Halloween Costume ideas 2015

सत्तांतराचा महाराष्ट्र पॅटर्न इजराईलमध्ये


गेल्या 12 वर्षांपासून सत्तेत असणारे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना शेवटी पायउतार व्हावे लागले. अवघ्या एका मताने संसदेत त्यांना हार पत्करावी लागली. नेफ्टाली बेनेट यांची पंतप्रधान पदावर वर्णी लागली. आठ पक्षाचे सरकार 13 जून रोजी सत्तेत आले. पॅलिस्टीनी लोकांवर 11 दिवसाचे युद्ध लादूनही, राष्ट्रवादाचे स्फुलिंग पेटविण्यामध्ये नेतान्याहू यांना अपयश आले. सत्ता सोडताना नेतान्याहू यांना ज्या वेदना झाल्या त्या त्यांना लपविता आल्या नाहीत. सभागृहात केलेल्या भाषणात त्यांनी या सत्तांतराला अभद्र लोकांची युती तसेच राष्ट्रावर आलेले संकट या शब्दात नवीन सरकारचे स्वागत केले. त्यांनी यासाठी जोबायडन यांना जबाबदार धरत त्यांच्यावर प्रचंड तोंडसुख घेतले.

नेतान्याहू हे 1996 ते 1999 तसेच 2009 ते 2021 पर्यंत पंतप्रधान म्हणून काम करत होते. दोन वर्षात तीन निवडणुका होवूनही त्यांना बहुमत न मिळाल्याने शेवटी त्यांना पद सोडावे लागले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.

71 वर्षीय नेतान्याहू इजराईलच्या राजकीय इतिहासातील सर्वात जास्त काळ राहणारे पंतप्रधान ठरले. त्यांचे समर्थक त्यांना किंग बीबी या नावाने हाक मारतात. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी लष्करामध्ये आपली सेवा बजावली होती. त्यांचे शिक्षण तेल अवीव आणि अमेरिकामध्ये झाले. त्यांचा भाऊ जोनाथन नेतान्याहू याला आजही इजराईलमध्ये राष्ट्रीय नायक म्हणून मिरविले जाते. 1976 मध्ये युगांडाच्या अँटेबे विमानतळावरून इजराईली बंधकांना सोडविताना ते धारातीर्थी पडले होते. मात्र सर्व इजराईली नागरिक सुखरूप मायदेशी परत आले होते. त्यांच्या या त्यागाचा भरपूर लाभ नेतान्याहू यांनी उचलला. 

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget