(३०) शहरातील स्त्रिया आपापसात चर्चा करू लागल्या की, ‘‘अजीजची२५ब पत्नी आपल्या युवक गुलामाच्या मागे लागली आहे. प्रेमाने तिला बेबंद करून सोडले आहे (प्रमुख अधिकारी) आमच्या दृष्टीने तर ती उघड चूक करीत आहे.’’
(३१) तिने जेव्हा त्यांच्या धूर्तपणाच्या गोष्टी ऐकल्या तेव्हा त्यांना बोलावणे पाठविले आणि त्यांच्याकरिता तक्याची बैठक सजविली२६ आणि मेजवानीत प्रत्येकीच्या पुढ्यात एक एक सुरी ठेवली, (मग ऐन वेळी जेव्हा त्या फळे कापूनकापून खात होत्या) तिने यूसुफ (अ.) ला इशारा केला की त्यांच्यासमोर बाहेर ये. जेव्हा त्या स्त्रियांची दृष्टी त्याच्यावर पडली तेव्हा त्या अवाक झाल्या आणि आपले हात कापून घेतले आणि अनायासे उद्गारल्या, ‘‘हे अल्लाह, ही व्यक्ती मनुष्य नाही, हा तर कोणी प्रतिष्ठित दूत होय.’’
(३२) अजीजच्या पत्नीने सांगितले, ‘‘पाहिलेत ना, हीच आहे ती व्यक्ती ज्याच्याबाबतीत माझ्यावर तुम्ही गोष्टी रचत होता, नि:संशय मी याला वश करण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा त्यातून वाचला. जर याने माझे म्हणणे ऐकले नाही तर कैद केला जाईल आणि अत्यंत अपमानित होईल.’’२७
(३३) यूसुफ (अ.) ने सांगितले, ‘‘हे माझ्या पालनकत्र्या, तुरुंगवास मला मान्य आहे यापेक्षा की मी ते काम करावे जे हे लोक माझ्यापासून अपेक्षा करतात आणि जर माझ्यापासून तू यांच्या चालींना टाळले नाहीस तर मी त्यांच्या जाळ्यात अडकेन आणि अज्ञानी लोकांमध्ये सामील होऊन जाईन.’’२८
२५ब) `अजीज' त्या माणसाचे नाव नव्हते. इजिप्त्मध्ये मोठ्या सत्ताधिकारी माणसाला ही पदवी दिली जात असे.
२६) म्हणजे अशी सभा जिथे पाहुण्यांना लोढ टेकण्यासाठी होते. इजिप्त्च्या पुरातन इतिहासावरुन हे सिद्ध होते की सभेत लोढ जास्त करून टाकण्यात येत असत. बायबल व तलमूदचे विधान याबाबतीत तथ्यहीन आहे. बायबलमध्ये या सत्काराचा काहीच उल्लेख नाही. परंतु तलमूदमध्ये हे वर्णन आलेले आहे. तलमूदचे वर्णन कुरआन वर्णनापासून अगदी भिन्न आहे. कुरआन वर्णनात जे जीवन, आत्मा, स्वाभाविकता आणि नैतिकता याचा उल्लेख सापडतो, परंतु त्या सर्वांपासून तलमूदचे वर्णन मात्र रिक्त आहे.
२७) याने अंदाज येतो की त्यावेळी इजिप्त्च्या उच्च्वर्गाच्या लोकांची स्थिती कोणती होती. स्पष्ट आहे की अजीजच्या पत्नीने ज्या स्त्रियांना बोलाविले होते त्या सर्व उच्च्वर्गातील श्रीमंत घराण्याच्या व पदाधिकाऱ्यांच्या बायकाच असतील. या विशिष्ट स्त्रियांसमोर ती आपल्या प्रिय युवकाला आणते आणि त्याचे सौंदर्य दाखवून त्या सर्वाना राजी करते की अशा सुंदर युवकावर मी भाळणार नाही तर काय करणार? या `उच्च्कुलीन' स्त्रियांनी स्वत: आपल्या व्यवहाराने दाखवून दिले की अजीजच्या पत्नीने बरोबर केले. त्या मोठ्या घराण्याच्या स्त्रियांसमोर अजीजच्या पत्नीला हे सांगताना लाज वाटली नाही की त्याच्या सुंदर युवक गुलामाने तिची `भूक' भागविली नाही तर ती त्या दासाला तुरुंगात टाकेल. यावरून हेच स्पष्ट होते की यूरोप, अमेरिका, इंग्लंड आणि इतर पाश्चात्य देशांत आज ज्या स्त्रीस्वातंत्र्याला प्रगतीचे द्योतक मानले जाते ते काही नवीन नाही. हा तर पुरातन अशाप्रकारच्या स्त्रीस्वातंत्र्याचाच भाग आहे.
२८) या आयतीं आमच्या समोर तात्कालीन परिस्थितीचे विचित्र चित्र रेखाटन करतात. या परिस्थितीला पैगंबर यूसुफ (अ.) यांना सामोरे जावे लागले होते. रात्रंदिवस या धोक्यात ते होते. इराद्याच्या बंधनात काही ढील देताक्षणी अपराधांचे अनेक द्वार उघडलेले होते की ज्यातून प्रवेश करता येत होते. अशा विचित्र स्थितीत हा नवयुवक सफलतापूर्वक या शैतानी प्रेरणांचा सामना करीत होता. हे एक प्रंशसनीय कृत्य आहे. मनाला काबूत ठेवण्याच्या या आश्चर्यकारक प्रयत्नात आत्मबोध व शुद्ध चितंनाचा परिणाम होता. तरी त्याच्या मनाला अहंकार शिवला नाही की मी किती मजबूत आहे आणि माझ्यावर अनेकानेक रूपवती भाळतात तरी मी शाबूत आहे. याऐवजी तो आपल्या मानवी स्वभावाच्या कमतरतेचा विचार करतो आणि भयग्रस्त होतो. अशा स्थितीत तो अल्लाहशी विनम्रतेने प्रार्थना करतो व मदतीची याचना करतो, ``हे स्वामी ! मी कमजोर मनुष्य आहे, माझे इतके सामर्थ्य कोठे की या कठीणतम स्थितीचा सामना करू शकेल. तू मला आधार दे आणि मला वाचव. मला भीती आहे की माझे पाय वाममार्गाकडे वळू नयेत.''
Post a Comment