Halloween Costume ideas 2015

डोंगर पोखरून शोधला उंदीर!


महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांत खुले आणि छुपे द्वंद्व कोणत्या टोकाला जाईल हे सांगणे कठीण असले तरी याचा अंदाज दोन दिवसीय विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दिसून आले. विधानभवन शिवराळ शिव्यांनी गाजले, ज्याचा आवाज राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. राज्यातील विरोधकांच आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांच वागणं अशोभणीयच. अशातच माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या मागे लावलेली ईडी किती खोलवर उत्खनन करते हे पाहणे उत्सुकतेचे असून, सध्यातरी उंदीरच हाती लागल्याचे चित्र आहे.  


अनिल देशमुख महाराष्ट्राचे सन्माननीय आणि मातब्बर गृहमंत्री होते. कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान पालघर येथे मॉबलिंचिंग द्वारे दोन साधुंची हत्या केली गेली. या घटनेनंतर गोदी मीडिया आणि रिपब्लिक टीव्ही वाहिनीने राज्यात दंगा घडविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण अनिल देशमुखांनी ही परिस्थिती अत्यंत कुशलतेने हाताळली. जर दंगा झाला असता तर कित्येक निष्पाप लोकांचे प्राण गेले असते. 

या दंगलीचे राजकीय भांडवल करून भाजपाने महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारला बडतर्फ करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली असती. पण त्याला असे काही करता आले नाही हे माजी गृहमंत्र्यांचे मोठे यश होते. यानंतर अर्णब गोस्वामी यांना नियंत्रणात आणणे हे देखील मोठे आव्हान होते. अनिल देशमुखांनी टीआरपी घोटाळ्यात अर्णब गोस्वामीला तुरूंगात टाकून दिले. पण या नंतर अनिल देशमुखांकडून दोन चुका झाल्या. पहिली चूक ही की त्यांनी सचिन वाझे यांना 15 वर्षानंतर पुन्हा पोलीस खात्यात रूजू करून घेतले. दुसरी चूक परमबीर सिंह यांना पोलीस खात्याच्या प्रमुखपदी नियुक्त केले. ह्या दोन चुकीमुळं केंद्र सरकार त्यांना तुरूंगात पाठविण्याची तयारी करत आहे. परमबीर सिंह यांनी पोलीस खात्यात अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ते अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोचे प्रमुख देखील होते. हे ही शक्य आहे की, त्यांनीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यात्नलीनचिट दिली असेल पण कुणाच्या आदेशांनी त्यांनी ही्नलीनचिट दिली होती आणि का दिली होती हा विषय वेगळा. 

परमबीर यांच्या पुत्राचा विवाह सागर मेघेच्या कन्येशी झाला आहे. ते भाजपाचे मोठे नेते दत्ता मेघेचे पुत्र आहेत. ते बराच काळ काँग्रेस पक्षात होते. पण 2014 नंतर देशाचे राजकारण बदलून गेले तेव्हा त्यांनी देखील पक्ष बदलला. दत्ता मेघेंचा एक मुलगा समीर मेघे विधानसभा सदस्य आहे. परमबीर यांना संजय बर्वे नंतर - (उर्वरित पान 7 वर)

पोलीस आयुक्तपदी नियुक्त केले गेले. मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर विस्फोटकाने भरलेली गाडी आढळली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी रान उठवले. सरकार समोर मोठे संकट उभे होते. या घटनेनंतर परमबीर यांचा बळी देऊन त्यांची बदली होमगार्ड मध्ये केली गेली. याच घटनाक्रमात मनसुख हिरेनची हत्या झाली. ज्या मनसुख हिरेनच्या हत्येबाबत फडणवीस यांनी आकाश पातळ एक केले होते तोच मनसुख हिरेन सचिन वाझेचा मित्र निघाला. फडणवीस यांचे स्वप्न धुळीस मिळाले. ही शक्यता नाकारता येत नाही की या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी परमबीर सिंह यांची भेट घेतली असेल आणि त्यांनी सरकारशी बदला घेण्यासाठी एखादे षडयंत्र रचला असेल.

20 मार्च 2021 रोजी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री यांना एक पत्र पाठवले त्यात त्यांनी असे म्हटले होते की, अनिल देशमुखांनी सचिन वाझे यांना असे सांगितले होते त्यांनी हॉटेल्स, दारू विक्रेत्याकडून महिना 100 कोटी रूपये वसूल करावे पण सचिन वाझेने म्हटले होते 100 कोटी जमा करणं अवघड आहे. 50 कोटी दरमहा ते जमा करू शकतील. या आठ पानी पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आणि भाजपाने गृहमंत्री देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. पण जेव्हा परमबीर सिंहांनी हे पाहिले की अनिल देशमुख राजीनामाही देत नाही आणि त्यांना बडतर्फ ही केले जात नाही तेव्हा त्यांनी 24 मार्चला सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

सर्वोच्च न्यायालयात परमबीर सिंह यांनी त्यांच्या खऱ्या वेदना काय आहेत त्या मांडल्या. त्यात ते म्हणाले की, त्यांना आयुक्त पदावरून हटवणे ही मनमानी असंवैधानिक कारवाई होती. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या या आदेशाला रद्दबातल करण्याची मागणी केली. त्यांनी यात अशीही विनंती केली होती की त्यांना या पदावर कार्यरत करावे. त्याचबरोबर त्यांनी अशी देखील मागणी केली की अनिल देशमुखांच्या घरातले सीसीटीव्ही फुटेज, महाराष्ट्र शासन, केंद्रशासन आणि सीबीआयने आपल्या ताब्यात घ्यावे. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यात यावा. सीबीआय तपास संबंधी सुनावणी करताना न्या. संजय किशन कौल आणि न्या. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठाने परमबीरसिंह यांच्या वकिलांना काही प्रश्न विचारले का. त्यांनी अनिल देशमुख आणि संबंधित खात्याला का पार्टी बनवले नाही. त्याचबरोबर त्यांनी हे देखील विचारले की त्यांनी हा अर्ज कलम 226 अन्वये न देत कलम 32 अन्वये का दिला. त्यांना सांगण्यात आले की, ते उच्च न्यायालयात का गेले नाही . आधी हायकोर्टात जावे. परमबीरसिंह यांनी सर्वोच्च न्यायालयातून माघार घेतली. हे परमबीर यांच्या हाती आलेले दुसरे अपयश होते.

पण जेव्हा अनिल देशमुखांविरूद्ध राजकीय वातावरण तापू लागले तेव्हा महाराष्ट्र सरकारने अनिल देशमुखांचा बळी घेतला. परमवीर सिहांचा देशमुखांनी जसा बळी घेतला होता तसाच हा प्रकार. यामुळे भाजपा आणि परमबीर सिंहाला शक्ती मिळाली. त्यांच्यावर विभागीय चौकशी तलवार लटकत होती. या दहशतीमुळे त्यांनी पुन्हा 12 जूनला सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परमबीर सिंह यांनी असे म्हटले की त्यांना मुंबई पोलीस विभागावर विश्वास नाही म्हणून हा तपास सीबीआय किंवा इतर कोणत्या संस्थेद्वारे केला जावा. यावर न्यायालयाने त्यांना विचारले की आपण 30 वर्षे राज्याच्या पोलीस विभागात सेवा केलेली असून, तुम्ही स्वतः त्याचे घटक आहात. त्याचबरोबर कोर्टाने असे सांगितले की, ज्यांची घरे काचेची असतात त्यांनी इतरांच्या घरावर दगड फेकू नये. न्यायालयाकडून असे फटकारल्यावर परमबीरसिंह यांचे वकील महेश जेठमलानी रागावत म्हणाले की, त्यांच्या पक्षकाराला अनिल देशमुखांविरूद्ध  पाठवलेल्या पत्रामुळे रागावून न्यायालय त्यांना त्रास देत आहे? त्यावर कोर्टाने उत्तर दिले की, जर डीजीपी सारख्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यावर दबाव आणला जाऊ शकतो तर मग कोणात्याही पदाच्या अधिकाऱ्यावर दबाव आणला जावू शकतो.

परमबीर सिंह यांची चौकशी सीबीआयकडून व्हावी असे मुंबई उच्च न्यायालाने आदेश दिले आहेत, असे महेश जेठमलानी यांनी न्यायालयात सांगितल्यावर त्यावर न्यायालयाने म्हटले की दोन्ही वेगळे प्रकरणे आहेत. त्या आधी युक्तीवाद करताना महेश जेठमलानी यांनी विनंती केली होती की त्यांच्या पक्षकाराविरूद्ध कोणते नवीन एफआयआर होऊ नये. यावर न्यायालयाने त्यांना तंबी दिली की, आम्ही इथं एफआयआरवर चर्चा करत नाहीत. न्यायालयाची भूमिका ओळखत परमबीर सिंह यांच्या दुसऱ्या वकीलांनी आपला अर्ज परत घेतला आणि परमबीर सिंहांची नाचक्की झाली.

ईडीने अनिल देशमुखांना तपासासाठी बोलाविले आहे. त्या सर्वांच्या या भानगडीत खरे युद्ध दोन शक्तीमध्ये आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस परमबीर सिंहांची आड घेऊन महाराष्ट्र सरकारला पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार देशमुखांना वाचविण्याचे प्रयत्न करतंय. ईडीने नागपूर येथील देशमुखांच्या निवासावर छापे टाकले आहे आणि त्यांना पुढील तपासासाठी ईडीने बोलावून घेतले आहे. आता राहिला प्रश्न 100 कोटी खंडणीचा. आरोप प्रसार माध्यमानुसार दहा बार मालकांनी असे म्हटले आहे की त्यांनी देशमुखांना चार कोटी रूपये लाच म्हणून दिले आहेत. ईडीने बार मालकाच्या याच म्हणण्यावर देशमुखांविरूद्ध कारवाई केलेली आहे. 100 कोटी कुठ आणि चार कोटी कुठे. एका सामान्य माणसासाठी चार कोटीची र्नकम थोडी नाही. देशमुखांच्या गावापासून नागपूर 59 कि.मी.अंतरावर आहे. त्याच नागपूर शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या मुलाचा विवाह सोहळ्यात 10000 लोकांना आमंत्रीत केले होते. 50 चार्टर्ड विमानांद्वारे पाहुण्यांना बोलावले होते. या विवाह सोहळ्यावर किती खर्च झाला असेल याचा अंदाज लावला जावू शकतो. सुदैवाने की दुर्दैवाने इडीच्या नजरेत हा सोहळा आला नाही. म्हणून हत्ती गिळले जात आहेत आणि माश्यांना वेगळे केले जाते. अनिल देशमुखांवर 4 कोटी 17 लाखांचा आरोप आहे. म्हणजे खोदा पहाड निकला चुहा वो भी मरा हुआ.

- डॉ. सलीम खान


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget