एडिआरच्या अहवालात एक विचित्र तथ्य समोर आले आहे. फौजदारी गुन्हे दाखल असलेले उमेदवार अधिक जिंकतात. बहुधा त्यामुळेच गुन्हेगार / धनदांडग्यांना तिकीट देणे ही राजकीय पक्षांची अपरिहार्यता झाली आहे. परिणामी, गेल्या दहा वर्षात लोकसभेत फौजदारी खटल्यातील माननीय खासदारांची टक्केवारी 30 वरून 43 आणि गंभीर गुन्ह्यांच्या श्रेणीत मोडणाऱ्या खासदारांची टक्केवारी 14 वरून 29 वर गेली आहे. या कालावधीत गुन्हेगारी प्रकरणे असणाऱ्या उमेदवारांच्या विजयाची शक्यताही फौजदारी खटले नसलेल्या उमेदवारांपेक्षा साडेतीन पट अधिक होती.
याचा अर्थ स्पष्ट आहे की मतदार धनदांडगे किंवा गुन्हेगारांबद्दल प्रतिकूल नाहीत. तसेच दबंग व्यक्तीमत्व निवडणे चांगले, असे त्यांना वाटते. आकडेवारीवरून असेही स्पष्ट दिसून आले आहे की, सध्याच्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस आणि प्रादेशिक स्तरावर अण्णाद्रमुक याच पक्षांचे गुन्हेगारी प्रकरणे नसलेले उमेदवार जास्त प्रमाणात जिंकतात. तर भाजप व अगदी डाव्यांसह इतर सर्व पक्षांचे मतदार गुन्हेगारी खटले असलेले अधिक उमेदवार निवडतात. यात सर्वात आघाडीवर महाराष्ट्र आहे. इथे शिवसेना आणि
गुन्हेगार पार्श्वभूमीचे लोक...
राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रादेशिक पक्षांचे गुन्हेगारी खटले असलेले उमेदवार अनुक्रमे 7 पट आणि 4 पट जास्त जिंकण्याची शक्यता असते. गुन्हेगारी खटले असलेले भाजपाचे उमेदवारही मोठ्या प्रमाणात निवडून येतात.
गेल्या काही वर्षात राजकीय वैमनस्य वाढले असावे आणि आक्रमकपणे सरकारला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असावेत. पण खून किंवा बलात्कारासारख्या गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवार लोकांची पसंती कशी काय मिळवितात. कदाचित, अकार्यक्षम व्यवस्थेमुळे त्रस्त लोक आपल्या नेत्याकडे तो श्रीमंतांना लूटतो पर गरीबांवर दया करतो, अशी अतार्किक म्हण असलेला रॉबिनहुड म्हणून पाहत असतील. या अर्थाचा अहवाल औरंगाबादहून प्रकाशित होणाऱ्या एका आघाडीच्या मराठी दैनिकाच्या 9 फेब्रुवारीच्या पान क्रमांक 4 वर प्रकाशित झालेला आहे.
यातील सुरूवातीचे आकलन जरी बरोबर असले तरी शेवटचा निर्णय तेवढा बरोबर नसावा. कारण आपल्याकडे नेते फक्त श्रीमंतांना लूटतात असे नाही तर ते श्रीमंत आणि गरीब असा भेद न करता सर्वांनाच लूटतात. तसेच लूटलेली कमाई रॉबिनहुड सारखी ते आपल्या मतदार संघातील गरीबांवर खर्च करतात, असाही प्रकार नाही. तर ते लुटीतून मिळालेल्या कमाईतून स्वतः व स्वतःच्या सातपिढ्यांची व्यवस्था करतात. सातपिढ्यांची व्यवस्था झाली, असे जेव्हा त्यांना खाजगी सचिव सांगतो तेव्हा ते, ’’ मूर्खा आठव्या पिढीचे काय?’’ असा सवाल करत तर नसावेत, अशी शंका निर्माण होईल, असे त्यांचे वर्तन असते.
Post a Comment