Halloween Costume ideas 2015

जग विनाशाकडे जात आहे याला युवावर्गाने रोखले पाहिजे

१२ ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस

जगातील संपूर्ण युवकांनी घातक हतीयार,जैविक हतीयार व वाढते प्रदुषण याचा कडाडून विरोध करण्याची वेळ आली आहे.संयुक्त राष्ट्र संघाने 17 डिसेंबर 1999 ला युवा विश्र्व संम्मेलनाच्या कार्यक्रमात ठरविण्यात आले की प्रत्येक वर्षाच्या "12 ऑगष्टला" युवा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.याप्रमाने पहिल्यांदाच 2000 मध्ये  आंतरराष्ट्रीय युवा दिवसांची सुरूवात करण्यात आली.2018 मध्ये आंतरराष्ट्रीय युवा दिवसांचा थीम होता "युवाओं के लिये सुरक्षित स्थान" आणि 2019 मध्ये थीम होता "ट्रांस्फोर्मिंग एज्युकेशन" परंतु 2022 चा थीम "युवाओका पृथ्वी को बचाने का प्रयास". हा थीम असायला पाहिजे.

वैश्विक महामारी आणि पृथ्वीचा होत असलेला ह्रार याला युवा शक्तीच वाचवु शकते. संपूर्ण जगाची धुरा युवकांच्या हाती आहे.कारण आजच्या परिस्थितीत पृथ्वीतलावर "जगात युध्दजन्य परिस्थितीत दिसून येते. आज प्रत्येक देश एकमेकावर वरचढ होण्याचा प्रयत्न करीत आहे.याचे जिवंत उदाहरण म्हणजे युक्रेन-रशिया युद्ध व तैवान -चीन संघर्ष यात प्रगती तर नाहीच परंतु विनाश अटळ आहे.चीनचे राष्ट्राध्यक्ष शि. जिंपिंग यांनी वुहानमध्ये कोरोना व्हायरस तयार केला आणि याला संपूर्ण जगात पसरविण्याचे काम सुध्दा चीनने केले. यात लाखोंच्या संख्येने जीिवत हानी सुध्दा झाली व करोडोंच्या संख्येने संक्रमीत आहेत. 

अमेरीकेने दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी 6 ऑगस्ट 1945 साली सकाळी 8 वाजुन 15 मि. हिरोशिमा-नागासाकीवर परमाणु बॉम्ब टाकला होता याचे मुख्य कारण तानाशहा हिटलर यांची क्रूरता  समाप्त करने होती. परंतु याचे प्रायश्चित्त जपानला भोगावे लागले. यात लाखोंची जीवीत हानीसुध्दा झाली. दिनांक 6 ऑगस्टला या घटनेला 77 वर्षे पूर्ण झाली. परंतु चीनच्या विस्तारवादी नितीला रोखण्यासाठी अमेरीकेसह नाटोसेनेने चायना सी मध्ये चीनला घेरून ठेवले आहे. सोबतच चीन तैवानला नेहमीच युध्दासाठी उकसविण्याचे काम करीत असतो. परंतु आता जर युद्ध झाले तर "तिसरे महायुध्द" अटळ आहे. याला युवावर्गाने कोठेतरी रोखले पाहिजे.

चीनने सुपरपावर बनण्यासाठी संपूर्ण हद्द पार केलेल्या आहेत. जगातील कोणत्याही देशाचा युवक असो त्याने पशु-पक्षी व मनुष्य प्राणी यांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही अशा पध्दतीचे कार्य अंगीकारले पाहिजे.याकरीता चीनच्या युवकांनी शि. जिंनपिंग यांच्या विनाशकारी बायोवेपन्सचा कडाडून विरोध करून चांगला धडा शिकवला पाहिजे. आज संपूर्ण जगाची धुरा युवकांच्या हाती आहे.मानवजातीचा पृथ्वीतलावर जन्म जगण्यासाठी व विकासासाठी झाला आहे. त्यामुळे आजच्या युवकांनी जगाला कोणत्याही परीस्थितीत विनाशापासुन रोखलेच पाहिजे. अन्यथा अनर्थ होऊ शकतो याला नाकारता येत नाही.

जर्मनीचा तानाशहा हिटलर यांची कल्पना "विस्तारवादाची" होती परंतु त्याचे प्रायचित्य "हिरोशिमा-नागासाकीच्या"स्वरूपात "जापानला"भोगावे लागले. याची पुनरावृत्ती चीन व चीनच्या मित्रराष्ट्रामध्ये होऊ शकते याला नाकारता येणार नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शि. जिनपिंग त्याचे विस्तारवादाचे प्रायचीत्य चीनला व त्यांच्या मित्रराष्ट्रांना भोगावे लागेल.त्यामुळे जगातील युवकांनी या युध्दजन्य परिस्थितीला रोखण्यासाठी जागतिक पातळीवर आवाज उठविण्याची गरज आहे. कोरोना काळाच्या कठीण प्रसंगाने युवकांच्या रोजगारावर मोठे संकटाचे बादल निर्माण झाले होते. यामुळे संपूर्ण जगात मंदीचा काळ ओढवला आहे, अनेकांची घरे उजाडली आहे, उपासमारी, भूकमरी, बेरोजगारी, महागाई अशा कठीण प्रसंगांना युवकांना व सर्वसामान्यांना तोंड द्यावे लागत आहे.

आजचा युवावर्ग फिजीकली कमजोर असला तरी "बुध्दीच्या" बाबतीत तर्बेज आणि ताकदवर आहे. त्यामुळे आज कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी बुध्दीचा योग्य वापर करण्याची वेळ युवकांवर आली आहे. कारण युवाशक्ती "भविष्याची धरोहर" आहे. याची जोपासना करण्याचे काम अनुभवी पिढीने युवकांना मदत करून केले पाहिजे.

आज संपूर्ण जग कोव्हीड-19 मुळे व निसर्गाचा ह्रास होत असल्याने मानवजाती भयभीत आहे. त्याचप्रमाणे जगातील प्रत्येक बलाढ्य देशाने आपल्या वर्चस्वासाठी मोठ्या प्रमाणात दारुगोळा, घातक क्षेपणास्त्रे व परमाणू बॉम्ब बनविले आहे. म्हणजेच आज संपूर्ण पृथ्वी "बारुदच्या ढिगाऱ्यावर" बसली आहे. त्यामुळे प्रत्येक देश विनाशाकडे वाटचाल करतांना दिसत आहे. परंतु विध्वंसकारी व विनाशकारी प्रवृत्तीला युवावर्ग रोखु शकते. प्रत्येक देशाच्या युवकांनी शांतीचा मार्ग स्वीकारण्याचे ठाणले तर प्रत्येक देशाचे राष्ट्राध्यक्ष व राजकीय पुढारी युवकांच्या मार्गाला चालना देऊ शकतात. आपण हिरोशिमा-नागासाकीचा विनाश पाहिला, 4ऑगष्ट 2020 ला "लेबनॉनची राजधानी बेरुत" त्यांची पुनरावृत्ती आपण पाहिली. हा धमाका हिरोशिमा-नागासाकीपेक्षा भयानक असल्याचे सांगण्यात येते, युक्रेन-रशिया युध्दामुळे युक्रेन 100 वर्षे मागे गेला आहे, चीन-तैवानमध्ये युध्दाची ठिणगी केव्हाही उडू शकते. म्हणजेच कोणताही दारूगोळा असो त्याचा फक्त एकच मार्ग असतो तो म्हणजे "विनाश". 

जागतिक विनाशाला युवकांनी कोठेतरी रोखलेच पाहिजे अन्यथा अनर्थ होऊ शकतो याला नाकारता येत नाही.सध्याच्या परीस्थितीत युवाशक्ती ही "जगाची धरोहर" आहे.त्यामुळे सर्वांनीच युवकांना सहकार्य करून जी काही "चीनकडून विनाशाची वाटचाल" सुरू आहे तीलाही ताबडतोब रोखण्याची नितांत गरज आहे. हे कार्य युवकांच्या शक्तीनेच सफल होऊ शकते. युवावर्ग सर्वच क्षेत्रात आमूलाग्र प्रगती करीत आहे यात दुमत नाही. परंतु शि. जिनपिंग व उत्तर कोरियाचा तानाशहा कींग्म जॉन उन सारखे जगाला विनाशाकडे नेत आहे. यांच्यावर ब्रेक लावणे अति आवश्यक आहे. संपूर्ण जगातील युवावर्ग, शिक्षणामध्ये व खेळांमध्ये अग्रेसर आहेत.

भारतातील युवावर्ग राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय खेळांमध्ये अग्रगण्य भूमिका बजावून देशाची मान उंचावून सन्मानजनक स्थितीमध्ये आहे. याचे संपूर्ण श्रेय युवकांना जाते. देशाचा युवा म्हणजे भारताची आन-बाण-शान आहे. आंतराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने युवकांनी वृक्ष लागवडीकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवडीचा संकल्प केला पाहिजे. यामुळे पृथ्वीचे संतुलन स्थिर राहण्यास मोठी मदत होईल.

- रमेश कृष्णराव लांजेवार

नागपूर, मो.नं.9921690779


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget