शेवटी साऱ्या पाश्चिमात्य राष्ट्रांनी कोरोना विषाणूच्या संदर्भात एकच भूमिका घेतली आहे. ती म्हणजे ह्या विषाणूचा उगम नैसर्गिकरित्या झालेला आहे अथवा चायनाने या विषाणुला लॅबमध्ये तयार केले आहे. जाणूनबुजून जैविक हत्यार बनविण्यासाठी ह्या विषाणूची निर्मिती केली गेली, की लॅबमधील काही चूक झाल्याने तो विषाणू बाहेर पडला आणि साऱ्या जगाला मृत्यूच्या दाढेत ढकलले. आजवर जी चर्चा झाली आणि होते आहे यावरून हे स्पष्ट झाले आहे की जगाच्या कित्येक राष्ट्राच्या राष्ट्रप्रमुखांनी हे विषाणू नैसर्गिक नसून तो मानवनिर्मित आहे, असे मत व्यक्त केलेले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जेव्हा स्वतः आपला संशय व्यक्त करीत ह्या विषाणूचा उगम कुठून आणि कोणत्या परिस्थितीत झाला याचा तपास करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी निश्चित केला. तपासाचे स्पष्ट संकेत असे आहेत की हा विषाणू मानव निर्मितीच आहे. यावर त्यांना काही संदेह नाही.
चायनाची भूमिका अधिकच संशय निर्माण करणारी आहे. त्याने बाईडेनला प्रत्युत्तर देताना थेट अमेरिकेवर न्यू्नलीयर हल्ल्याची धमकी दिली. कोणत्याही राष्ट्राने असे म्हटले नसताना की चायनाने जाणून बुजून हे विषाणू निर्माण केले आहे. तेव्हा त्याने स्वतःच चौकशीसाठी पुढे यायचे होते. अंतीम युद्धाची धमकी कशाला? जेव्हा आपण काहीच केले नसेल तर चौकशीची चिंता कशाला? खुद्द त्या राष्ट्राचे हजारो लोक मृत्यूमुखी पडले आहेत. 80 हजाराच्या पुढे लोकांना कोविडचा संसर्ग झाला. असे असतांना त्या राष्ट्राने स्वतःच ह्या विषाणूच्या निर्मितीबद्दल वुहान लॅब जिथून हा विषाणू बाहेर पडला होता त्याची त्यातील काम करणाऱ्या वैज्ञानिक विषाणू तज्ज्ञांची चौकशी करायला हवी होती. त्यांनी तसे काही केले नाही. सुरूवातीपासूनच त्याचे म्हणणे असे आहे की, हा विषाणू वटवाघळाद्वारे माणसांत पोहोचला. याचा पुरावा त्याने जगासमोर आजवर आणलेला नाही. त्याने जे सांगितले तेख खरे आणि बाकी सारे जग खोटे असे होत नसते. सुरूवातीला जेव्हा जगभराच्या नागरिकांकडून राष्ट्रप्रमुखांकडून चायनाच्या वुहान लॅबकडे बोट दाखवण्यात येत होते तेव्हा अमेरिकी वैज्ञानिक याचा नकार करत म्हणत होते की, ह्या विषाणूबद्दल असे म्हणणे चुकीचे आहे. माणसांनी हे निर्माण केले नसेल. पण नंतर एका वर्षांनी जगातल्या बऱ्याच राष्ट्रांनी ह्या विषाणूच्या निर्मितीवर संशय घेण्याची सुरूवात केली तेव्हा प्रथम ऑस्ट्रेलिया आणि नंतर इतर राष्ट्रांचे वैज्ञानिकांचे वुहान लॅबमधून हा विषाणू बाहेर कसा पडला यावर प्रश्न उपस्थित करू लागले.
वुहान शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. वुहान शहराकडे बोट दाखवले गेले हे सत्य असले तरी थेट वुहान लॅबलाच का लक्ष्य केले गेले? हा अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे.
या प्रश्नाचे उत्तर अमेरिकी तज्ञांना माहित असणार आहे. कारण वुहान लॅबमध्ये सर्रास कोरोना वायरस या विषाणूचा अभ्यास केला जात होता. गेन ऑफ फं्नशनिंग या सुुत्राचा अभ्यास करीत कोणत्याही विषाणूची प्रक्रियाच आधी अभ्यास करून त्या प्रक्रियेत बदल केल्यास विषाणूदर याचा काय परिणाम होतो हा अभ्यास कोरोनावर वुहान लॅबमध्ये चालू होता. या अभ्यासाला अमेरिकेतील तज्ञ पीटर डेस्साक यांनी स्वतः निधी पुरवला होता. आणि नंतर आलेल्या बातम्यानुसार त्यांनी एकट्यानेेच नाही तर अमेरिकेचे विषाणू तज्ज्ञ डॉ. फौची यांनी देखील या प्रोजे्नटसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले होते. म्हणजे वुहान लॅबमधील घडामोडीत या दोघांचाच नव्हे तर अमेरिकेतील इतर तज्ञांचाही सहभाग होता.
सुरूवातीला जेव्हा जगाच्या इतर राष्ट्रपती प्रथम आस्ट्रेलियानंतर इटली, ब्राझील यांनी मानवनिर्मित विषाणूची भूमिका घेतली तेव्हा अमेरिकेतील तज्ञांनी लॅन्स्टेया महत्त्वाच्या नियत कालिकेत एक लेख प्रकाशित केला ज्याद्वारे हा विषाणू पशुमधून आधी वटवागुळे आणि नंतर एक वन्य प्राण्यांच्या माध्यमातून माणसांपर्यंत असे म्हटले गेले. अमेरिकेने या विषाणूच्या जगभर प्रसारात चीनद्वारे मदत केली असे म्हटले गेले तर ते चुकीच ठरणार नाही. जेव्हा सगळीकडून मानवनिर्मित विषाणूला पाठिंबा मिळू लागला तेव्हा स्वतः डॉ. फौची यांनी देखील आपली भूमिका बदलली आता ते म्हणतात की ह्या विषाणूची लागण माणसाला पशुंच्या साह्याने झाली असेल याच्याशी ते सहमत नाहीत.
अमेरिका आणि पाश्चात्य वंशवादी राष्ट्रांना मानवजातीच्या नरसंहाराची सुरूवातीपासूनच सवय पडलेली आहे. आपल्या सभ्यतेच्या प्रसर प्रचारासाठी या राष्ट्रांना आजवर एक अब्जावर नागरिकांना ठार केले आहेत. कोरोनामुळे 40-50 लाख मारले गेले असतील तर त्यांच्याकडे काहीच नाही. या साऱ्याचा सारांश असा की अमेरिकन आणि युरोपियन वैज्ञानिकांनीच कोरोना विषाणूची निर्मिती केली पण यासाठी चायनाच्या वुहान लॅबचा वापर करून घेतला. चायनाला हा सगळा खटाटोप माहित नसेल असे नाही. त्याचेही उद्दीष्ट मानव जातीची सर्रास कत्तल करणे हाच असल्याने त्यांनी जाणून बुजून वुहान लॅबमध्ये अमेरीकी तज्ज्ञांच्या सहाय्याने जे काही चालले आहे त्यांच्याकडून डोळेझाक केली.
आज न उद्या ह्या कारस्थानांचे सत्य बाहेर येणारच आणि त्यासाठी जे राष्ट्र जबाबदारी असतील त्यांनी त्याची किंमत मोजावी लागणार हे मात्र नक्की.
Post a Comment