इस्लामोफोबिया खरे तर एक मानसिक आजार आहे. फोबियाचा अर्थ भीती आहे. साधारणतः माणसांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती असते. कुणाला पाण्याची भीती असते, कुत्रा चावल्यावर पीडिताला पाण्यापासून भीती वाटते. त्याला हायड्रोफोबिया म्हणतात. कुणाला उंचीवरून खाली पाहताना भीती वाटते. कुणी विमानाच्या प्रवासाला भीत असतात. अशा कित्येक गोष्टी आहेत ज्यांना विविध प्रकारच्या माणसांना भीती वाटत असते. म्हणजेच हा एक वास्तविक आजार नसून मानसिक आजार आहे. म्हणून सध्या जगातल्या कित्येक ‘सुसंस्कृत सभ्यतां’ना इस्लामची भीती वाटते. ते मानसिक आजारी आहेत. त्याचा उपचार त्यांनी मानसशास्त्र तज्ज्ञांकडून करून घ्यायला हवा. मुस्लिमाची स्थिती वेगळीच आहे. ते इस्लामोफोबियाने ग्रस्त राष्ट्रांना भीत आहेत. म्हणजे जे स्वतः भित्रे आहेत त्यांनाच मुस्लिम लोक भिऊ लागले आहेत. जे लोक इस्लामोफोबियाने ग्रस्त आहेत ते मुस्लिमांना भीत नाहीत. त्यांना भीती इस्लाम आणि इस्लामी शिकवण, त्याची नैतिक मूल्ये आणि अशा विचारसरणीची वाटते, की जर ती जगभर पसरली तर त्यांच्या स्वतःच्या वंशवादाला यापासून धोका आहे. इस्लामची राजकीय व्यवस्था, त्याची अर्थव्यवस्था, त्याचे गत काळातील वैभव आणि नैतिकतेची भीती वाटते. याचे कारण त्यांच्याकडे या इस्लामी व्यवस्थेला रोखण्यासाठी त्याच्या तोडीची कोणतीच व्यवस्था नाही. त्यांच्याकडे नीतीमत्ता नाही. ऐहिक जीवनाच्या ऐशोआरामात ते इतके व्यस्त झालेले आहेत की जर त्यांच्याविरूद्ध एखाददुसऱ्या व्यवस्थेने आव्हान उभे केले तर ते त्याचा सामना करू शकणार नाहीत. कारण दहशतवादाने प्रेरित मानसिकतेत मानवतेला देण्यासाठी काहीही शिल्लक नाही. इस्लामच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांनी घोषणा केली की या जगाचा स्वामी एकच आहे. त्याच वेळी मक्केतील लोकांना हे कळून चुकले होते की याचा अर्थ सध्याच्या व्यवस्थेला उलटून लावण्याचा आहे. म्हणून ते इस्लामला भिऊन, आपल्या ऐहिक सुखसाधनांच्या रक्षणासाठी असमर्थ असल्याची त्यांना जाणीव झाली आणि म्हणून इस्लामच्या उदयाच्या भीतीपासून बचावासाठी ते काही करू शकत नाहीत. त्यामुळे ते भयभीत झाले. त्या काळापासूनच जगाला इस्लामोफोबियाने ग्रासले आहे. त्यांना हे माहीत होते की ज्या एकमेव अल्लाहची प्रेषित घोषणा करत आहेत त्यांच्या समोर त्यांचे देवीदेवता काही करू शकणार नाहीत. विचारांशी लढा ते देऊ शकत नव्हते. म्हणून विरोधासाठी त्यांनी ज्या लोकांनी प्रेषितांच्या हाकेला प्रतिसाद दिला त्यांच्या जीवावर उठले. अन्याय-अत्याचाराचा मार्ग स्वीकारला. त्यांना चांगले माहीत होते की हा उपाय त्यांना फारसा टिकू देणार नाही आणि बघता बघता दहा वर्षांतच त्या सर्व इस्लामोफोबिक शक्तीचा पराभव झाला. अशीच काही स्थिती सध्या आहे. इस्लामचा पुन्हा उदय होऊ नये यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण मुस्लिमांच्या कुजलेल्या अवस्थेत देखील इस्लामचे शक्तीकेंद्र पवित्र कुरआन आणि प्रेषितांच्या शिकवणी आजही बाकी आहेत. त्यांना कधीली संपवता येणार नाही, हे कळून चुकल्याने त्यांनी इस्लामला दहशतवाद म्हणून घोषित केले आणि स्वतःच दहशतवादाचे बळी पडत आहेत की काय म्हणून त्यांना इस्लामोफोबियाचा राग इतका जडलेला आहे की यातून त्यांची सुटका होणे त्यांना शक्य दिसत नाही. राहिला प्रश्न मुस्लिमांचा तर अल्लाहने त्यांना आधीच सांगितले आहे की त्यांनी इस्लामचा स्वीकार केल्यावर यातना दिल्या जातील, ते त्यांना सहन कराव्या लागतील. फुकटातच या जगती ऐशआराम आणि परलोकात देखील त्यांना वैभवाचे स्थान मिळणार नाही. पवित्र कुरआनात अल्लाहने स्पष्ट केले आहे की “तुमची परीक्षा घेतली जाईल, भीतीने, उपासमारीने, तुमच्या घरादारांचे मालमत्तेचे नुकसान सहन करावे लागेल. तुम्हाला आणि तुमच्या संततीला या परीक्षेद्वारे आजमावले जाईल, यात त्यांचे आणि त्यांच्या आपत्यांचे प्राणदेखील पणाला लागतील.” मुस्लिमांना या सर्व परीक्षांचा सामना करावा लागणार आहे. म्हणून त्यांनी अल्लाहची भीती बाळगावी, इस्लामोफोबियाने ग्रस्त लोकांना भिऊ नये. कॅनडामधील ज्या व्यक्तीने एका मुस्लिम परिवाराला आपल्या मोटारीखाली चिरडले तो मानसिक भीती ग्रस्त होता. त्या कुटुंबाकडून त्याला कोणतीच भीती नव्हती, हे त्याला माहीत होते तरीदेखील त्याच्या भीतीची तीव्रता इतकी अधिक होती की त्याने कसलाच विचार केला नाही. अशा मानसिक रोगींना मुस्लिमांनी भिण्याचे काहीच कारण नाही. इतिहासात एखाद्या मुस्लिम व्यक्तीने परधर्मियाच्या भीतीने असे कार्य कधीच केले नाही कारण मुस्लिमाला अल्लाहशिवाय कुणाचीच भीती नसते जे भितात ते मुस्लिम नसतात.
- सय्यद इफ्तिखार अहमद
संपादक
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment