अतिशय महत्वाचा व गुंतागुंतीचे ऑपरेशन होते. डॉक्टर साहेबांना ऑपरेशन थिएटरमध्ये जायचे होते. पण हे काय ? त्यांनी कोपरापर्यंत तीन वेळा हात धुतले (वुजु मध्ये धुतात तसे ) आणि हिजाब घालायला सुरुवात केली. त्यांनी परिधान केलेला पोशाख वरूनच एक गाऊन, डोक्यावर टोपी व तोंडावर मास्क लावला हा झाला (1) सर्जिकल हिजाब ? याची काय गरज होती?
अतिसुरक्षेसाठी, डिसेनफिकेशनसाठी, आपल्या कपड्यांवरील जंतू, विषाणु (इरलींशीळर तर्ळीीीशी) हे पेशंटच्या शरीरामध्ये जाऊ नये म्हणून बचाव व सुरक्षा उपाय, घेतलेली काळजी.
’’हिजाब’’ जेवढे मला कळते म्हणजे सुरक्षेसाठी घातलेले जास्तीचे पेहरावे आणि निरीक्षण करून पाहिले तर काय सगळीकडे ’’हिजाब’’ दिसू लागले.
देशाची रक्षा करणाऱ्या जवानांना लढताना घालावा लागतो तो ड्रेस, पोलादी टोपी, कपड्यांवरुनच घातलेला जंगी पोशाख हे आर्मी ’’हिजाब’’ आहे.
क्रिकेट मॅच बघताना खेळाडूंच्या तोंडासमार लोखंडी जाळ असलेला हेलमेट हाता पायावरील ग्लोज हे (3) स्पोर्ट हिजाब वाटतो.
उष्णतेमुळे बाहर पडताना धारण करण्यात येतो तो अॅप्रन, सन ग्लासेस, ग्लोज़ वगैरे (4) हा ’’समर हिजाब’’होय. थंडीमध्ये घालण्यात येणारे स्वेटर, मफलर, हातमोजे व पायमोजे यांना (5) ’’विंटर’’ हिजाबमध्ये सामील करायला हरकत नाही.
पावसाळ्यात घातलेला रेनकोट, गमबुट हे (6) ’’रेनी हिजाब’’ च्या दर्जात येतात.
* समुद्रात (खोल) जाण्याआदी घालण्यात येणाऱ्या पोशाखाला (7) ’’मरिन हिजाब’’ असे संबोधावे लागणार.
तर अंतराळ मध्ये जाण्यासाठी विशिष्ट प्रकारचे वस्त्र घालावे लागतात त्यांना आपण (8) ’’स्पेस हिजाब’’ असे
म्हणायला काही हरकत नाही.
(9) बेकरीमध्ये काम करणारे वापरतात ते किचन अॅपरन, टोपी वगैरा हा झाला (9) ’’बेकिंग हिजाब’’/ कुकिंग हिजाब’’
(10) फॅक्टरी मध्ये काम करणाऱ्या लोकांना दिलेले ए्नस्ट्रा्नलॉथ हे ’’फॅ्नट्री हिजाब.’’
(11) फायरब्रिगेड मधील लोक धारण करतात ते आपण ’’फायरमन हिजाब ’’ म्हणू.
(12) ’लॅब हिजाब’ लॅब मध्ये वावरताना घालण्यात येतो तो पोशाख म्हणजेच (लॅब हिजाब) होय.
(13) ’एक्स-रे हिजाब’ एक्स-रे काढताना घालण्यात येणारा ए्नस्ट्रा डेस म्हणजे एक्स-रे हिजाब.
(14) ’मोबाईल हिजाब’ मोबाईलचे कवर हा ’मोबाईल हिजाब’
(15) फ्रिज हिजाब : फ्रिजवर घालण्यात येणाऱ्या कवरला ’फ्रिज हिजाब’
(16) चॉकलेट, बिस्कीट, चिप्स हे देखील कव्हर्ड असतात मग त्यांना (16) ’’चॉकलेट हिजाब’’ (17) बिस्कीट हिजाब व (18) ’चिप्स हिजाब’ म्हणायचे का?
(19) ’’कोरोना हिजाब ’’ : कोरोना संक्रमणामुळे बचावासाठी आपण मास्क घालतो, गाऊन घालतो, सॅनिटायझर वापरतो, ’दो गज की दूरी’ ठेवतो खरं तर याने कोरोना तर काय एचआयव्ही ही होणार नाही. का? अन्ड्यू अट्रॅ्नशन (विनाकारण) चे प्रेम होत नाही.
(20) नॅचरल हिजाब : नॅच्युरल हिजाब हिजाबच्या या प्रकारालाच ’हिजाब’ समजले जाते. यात मुस्लिम महिला व मुली (सर से पैर तक) डोक्यापासून पायापर्यंत स्वतःला झाकून ठेवतात.
बुरखा नावाच्या वस्त्राने व त्यात त्यांना सुरक्षित वाटते. स्वतः ला वाईट नजरांपासून रक्षण करण्यासाठी यात वाईट काय? आणि कशाचा ऑप्रेशन? चॉकलेटला बिनाकव्हर का कंपनी बाजारात आणत नाही ? खराब होईल, विरगळेल, मुंग्या वगैरे लागतील म्हणून मग विना कव्हरमुळेच लेकरं खराब झाली आहेत.
जर धरतीवरील सगळ्या महिला ’’हिजाब’’ करतील तर या भूतलावर ’’रेप’’ नावाची वस्तू असतित्वात राहणार नाही. हिजाब करुनच लग्नसमारंभात महिला जाऊ लागल्या तर मेक अप, ज्वेलरी व ड्रेसिंग वर होणारा फालतू (विनाकारण ) होणारा खर्च ही वाचेल. या जगातून एचआयव्ही नावाचा रोग निरोप घेईल.
हिजाबला बॅन केले तर त्याच्या सर्व प्रकारांना ही बॅन करावे लागेल हे व आपल्याला मान्य आहे का? कुठला हा शहाणपणा ? अल्लाह सर्वांना हिजाबचे महत्व कळू दे हिजाब करणाऱ्यांना सुरक्षा प्रदान कर (आमीन).
- डॉ. सीमीन शहापूरे
8788327935
Post a Comment