कबीरांनी मातीबद्दल जे सांगितले होते ते आज खरे ठरत आहे. कबीर म्हणाले होते, ‘माटी कहे कुम्हार से तू क्या रौंदे मोहे, एक दिन ऐसा आएगा मैं रौदूंगी तोय।’ आज मातीच्या संदर्भात जगभर नव्याने चर्चा सुरू आहे. आणि याचा संदर्भ घेऊन 1 ते 5 ऑगस्टदरम्यान फूड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनने (एफएओ) वैज्ञानिक संघटनांशी पाचदिवसीय संवाद सुरू केला आहे. माती सातत्याने निकृष्ट होत असल्याने हे प्रयत्न केले जात आहेत, त्याचप्रमाणे तिच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. औद्योगिक क्रांती सुरू झाल्यापासून आपण निम्म्याहून अधिक सुपीक माती गमावली आहे. मुसळधार पावसातच पाहा, प्रत्येक नदी किंवा खाडी पिवळी दिसते. म्हणजे आपण अमूल्य माती थेट समुद्रात वाहून जाऊ देतो. जिच्यामुळे हरितक्रांती झाली ती हीच माती. तिचा संबंध आपल्या पोटापाण्याशी आहे. मातीच्या बदलत्या स्थितीला आपणही जबाबदार आहोत. आपल्याला माहीत असले पाहिजे की, आपले 95% अन्न मातीतून येते. गहू, मसूर, तांदूळ, भाजीपाला कोणत्याही स्वरूपात असो. ही मातीच आपले जेवणाचे ताट विविध रूपांत सजवते. आज हीच माती मोठे संकट सोसत आहे. जागतिक स्तरावर 90% मातीची गुणवत्ता घसरली आहे, तर आगामी काळात अन्न असुरक्षिततासुद्धा एक समस्या होत आहे. किंबहुना, आपण मोफत उपलब्ध असलेल्या इतर नैसर्गिक संसाधनांप्रमाणेच मातीकडे दुर्लक्ष केले. आणि त्यांच्याप्रमाणेच तिलाही उद्ध्वस्त केले. ‘मातीमोल’ असे अनेकदा म्हटले जायचे, पण मातीची ती किंमत राहिलेली नाही. ती आता अमूल्य झाली आहे. आज रासायनिक खतांचा प्रादुर्भाव वाढत असताना व त्याचे दुष्परिणाम दिसत असताना मातीच्या आठवणी ताज्या होत आहेत.
आज जगात 4 ते 20 लाखांहून अधिक लोक केवळ माती विषारी झाल्यामुळे जीव गमावतात. तिची गुणवत्ता ढासळू लागल्यावर रसायनांचा बोलबाला सुरू झाला. ग्लोबल असेसमेंट ऑफ सॉइल पोल्युशनच्या अहवालानुसार, मातीवर उद्योग, शेती, खाणकाम आणि प्रदूषणाशी संबंधित अनेक प्रकारे दबाव वाढत आहे. या सगळ्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण मातीत रसायने वापरत आहोत आणि हेवी मेटल सायनाइड, डीडीटी आणि इतर कीटकनाशके माती प्रदूषित करत आहेत. रासायनिक खतांचा वापर करणाऱ्या जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात जवळपास 165 छोटे-मोठे रासायनिक खत उद्योग आहेत, जे या देशात कृत्रिम मातीने भरपाई करतात. कृत्रिम रसायने हजारो वर्षे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पर्यावरणाची हानी करतात, हे आपण विसरलो.
रासायनिक खतांच्या वापराची मर्यादा काय असावी, हाही मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत, एफएओने गंभीर पावले उचलली व अनेक देशांकडे कारवाईची मागणी केली आणि एक जागतिक माती भागीदारीदेखील स्थापित केली, जेणेकरून मातीशी संबंधित समस्या एकत्रितपणे सोडवण्यासाठी मोठी पावले उचलता येतील आणि हे जागतिक स्तरावर हा अजेंडा चालवण्याचा प्रयत्न करता येईल. आता 83.3 लाख हेक्टर जमिनीवर परिणाम झाला आहे, तर हा प्रश्न आपोआप उद्भवेल, कारण ती पृथ्वीच्या सुमारे 8.7% आहे. अशा परिस्थितीत अन्न असुरक्षिततेचा प्रश्न सर्वात मोठे संकट म्हणून निर्माण होईल. तथापि, आपली 20 ते 50 टक्के बागायती जमिनीचा भागही खराब झाली आहे. त्यामुळे आता मातीच्या पुनरुज्जीवनाचे आव्हान आहे. मातीच प्रदूषित आणि विषारी झाली तर जीवाच्या जन्मापासून ते आपल्या संगोपनापर्यंत आणि नष्ट होण्यापर्यंत आपल्याला विषच पचवावे लागेल, हे स्पष्ट आहे. आमचे जीवन संकटात पडेल. मातीबद्दल नवीन विचार करण्याची गरज आहे. यात सरकारे मोठी भूमिका बजावू शकतात, कारण जगातील सरकारांची धोरणे रासायनिक उद्योगांना सबसिडी देऊन प्रोत्साहन देत आहेत. अशा अनुदानाला सेंद्रिय शेतीकडे वळवण्याची आज हीच वेळ आहे, जेणेकरून छोटे व अत्यल्प भूधारक शेतकरी रसायनांपासून मुक्त होतीलच, पण ते सेंद्रिय शेतीचे नेतृत्वही करतील. जीव वाचवायचा असेल तर मातीच्या सुधारणेची काळजी घ्यावी लागेल. आता विचार केला नाही तर मातीच मातीत मिसळण्यास मागे-पुढे पाहणार नाही. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) (लेखक : पद्मश्रीने सन्मानित पर्यावरणतज्ज्ञ आहेत) (साभार : दिव्य मराठी, ऑनलाईन )
- डॉ. अनिल प्रकाश जोशी
Post a Comment