भारताच्या दक्षिण-पश्चिम सागरी तटापासून 200 ते 440 किलोमीटर लांब लक्षद्वीप नावाचा एक द्विप समुह आहे. सदरचे द्विप हे केंद्रशासित प्रदेश आहे. या ठिकाणी विधानसभा किंवा विधानपरिषद नाही. हा देशातील सगळ्यात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ फक्त 32 वर्ग किलोमीटर आहे. जमीनीचा आकार 4200 वर्ग किलोमीटर आहे. याची क्षमता फक्त एका जिल्ह्याएवढी आहे. कवररत्ती नावाचे गाव लक्षद्विपची राजधानी आहे. हा द्विप समूह केरळ उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येतो. केंद्र शासित प्रदेश म्हणून याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. येथील लोकसंख्या फक्त 70 हजार आहे. यात 96 टक्के मुस्लिम आहेत. येथून फक्त एक खासदार निवडून जातो. सध्या मोहम्मद फैजल हे खासदार म्हणून लोकसभेमध्ये प्रतिनिधीत्व करत आहेत.
अलिकडे शांत असणारे हे द्विप अचानक प्रकाशझोतात आले आहे. 5 डिसेंबर 2020 रोजी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती या द्विपकल्पाचे प्रशासक म्हणून केंद्रशासनाने केली. गुजरातचे राहणारे प्रफुल्ल पटेल यांनी लक्षद्विपमध्ये ते सर्व नवीन प्रयोग सुरू केले जे यापूर्वी गुजरातमध्ये करण्यात आलेले आहेत. 96 टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या या द्विपकल्पात त्यांनी बीफ बॅनचे नोटिफिकेशन आणलेले असून, स्थानिक पंचायत निवडणुकांमध्ये त्या लोकांना निवडणूक लढण्यास प्रतिबंध करण्याची त्यांची योजना आहे ज्यांना दोन पेक्षा जास्त मुलं असतील. याशिवाय, लोकांना अटक करण्यासाठी गुंडा अॅ्नट (युएएसए-2021) आणण्याचीही त्यांची योजना आहे. खा. मोहम्मद फैजल यांनी प्रशासक पटेल यांच्यावर नाराजी व्यक्त करतांना पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, पटेल या छोट्याशा द्विपमध्ये 50 मीटर रूंद सडकेचे निर्माण करू पाहत आहेत. स्मार्ट सिटी प्रोजे्नट अंतर्गत नवीन सरकारी इमारती बांधू पाहत आहेत. आम्ही विकासाच्या विरूद्ध नाहीत. परंतु, त्यांच्या हे लक्षात येत नाही. की छोट्या छोट्या द्विपसमुहामध्ये असे मोठे निर्माण प्रकल्प घेतल्याने लोकांच्या अडचणीमध्ये वाढ होईल. पटेल यांची कार्यशैली एकाधिकारशाहीची आहे. निवडून आलेल्या स्थानिक प्रतिनिधीबरोबर चर्चा करण्याची त्यांची तयारी नाही. 29 जानेवारीला त्यांनी अॅन्टीसोशल अॅ्नटीव्हिटी रेग्युलेशन ड्राफ्ट तयार करून घेतला आहे. हा ड्राफ्ट मंजूर झाल्यास कोणत्याही नागरिकाला एक वर्षापर्यंत तुरूंगात ठेवण्याचा अधिकार शासनाला मिळेल. एनसीआरबी (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) च्या आकडेवारीअनुसार लक्षद्वीपमध्ये देशातील इतर कुठल्याही भागाच्या तुलनेत सर्वात कमी गुन्हे घडतात. अशा ठिकाणी अशा कठोर कायद्याची गरज काय? असे नागरिकांकडून संतप्त प्रश्न विचारला जात आहे. खा. फैसल यांनी हे ही सांगितले की, येथील नागरिकांचे प्रमुख अन्न बीफ हे मिड्डे मीलमधून पटेल यांनी वगळण्याचे निर्देश दिलेले आहेत.’’ थोडक्यात पटेल हे स्थानिक नागरिकांची कोंडी करू पाहत आहेत.
Post a Comment