Halloween Costume ideas 2015

सूरह हूद :ईशवाणी (सुबोध कुरआन)


(४०) येथपावेतो की जेव्हा आमचा हुकुम आला आणि तो तुफान उफाळला४२ तेव्हा आम्ही सांगितले, ‘‘प्रत्येक जातीच्या प्राण्याची एक, एक जोडी नावेत ठेवा, आपल्या कुटुंबियांनादेखील, त्या व्यक्तींना सोडून ज्यांचा निर्देश अगोदरच केला गेला आहे.४३ तिच्यात स्वार व्हा आणि त्या लोकांनासुद्धा बसवा ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे.’’४४ आणि थोडेच लोक होते ज्यांनी नूह (अ.) बरोबर श्रद्धा ठेवली होती. 

(४१) नूह (अ.) यांनी सांगितले, ‘‘स्वार व्हा यात, अल्लाहच्या नावानेच आहे हिचे चालणे आणि हिचे थांबणेसुद्धा. माझा पालनकर्ता मोठा क्षमाशील व कृपाळू आहे.’’४५ 

(४२) या लोकांना घेऊन नौका चालली होती आणि एक, एक लाट पर्वतासमान उसळत होती. नूह (अ.) चा मुलगा दूर अंतरावर होता. नूह (अ.) ने हाक देऊन सांगितले, ‘‘पुत्रा, आमच्याबरोबर स्वार हो, अश्रद्धावंतांबरोबर राहू नकोस.’’ 

(४३) त्याने उलट उत्तर दिले, ‘‘मी आताच एका पर्वतावर चढून जातो जो पाण्यापासून माझे रक्षण करील.’’ नूह (अ.) ने सांगितले, ‘‘आज कोणतीही वस्तू अल्लाहच्या आदेशापासून (आज्ञेतून) वाचविणारी नाही, याशिवाय की अल्लाह एखाद्यावर दया दाखवील.’’ इतक्यात एक लाट दोघांच्यामध्ये आली आणि तोदेखील बुडणाऱ्यांमध्ये सामील झाला. 

(४४) आज्ञा झाली, ‘‘हे पृथ्वी! आपले संपूर्ण पाणी गिळून टाक आणि हे आकाशा! थांब.’’ यावर पाणी जमिनीत ओसरले, निर्णय लावण्यात आला, नौका जुदीवर ठेपली४६ आणि म्हटले गेले की दूर झाला अत्याचाऱ्यांचा समुदाय.
४२) या विषयी भाष्यकारांचे वेगवेगळे कथन आहे. परंतु आमच्याजवळ सत्य तेच आहे जे कुरआनद्वारा स्पष्ट शब्दांनी कळून येते. तुफानची सुरवात एक खास जमिनीतील पाण्याच्या स्त्रोताने झाली, आकाशातून मुसळधार वर्षा सुरु झाली आणि दुसरीकडे जमिनीतून अनेकानेक स्त्रोत फुटू लागले. येथे जमिनीतून स्त्रोत बाहेर पडण्याचा उल्लेख आहे आणि दुसरीकडे पावसाचा वर्षाव होऊ लागला होता. सूरह ५४ मध्ये याचे विवरण मिळते, ``आम्ही आकाशाची दारे उघडली ज्यातून मुसळधार वर्षा होऊ लागली आणि धरतीला फाडून टाकले आणि चहुकडून पाण्याचे स्त्रोत वाहू लागले आणि या दोन्ही प्रकारचे पाणी ते काम पूर्ण करण्यास एकत्र आले जे निश्चित केले होते.'' शब्द `तनूर' वर `आलिफलाम' दाखल करण्यामुळे हे स्पष्ट होते की अल्लाहने विशिष्ट `तनूर' (पाण्याचा स्त्रोत) ला सुरवातीला निश्चित केले होते जे संकेत मिळताच फुटू लागले होते आणि नंतर `तुफानवाल्या तनूर'च्या नावाने प्रसिद्ध झाले.

४३) म्हणजे तुमच्या घरातील ज्या लोकांच्या बाबतीत अगोदर सांगितले गेले आहे की ते अधर्मी आहेत आणि अल्लाहच्या कृपेचे हकदार नाहीत त्यांना नावेत बसवू नका. ते दोनच लोक असतील एक नूह (अ.) यांचा मुलगा ज्याच्या बुडण्याचा उल्लेख आता होत आहे. दुसरी नूह (अ.) यांची पत्नी जिचा उल्लेख सूरह ६६ मध्ये आला आहे. संभवता परिवारातील दुसरे लोकही असतील. परंतु कुरआनमध्ये त्यांचा उल्लेख नाही.

४४) याने त्या इतिहासकारांच्या आणि वंशविशेषज्ञांच्या दृष्टिकोनाचे खंडन होते जे तमाम मानवी वंश नूह (अ.) यांच्या तीन पुत्रांचा ठरवितात. इस्त्राईली लोकांनी हा संभ्रम निर्माण केला की त्या तुफानामुळे नूह (अ.) आणि त्यांचे तीन मुले आणि त्यांच्या पत्नीशिवाय कोणीच वाचले नाही (पाहा बायबल, उत्पत्ति ६:१८, ७:७, ९:१, ९:१९) परंतु कुरआन अनेक ठिकाणी याला स्पष्ट करतो की आदरणीय नूह (अ.) यांच्या कुटुंबाशिवाय त्यांच्या राष्ट्रातील अनेक लोकांना, जरी ते थोडे होते अल्लाहने तुफानापासून वाचविले होते. कुरआन नंतरच्या मानवी वंशाला फक्त नूह (अ.) यांची संतती नव्हे तर त्या सर्व लोकांची संतती सिद्ध करतो ज्यांना अल्लाहने त्यांच्याबरोबर नावेत बसविले होते. उदा ``त्यांची संतती ज्यांना आम्ही नौकेत बसविले होते.''(कुरआन १७:३)``आदमच्या संततीपैकी आणि त्या लोकांच्या संतानांपैकी ज्याना नूहने नौकेत बसविले होते.''(कुरआन १९ :५८)

४५) ही आहे ईमानधारकांची खरी शान. ते जगात प्रकृतीच्या नियमानुसार उपाय त्याचप्रमाणे स्वीकारतात ज्याप्रमाणे जगवाले करतात, परंतु त्यांचा भरोसा या उपायांवर नाही तर अल्लाहवरच भरोसा असतो. त्याला पूर्ण कळते की त्याचा कोणताच उपाय ठीक सुरु होऊ िंकवा चालू शकत नाही आणि अंतिम अभिष्टांपर्यंत पोहोचू शकत नाही जोपर्यंत अल्लाहची मेहरबानी आणि त्याची दयाकृपा सामील होत नाही.

४६) जुदी पर्वत कुर्दीस्थानच्या क्षेत्रात इब्ने उमर द्वीपच्या उत्तर-पूर्व भागात स्थित आहे. बायबलमध्ये या नौकेचा थांबा आरारत हे स्थान सांगितले आहे. आरमेनिया पर्वताचे हेच नाव आहे आणि एका पर्वतराईचे नावसुद्धा आहे. अरारात म्हणजे पर्वतराई आहे आणि आरमीनियाच्या उंच जागी सुरु होऊन दक्षिणेत कुर्दीस्थानपर्यंत जाते. जुदी पर्वत याचपैकी एक पर्वत आहे जे आजसुद्धा जुदीच्याच नावाने प्रसिद्ध आहे. प्राचीन इतिहासात नौकांच्या थांबण्याचे ठिकाण हेच दाखविण्यात आले आहे. परंतु मसीह (इसा (अ.) यांच्या अडीचशे वर्षांपूर्वी बाबीलचे एक धर्मगुरु बेरासस (इशीर्रीीी) याने प्राचीन किलदानी कथनांनुसार आपल्या देशाचा जो इतिहास लिहिला आहे, त्यात तो नूह (अ) यांच्या नौकेच्या थांबण्याची जागा `जुदी' दाखवितो. अ‍ॅरिस्टॉटलचा शिष्य अबीडीनुस (अलूर्वििीी) सुद्धा आपल्या इतिहासात याची पुष्टी करतो. याचबरोबर तो आपल्या काळाचे वर्णन करतो की इराकमध्ये अनेक लोकांकडे या नावेचे तुकडे सुरक्षित आहेत जे त्यांना घोळून घोळून आजारी लोकांना पाजतात.

हे एक विश्वव्यापी तुफान होते की हे त्या विशेष क्षेत्रात आले होते काय जिथे आदरणीय नूह (अ.) यांचे राष्ट्र आबाद होते? हा एक असा प्रश्न आहे ज्याचा निर्णय आजपर्यंत झाला नाही. इस्राईली कथनांनुसार सामान्य विचार हाच आहे की हे एक विश्वव्यापी तुफान होते. (उपत्ति ७ : १८-२४) परंतु कुरआनमध्ये असे सांगितले गेले नाही. कुरआन संकेतानुसार हे अवश्य माहीत होते की नंतरच्या मानवी पिढ्या याच लोकांची संतती आहेत ज्यांना त्या तुफानापासून वाचविले गेले होते. यावरून हे अनिवार्य ठरत नाही की ते विश्वव्यापी तूफान होते. हे या पद्धतीनेसुद्धा सिद्ध होते की तोपर्यंत आदम (अ.) यांची संतती त्याच क्षेत्रापुरती मर्यादित होती जिथे तुफान आले होते.  तुफाननंतर जे वंश जन्मले,  ते हळू हळू संपूर्ण जगात पैâलावले असणार. या दृष्टिकोनाची पुष्टी दोन  प्रकारे होते. एक म्हणजे दजला व फरातची भूमीवर एक भयानक तुफान येण्याचा ऐतिहासिक पुरावा तसेच भूगर्भ  शास्त्रावरून मिळतो. परंतु धरतीच्या इतर भागांवर हे प्रमाण सापडत नाही ज्यानुसार एका विश्वव्यापी तूफानाच्या येण्याचा विश्वास ठेवला जाऊ शकतो. दुसरा दृष्टिकोन  म्हणजे जगात या महाभंयकर तुफान (पूर) विषयी अनेक देशात प्राचीन काळापासून यावरील कथन सापडतात. ऑस्ट्रोलिया, अमेरिका, आणि न्युगीनी या दूरवरच्या देशातसुद्धा त्यांच्या प्राचीन कथनांत हा उल्लेख सापडतो. यावरुन हा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की एका निश्चित समयी या देशाचे (सर्व जगातील) पूर्वज याच एका क्षेत्रात आबाद असतील जेथे हे महापूर (तुफान) आले होते. नंतर त्यांचे वंशज पृथ्वीच्या विभिन्न भागात पैâलावले तेव्हा हे ऐतिहासिक कथन (घटना) त्यांच्याबरोबर जगात पसरले असेल. (पाहा सूरह ७, टीप ४७)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget