Halloween Costume ideas 2015

एकटी आई


अल्लाहने दिलेल्या नियमांपासून जेव्हा ही मानव जात दूर गेली तेव्हा अशाच भयंकर परिणाम दिसतात. एकटी आई सोबत वाढताना मुलं ही एकटेच असतात. आईच्या प्रकृतीमध्ये लेकरांना लाड करणे असते. एकटी आई ही आई आणि वडिल दोघांचे प्रेम मुलांना देण्याच्या नादात ए्नस्ट्रा लाड करत असते व प्रत्येक गोष्टीची अती तेथे माती असते. लाडामध्ये सडून मुलं बिघडतात. बाबांची जागा कोण घेऊ शकतो? आई खूप प्रयत्न करते पण  ज्याचे काम त्यालाच जमते. बाबांसारखी धाक ती लेकरांवर ठेऊ शकत नाही. 

माणूस एकटाच या जगात आला आहे व एकटाच येथून जाणार आहे, असे आपण जरी म्हणत असलो तरी आपण कधी विचार केलात का की आपल्या जन्माच्या वेळी आपण एकटे नसतो. आपल्या सोबत आपली आई असते आणि ती मात्र एकटीच आपल्याला जन्म देण्यासाटी असहाय्य वेदणांना तोंड देत असते. प्रशस्त प्रसुतीगृहाच्या खोलीत (लेबर रूम) मध्ये तिच्या अवतीभवती परिचारिकांची गर्दी असली, डॉ्नटर तिला प्रोत्साहन देत असले, नातेवाईकांच्या प्रार्थना, आपुलकी तिच्या सोबत जरी असली तरी भावी आई ह्या झुंझीत ती एकटीच असते. 

प्रसूती नॉर्मल झाली तर बरं नाहीतर ऑपरेशन थिएटरमध्ये सिझरसाठी तिला एकटीलाच सामोरे जावे लागते व नंतर टाक्याची वेदनाही सहन करावी लागते. स्तनपान तिला एकटीलाच करावे लागते. एवढे सगळे करताना होणाऱ्या वेदना ती एकटीच सहन करते; मात्र तिच्यापाठीशी पूर्ण परिवार असतो आणि एक नाही तर दोन परिवार (माहेर आणि सासर) मदत करतात. तिला एकटी आई कोणी म्हणत नाही.

आदी काळात जोडीदाराच्या मृत्यूनंतरच लेकरांना सांभाळण्याची वेळ आईवर येत होती व ती अगदी सुरळीतरित्या पार पाडत होती. आजही आपण बघतो पतीच्या अकाली निधनानंतर महिला मोलमजूरी, धुणेभांडे, स्वयंपाक, शिवणकाम या कलाच्या आधारे आपल्या लेकरांना एकट्याच सांभाळून त्यांना मोठ्या पदापर्यंत पोहोचविण्यात यश प्राप्त करतात. घरस्फोटीत महिलांचेही तसेच. त्याही एकट्याच  कधी माहेरच्या लोकांची साथ घेऊन लेकरांना मोठे करतात. पण हल्ली वेगळ्याच एकट्या आई आपल्याला बघायला मिळत आहेत, आणि त्यांना कायदेशीर ‘सिंगल मदर’ चा खिताब ही मिळाला आहे. वयात आल्यानंतर सेक्स हार्मोन्स च्या प्रभावाने मुले असो किंवा मुली त्यांना आपल्या भावी जोडीदाराची चाहुल लागते. कोण असेल ती व्यक्ती याचे नेहमी कुतुहल वाटते. शिक्षणाचे ओझे व शारीरिक गरजांचे ओझे या दोन्हींना बॅलन्स करताना काहींचे पाय घसरतात व शिक्षणाकडे दुर्लक्ष करून शारीरिक गरजांकडे लक्ष केंद्रीत होते. अशात कोणाशी तरी ओळख होते आणि तो भावी जोडीदार होण्याचे आश्वासन देेतो. अश्या भावनिक आश्वासनामुळे मुली आपले सर्वस्व स्वाधीन करतात व अनैतिक संबंधामुळे गर्भ राहतो. जो आदी समाजाला मान्य नसल्यामुळे कचराकुंडीत टाकून द्यावे लागत असे किंवा गर्भपात हाच एकमात्र पर्याय होता. पण आपल्या भारत देशात या समस्येची खरी सुरूवात 6 जुलै 2015 मध्ये झाली जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने एका निवाड्यात असे म्हटले की, महिला या अविवाहित असताना सुद्धा मुलाला जन्म देऊ शकतात. त्यानंतर लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या अनेक महिलांनी मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला व एकट्याच त्याचे संगोपण करण्याचे ठरविले. 

‘‘ इश्क में तुम्हारे बगैर खुद को तो संभाल ही लिया है, तुम्हारी निशानी भी संभाल कर दिखाएंगे‘‘

खरं प्रेम ही एक स्त्रीच करू शकते. पुरूष सोडून जरी गेला तरी आपल्यात एवढे सामर्थ्य आहे की बाळाला जन्म देण्याचा व त्याचे संगोपन करण्याचे कठीण कार्य आपण एकट्याने करू शकतो, असे तिला वाटते. व आज जगभर नोंदणीकृत 101.3 मिलीयन्स महिला ह्या प्रॅ्निटकली करून दाखवितात. त्यातल्या 13 मिलियन ह्या आपल्या भारतीय महिला आहेत. 2019-2020 च्या रिपोर्टनुसार सिंगल मदर 4.5% नी वाढत आहेत. 

अमेरिकेत तर 80 टक्के मुलं फक्त आई सोबत राहतात. अमेरिकेमध्ये सिंगल मदर ही व्यवस्था जवळ-जवळ सर्व क्षेत्रात प्रस्थापित झालेली आहे. फार कमी महिला आता गृहिणी म्हणून युरोप व अमेरिकेमध्ये वावरताना दिसतात. बहुसंख्या सिंगल मदर्स(एकट्याने राहणाऱ्या महिलां)चीच आहे. त्यामुळे त्यांच्याकडे ज्युएनाईल क्राईम अर्थात ‘‘बाल गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. 24 मे 2022 रोजी सेल्वाडोर येथील एका शाळेत त्याच शाळेच्या एका सोळा वर्षीय विद्यार्थ्याने ज्याला शाळेतून काढून टाकले होते गोळीबार करून दोन शिक्षक व 19 विद्यार्थींचा बळी घेतला होता. संस्कारहीन पिढी जेव्हा आकार घेते तेव्हा असे प्रकार होतच असतात. एकट्यानेच संगोपण करताना पुरूषासारखे रोज ऑफिसला जाणे आणि पुन्हा त्यात बाळाला मॅनेज करणे हे अनेक अर्थांनी अशक्य होऊन जाते. ऑफिसचे काम, घराची जबाबदारी आणि बाळाचे संगोपण ह्यात जेव्हा संतुलन अशक्य होऊन जाते तेव्हा लहान मुलाला पाळणा घरात टाकणे, घरात आया ठेऊन बाळाचे संगोपन करण्याचा प्रयत्न करणे यासारखे कृत्रिम उपाय योजले जातात, जे की हमखास अयशस्वी ठरतात. आई आणि मोलकरीण यात जो फरक असतो तो फरक बाळाच्या संगोपणावर एवढा परिणाम करतो की बाळाची वाढ चुकीच्या दिशेने होत जाते. अमेरिकेच्या शाळेमध्ये घडलेली ही गोळीबारीची घटना एकमेव नव्हती तर दररोज अश्या हिंसाचाराच्या घटना अमेरिकेत घडत असतात. जोपर्यंत मोठी घटना घडत नाही, त्याची बातमी होत नाही आणि आपल्यापर्यंत येत नाही. बालगुन्हेगारीचा सर्वात मोठा बळी जर कुठला देश असेल तर तो अमेरिका आहे. 

अल्लाहने दिलेल्या नियमांपासून जेव्हा ही मानव जात दूर गेली तेव्हा अशाच भयंकर परिणाम दिसतात. एकटी आई सोबत वाढताना मुलं ही एकटेच असतात. आईच्या प्रकृतीमध्ये लेकरांना लाड करणे असते. एकटी आई ही आई आणि वडिल दोघांचे प्रेम मुलांना देण्याच्या नादात ए्नस्ट्रा लाड करत असते व प्रत्येक गोष्टीची अती तेथे माती असते. लाडामध्ये सडून मुलं बिघडतात. बाबांची जागा कोण घेऊ शकतो? आई खूप प्रयत्न करते पण  ज्याचे काम त्यालाच जमते. बाबांसारखी धाक ती लेकरांवर ठेऊ शकत नाही. 

एकटी आई ही विशेषतः मेट्रो शहरांमध्ये कामकाजी व उच्च शिक्षित महिलांमध्ये आढळतात. शिक्षणापासून स्वावलंबीपणा येतो हे खरं पण असा स्वावलंबीपणा समाजासाठी चांगला आहे का? का ह्यासाठी समाज व समाजाने अंगीकारलेली जीवनशैली जबाबदार आहे? 

का मुले 5-5, 7-7 वर्षे रिलेशनमध्ये राहूनही आपल्याच मुलाला नाकारतात? आई-वडिलांना सांगून का त्या मुली व आपल्या लेकराचा स्वीकार करत नाहीत का? आई-वडिल आपल्या मुलांच्या पसंतीला का कबुली देत नाही? का फेटाळून लावतात ? का अस्वीकार करतात? का मान्यता देत नाहीत? इगो, प्रेस्टिज, स्टेटस यामध्ये येत असावा किंवा मुलांच्या भित्रेपणा त्यांनी या बाबी पालकांपर्यंत सांगू देत नाही. म्हणून आपल्या मुलांसोबत सुसंवाद असावा जेणेकरून प्रत्येक गोष्ट ते पालकांना विश्वासाने शेअर करतील. 

भित्रे व निर्लज्ज तरूण आपल्या लिव्ह इन पार्टनरला कावर्डनेसचे कारण सांगून मोकळे होतात व पत्नी बनवून घरी घेवून जाण्याऐवजी सिंगल मदर करून सोडतात. जिचे आयुष्य सदा संघर्षात जाते व दररोजचे टोमने ऐकून (नातेवाईकांकडून समाजाकडून) नरकासमान होऊन जाते.

थोडक्यात सांगायचे झाले तर वेळेवर लग्न न होणे, अनैतिक संबंध, घटस्फोट आणि अकाली मृत्यू हे सिंगल मदरसाठी कारणीभूत ठरणारी कारणे आहेत. पण बारकाईने निरिक्षण केल्यास नजरेत येते की, याच्या मागे इगो, असहनशीलता व अतिस्वावलंबन हीच आहेत ते कसे?

हैद्राबादहून निघणाऱ्या ’सियासत’ नावाच्या उर्दू दैनिकामध्ये मागच्या दोन वर्षांपूर्वी एक बातमी आली होती. बातमी अशी होती की एका तरूण व्यक्तीच्या पत्नीचे निधन कोरोनामुळे झाले त्याला दूसरे लग्न करायचे होते तेव्हा त्याने एक जाहिरात दिली. प्रतिसाद म्हणून अनेक महिलांनी संपर्क केला. त्यातील बहुतेक महिला या सिंगल मदर होत्या. काही कारणाने त्यांचे पहिले लग्न अयशस्वी झाले होते. विशेष म्हणजे या सर्व उच्चशिक्षित व बहुतांश कंपन्यामध्ये काम करणाऱ्या होत्या. यावरून एक प्रश्ननिर्माण होतो की उच्चशिक्षित महिलांचे लग्न जास्त काळ का टिकत नाही? आपण शिक्षणाचा, प्रगतीचा उच्चांक जरी गाठला असला तरी नैतिक पातळीमध्ये होत चाललेल्या घसरणीकडे पाहणे ही गरजेची आहे.

वाढत्या असहनशीलतेवर उपाय काय? 

जसं आज आपल्याला या ‘‘अच्छे दिन‘‘ पेक्षा ते ‘‘बुरे दिन‘‘च चांगले वाटतात तसेच अश्या ह्या प्रगतीपेक्षा या शिक्षणापेक्षा ते अज्ञानाचा काळ चांगला वाटतो. भौतिक नसले तरी नैतिकदृष्ट्या प्रगत होते ते लोक.

एकटी आई या समस्येवर उपाय काय?

1. वेळेवर लग्न करणे : बच्चों को कब तक भूखा रखोगे? आपण मुलांच्या जेवणाच्या गरजेचे भान ठेवतो पण शारीरिक भुकेचे काय? याबद्दल ही विचार करणे गरजेचे. 15 वर्षाच्या वयाच्या आत शहाणे झालेल्या मुलांना लग्नासाठी अजून पुढे 15 वर्षे वाट पाहायला लावणे हा कसला शहाणपणा? या काळात त्या मुला/मुलींनी काय करावे. 

इस्लाम धर्म खूप नैसर्गिक आहे. म्हणून ‘‘बालिग होते ही निकाह का हु्नम आहे‘‘ जेवण समोर असताना चोरून कोण खाईल? लवकर लग्न व्हायचे म्हणून सिंगल मदरची कल्पनाही नव्हती. 

2. इस्लाममध्ये अर्थाजनाची जबाबदारी सर्वार्थाने पुरूषांवर टाकलेली असल्यामुळे महिला या एकाग्रचित्त होऊन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी यशस्वीपणे पेलू शकतात. कारण घरात गृहिणी म्हणून वावरताना त्यांना मुलांकडे लक्ष देणे सहज शक्य होते. ही ईश्वरीय व्यवस्था आहे. यात फारतर एवढी मुभा असू शकते की महिला वर्कफ्रॉम होम करून अर्थार्जन करू शकतात. 

3. घटस्फोटित महिलांचे पुनर्विवाह करून देणे जेणेकरून आई - बाबांवर व भाऊ-वहिनींवर ओझे होण्यापेक्षा तिलाही जोडीदार भेटेल व दोघे मिळून संसाराचे ओझे सांभाळतील.

4. विधवांचे पुनर्विवाह जे चुकीचे समजले जाते याला समाजाने मान्यता द्यायला हवी. इस्लामने 1443 वर्षांपूर्वीच याला मान्यता दिली व विधवांशी निकाह करून प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी आदर्श स्थापित केले व प्रोत्साहित केले आहे. 

इस्लामने महिला आणि पुरूषांचे अधिकार जरी समान ठेवले असले तरी जबाबदाऱ्या मात्र वेगवेगळ्या ठेवल्या आहेत. स्त्री-पुरूष आपापल्या जबाबदाऱ्या ओळखून जेव्हा घराला आकार देतात तेव्हा कुठे घर, घर बनतं आणि चांगल पीढी आकार घेते. ‘‘चांगले आई-बाबा होण्यासाठी लग्नाची गरज नाही‘‘ कोच्चि स्थित कॉर्पोरेट जोखीम वकील लैला जफरचे हे विचार आहेत. भारतीय एकल माता-पितांमध्ये आपसात वार्ता व सहायता करण्यासाठी एक समुदाय निर्माण केला आहे जे सिंगल पॅरेंटला समर्थन देणारा आहे. ‘‘अ‍ॅट द व्हिलेज फॉर सिंगल पॅरेंटस्‘‘ हा त्यांचा इन्स्टाग्राम अकाऊंट आहे त्याचे 8893 फॉलोअर्स आहेत. सिंगल मदर्स व सिंगल फादर्स यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणे महत्वाचे आहे पण त्याहून महत्त्वाचे हे की सिंगल पॅरेंट्सची वाढती संख्या आटोक्यात आणणे. यासाठी कारणीभूत ठरत असलेल्या गोष्टींना मूळासकट उपसून काढणे, पाश्चिमात्य जीवनशैलीच्या मागे धावणाऱ्या लोकांनी या आंधळ्या शर्यतीमध्ये पडू नये. इस्लामने दिलेले स्त्री पुरूषांचे अधिकार आणि विशेषतः मुलांचे आई-वडिलांचे अधिकार काय आहेत? याचा अभ्यास करावा व त्यानुसार आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आकार द्यावा तरच खऱ्या अर्थाने आदर्श समाजाची मुहूर्तमेढ रोवल्या जाऊ शकेल. अल्लाह सद्बुद्धी देवो आमीन.

- डॉ. सिमीन शहापुरे

8788327935


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget