कर्नाटकात भाजप सरकारने ’हिजाब’ या नैतिक पोशाखाला विरोध घडवून आणत आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. अनेक देशांनी हिजाबची पाठराखण करीत कर्नाटक सरकारला खडसावले आहे. या मुद्यावर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. खरे तर हिजाब मुद्याला भाजपाने ऐन मतदानाच्या तोंडावर उकरून काढत पाच राज्यांतील मतदारांचे ध्रुवीकरण करून राजकीय फायदा उठवण्याचा डाव साधला आहे. ते यात कितपत यशस्वी ठरतील हे 10 मार्चला येणाऱ्या निकालावरून स्पष्ट होईल.
हिजाब, बुरखा कधीही शिक्षणाला अडसर ठरले नाहीत. उलट हिजाब परिधान करून मुली शिक्षणात यशोशिखर गाठू लागल्या. उच्च पदापर्यंत पोहोचू लागल्या. त्यांचे पाहून इतर समाजातील मुलीही हिजाब, स्कार्फ परिधान करू लागल्या. महिलाही मोठ्या प्रमाणात त्याचे अनुकरण करू लागल्या. हे कुठेतरी भाजपाला खपत होते. 370, बाबरी मस्जिद, तीन तलाक हे मुद्दे आता संपले होते. विकासावरून देशात गदरोळा सुरू आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. लोकांत मोठ्या प्रमाणात भाजपाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. अशात भाजपाच्या थिंक टँकने मंथन करून ऐन निवडणुकीच्या तोंडावर हिजाबचा मुद्दा उकरून काढला आणि तो इतका चर्चेत आणला की भाजपाविरूद्ध वाढलेली नाराजी थांबविण्यात ते कुठेतरी यशस्वी होत असल्याचे दिसू लागले आहे. भाजपाला चांगले माहित आहे की, मुस्लिम समाज धार्मिक मुद्यांवरून सदैव आक्रमक होत एकत्र आलेला आहे. यामध्ये पुरूषांसह, महिला, मुली, लहान मुलांसह सर्वच आंदोलनात सहभागी होतात. देशात विविध ठिकाणी हिजाबवरून महिलांची मोठ-मोठे आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाचे मोठे चित्र रंगवून हिंदू बांधवांना भीती दाखवून आपली मते प्नके करण्यात भाजपा पुन्हा एकदा यशस्वी झाल्यासारखे वाटत आहे. हिजाबचा वापर सर्व समाजातल्या मुली, महिला आज मोठ्या प्रमाणात करत आहेत. कोरोनात तर ते अधिक गडद झाले. फक्त मुस्लिम मुली काळ्या रंगाचा हिजाब एकसारखा वापरतात म्हणून ते लक्षात येते. खरे तर काळा रंग इस्लाम धर्माची ओळखही नाही. मग काळ्या रंगाचा अधिक वापर का? काळा रंग खरे तर सुखाचीही अनुभुती देतो आणि निषेधाचीही. कंबरेचा करदोडाही काळाच, गळ्यातील दोराही काळाच, तावीजलाही दोरा काळाच, राजकारण्यांना निषेधासाठीही दाखविले जाणारे झेंडेही काळेच, रात्रीचा रंगही काळाच अन् मंगळसुत्रात वापरला जाणारा दोराही काळाच. याचा नैतिकही आणि अनैतिकही वापर. यावरून आपण विचार करावा की काळ्या रंगाचे बुरखे अधिक का वापरले जात असावेत.
हिजाब...
हिजाब हा एक सुरक्षेचा, नैतिक मुल्यांचा, मुलींना ऐहिक आणि पारलौकिक जीवनात यशस्वीतेकडे घेऊन जाणारा, संवैधानिक हक्काचा आणि ईश्वर आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सांगितलेला मुद्दा/मार्ग ही आहे. त्यामुळे याचा चोहोबाजूंनी अभ्यास केला तर तो समजून येईल.
शाळा, महाविद्यालयात हिजाब वापरावा की न वापरावा....
खरे तर याचे उत्तर त्या मुलींनीच मला सांगितले, ज्या मुली हिजाब, बुरखा, स्कार्फ, परिधान करतात... मी मुलींना विचारले तर अधिक मुली हिजाब, स्कार्फ बांधण्याला अनिवार्य समजतात. त्यांचे म्हणणे आहे की, शिक्षणात आम्हाला हिजाबमुळे कधीच अडचण आली नाही. उलट यामुळे आम्हाला नैतिक बळ मिळते. त्यामुळे हिजाब, बुर्का, स्कार्फ याला मुभा असावी. याचा कलर काळा राहिला तर बरेच आहे. मात्र काळ्या कलरचा शाळा प्रशासन, सरकारला राग येत असेल तर तो तेथील प्रशासनाने ठरवावे. शारीरिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक, सामाजिक फायदे ही यामधून अधोरेखित होतात. हिजाब सारखा पोशाख नैतिकतेचे अधिक प्रतिनिधीत्व करतो. त्यामुळे हिजाबला शाळा, महाविद्यालयात परवानगी असावी. जबरदस्ती नको.
‘बेटी बचाव बेटी पढाव’ला हरताळ...
कर्नाटक भाजपा सरकारच्या आशिर्वादाने मंड्या येथील शाळेत मुलींना हिजाब, बुरखा परिधान केल्यावरून बाहेर काढण्यात आले. परीक्षेपासून वंचित ठेवले. खरे तर शाळा प्रशासन व सरकार संवैधानिक हक्कांची पायमल्ली करीत आहे. ’प्रधानमंत्री बेटी बचाव बेटी पढाव’चा नारा देत आहेत आणि एकीकडे मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणाऱ्यांना एकप्रकारे पाठिंबा देत आहेत. समजायचे काय... कुठली क्रोनोलॉजी आहे. इतका द्वेष कशासाठी?
हिजाब आणि आंदोलन
लोकशाहीत आंदोलनाला अधिक महत्त्व आहे. मात्र हे आंदोलन सर्वांनी मिळून आणि एक मुद्द्यावर केले तर यश मिळते. जसे शेतकरी आंदोलन, रस्ते, गावातील समस्या. मात्र एखाद्या विशिष्ट धार्मिक चिन्ह, रंग, पोशाख यावर असेल तर राजकीय पक्षांना याचा अधिक फायदा होतो. याला सर्वसमाज घटकांची साथ मिळत नाही. त्यामुळे आंदोलन यशस्वी होत नाही. ते तेव्हा यशस्वी होण्याची अधिक शक्यता असते जेव्हा तुम्ही बहुसंख्यांक असता आणि सरकार पाडण्याची क्षमता ठेवता. यासाठी असे मुद्दे न्यायालयीन लढाई द्वारे जिंकता येतात. न्यायालयही जनभावनाचा आदर करत आपले निर्णय फिरविते त्यामुळे आंदोलने गरजेची वाटतात. सरकारच्या दबावालाही न्यायालये बळी पडत चालल्याची चर्चा सध्या विचारवंतामधून बोलली जात आहे. मात्र माझा तर अजूनही आपल्या न्यायापालिकेवर दृढ विश्वास आहे. हिजाबवर जनजागृती करावी आणि सर्व समाजांना याचे यथोचित महत्व, माहिती समजेल अशा भाषेत द्यावी. हरिशंकर परसाई यांच्या मते, ’सत्य को भी प्रचार चाहिये अन्यथा वह मिथ्या मान लिया जाता है.’
कुरआन आणि हदीसमध्ये पोशाखाचे महत्व विशद करताना म्हटले आहे,
’1. लिबास ऐसा पहनिए जो शर्म व हया, गैरत व शराफत और जिस्म को ढाँके और उसकी हिफाज़त के काम को पूरा करे और जिससे तहज़ीब व सलीक़ा और जीनत व जमाल ज़ाहिर होता हो ।
कुरआन पाक में अल्लाह तआला ने अपनी इस नेमत का ज़िक्र करते हुए इरशाद फरमाया है के, ‘ऐ आदम की औलाद ! हमने तुम पर लिबास उतारा है कि तुम्हारे जिस्म की शर्मगाहों को ढाँके और तुम्हारे लिए जीनत और हिफाज़त का ज़रिया भी हो’ । (क़ुरआन, 7:26)
कुरआन मजीद की उक्त आयत में अरबी शब्द ’रीश’ आया है। ’रीश’ दरअसल चिड़ियों के पंखों को कहते हैं । चिड़ियों के पंख उसके लिए खूबसूरती का भी ज़रिया हैं और जिस्म की हिफाज़त का भी। आम इस्तेमाल में ’रीश’ शब्द जमाल व ज़ीनत और बहुत अच्छे लिबास के लिए बोला जाता है ।
लिबास का मक़सद साज-सज्जा और जिस्म को मौसम के असर से बचाना भी है, लेकिन पहला मक़सद शर्मवाले अंगों को ढाँकना ही है। ख़ुदा ने शर्म व हया इन्सान की फितरत में पैदा की है। यही वजह है कि जब हज़रत आदम (अलै.) और हज़रत हव्वा (अलै.) से जन्नत का अच्छा लिबास उतरवा लिया गया तो वे जन्नत के पेड़ों के पत्तों से अपने जिस्मों को ढाँपने लगे। इसलिए लिबास में इस मक़सद को सबसे ज़्यादा अपने सामने रखिए और ऐसा लिबास चुनिए जिससे शर्मगाहों को ढकने का मक़सद अच्छी तरह पूरा हो सके। साथ ही, इसका भी एहतिमाम रहे कि लिबास मौसम के असर से जिस्म की हिफाज़त करनेवाला भी हो और ऐसा सलीक़े का लिबास हो जो जीनत व जमाल और तहज़ीब का भी ज़रिया हो । ऐसा न हो कि उसे पहनकर आप कोई अजुबा या खिलौना बन जाएँ और लोगों के लिए हँसी और दिल्लगी का सामान इकट्ठा हो जाए । (संदर्भ: आदाबे जिंदगी)
कुरआनमध्ये अन्य ठिकाणी म्हटले आहे की, ’’हे नबी (स.), ’आपल्या पत्नी व मुली आणि श्रद्धावंतांच्या स्त्रियांना सांगा की आपल्या चादरीचे पदर आपणावर आच्छादून ठेवत जा. ही अधिक योग्य पद्धत होय जेणेकरून त्या ओळखल्या जाव्यात आणि त्रास दिला जाऊ नये. सर्वश्रेष्ठ अल्लाह क्षमाशील व परमकृपाळू आहे.’(संदर्भ : सुरह अल अहजाब :59). या आयतवरून लक्षात येते की, अल्लाहने प्रेषित सल्ल. यांच्या पत्नी, मुलींवर देखील चादरीचे पदर आच्छादून बाहेर पडण्यास सांगितले आहे. म्हणजे प्रेषितांच्या पत्नी आणि मुलींना देखील यातून सूट नाही. म्हणजेच सर्वांसाठी समान आदेश अल्लाहने दिलेला आहे. चादरीचे अच्छादन कसे असते हे आपणास ठावूक आहे. ते का परिधान करावे याचे सुद्धा कारण सदर आयातमध्ये दिलेले आहे.
....................................
कुरआनमध्ये दूसऱ्या एका ठिकाणी आदेशित केले आहे की, ’’आणि हे पैगंबर (स.), श्रद्धावंत स्त्रियांना सांगा की, त्यांनी आपल्या दृष्टींची जपणूक करावी आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे. आणि आपला साजशृंगार दर्शवू नये त्याव्यतिरिक्त जे सहजासहजी प्रकट होईल आणि आपल्या छातीवर आपल्या ओढणीचा पदर घालून ठेवावा. त्यांनी आपला साजशृंगार प्रकट करू नये परंतु या लोकांसमोर, पती, पिता, पतीचे वडील, आपली मुले, पतीची मुले, भाऊ, भावांची मुले, बहिणींची मुले आपल्या मेलमिलाफाच्या स्त्रिया, आपल्या दासी, गुलाम, ते हाताखालचे पुरुष जे एखादा अन्य प्रकारचा हेतू बाळगत नसतील आणि ती मुले जी स्त्रियांच्या गुप्त गोष्टींशी अद्याप परिचित झाली नसतील त्यांनी आपले पाय जमिनीवर आपटत चालू नये की जेणेकरून त्यांनी जो आपला शृंगार लपविलेला आहे त्याचे ज्ञान लोकांना होईल. हे श्रद्धावंतांनो, तुम्ही सर्वजण मिळून अल्लाहजवळ पश्चात्ताप व्यक्त करा, अपेक्षा आहे की सफल व्हाल.’’ (संदर्भ : सुरह अन्नूर 24:31)
सदर आयातीवरून आपल्या लक्षात येते की पर्दा, हिजाब का वापरावा. सरळ शब्द हिजाब व पर्दा जरी आला नसला तरी हिजाब व पर्दाचा जसा पोशाख आज महिला वापरतात तसा अर्थच वरील आयातींमधून स्पष्ट होतो.
अल्लाहने प्रत्येक पुरूष व स्त्रीला स्वतंत्र जन्मास घातले. त्यांच्या विचारांचे स्वातंत्र्य त्यांना दिले. खरे तर मनुष्याला सर्वश्रेष्ठ जीवाचा दर्जाचा आहे. तो कोणत्याही मार्गाने आपले जीवन जगू शकतो. ही पृथ्वी, आकाश आणि त्यामधील जे सर्वकाही आहे ते मानवजातीसाठीच आहे. परंतु अल्लाहने मानवासाठी या सृष्टीत त्याला अधिक फायदेशीर काय आहे आणि काय अपायकारक आहे याचेही मार्गदर्शन वेळोवेळी आपल्या प्रेषितांमार्फत लोकांना केलेले आहे. त्यांच्यासाठी एक आदर्श आचारसंहिता बनवून दिलेली आहे. जर मनुष्याने त्या आचारसंहितेचे पालन केले तर तो यशस्वी होईल. ईश्वराने कुरआन आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या द्वारे स्त्री-पुरूषांसाठी उत्तम आचारसंहिता सांगितलेली आहे ती समस्त मानवजातीसाठी आहे. या आचारसंहितेला नाकारण्याचा आणि स्विकारण्याचा अधिकारही सर्वस्वी आपणांस आहे. जे स्वीकारतील ते ऐहिक आणि पारलौकिक जीवनात सुख, शांती, समाधानाचा अनुभव घेतील. जे नाकारतील ते ऐहिक आणि पारलौकीक जीवनात अपयशी होतील. अल्लाहने सांगितलेल्या आदर्श आचारसंहितेचे मोठ्या प्रमाणात पालन करणाऱ्यांना मी पाहिले आहे. त्यावरून मी सांगतो. ईश्वरीय आचारसंहितेला विरोध कराल अथवा नाकाराल तर याचे परिणाम तो व्यक्ती आणि समाज भोगेल. ज्या लोकांनी ही आचारसंहिता नाकारली त्यांचे काय परिणाम झालेत याचे कुरआनमध्ये दाखलेही आहेत. त्यामुळे ही व्यवस्था इस्लामची आहे म्हणून तिचा द्वेष करू नका. सत्य - असत्यातील फरक, चांगले आणि वाईट यामधील फरक जाणून घ्या. अल्लाहकडे प्रार्थना आहे की, अल्लाह आम्हाला चांगली समज देओ आणि माझा देश जगात सर्वात सुंदर बनो. आमीन.
- बशीर शेख
Post a Comment