प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये घुंगट घेण्याच्या प्रथेला सामाजिक मान्यता होती आणि आजही आहे. सुसंस्कृत हिंदू महिला आजही मोठ्या प्रमाणात घुंगट घेतात. शीख आणि मारवाडी महिलांच्या डोक्यावरील पदर आजही सरकत नाही. हा सुद्धा हिजाबचाच एक प्रकार आहे.
नूर-ए-खुदा है कुफ्र की हरकत पे खंदाजन
फूकों से ये चराग बुझाया न जाएगा
र्नाटकामध्ये एका सरकारी महाविद्यालयात एका दिवशी सकाळी अचानक महाविद्यालय प्रशासनातर्फे हिजाब घालणाऱ्या मुस्लिम विद्यार्थीनींना प्रवेश नाकारण्यात आला आणि बा-हिजाब मुलींनी त्याचा विरोध केला. त्यानंतर जे घडले ते सर्वविदित आहे. या पार्श्वभूमीवर नग्नतेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या अभिनेत्रींना पद्मश्री देऊन हिजाबला विरोध करण्याची मानसिकता सरकारपासून सामान्य लोकांमध्ये का निर्माण झाली? याचा या आठवड्यात आढावा घेणे अप्रस्तूत होणार नाही म्हणून हा लेखन प्रपंच.
प्रश्न हिजाबचा नाही मुस्लिमांचा आहे. शाहरूख खानची दुआ असो की कर्नाटकच्या विद्यार्थीनींचा हिजाब असो, मुस्लिमांचा विरोध करणे समाजातील एका विशिष्ट घटकाचे नित्याचेच काम झालेले आहे. 8 तारखेला मुस्कान हुसैन खान नावाच्या मुलीला भगवा गमछाधारी मुलांच्या टोळक्याने घेरल्यानंतर ज्या धैर्याने मुस्कानने त्यांचा सामना केला त्याचे कौतुक मुस्लिमांसह बिगर मुस्लिम नागरिकांनीही करून तिला त्रास देणाऱ्या टोळक्यांचा निषेध केला. ही बाब त्यातल्या त्यात समाधानाची आहे. एवढेच नव्हे तर मुस्कानला संरक्षण देऊन ज्या दोन प्राध्यापकांनी तिला वर्गात सुरक्षितपणे पोहोचवले त्यांचे सर्वप्रथम आभार. हाच रिअल आयडिया ऑफ इंडिया आहे. हीच आपल्या देशाची श्रीमंती आहे. जरी मुस्लिमांविषयीची घृणा मुद्दामहून वाढविण्याचे प्रयत्न होत असले तरी, त्यांच्याविरोधात क्षीण का असेना हिंदु बांधकांवाकडून जो आवाज उठवला जातो आहे तो जास्त महत्त्वपूर्ण आहे. जोपर्यंत असे लोक समाजात आहेत तोपर्यंत लोकशाही टिकण्याची आशा आहे.
कर्नाटकामध्ये असो, श्रीलंकेमध्ये असो का फ्रान्समध्ये असो परद्याचा विरोध जगात सर्वत्रच होतो. पण त्याची कारण वेगवेगळी आहेत. कुठे बुरखा धारण करून दहशतवादी हल्ला केला जाऊ शकतो, असा तर्क मांडला जातो. तर कुठे महिलांना बुरखा घालायला भाग पाडणे ही त्यांना गुलामगिरीत ढकलण्याचा प्रयत्न असल्याचा तर्क मांडला जातो. अनेक महाभाग बुरखा/हिजाब हा महिलांच्या प्रगतीमध्ये आडवा येतो, असे समजले जाते. पण हे सर्व तर्क नसून कुतर्क आहेत. कारण लंडनच्या पोलीस विभागापासून ते अमेरिकेच्या न्याय विभागापर्यंत बा-हिजाब मुस्लिम महिला ह्या अगदी सहज वावरतांना दिसून येतात. हिजाबला विरोध हा तर्कशुन्य विरोध असून, याचे उत्तर अनेकवेळा देण्यात आलेले आहे. तरी परंतु पुन्हा-पुन्हा हा प्रश्न अधूनमधून उठतोच. हिजाब संदर्भात सय्यद आसीफ मिल्ली नदवी यांचे म्हणणे खालीलप्रमाणे-
’’इस्लाम औरतों को अजनबी मर्दों के साथ अदम इख्तेलात (मुक्त भेटीगाठी) और पर्दे के पूरे एहतेमाम के साथ तालीम की इजाजत देता है. लेकिन वो तालीम के साथ-साथ सन्फ-ए-नाजूक (कोमल स्त्री) की निस्वानियत (स्त्रीत्व) के तकद्दुस (सम्मान) की हिफाजत को उसकी तालीम से कई गुना ज्यादा अहेमियत देता है. वो औरत को तालीम लेने से मना नहीं करता बल्के तालीम के हुसूल (प्राप्त करणे) के तरीकों (सहशिक्षा) से मना करता है. जिनके जरीए उसकी निस्वानियत का तकद्दुस पामाल (नष्ट) होता हो, या उसके अस्मत (अब्रु) के दागदार होने का खतरा भी होता हो. और ये बात बिल्कुल रोज-ए-रौशन (चमकदार दिवस) की तरह अयां (स्पष्ट) है के हमारे मुल्क में राईज (स्थापित) मौजूदा मख्लूत (संयुक्त) निजाम-ए-तालीम (शिक्षण व्यवस्था) एक ऐसा निजाम है जो तलबा (विद्यार्थी) और तालेबात (विद्यार्थीनी) को हमावक्त (प्रत्येकवेळी) गुमराही और आवारगी पर उभारता रहेता है, जिसकी तबाहकारीयां (विध्वंसता) और मुजीर (वाईट) असरात (परिणाम) की एक लंबी फेहरीस्त है. जिसमें सरे फेहरीस्त ये बात है के वो हमारे नौखेज (नवीन) नस्ल और मुस्तकबिल (भविष्य) के मेअमारों (देशाचे शिल्पकार) से सबसे पहले हया (लाज-लज्जा) की आखरी रमक (आभा) भी छीन लेता है.’’ (संदर्भ : उर्दू वर्तमानपत्र, -दावत दि.7-11-2018 पान क्र.2)
मानवी सभ्यतेची सुरूवात होण्यापूर्वी पृथ्वीवर नग्न आदीमानव राहत होते. पुढे त्यांना त्याची लाज वाटू लागली आणि त्यांनी आपल्या गुप्तांगांवर झाडाची पाने बांधण्यास सुरूवात केली. त्यानंतर लंगोट आली आणि सभ्यतेची अधिकृतरित्या सुरूवात झाली, जी पुढे चालून अंगभर वस्त्र नेसण्यापर्यंत येऊन पोहोचली. त्यानंतर सातव्या शतकात कुरआन अवतरित झाले आणि कुरआनने महिला आणि पुरूष दोघांसाठीही वस्त्र आचारसंहिता ठरवून दिली. त्यातूनच हिजाबची सुरूवात झाली. हा मानवी सभ्यतेचा कळस होता. आता परत कळसावरून पायाकडे परतण्यास सुरूवात झाली असून, महिलांना अत्यंत तोकड्या कपड्यात वावरण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. हा एका प्रकारे सिव्हीलायझेशनने घेतलेला यू टर्नच म्हणावा लागेल. मानसिक गुलामीममध्ये मानवी मुल्य सुद्धा बदलून जातात. पाश्चीमात्य असभ्यतेच्या मानसिक गुलामीमध्ये अखंड बुडालेल्या लोकांनी हिजाबचा विरोध सुरू केला आहे. खरेतर विरोध महिलांच्या नग्नतेचा व्हायला हवा होता. परंतु मानसिकरित्या गुलाम झालेल्या लोकांकडून एवढ्या सभ्यतेची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
हिजाब संबंधी कुरआनचे मार्गदर्शन
’’हे नबी (स.), आपल्या पत्नी व मुली आणि श्रद्धावंतांच्या स्त्रियांना सांगा की आपल्या चादरीचे पदर आपणावर आच्छादून ठेवत जा. ही अधिक योग्य पद्धत होय जेणेकरून त्या ओळखल्या जाव्यात आणि त्रास दिला जाऊ नये. सर्वश्रेष्ठ अल्लाह क्षमाशील व परमकृपाळू आहे.’’(सुरह अलएहजाब आयत नं.: 59).
’’आणि हे पैगंबर (स.), श्रद्धावंत स्त्रियांना सांगा की, त्यांनी आपल्या दृष्टींची जपणूक करावी आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे. आणि आपला साजशृंगार दर्शवू नये त्याव्यतिरिक्त जे सहजासहजी प्रकट होईल आणि आपल्या छातीवर आपल्या ओढणीचा पदर घालून ठेवावा. त्यांनी आपला साजशृंगार प्रकट करू नये परंतु या लोकांसमोर, पती, पिता, पतीचे वडील, आपली मुले, पतीची मुले, भाऊ, भावांची मुले, बहिणींची मुले आपल्या मेलमिलाफाच्या स्त्रिया, आपल्या दासी, गुलाम, ते हाताखालचे पुरुष जे एखादा अन्य प्रकारचा हेतू बाळगत नसतील आणि ती मुले जी स्त्रियांच्या गुप्त गोष्टींशी अद्याप परिचित झाली नसतील त्यांनी आपले पाय जमिनीवर आपटत चालू नये की जेणेकरून त्यांनी जो आपला शृंगार लपविलेला आहे त्याचे ज्ञान लोकांना होईल. हे श्रद्धावंतांनो, तुम्ही सर्वजण मिळून अल्लाहजवळ पश्चात्ताप व्यक्त करा, अपेक्षा आहे की सफल व्हाल.’’ (सुरे अन्नूर आयत नं.:31).
हिजाब खरे तर मुस्लिम मुलींनीच नव्हे तर देशातील सर्वच मुलींनी करायला हवा. त्यात त्यांचीच सुरक्षा आणि स्वातंत्र्य निहित आहे. पुरूष हे मुळातच पॉलिगामस प्रवृत्तीचे असतात. स्वतःबरोबर अप्सरेसारखी सुंदर पत्नी असली तरी रस्त्यातून जातांना दुसऱ्या स्त्रीकडे ते वाईट नजरेने पाहतच असतात. अशा परिस्थितीत हिजाब फक्त महिलांचीच सुरक्षा करत नाही तर पुरूषांची सुद्धा महिलांकडे रोखून पाहण्याच्या अनैतिक गुन्ह्यापासून सुरक्षा करतो. आज महाविद्यालयात जाणाऱ्या बहुतांश मुली ह्या जिन्स-टी शर्टमध्ये जातात. त्यांना जेव्हा जिन्स टी शर्ट घालण्याचे स्वातंत्र्य आहे तर ज्या मुली हिजाब घालू इच्छितात त्यांना कसे बरे ते नाकारता येईल?
असे म्हटले जाते की, शाळा- महाविद्यालयांमध्ये ड्रेस कोड ठरविण्याचा अधिकार शैक्षणिक संस्थांना असतो. हां असतो ! परंतु ते शाळेचे नियम असतात. लिगल ज्युरिसप्रुडन्सप्रमाणे नियमांपेक्षा कायदा श्रेष्ठ असतो आणि कायद्यापेक्षा संवैधानिक तरतुदी श्रेष्ठ असतात. येथे संविधानाच्या अनुच्छेद 25 प्रमाणे धार्मिक स्वातंत्र्य देशातील प्रत्येक नागरिकाला प्रदान करण्यात आलेले आहे. अशात धर्माचे एक महत्त्वपूर्ण प्रतीक असलेला हिजाब घालण्याचे स्वातंत्र्य त्यांना मूलभूत अधिकाराच्या रूपाने प्रदान करण्यात आलेले असल्यामुळे त्या अधिकारांसमोर शाळेचे नियम गौन ठरतात. हे सत्य हिजाबला विरोध करणारे लोक सोयीस्कररित्या विसरतात.
परद्याचे तीन उद्देश
1. स्त्री आणि पुरूष यांच्या स्वतंत्र सहजिवनातून स्वैराचाराच्या वाटा निश्चितपणे खुलतात, परद्याद्वारे त्यांना आळा बसविणे.
2. स्त्री आणि पुरूषांच्या कामांची जी नैसर्गिक विभागणी ईश्वराने केलेली आहे, परद्याद्वारे ती अधिक भ्नकम करणे.
3. कुटुंब व्यवस्था मजबूत करणे.
परद्याच्या व्यवस्थेशिवाय हे तिन्ही उद्देश पूर्ण होऊच शकत नाहीत. परद्याची पद्धत नाकारल्याने अश्लिलता वाढते. स्वैराचार वाढतो. लग्न गौन ठरते. लिव्ह इन रिलेशनशिप वाढते. यात पुरूष तर नामानिराळे होऊन जातात मात्र स्त्रीया आणि मुलांचे अधिक नुकसान होते. हिजाब खरेतर व्यक्तीगत सुरक्षेपेक्षा सार्वजनिक सुरक्षेचा विषय आहे म्हणून त्याला जास्त महत्त्व प्राप्त आहे. महिलांवर एकतर्फा प्रेमातून होणारे अॅसिड हल्ले, विनयभंग, लैंगिक हल्ले, बलात्कार इत्यादी घटनांवर परद्याच्या व्यवस्थेच्या माध्यमातून प्रभावी उपाय योजता येऊ शकतो. पूर्वग्रह सोडून बारकाईने जर लक्ष दिले तर एक गोष्ट सहज लक्षात येऊ शकते की, वरील अत्याचारांपासून बा-हिजाब मुस्लिम महिला ह्या बऱ्यापैकी सुरक्षित आहेत ते केवळ परद्याच्या व्यवस्थेमुळेच.
कर्नाटकातील मुस्लिम मुलींच्या शिक्षणाला विरोध केवळ हिजाब धारण केल्यामुळे होत असतांना ते लोक आजही गप्प आहेत जे ऑगस्ट 2021 मध्ये अफगानिस्तानमध्ये तालीबान सरकार आल्यावर तेथील मुलींच्या शिक्षणाची प्रचंड काळजी करत होते. परदा करणाऱ्या कोट्यावधी महिला मुळात आपल्या परद्याच्या माध्यमातून प्रत्यक्षपणे अब्जावधी डॉलरच्या फॅशन, फिल्म आणि अशाच अश्लील उद्योगांवर लानत (निषेध) करत असतात. त्यामुळे त्या उद्योगांशी संबंधित लोकांमध्ये नुसता जळफळाट होते आणि ते कुठल्या न कुठल्या कारणांनी परद्याचा विरोध करत असतात.
ही झाली इस्लामची बाजू. प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये घुंगट घेण्याच्या प्रथेला सामाजिक मान्यता होती आणि आजही आहे. सुसंस्कृत हिंदू महिला आजही मोठ्या प्रमाणात घुंगट घेतात. शीख आणि मारवाडी महिलांच्या डोक्यावरील पदर आजही सरकत नाही. हा सुद्धा हिजाबचाच एक प्रकार आहे.
आपल्या देशात उत्तर प्रदेश सारख्या सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री धार्मिक वस्त्र धारण करून राज्य चालवत आहेत. मनमोहनसिंग यांनी पगडी धारण करून यशस्वीपणे देश चालविला, आपले पंतप्रधान मंदिरात जाऊन पूजा करत असतात, संसदेत साधू आणि साध्वी धार्मिक वस्त्र परिधान करून येऊ शकतात तर शाळा, महाविद्यालयात मुस्लिम मुलींना हिजाब घालून जाण्यास प्रतिबंध करणे, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाला शोभण्यासारखे आहे काय? याचा वाचकांनी स्वतःच विचार करावा.
सर्वोच्च प्राथमिकता भारताला द्यायला हवी
आज जगात सर्व देशांच्या सीमा निश्चित झालेल्या आहेत. नेशन स्टेटची संकल्पना जगाने स्वीकारलेली आहे. नेशन स्टेट, देशात राहणाऱ्या सर्व नागरिकांचा समावेश करून बनत असते. 20 कोटी अल्पसख्यांकांना वगळून यशस्वी नेशनस्टेट बनणे केवळ अश्यक आहे. शांतीपूर्ण सहअस्तित्वाचे महत्त्व समजल्याखेरीज देश सुरक्षित राहू शकत नाही. 20 कोटी अल्पसंख्यांकांचे अस्तित्व 110 कोटी बहुसंख्यांकांनी व 110 कोटी बहुसंख्यांकांचे अस्तित्व 20 कोटी अल्पसंख्यांकांनी मान्य केल्याशिवाय देशात शांतता नांदणार नाही. देशाला महासत्ता तेव्हाच करता येईल जेव्हा देशात शांती राहील. प्रगतीसाठी शांती आवश्यक आहे. याचा विचार अल्पसंख्यांक व बहुसंख्यांक दोघांनीही करावा. परदा, दाढी, टोपी, लव्ह जिहाद, गाय, गोवंश, शाहरूखची दुआ यासारख्या विषयांना सोडून रोजगार, श्रमाचे मुल्य, कौशल्य विकास, शिक्षण, आरोग्य, मुल्याधारित राजकारण यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांकडे जोपर्यंत आपण एक राष्ट्र म्हणून लक्ष देणार नाही तोपर्यंत देश महासत्ता होणार नाही. लेट्स बी ट्रू इंडियन. जय हिंद !
- एम.आय.शेख
Post a Comment