कोल्हापूर | अशपाक पठाण
कोरोना एका अशी महामारी जिन्हे देशालाच नव्हे तर जगाला हादरून टाकले. जगात असा एकही देश उरला नाही ज्या ठिकानी या महामारीने विनाश केला नाही. पण अशातच दुसरीकडे या कोरोनामुळे संपूर्ण जग एकत्र आले आहे. जगातील लोक जात - धर्मा पलीकडे फक्त आणि फक्त माणुसकीपण जोपासताना दिसत आहेत. याच गोष्टीची प्रेरणा घेऊन कोल्हापूरातील एक मुस्लिम तरुणाचा समूह ज्याला बैतुलमाल कमिटी या नावाने ओळखले जाते. या समुहाने कोरोना काळात पीडितांच्या दुःखाना कमी करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला.
बैतुलमाल कमिटी 2001 पासून जाफर बाबा सैय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. कमिटीत 25 ते 30 तरुणांचा समावेश आहे. कोरोना महामारीची सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळी त्याची तीव्रता पाहून या कमिटीने 65 लाख रुपये खर्च करून कोल्हापूरमधील सि. पी.आर. हॉस्पिटल व इचलकरंजीमधील आय. जी. एम हॉस्पिटल मध्ये आय.सी. यू. युनिट तयार करून प्रशासनाला मदत केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी उपचारा दरम्यान मोठया प्रमाणात मृत्यू होत होते. मृत व्यक्तीचे प्रेत घेण्यासाठी घरची मंडळी धजावत होती. अश्या वेळी बैतूलमाल कमिटीत काम करणाऱ्या तरुणांनी ती व्यक्ती कोणत्या समजाज व धर्माची आहे हे न पाहता माणुसकीच्या नात्याने 1 हजार 700 च्या वर पार्थीवावर दफनविधी, अंतिम संस्कार केले आहेत.
यावेळी लागणारा पैसा त्यानी स्वतःजवळील खर्च केला. दवाखान्यातून मयत घेऊन येण्यापासून ते अंतिमसंस्कार करेपर्यंत सर्व कार्य कमिटीतील लोकांनीच केले आहे. अश्या या तरुणाच्या कार्याचा आदर्श नवयुकांनी व समाजांनी घेण्याची गरज आहे. बैतुलमाल कमिटी या कामा व्यतिरिक्त 300 गरजू, विधवा लोकांना महिन्याचे राशन पुरवठा करतात, अनेक लोकांचे ऑपरेशनसाठी आर्थिक मदत करतात, सोबतच ज्याची परिस्थिती हलाकीची आहे अश्या कुटूंबातील व्यक्तीच्या मुलीचे लग्नाचे कार्यात ही मदत केली जाते.
नुकताच यांच्या कार्याची दखल म्हणून लोकमत समूहाकडून ’ महाराष्ट्र ऑफ दि इयर ’2021 या पुरस्काराने बैतुलमाल कमिटीला सन्मानित करण्यात आले. कमिटीत जाफर बाबा सैय्यद, राजू नदाफ, वासिम चाबूकस्वर, जाफर कादर मलबारी, तौफिक मुल्लानी, जावेद मोमीन, समीर बागवान,सैफुला मलबारी, युनूस शेख, सलीम मांडा, सलाम मलबारी, नईम शेख इ. लोकांचा महत्वाचा सहभाग आहे.
माणसाचे आयुष्य हे अल्प काळाचे आहे. या अल्पकाळातील सत्कर्मावर त्याच्या पारलौकिक जीवनाचा डोलारा सजणार आहे. मनुष्याची गणना सर्वश्रेष्ठ जीव म्हणून केली जाते. जर मनुष्य सर्वश्रेष्ठ जीव आहे तर त्याच्या हातून सर्वश्रेष्ठ कार्यही घडणे अपेक्षित आहे. त्यामुळे आम्ही ईश्वराच्या आदेशाप्रमाणे सर्वश्रेष्ठ जीवांच्या सेवेसाठी प्रयत्नशील आहोत. प्रत्येकाने आपल्यातील श्रेष्ठत्व टिकविण्यासाठी सत्कर्माचे सोपे व्रत आपल्या जीवनात अंगीकारले तर निश्चितच आमच्यावर येणारी संकटे टळू शकतील. सर्वांनी मानवसेवेसाठी पुढे येवून कार्य केले तर निश्चितच सोनियाचे दिवस येतील.
Post a Comment