(३५) हे पैगंबर (स.)! हे लोक म्हणतात काय की या व्यक्तीने हे सर्वकाही स्वत:च रचले आहे? यांना सांगा, ‘‘जर मी स्वत: हे रचले असेल तर माझ्यावर माझ्या अपराधाची जबाबदारी आहे आणि जो अपराध तुम्ही करीत आहात त्याच्या जबाबदारीतून मी मुक्त आहे.’’३९
(३६) नूह (अ.) कडे दिव्य प्रकटन केले गेले की तुमच्या लोकांपैकी ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली, बस्स त्यांनीच ठेवली, आता कोणी मानणार नाही. त्यांच्या कृत्यांवर दु:ख करण्याचे सोडून द्या
(३७) आणि आमच्या देखरेखीत आमच्या दिव्य प्रकटनानुसार एक नौका बनविण्यास प्रारंभ करा. आणि पाहा ज्या लोकांनी अत्याचार केला आहे त्यांच्यासंबंधी माझ्याकडे कोणतीही शिफारस करू नका, हे सर्वच्यासर्व आता बुडणारे आहेत.४०
(३८) नूह (अ.) नौका बनवीत होता आणि त्याच्या जनसमूहाच्या सरदारांपैकी जो कोणी त्याच्या जवळून जात असे तो त्याची टिंगल उडवीत असे. त्याने सांगितले, ‘‘जर तुम्ही आमच्यावर हसत आहात तर आम्हीदेखील तुमच्यावर हसत आहोत,
(३९) लवकरच तुम्हाला स्वत: कळून चुकेल की कोणावर तो प्रकोप येईल ज्याने त्याची नामुष्की होईल आणि कोणावर ती आपत्ती कोसळेल जी टाळता टळणार नाही.’’४१
३९) वर्णनशैलीवरून असे वाटते की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या मुखातून आदरणीय नूह (अ.) यांची ही ऐतिहासिक घटना ऐकताना विरोधकांनी आपत्ती केली असेल की पैगंबर मुहम्मद (स.) अशा घटना अशासाठी सांगतात की त्यांना आमच्यावर चिटकून द्यावे. जो वार पैगंबर मुहम्मद (स.) आमच्यावर सरळ सरळ करू इच्छित नाही त्यांच्यासाठी एक घटना `दुसऱ्यांच्या गोष्टी'च्या रूपाने आम्हावर वार केले जाते. म्हणून वार्ताक्रमाला येथे तोडून या लोकांच्या आरोपाचे खंडन केले आहे.
खरे तर अशा नीच स्तराच्या माणसाच्या डोक्यात नेहमी एखाद्या गोष्टीचा वाईट पैलूच असतो आणि चांगुलपणाची त्याला काहीच आवड नसते जेणेकरून त्या गोष्टीच्या चांगल्या पैलूवर त्याची नजर जावी. एखाद्याने जर विवेकपूर्ण गोष्ट केली किंवा तुम्हाला तुमच्या चुकीच्या गोष्टीपासून सचेत करत आहे आणि लाभप्रद शिकवण देत आहे तर त्यापासून लाभ उठवा आणि स्वत:चा सुधार करून घ्या. परंतु नीच स्तरातील मानसिकतेचा माणूस नेहमी त्यात वाईटाचाच शोध घेईल आणि विवेक आणि उपदेशावर पाणी फेरेल. तो स्वत: दुष्टतेवर फक्त कायम राहात नाही तर उपदेश करणाऱ्यावरसुद्धा वाईट आणि खोटे आरोप करतो. चांगल्यातला चांगला उपदेश नष्ट केला जाऊ शकतो जर ऐकणारा त्याला हानिकारक होण्याचे स्वीकार करतो आणि त्याला आपल्यावरील एक वार समजतो. अशा वेळी त्याचे डोके स्वत:च्या अपराधाला मान्य करण्याऐवजी त्या उपदेशाला आपल्यावर टाकलेला एक वार समजतो. मग या प्रकारचे लोक सदैव त्यांच्या चितंनाचा आधार एका दुर्भावनेवर (द्वेषावर) ठेवतात. ज्याची बरोबर आणि चूक असण्याची एकसारखी संभावना असेल आणि ती तुम्हाला अगदी फीट बसत असेल. (पूर्ण लागू होत असेल) त्या उपदेशावरून तुमच्यातील एखादा दुर्गुण स्पष्ट होत असेल तर तुम्ही एका विवेकशील माणसाप्रमाणे त्यापासून लाभ उठवावा. जर तुम्ही पूर्वग्रहदूषित आणि दुष्ट मनोवृत्तीचे असाल तर तुम्ही पुराव्याविना हा आरोप लावून मोकळे होता की उपदेश करणाऱ्याने आम्हाला पुढे ठेवूनच ही गोष्ट रचली आहे. (असा उपदेश दिला आहे) म्हणून असे सांगितले गेले आहे की गोष्ट मी जरी रचली असेल तर त्या अपराधाला मी जबाबदार आहे. परंतु जो अपराध तुम्ही करीत आहात तो तर आपल्या जागी कायम आहे आणि त्याविषयीची पकड मात्र तुमचीच होणार आहे माझी नाही.
४०) यावरून माहीत होते की जेव्हा पैगंबराचा संदेश एखाद्या राष्ट्राला पोहचतो तेव्हा त्या राष्ट्राला तोपर्यंतच सवलत मिळते जोपर्यंत त्यात भल्या माणसांचे अस्तित्व असते. परंतु त्या वस्तीत (राष्ट्र) भली माणसं अजिबात नसतात आणि तिथे फक्त दुष्ट माणसांचेच राज्य असते तेव्हा अल्लाह त्या राष्ट्राला आणखीन सवलत देत नाही. अल्लाहच्या कृपेची निकड अशा वेळी हीच असते की सडक्या फळांच्या टोकरीला दूर फेकून द्यावे कारण त्यामुळे चांगली फळंसुद्धा नासली जाऊ नयेत. त्या वस्तीवर आता दया दाखविणे म्हणजे मानवी वंशाशी व्रूâरता आहे.
४१) हा एक विचित्र मामला आहे. यावर विचार केल्याने माहीत होते की मनुष्य जगाच्या बाह्यांगापासून किती मोठा धोका खातो. जेव्हा नूह (अ.) नदीपासून अतिलांब अंतरावर एका खडकावर आपले जहाज बनवित होते तेव्हा लोकांना हे हास्यास्पद कृत्य दिसत होते. ते हसून हसून सांगत असतील, ``बडेमियाँचा वेडसरपणा येथपावतो येऊन पोचला की हे महाशय खडकावर जहाज चालवणार आहेत. त्या वेळी कुणालाही स्वप्नात वाटत नसेल की काही दिवसांनंतर येथे पाणीच पाणी होऊन हे जहाज त्यावर चालू लागेल. ते या कार्याला आदरणीय पैगंबर नूह (अ.) यांच्या मानसिकतेच्या असंतुलनाचा पुरावा ठरवित असतील. प्रत्येकांना ते सांगत फिरत असतील की पूर्वी तुम्हाला या माणसाच्या वेडसरपणावर शंका होती परंतु आता तुम्ही स्वत:च्या डोळयांनी पाहा की तो काय वेडेपणा करीत आहे. परंतु जो माणूस वास्तविकतेची जाणीव ठेवून होता आणि ज्याला हे माहीत होते की उद्या येथे जहाजाची आवश्यकता भासणार आहे. लोकांच्याच मूर्खपणावर, निष्काळजीपणावर आणि अज्ञानतेवर नूह (अ) यांना हसू येत असेल. ते सांगत असतील की किती नादान आणि अविचारी लोक आहेत. संकट त्यांच्या डोक्यावर आहे, मी यांना सावधान केले आहे, त्यांच्या डोळयांसमोर संकटापासून वाचण्याची मी तयारी करीत आहे. परंतु हे लोक संतुष्ट होऊन बसले आहेत. असे असूनसुद्धा हे लोक मलाच वेड्यात काढत आहेत. या मामल्यास स्पष्ट पाहिले गेले तर माहीत होते की जगातील प्रत्यक्ष आणि प्रकट पैलूच्या दृष्टीने बुद्धिमत्तेला आणि मूर्खतेला कसोटी बनविली जाते. परंतु ही कसोटी त्या कसोटीपेक्षा अगदी वेगळी असते जी वास्तविक ज्ञानाच्या दृष्टीने तयार होते. बाह्य दृष्टी ठेवणारा मनुष्य ज्याला अतिबुद्धिमत्ता समजतो ती वास्तविक दृष्टी ठेवणाऱ्या माणसाला अतिमुर्खता वाटते. प्रत्यक्ष पाहणाऱ्याजवळ ज्या गोष्टी बेकार, वेडेपणा आणि चेष्टेचे विषय असतात परंतु वास्तविक दृष्टी ठेवणाऱ्याला तेच विवेकशील, अत्यंत गंभिरतापूर्ण आणि बुद्धीपूर्ण वाटते.
Post a Comment