महिला शिक्षणाविषयी अवलंबिलेल्या चुकीच्या धोरणामुळे निर्माण झालेल्या समस्यांवरील उपायासंबंधी सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात, ‘‘ महिलाओं को लेकर दो इंतिहाओं (अतियों) की भूल-भुलैयों में भटकनेवाली दुनिया को अगर संतुलन का रास्ता दिखानेवाला कोई हो सकता था तो वह सिर्फ मुसलमान हो सकता था, जिसके पास सामाजिक ज़िंदगी की सारी गुत्थियों के सही हल मौजूद हैं. मगर दुनिया की बदनसीबी का ये भी एक अजीब दर्दनाक पहलू है कि इस अंधेरे में जिसके पास चिराग़ था, वही कमबख़्त रातौंध के रोग का शिकार हो गया और दूसरों को रास्ता दिखाना तो दूर की बात, ख़ुद अंधों की तरह भटक रहा है और एक-एक भटकनेवाले के पीछे दौड़ता फिर रहा है.’’
लडकीयों की तालीम जरूरी है तो है मगर
वो खातूने खाना हो सभा की परी न हो
नुकतीच एका मुस्लिम वकीलाची फेसबुक पोस्ट वाचली. त्यात त्यांनी लिहिली होते की, ‘‘मुस्लिम लोक आपल्या मुलींच्या लग्नांवर लाखो रूपये खर्च करतात, तोच खर्च त्यांनी आपल्या मुलींच्या शिक्षणावर केला, त्यांना आधुनिक शिक्षण दिले तर त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, स्वतःच्या पायावर उभ्या राहतील, मग त्यांच्या लग्नामध्ये कुठलीही अडचण येणार नाही, अवाजवी खर्च करावा लागणार नाही, वर पक्षाच्या अवास्तव मागण्या मान्य कराव्या लागणार नाहीत, उलट वरपक्षाचे लोकच तुमची मुलगी आम्हाला द्या म्हणून विनविण्या करतील.‘‘ सकृत दर्शनी ह्या पोस्टमध्ये काही चुकीचे वाटत नाही. किंबहुना मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोकांचा याच दिशेने प्रवास सुरू आहे. विशेष बाब म्हणजे मुस्लिम महिलांना सुद्धा हा विचार पटलेला दिसतो. समाज माध्यमांवर किंवा वर्तमान पत्रातून ज्या मुस्लिम महिला व्यक्त होतात त्यांचा सूरही याच विचाराच्या समर्थनात असतो.
एखादी मुलगी आयएएस झाली, फौजदार झाली, तहसीलदार झाली, किंवा निखतझरीन सारखी बॉक्सर झाली तर समाजाला किती आनंद होतो, हे त्यांच्या होत असलेल्या अभिनंदनावरून लक्षात येते. कुठल्याही विद्यापीठात मुस्लिम तरूणांपेक्षा तरूणींचीच संख्या जास्त असल्याची वस्तुस्थिती लक्षात घेता, एकंदरित समाज मुलींना व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. अशा उच्चशिक्षित व नोकरी करणाऱ्या मुलींची अपेक्षेप्रमाणे लग्नही होत आहेत. म्हणून मुस्लिम समाजातील मुली ह्या आधुनिक शिक्षणही घेत आहेत. असे करून मुस्लिम समाज आपली अशी समजूत करून घेत आहे की, ऑल ईज वेल. पण वस्तुस्थिती अशी नाही.
मग वस्तुस्थिती काय आहे?
हम लोग न उलझे हैं न उलझेंगे किसीसे
हमको तो हमारा ही गिरेबान बहोत है
मुलींच्या शिक्षणासंबंधी देशात अवलंबिलेली आधुनिक शिक्षण व्यवस्था ही बिगर इस्लामी असून, तिचा स्विकार करतांना भारतीय मुस्लिम समाजाला एका मुलभूत इस्लामी तत्वाचा विसर पडलेला आहे. ते तत्व म्हणजे शरियतने अर्थाजर्नाची ’संपूर्ण जबाबदारी’ पुरूषावर टाकलेली आहे. महिलेला तिच्या कामाचे महत्त्व आणि स्वरूपामुळे अर्थार्जनाच्या जबाबदारीपासून संपूर्णतः मुक्त केलेले आहे. सहशिक्षणाच्या पाश्चिमात्य पद्धतीला मनापासून स्विकारलेल्या प्रत्येक नागरिकाने स्वतःलाच एक प्रश्न विचारावा की, आपल्या देशात महिलांना नोकरी करण्यासाठी सुरक्षित वातावरण आहे काय? कामाच्या ठिकाणी त्यांच्या शीलाचे रक्षण होत आहे काय? त्यांना सन्मानाने नोकरी करता येत आहे काय? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे! हे सर्वांनाच माहित आहे. मग प्रश्न असा उत्पन्न होतो की, हे सर्व माहित असतांना आपण आपल्या प्राणाप्रिय असलेल्या आई, बहिणी आणि मुलींना अशा असुरक्षित वातावरणात चार पैसे मिळतात म्हणून नोकरी करण्याची परवानगी देणे किंवा त्यांना प्रोत्साहित करणे कितपत योग्य आहे? ज्या व्यवस्थेमध्ये आज आपण राहतो त्यामध्ये महिलांच्या स्थानासंबंधी सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात, ‘‘मानव सभ्यता की सबसे अहेम और सबसे पेचिदा समस्याएं दो हैं. जिनके सही संतुलित हल पर ही इन्सान की भलाई और तरक्की निर्भर है और जिनको हल करने में बहोत प्राचिन काल से आजतक दुनिया के बुद्धिवादी प्रयत्नशील और परेशान हैं. पहिली समस्या ये है के, सामुहिक जीवन में औरत और मर्द का संबंध किस तरह स्थापित किया जाए? क्यूं की यही संबंध सभ्यता की आधारशीला है और इसका हाल ये है के, अगर इसमें जरासीभी टेड आ जाए तो आसमान तक दीवार टेडी ही चली जाएगी. और दूसरी समस्या व्यक्ती और समाज के बीच संबंध स्थापित करने की है. जिसका संतुलन स्थापित करणे में अगर तनिक भर भी कमी रहे जाए तो सदीयों तक इन्सानी दुनिया को इसके कडवे नतीजे भुगतने पडते हैं‘‘ (पर्दा : पान क्र. 7)
याच संदर्भात परदा नावाच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त पुस्तकामध्ये सय्यद अबुल आला मौदूदी दुसऱ्या ठिकाणी म्हणतात, ‘‘ होटल, रेस्तराँ, शोरूम, कोई जगह आपको ऐसी ना मिलेगी जहाँ औरत इस मक़सद से न रखी गई हो कि मर्द उसकी ओर खिंचकर आएं. बेचारा समाज जिसकी हिफाज़त करनेवाला कोई नहीं, सिर्फ एक ही ज़रीए से अपने हित की हिफाज़त कर सकता था कि ख़ुद अपनी नैतिक धारणाओं से इन हमलों से बचाव करता और वासना को अपने ऊपर सवार न होने देता. मगर पूंजीवादी व्यवस्था ऐसी कच्ची बुनियादों पर नहीं खड़ी हुई थी कि यूं उसके हमलों को रोका जा सकता. उसके साथ एक मुकम्मल दर्शन, एक ज़बरदस्त शैतानी फौज और लिट्रेचर भी तो था जो साथ-साथ नैतिक दृष्टिकोणों को ध्वसस्त और पराजित भी करता जा रहा था. इस हत्यारे का कमाल यही है कि जिसे क़त्ल करने जाए उसे राज़ी-ख़ुशी से क़त्ल होने के लिए तैयार कर दे.‘‘ (परदा: पेज नं 54).
मुस्लिम समाजाची खरी शक्ती आर्थिक नाही तर नैतिक आहे. अर्थप्राप्तीसाठी नितीमुल्यांचा बळी ज्यांना द्यायचा असेल, त्यांनी खुशाल आपल्या मुलींना व्यावसायिक शिक्षण द्यावे व आपल्या स्वार्थी, मूल्य हरवून बसलेल्या कार्पोरेट किंवा सरकारी से्नटरमध्ये नोकऱ्या लावाव्यात. मुस्लिम समाजामध्ये जी नैतिक मुल्य परद्यामुळे उरलेली आहेत, नोकरीनिमित्त महिलांना घराबाहेर पाठवून ती ही जर पणाला लावली जात असतील तर समाजाच्या हातात काय उरणार आहे? याचाही गंभीरपणे विचार व्हावा. नैतिक मुल्यांच्या जपणुकीमुळे एखाद वेळी गरीबी परवडेल पण अनैतिकता घेऊन येत असेल तर संपन्नता कोणत्याही समाजाला परवडणार नाही. हे मुस्लिमांनी नीट लक्षात घ्यावे. कारण मुस्लिम समाजाचा डोलाराच नैतिकतेच्या पायावर उभा आहे. त्याचसाठी दिवसातून पाचवेळा नमाज अदा करण्याची सक्ती, रमजानचे कठीण रोजे ठेवण्याची सक्ती, कष्टाने कमाविलेल्या संपत्तीतून जकात देण्याची सक्ती शरियतने केलेली आहे. या सर्वांतून अदृश्यपणे समाजाचे एका प्रकारचे नैतिक प्रशिक्षण होत असते. मुलींना असुरक्षित वातावरणात नोकरीसाठी पाठवायला सुरूवात केली तर या सर्व इबादती कॉम्प्रमाईज होतील. आर्थिकदृष्ट्या संपन्न महिला ह्या आपल्या कुटुंबाची पुरेशी काळजी घेण्यास असमर्थ असतात. नोकरी करून पुन्हा कुटुंबाची जबाबदारी पुरूषही पेलू शकणार नाहीत तर ती अपेक्षा महिलांकडून करणे हे महिलांवर अत्याचार करण्यासारखे आहे. गृहसौख्याला संकटात टाकून व्यावसायिक महिला तयार तर होतीलही पण त्यातून साध्य काय होणार? पुरूषाला लग्न करण्याचे जे कारण कुरआनने सांगितलेले आहे ते खालीलप्रमाणे आहे -
‘‘आणि त्याच्या संकेतचिन्हांपैकी ही आहे की त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नीं बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा. आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करुणा उत्पन्न केली, निश्चितच यात बरीच संकेतचिन्हे आहेत, त्या लोकांसाठी जे मनन व चिंतन करतात.‘‘ (सुरे अर्रूम क्र. 30: आयत क्र. 21)
अर्थात पतीला पत्नीकडून संतुष्टी प्राप्त व्हावी यासाठी ईश्वराने पुरूषाला लग्न करण्याची परवानगी दिलेली आहे. अशात महिला जर व्यावसायिक असतील तर दोघेही थकून भागून रात्री घरी येतील. अशात कोण कोणाला संतुष्टी देऊ शकेल? मग अशा लोकांना संतुष्टी विवाहबाह्य संबंधातून, दारू आणि ड्रग्समधून शोधावी लागते. राहता राहिला या लेखाच्या सुरूवातीला एका मुस्लिम वकिलांंनी उपस्थित केलेल्या लग्नात लाखोचा खर्च करण्याचा. तर त्यासंबंधी माझे स्पष्ट मत असे आहे की, हा खर्च आपण आपल्या मुर्खपणामुळे स्वतःहून ओढून घेतलेला आहे. शरियतने निकाहच्या प्रक्रियेतील सर्व खर्च वर पक्षावर टाकलेला आहे. एक रूपयाचा खर्चही वधू पक्षाकडे नाही. जे काही होत आहे ती शुद्ध भारतीय परंपरा आहे त्याचा इस्लामशी काही संबंध नाही आणि हा प्रश्न जनजागृती करून सोडविता येण्यासारखा आहे. किंबहुना त्याची प्रक्रिया सुरूही झालेली आहे. आज अनेक मुस्लिम तरूण असे आहेत जे नगदी महेर अदा करून एक रूपयाचाही खर्च वधू पित्याला न होऊ देता निकाह करत आहेत. अनेक ठिकाणी चहा, शरबत किंवा शिर्खुम्यावर निकाह होत आहेत. ही समाधानकारक बाब आहे आणि त्या वकील साहेबांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तरही आहे. लग्नात खर्च होत आहे म्हणून आपल्या मुलींना आधुनिक शिक्षण देऊन नोकरी करण्यासाठी परवानगी देणे हे काही या प्रश्नाचे समाधान नाही.
कौटुंबिक व्यवस्थेचे पतन
साहीर की रस्सीयों से वही लोग डर गये
जो भीड में खडे थे कलीनी असा लिए हुये
महिलांना मोठ्या प्रमाणात नोकरीसाठी घराबाहेर जाण्यासाठी प्रोत्साहित केल्यास त्याचा पहिला दुष्परिणाम कुटुंब व्यवस्थेवर होतो. या कारणामुळे कुटुंब व्यवस्था एक तर उध्वस्त होते किंवा कमकुवत होते. सतत घराबाहेर राहिल्यामुळे स्त्री- पुरूष दोहोंचेही भावविश्व उध्वस्त होते ते वेगळेच. या उलट निकाह झाल्यानंतर पत्नी घरात राहिल्यामुळे कुटुंब मजबूत बनते. कारण यात कामाची सरळ-सरळ दोन भागात विभागणी झालेली असते. अर्थार्जनाचे घराबाहेरील काम पुरूष प्रवृत्तीस अनुकूल असल्यामुळे व ते काम सुलभपणे करू शकतो. घरातील जबाबदारी महिला प्रवृत्तीस अनुकूल असल्यामुळे ती जबाबदारी पत्नी सुलभपणे पार पाडू शकते. या व्यवस्थेतूनच संंतती जन्माला येते व एक कुटुंब आकार घेते. मुलं झाल्याबरोबर पती-पत्नी दोघांच्याही जीवनात अमुलाग्र असे बदल घडतात. दोघांमध्ये भावनिक जवळीकता अधिक वाढते. त्यातूनच आदर्श समाजाचा पाया रचला जातो. पती आणि पत्नी दोघेही कामानिमित्त रोजच घराबाहेर राहत असतील तर कुटुंब व्यवस्थेचा आधारच निखळून पडतो. परस्परांविषयी निर्माण होणारा स्नेह, दया, करूणा, सहकार्य, त्याग या सर्व भावना लोप पावतात व त्या जागी एक लिंगपिसाट आणि स्वार्थी समाज तयार होतो. लक्षात ठेवा मित्रानों ! भविष्यातील चांगल्या पिढ्यांची इमारत चांगल्या चारित्र्याच्या तरूणांच्या बळावरच उभी राहते व असे तरूण चांगल्या कुटुंबातूनच येतात व चांगले कुटुंब एक फुलटाईम गृहिणीच उभे करू शकते. याचा असा अर्थ मुळीच नाही की सर्व कामकाजी महिलांची घर उध्वस्त होतात व त्या आदर्श कुटुंब निर्माण करू शकत नाहीत. पण अशा महिला अभावानेच आढळतात. त्यांची संख्याही बोटावर मोजण्याइतकीच असते. त्या अधिक सक्षम व कार्यक्षम असतात. म्हणूनच हे कठीण कार्य करू शकतात. बाकीच्या महिलांचे तडजोडीतच आयुष्य संपते.
प्रगतीच्या नावाखाली महिलांना मोठ्या प्रमाणात घराबाहेर काढून व्यावसायात गुंतविण्याचा प्रयोग युरोप आणि अमेरिकेमध्ये सुरू होऊन 200 वर्षांचा काळ लोटलेला आहे आणि त्याचे उलटे परिणाम तो समाज भोगत आहे. भारतातही स्वातंत्र्यानंतर ही प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्याचा विपरित परिणामही आपल्याकडे दिसून येत आहे. वाढत्या वृद्धाश्रमांची संख्या, वाढते बलात्कार, वाढती घरेलू हिंसा, लिंगपिसाट आणि चारित्र्यहीन स्त्री-पुरूषांची मुबलकता, तणावपूर्ण जीवन, वाढत्या आत्महत्या, कन्याभ्रूनहत्या, वाढती जुगारी प्रवृत्ती, नशा आणि ड्रग्सचे सेवण, वाढती बालगुन्हेगारी, दरदिवशी वाढत असलेली मनोरूग्णांची संख्या या सर्व गोष्टी भारतीय समाजामध्येही सुरू झालेल्या आहेत. फक्त वाट त्या दिवसांची पाहणे शिल्लक आहे ज्या दिवसात अमेरिकेसारखे रोज शुटआऊट आपल्याकडेही होतील व सामान्य माणसं हाकनाकपणे बळी पडतील.
महिला शिक्षणाविषयी अवलंबिलेल्या चुकीच्या धोरणामुळे निर्माण झालेल्या समस्यांवरील उपायासंबंधी सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात, ‘‘ महिलाओं को लेकर दो इंतिहाओं (अतियों) की भूल-भुलैयों में भटकनेवाली दुनिया को अगर संतुलन का रास्ता दिखानेवाला कोई हो सकता था तो वह सिर्फ मुसलमान हो सकता था, जिसके पास सामाजिक ज़िंदगी की सारी गुत्थियों के सही हल मौजूद हैं. मगर दुनिया की बदनसीबी का ये भी एक अजीब दर्दनाक पहलू है कि इस अंधेरे में जिसके पास चिराग़ था, वही कमबख़्त रातौंध के रोग का शिकार हो गया और दूसरों को रास्ता दिखाना तो दूर की बात, ख़ुद अंधों की तरह भटक रहा है और एक-एक भटकनेवाले के पीछे दौड़ता फिर रहा है.’’ (परदा: पेज नं 27)
मग मुस्लिम मुलींना कोणते शिक्षण द्यावयास हवे?
भंवर से लढो तुम लहरों से उलझो
कहां तक चलोगे किनारे किनारे
‘‘जहाँ तक तालीम व तरबियत का तआल्लुक है इस्लाम में औरत और मर्द के बीच कोई अंतर नहीं किया गया है. अलबत्ता स्वरूप में अंतर जरूरी है. इस्लामी दृष्टी से औरत की सही तालीम व तरबियत वो है जो उसको बेहतरीन बिवी, बेहतरीन माँ और एक बेहतरीन गृहिणी बनाए. उसका कार्यक्षेत्र घर है. इसलिए उसे विशेष रूप से उन विषयों की तालीम दी जानी चाहिए जो उस क्षेत्र में उसे ज्यादा फायदा पहूंचा सकते हैं. साथ ही वो ज्ञान भी उसके लिए आवश्यक है जो इन्सान को इन्सान बनानेवाले और उसके अख्लाक संवारनेवाले और उसकी नजर को व्यापक बनानेवाले हैं. ऐसी तालीम और ऐसी तरबियत हासिल करना हर मुसलमान औरत के लिए जरूरी है. इसके बाद अगर कोई औरत गैरमामुली जहेनी (बौद्धिक) योग्यता रखती हो और उन विषयों के अलावा दूसरे विषयों की तालीम भी हासिल करना चाहती हो तो इस्लाम उसके राह में रोडा नहीं बनता. बशर्ते की उन हदों से वो आगे न बढे जो शरियत ने औरतों के लिए मुकर्रर किए हुए हैं. ‘‘ (संदर्भ : परदा, पान क्र.197).
कोणाला पटो किंवा न पटो महिलांची जबाबदारी घर सांभाळण्याची आहे. परंतु समाजामध्ये अनेक महिला अशा असतात विशिष्ट परिस्थितीमुळे त्यांना अर्थार्जनासाठी घराबाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नसते. अशा परिस्थितीत त्यांनी काय करावे? तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, सरकारने त्यांच्या स्त्री सुलभ स्वभावास अनुकूल असे क्षेत्र निवडून ते महिलांसाठी पूर्णतः आरक्षित करावेत व त्या ठिकाणी अशा गरजू महिलांना सामावून घ्यावे. ते क्षेत्र, ‘‘नो मेन्स लँड‘‘ असावे. ज्यामुळे त्या आपल्या कामाच्या ठिकाणीही निःसंकोचपणे काम करू शकतील. याशिवाय, ज्या महिला अपवादात्मकरित्या सक्षम, तिक्ष्ण बुद्धीमत्तेच्या असतील त्यांनी त्यांच्या आवडीचे कोणतेही क्षेत्र निवडावे. परंतु त्या क्षेत्रात त्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे भरारी घेतांना कुठलीही अडचण येणार नाही, याची दक्षता सरकारने घ्यावी. एकंदरित, हीच आदर्श परिस्थिती आहे. माझ्या या विचारांशी अनेक लोक असहमत असतील याची मला पूरेपूर कल्पना आहे. परंतु, माझे हे विचार शरियतवर आधारित असल्यामुळे मला लोकांच्या असहमतीचा विचार करण्याची आवश्यकता वाटत नाही. एकदा महात्मा गांधींनी म्हटले होते की, ‘‘आबकारी अर्थात उत्पादन शुल्क (दारू विकून) मिळविलेल्या पैशातून उभारलेल्या शाळांतून मुलांना शिक्षण देण्यापेक्षा मी त्यांना निरक्षर ठेवणेच पसंत करीन‘‘ महिलांच्या शिक्षणासंबंधी हाच माझा तर्क आहे की, कुटुंब व्यवस्थेला धोक्यात घालून महिलांना कामकाजासाठी बाहेर पाठविण्यापेक्षा गरीबीत राहून जगणे मी पसंत करेन.
- एम.आय. शेख
Post a Comment