंधुभावाने राहा. अधिक असलेले गरजूंना दे. फिजूल खर्च करू नकोस. व्याज घेऊ नको. चूक झाली तर क्षमायाचना कर. गुलामाला मुक्त करून, अन्नदान करून अथवा उपवास करून प्रायश्चित्त घे. पुन्हा तीच चूक करू नकोस. ईश्वर सर्वत्र आहे. तू ईश्वराच्या उपस्थितीत हे अत्यंत अल्पकालीन नश्वर जीवन जगत आहेस. त्याला शोभेल असे सदाचाराने जगून कायमस्वरूपी अमर जीवनाची शिदोरी गोळा करीत राहा. ईश्वराच्या या काही माफक अपेक्षा मी, मला त्याने जन्माला घातल्याच्या बदल्यात पुरेपूर पूर्ण करू शकत नाही. काही पूर्ण करतो तर काही अर्धवट करतो, तर कांहीना पूर्ण फाटा देतो. बहाणे करतो, निमित्तेे शोधत माफीची याचना करतो. हे सगळे माझ्या आत्मिक पातळीवर चालत असते. ‘दाखवेगिरी’ करायची नाही. माफीचा साक्षीदार होऊन साधेपणाने जगत राहायचे. स्वतःच्या चुकांमुळे स्वतःचे मन स्वतःलाच खाऊ लागले की, प्रायश्चित्त घेऊन त्या आतल्या आवाजाला शांत करायचे आणि मग स्वतःच्या अंतिम कल्याणाची दुआ मागत राहावयाची. कारण ‘करने करानेवाली जात फक्त एकमेव अल्लाहची आहे.’ अशा संवादामुळे मला माझ्या जीवनातील अमर्याद दुःखदर्द सहन करता येतात. माझ्या धर्माने मला असा संवाद दिलेला आहे. मानवी कल्याणासाठी निर्माण झालेल्या धर्माला जेव्हा संस्थात्मक रूप येऊ लागते तेव्हा तो पुरोहित आणि वर्चस्ववादी वंशश्रेष्ठांच्या स्वार्थानुसार बदलत जातो. सोय म्हणून कुठली तरी रीत, पद्धत स्वीकारली जाते. मग या बदलांचीच परंपरा होऊन बसते. इस्लामध्ये जाती नसताना जाती मानल्या जाऊ लागतात. वर्ण, वर्ग निर्माण होऊन भेदभाव, उच्चनीच भाव मानला जाऊ लागतो. त्यामुळे इस्लामने जो इतरांच्या मार्गदर्शनासाठी आदर्शवत माणूस निर्माण केला होता तो आदर्शहीन होत जातो. अशा वर्चस्ववादी अनुयायांमुळे इस्लाम बदनाम होत गेलेला आहे. तरीही इस्लामने मला अन्‌ माझ्या समाजाला जगण्याची हिम्मत आणि निर्भयता दिलेली आहे.

आज इथे इस्लामी धार्मिक ओळख तोट्याचीच नव्हे तर जीवघेणी होऊन बसलेली आहे. राही मासूम रजा यांच्या एका आठवणीत असं आलं आहे की, लालकृष्ण अडवाणी एक दंगल झाली तर आपला देश सोडून भारतात आले. पण आम्ही मुसलमान हजारो दंगली झाल्या तरी कुठे जाण्याचा विचारसुद्धा करीत नाही. कारण हे जीवन तात्कालिक आणि नश्वर आहे. आज इथले मुसलमान पाकिस्तानी हेर, दहशतवादी, लव्हजिहादी, गोमांस बाळगणारे कवडीमोलाने मारले जात आहेत. तरीही ते कुठेही न जाता निवांतपणे दारिद्र्याची शिक्षा भोगत हिमतीने जगत आहेत. हातपाय न गाळता, गर्भगळीत न होता निर्भयतेने आपापली रोजीरोटी मिळवत जगत आहेत. मरायचे तर सगळ्यांनाच आहे. म्हणून मरेपर्यंत जगत राहायचे. फाशी न घेता, रेल्वेरुळाखाली न येता, विष अथवा विषारी कीडनाशके न पिता जगत राहायचे. ही हिंमत, ही निर्भयता इस्लामनेच दिलेली आहे. इथल्या मुसलमानांची स्थिती-गती अशी आहे की, पाणी प्यायला आलेल्या माकडाने उथळ प्रवाहात इकडून तिकडे अन्‌ तिकडून इकडे हुंदडणारे मासे पाण्यात पडून तळमळत आहेत असे समजून त्यांना वाचवण्यासाठी काठावरील वाळूवर एकेक पकडून फेकून दिले. मुसलमान समाजाच्या भोवतालचे पर्यावरण असे असतानादेखील ते इथे जगत आहेत, याचे मला राहून राहून नवल वाटते. 

त्यांच्या मनात ही जगण्यातील निर्भयता, हिंमत कोठून आली असणार आहे? ‘केवळ ईश्वराला भ्यायाचे, केवळ ईश्वरापुढे झुकायचे, केवळ ईश्वरापुढे नतमस्तक होऊन प्रार्थना करायची म्हणजे नमाज पढत राहायची. बाकी सारे ईश्वर बघून घेतो.’ या विश्वासापोटी म्हणजे इमानापोटी ही हिंमत, ही निर्भयता आलेली असावी असे मला वाटते.

अनुवादितच का असेना- कुरआनच्या वाचनाने माझ्या मनात असे झिरपले आहे की या विश्वाच्या पसाऱ्यात मला सर्वच बाबतींत अणूरेणूंहूनही कमी स्थान आहे. तरी पण ईश्वराने दिलेल्या बुद्धीच्या बळावर या विश्वातील ईश्वरी खाणाखुणा समजून घेऊ शकतो. ईश्वरी मार्गदर्शनानुसार सदाचरण करून गुणवंत होऊ शकतो. बाकी कर्ता करविता ईश्वर आहे. माझ्या हाती प्रयत्नांशिवाय काहीही नाही. मी आता आहे, पुढच्या क्षणी असणारही नाही. म्हणून मी भपकेबाजपणा करण्याच्या भानगडीत पडत नाही की कोणत्याही प्रकारची दाखवेगिरीही करीत नाही. प्रत्येक काम कमीतकमी खर्चात कसे बसेल याचाच विचारपूर्वक प्रयत्न करतो. साधे कपडे, साधे राहणे, साधा आहार घेणे मला आवडते. पैसे असले तरी वारेमाप खर्च मी कशावरदेखील केलेला नाही. माझ्या प्रेषितांच्या साध्या राहणीशी माझ्या साधेपणाची तुलना होऊच शकत नाही. कारण ठिगळं लावून कपडे आणि स्वतःच दुरुस्त केलेली वाहन वापरण्याची पाळी माझ्यावर कधी आली नाही. आयुष्यभर कधी मी चटईवर झोपलो नाही. जवळ असले नसलेले सर्व त्यांच्यासारखे गरजूंना वाटून, उपवास असतानाही उपाशीपोटी, अर्धपोटी मी कधी झोपलो नाही. रात्र रात्र मी कधी त्यांच्यासारखी प्रार्थनेत घालवली नाही. कुरआनचा तर असा आदेश आहे की, प्रेषितांच्या जगण्याचा आदर्श समोर ठेवून त्यांच्यासारखे जगावे. त्याच्याएवढे साधे राहणे मला शक्य झाले नाही. पण कमीतकमीत मी साधे राहण्याचा प्रयत्न तरी करू शकतो. माझ्या माहितीतल्या बऱ्याच मुस्लीम मित्रांनी नोकरी असतानादेखील, गरीब मुलींशी हुंडा न घेता केवळ चहावर लग्ने केलीत. इस्लामने सांगितलेला हा साधेपणा आहे. एवढा साधेपणा मला जमू शकला नाही. माझे शिक्षण चालू असतानाच मला आईचे कर्ज फेडण्यासाठी लग्नाआधीच हुंडा घेऊन लग्न ठरवावे लागलेले आहे. मला जमेल तेवढे, कुणालाच त्रास होणार नाही इतपत मला सहन होईपर्यंत मी साधेपणाचा अवलंब करीत आलो आहे. त्यामुळे कधी मला चैन करावीशी वाटली नाही. हा साधेपणा कधी कधी फुकटची चैन करण्याची संधी मिळाल्याने डागाळलेला आहे. पण ही चैन फारच अपवादात्मक असल्याने हा साधेपणा मला माझ्या धर्मातून मिळालेला आहे, असे म्हणायला काही हरकत नाहीय.

ईश्वरासाठी कुरआनचा विषय माणूस आहे. माणसासाठी शोषण करणारी समाजव्यवस्था बदलून गरिबालाही प्रतिष्ठा द्यायची आहे, तर माणसाला कुरआन स्वर्गाची आशा दाखवून, नरकाची भीती घालून सदाचरणी व्हायला सांगणारा ग्रंथ आहे. पैगंबरचरित्र तर टोकाच्या साधेपणाने भरलेले असून स्वर्गप्राप्तीसाठी कराव्या लागणाऱ्या नैतिक प्रयत्नांचा आदर्श आहे. चिंतनात मग्न असताना निरक्षर पैगंबरांना ईश्वराने जे ज्ञान दिले ते त्यांनी सर्व भोवतालच्या माणसांपर्यंत पोहोचविण्याचे अहोरात्र प्रयत्न केले. मानवी विकारांना जिंकत जिंकत नैतिकतेसह माणुसकीसह सततची प्रार्थना केली. तर क:पदार्थ असलेल्या माणसालाही कबीराच्या या म्हणण्याचे स्वरूप ‘प्रभू स्मरे हमारा नाम हम करे आराम’ प्राप्त होऊ शकते. अफाट दुःखांनी भरलेल्या या जीवनाला इस्लामिक संतांच्या समृद्ध वारशाने जगालाच एक काव्यात्मक दिलासा दिलेला आहे. त्याच्यानेच माझ्या अंतःकरणाची शुद्धी होऊन माझे मन निर्मळ होत जाते. सूफी एक वृत्ती आहे. ती कोणत्याही धर्माच्या माणसात असू शकते. ईश्वराखालोखाल या सूफींनी जगाला खूप खूप दिलेलं आहे. पण काय करावे? माझ्या मनाचा पदरच विकारांनी फाटलेला आहे. म्हणून तर आम्हांला कळत असूनही वळत नाही. जसे इस्लामने सूफींनी दिलेल्या समतेला धर्मांतरानंतरही आमच्यात राहिलेल्या जातिव्यवस्थेने खाऊन टाकले. त्यामुळे विषमता, भेदभाव, उच्चनीच भाव तसाच राहिला.

सूफींनी इस्लामला सर्वांत मोठी देणगी फिलॉसॉफीची दिलेली आहे, ज्याचे श्रेय इमाम गजालींना जाते. या फिलॉसॉफीमुळे इस्लाममध्ये जो एक रुक्षपणा होता तो दूर झाला. धर्मातील कर्मठपणा, कडकपणा लोण्यासारखा मऊ झाला. सूफींमुळेच तर इस्लाम जगभर दूरदूरपर्यंत जाऊन पोहोचला. सूफींची लोकोपयोगी सेवाकार्ये तर अनेक आहेत. सूफींच्या गाण्यांनी आणि इथल्या शास्त्रीय संगीतात सूफींनी घातलेल्या भरीमुळे तर इथल्या आध्यात्मिक, आत्मिक जगण्याची गोडी वाढलेली आहे. म्हणून मी म्हणतो आहे की धर्माने मला सूफींचा समृद्ध वारसा दिलेला आहे, माझ्या धर्माने आणि विज्ञानाने माझे जगणे सुसह्य झालेले असले तरी माझा पदर माझ्यातील षड्‌विकारांनी मळलेला असल्याने धर्माला पुढे करून धर्माच्या नावावर आणि वैज्ञानिक शोधांच्या दुरुपयोगाने माणसांनीच लाखो माणसे मारलेली आहेत, त्याचे कोण काय करणार आहे?

-फ. म. शहाजिंदे

लातूर, मो. 94243 76656


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget