महाराष्ट्रात एकानंतर एक राजकीय घटना घडत आहेत. तसे पाहता महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आले तेव्हा पासूनच अशा घटना घडत होत्या रपण त्यांना वेग तेव्हा आला जेव्हा सध्याचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 आमदारांनी वेगळा गट स्थापना केला आणि भाजपाच्या मदतीने ते सत्तेत आले.
गेल्या आठवड्यात राज्याचे राज्यपाल यांनी महाराष्ट्राबद्दल एका कार्यक्रमात व्यक्त केलेल्या आपल्या विचारांची जाहीर माफी मागितली. त्यांनी या कार्यक्रमात स्पष्टपणे आणि पूर्णपणे विचारपूर्वक असे म्हटले होते की, ठाणे आणि मुंबईतून गुजराती आणि मारवाडी लोकांना काढले गेले तर महाराष्ट्राकडे पैसाच नसणार आणि मुंबईच्या आर्थिक राजधानीचा दर्जाही जाणार. यावर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पण मागील काही काळाआधी राज्यपालांनी सावित्रीबाई फुले आणि ज्योतीबा फुले यांच्या विषयीही अवमानजनक वक्तव्ये केले होते. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांविषयीही बोलले तेव्हा देखील राज्यात काही कडाडून विरोध झाला नव्हता. तसाच यावेळेही पाहण्यात आला. पत्रकार तसेच समाजमाध्यमांवरच जे काही राज्यपाल यांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवत बऱ्याच राज्यकर्त्यांनी आपले विचार मांडले पण याव्यतिरिक्त काही झाले नाही.
ही गोष्ट काही लपून राहिलेली नाही की भाजपाला मुंबईला केंद्रशासित प्रदेश करायचे आहे आणि त्या अनुषंगाने वेळोवळी महाराष्ट्रातील जनतेची प्रतिक्रिया आजमावून घेण्यासाठी तर असे विधान केले जात नाही ना असा प्रश्न आहे. राज्यपालांना महाराष्ट्रातील प्रभावी व्यक्ती जो तो बाष्फळ आणि सावित्रीबाई फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत तर केवळ दोन आठवड्याच्या अंतराने विधान केले होते. 14 फेब्रुवारी 2022 ला ज्योतीबा फुले यांच्याबाबत तर 24 फेब्रुवारी 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी बोलले आणि नंतर 30 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र कसे कंगाल होऊ शकते असे म्हणाले. म्हणजे ते सातत्याने महाराष्ट्रातील महापुरूषांविषयी अपमानजनक बोलत आहेत.
राज्यपालांच्या महाराष्ट्राबाबतीत विधानाचा बचाव करत उपमुख्यमंत्री यांनी सारवासारव करत त्यांनी अतिशोक्ती अलंकाराचा वापर केला असे सांगितले. काही लोक ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील समावेश आहे, असे म्हणतात की या मागे राज्यपालांची नीति इंग्रजांसारखी फोडा आणि राज्य करा अशी आहे. पण ही नीति तर भाजपाने सुरूवातीपासूनच आखलेली आहे. शरद पवार म्हणतात की, राज्यपालांच्या टोपीचा रंग आणि त्यांच्या अंतःकरण यात फरक नाही. हीच एवढी प्रतिक्रिया वास्तविक आणि सत्यतेला धरून आहे असे वाटते.
महाराष्ट्र राज्याचा आणि मराठ्यांचा भला मोठा इतिहास आहे. एकेकाळी साऱ्या देशावर या समाजाने आपले राज्य गाजविले आहे. राज्यांची पुनर्रचना होत असतांना मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचे बरेच प्रयत्न झाले. शेवटी मराठी माणसांनी आपल्या रक्ताचे बलिदान देऊन मुंबई जिंकलेली आहे. त्या घटनेला 70 एक वर्षे झाली तरीही मुंबईचा विषय वारंवार काढला जातो.
ज्या लोकांचा असा विचार आहे की, परप्रांतियांनीच मुंबईचा विकास केला, त्यांना राज्याचे नेते वारंवार एक प्रश्न विचारत असतात जर हे तथ्य असेल तर त्या-त्या प्रांताच्या लोकांनी आपल्या प्रांताचा विकास का केला नाही. मुंबई सारखे दूसरे शहर आपापल्या राज्यामध्ये का उभारले नाही. याचे उत्तर आजवर कुणी दिले नाही. कारण ते यांच्याकडे नाही.
Post a Comment