प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की, अल्लाह अशा व्यक्तींवर दया करत नाही जे माणसांशी दयेचा व्यवहार करत नाहीत. (ह. अब्दुल्लाह, बुखारी आणि मुस्लिम)
दया करणाऱ्यावर रहमान (दयावान) कृपा करत असतो. तुम्ही धरतीवरील लोकांशी दयेने वागा आकाशातील अल्लाह तुमच्यावर कृपा करील. (ह. अब्दुल्लाह बिन उमरो, अबू दाऊद, तिर्मिजी)
जी व्यक्ती दया करत नाही तिच्यावर कृपा होत नसते. (अबू सईद खुदरी, बुखारी)
अशा व्यक्तीचा आमच्याशी काही संबंध नाही जी लहान मुलांशी प्रेमाने, दयेने वागत नाही आणि वयोवृद्ध लोकांचा आदर करीत नाही. (इब्ने अब्बास, तिर्मिजी)
तीन प्रकारचे लोक स्वर्गात जातील, त्यातील असे लोक जे आपल्या नातलगांवर आणि मुस्लिमांवर दया करत असतात. (ह. अब्बास बिन हनार, मुस्लिम)
श्रद्धावंत लोक आपसात एका शरीराप्रमाणे असतात. जर एका अवयवाला त्रास होत असेल तर साऱ्या शरीराला त्याच्या वेदना जाणवतात. (ह. नोमान बिन बुशर, बुखारी, मुस्लिम)
एक मुस्लिम दुसऱ्या मुस्लिमाच्या भावासारखा असतो. त्याच्या मदतीला जातो. त्याच्यावर अन्याय करत नाही. जो कुणी आपल्या भावाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतलेला असेल, अल्लाह त्याच्या गरजा पूर्ण करत राहतो. जर कुणी मुस्लिम दुसऱ्या मुस्लिम व्यक्तीला कोणत्या कष्टातून बाहेर काढत राहतो, अल्लाह परलोकातील त्याच्या कष्टातून त्याची सुटका करील. आणि जी व्यक्ती कोणत्या मुस्लिमाच्या चुकांवर पडदा टाकतो अल्लाह कयामतच्या दिवशी अशा मुस्लिमाच्या चुकांवर पडदा टाकील. (ह. अब्दुल्लाह, इब्ने उमर, बुखारी, मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की, जर कुणापाशी ५-५० रुपये जास्तीचे असतील त्यावर पहिला अधिकार अशा व्यक्तीच्या माता-पित्यांचा आहे, दुसऱ्या क्रमांकावर त्याचा स्वतःचा आण त्याच्या पत्नी व मुलामुलींचा असेल. तिसरा अधिकार आपल्या घराजवळील जे गोरगरीब आहेत त्यांचा आणि चौथा अधिकार जर त्याचा शेजारी गरीब असेल तर त्याचा आणि सर्वांत शेवटी अल्लाहच्या कारणास्तव खर्च करणे. जसे मस्जिदी बांधण्यासाठी निधी देणे, वगैरेंचा अधिकार आहे. या कार्याचा मोबदला सर्वांत कमी मिळेल. पवित्र कुरआनात अल्लाहचे म्हणणे आहे की ''सर्वच लोक भुकेने व्याकूळ असतील तर त्यांना जेऊ घालणे, एखाद्या व्यक्तीची गुलामीच्या कचाट्यातून सुटका करणे, आपल्या जवळील अनाथांच्या जेवणाची सोय करणे तसेच जे निराधार आहेत त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणे हे कठीण कार्य आहे.'' (पवित्र कुरआन, ९०:१२-१५)
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment