Halloween Costume ideas 2015

रशियाला आणखी एका 'रक्तबंबाळ जखमे'चा धोका


एक हजार वर्षांहून अधिक काळ आधुनिक युक्रेनच्या भूभागावर इस्लामी राज्ये अस्तित्वात होती, परंतु केवळ काही इतिहासकारांना ते समजले आणि त्यांनी आपल्या देशातील मुस्लिम भूतकाळाविषयीचे साहित्य वैज्ञानिक व्यवहारात आणण्याचा प्रयत्न केला. एक स्वतंत्र राष्ट्र बनण्याच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे आधुनिक युक्रेनला जे बदल भोगावे लागले ते आपल्या सहज लक्षात येते. फार पूर्वीचा इतिहास सुप्रसिद्ध वस्तुस्थितीच्या नव्या अन्वयार्थामुळे सुधारण्याच्या अधीन असू शकतो, हे स्वीकारणे आपल्यासाठी अधिक कठीण आहे. एक हजार वर्षांहून अधिक काळ, जवळजवळ संपूर्ण दक्षिण आणि डाविकडील किनारपट्टी असा युक्रेनचा एक मोठा भाग तुर्क लोकांनी वसवला होता, ज्यांनी शहरे व शेतीचा विकास केला. आधुनिक युक्रेनच्या राजकारणावर आणि संस्कृतीवर अनेक प्रमुख मुस्लिम व्यक्तींचा लक्षणीय परिणाम झाला आहे हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. हे असे लोक होते, ज्यांनी कित्येक दशके, तर कधी शतकानुशतके सभ्यतेच्या प्रक्रियांचा विकास निश्चित केला होता. मात्र पंधराव्या शतकापासून ही परिस्थिती बदलत गेली आणि सोव्हियत राजवटीने स्थानिक मुस्लिमांनी तेथून स्थलांतर करण्यास भाग पाडले तर काहींवर अतोनात अत्याचार झाले. सध्या युक्रेनमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या मोजकीच म्हणजे ०.९ टक्के आहे तर ख्रिश्चनांची लोकसंख्या जवळपास ८३ टक्के आहे. रशिया आणि युक्रेन संघर्ष सध्या विकोपाला पोहोचला आहे. नऊ वर्षांहून अधिक काळ चाललेल्या लष्करी हस्तक्षेपात अडकून पडलेल्या अफगाणिस्तानला मिखाईल गोर्बाचेव्ह या शेवटच्या सोव्हिएत नेत्याने देशासाठी 'रक्तबंबाळ जखम' असे संबोधले होते. त्यानंतर बरेच काही बदलले आहे. परंतु आज युक्रेनच्या सरहद्दीवर रशियन सैन्याने धुमाकूळ घातला आहे आणि आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीची कोंडी चर्चेच्या आणखी एका आठवड्यात सुरू आहे, त्यामुळे काही गोष्टी तशाच आहेत, कारण युक्रेनला आणखी एक ‘रक्तबंबाळ जखम’ होण्याची भीती आहे. मार्च १९७९ पासून पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ अफगाणिस्तानच्या राजवटीतील नेते मॉस्कोला बंडखोरांविरुद्ध लष्करी पाठबळ देण्याची विनंती करत होते. त्यानुसार महत्त्वपूर्ण लष्करी मदत, सल्लागार आणि तंत्रज्ञांच्या अनेक तुकड्या पुरविल्या गेल्या. तथापि मार्क्सवादी राजवटीतील भांडणे आणि त्यातील अंगभूत अकार्यक्षमता व भ्रष्टाचार यामुळे अफगाणिस्तानमधील परिस्थिती अधिकच बिघडली आणि अखेरीस सोव्हिएत नेतृत्वाने लष्करी हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला. देशाला आणि त्याच्या भौगोलिक रचनेची जाण असलेल्या, तेथील कठोर हवामानाची सवय असलेल्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परकीय आक्रमणकर्त्यापासून आपल्या मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या एका प्रतिस्पर्ध्याविरुद्ध उभे ठाकलेल्या सोव्हिएत सैन्याला फारशी संधी नव्हती. लष्करी तंत्रज्ञानाच्या बाबतीत ते अधिक प्रगत होते हे खरे आहे, पण तरीही तेथील शिस्त आणि श्रेणीबद्ध संरचनेतील ताठरपणा, त्याच्या कमांडर्सनी खरी परिस्थिती लपवण्यासाठी मायदेशी पाठवलेली चुकीची माहिती, सोव्हिएत सैन्याचे आधीच खालावलेले मनोबल कमी करणाऱ्या दैनंदिन अस्तित्वाच्या कठोर परिस्थितीमुळे आणि बंडखोरीविरोधी गनिमी युद्धासाठीची एकूण तयारी यामुळे ते अडखळत होते. सोव्हिएत युनियनच्या अफगाणिस्तानातून अखेर माघार घेण्याच्या परिणामांच्या लहरींचा स्थानिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. सोव्हिएत अर्थव्यवस्थेला मोठ्या रकमेची किंमत मोजावी लागली. पण एकदा का एखादे सैन्य शत्रुत्वाच्या गर्तेत अडकले की नुकसान अटळ असते. १९८० च्या दशकापासून बरेच काही बदलले आहे, परंतु रशियाने युक्रेनवर आक्रमण केले होते, तर अशाच काही परिणामी जोखमीचे घटक आजही मोठ्या प्रमाणात आहेत. बहुतेक रशियन नागरिकांचे राहणीमान अजूनही सुधारलेले नाही. शत्रूला अद्ययावत पाश्चात्त्य युद्ध सामग्रीने सुसज्ज केले जात आहे. माध्यमे अजूनही मोठ्या प्रमाणात राज्य नियंत्रित आहेत. युक्रेनच्या सीमेवर रशियाच्या उभारणीचे निमित्त म्हणजे तेव्हा जसे होते तसेच पाश्चिमात्य देश रशियन सुरक्षेला धोका निर्माण करत आहेत. रशियाने युक्रेनमधील रशियन लोकांच्या संरक्षणाचे कारण देऊन आपली आर्मी तिथे पाठवली आणि 2014 मध्ये क्रिमियावर कब्जा केला. पण रशियाकडे एवढा मोठा भूभाग असताना, त्याला क्रिमिया का पाहिजे? तर याचे कारण आहे क्रिमिया हस्तगत केल्याने रशियन नौदलाला गरम पाण्याचे पोर्ट उपलब्ध झालेले आहे. ते रशियाच्या संरक्षण, डावपेच व व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळेच रशियाने क्रिमियावर कब्जा केला. युद्धे कधीही परिणामशून्य होत नाहीत किंवा ती योजनेनुसार विकसितही होत नाहीत. आणि आपले नियंत्रण कितीही घट्ट असले तरी राजकीय कारणांमुळे युद्धात सैन्य पाठवणारे राजकारणी या क्षेत्रातील सर्व आकस्मिक परिस्थितीचा अंदाज घेऊ शकत नाहीत. आज मॉस्कोने जगाला हे दाखवून देण्याची गरज आहे की ती एक प्रभाव क्षेत्राच्या ताब्यात असलेली एक महान शक्ती आहे - जी प्रतिस्पर्धी शक्तीला घुसखोरी करू देऊ शकत नाही. आणि युक्रेन हा अफगाणिस्तानसारखा परकीय देश नसला, तरी आजच्या रशियाची जनता त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात अजूनही मर्यादित असली तरी युक्रेनच्या राजकीय पटलावर वर्चस्व गाजवण्याच्या मॉस्कोच्या प्रयत्नात मोठ्या प्रमाणात जीवितहानी सहन करेल की नाही हे सांगता येत नाही.
- शाहजहान मगदुम
कार्यकारी संपादक, 
मो.:८९७६५३३४०४

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget