देशात कोरोनामुळे किती लोकांचे प्राण गेले हा आकडेवारीचा प्रश्न नाही. एकाही माणसाच्या जीवाची किंमत काय असते ती फक्त त्याच्या आई-वडिलांना, मुलांना विचारा. कोट्यवधी रुपये जरी कुणी देऊ केले तरी आपल्या प्रिय नातेवाईकास मृत्यूच्या तोंडात देण्यास नकार देतील. नैसर्गिक मृत्यू आल्यास कुणालाही दुःख होते, पण काही दिवसांनी लोक ते विसरून जातात आणि आपल्या पुढच्या जीवनाकडे लक्ष देतात. मात्र मरणाऱ्याची, त्याच्या नातेवाईकांची काहीच चूक नसताना कणाला जरी अकाली मृत्यू आला तर त्याचे दुःख कधीच थांबत नाही. जन्मभर त्या दुःखाचे स्मरण करत शेवटी तेही मरण पावतात. कोरोनामुळे ठार झालेल्यांची (मृत्यू नव्हे तर त्यांना ठार केले गेले) संख्या किती? शासनाची आकडेवारी खरी की खोटी यावर सगळीकडे सध्या चर्चा होत आहे. सरकारी आकडेवारी खरी की खोटी? असा प्रश्नदेखील लोक विचारतात. सामान्य माणसांनी काही विचारले तर त्याकडे कोण लक्ष देणार? भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये इथल्या नागरिकांना ज्या यातनांना सामोरे जावे लागले त्याचे दुःख आगामी शंभर-दोनशे वर्षेदेखील लोक विसरू शकणार नाहीत. दुःख मेलेल्यांचे नाही, दुःख याचे आहे की लोक एकेका श्वासासाठी तडफडत होते. ऑक्सिजन त्यांना मिळत नव्हते. अशात ऑक्सिजनसहित औषधांचा काळा बाजार अमानुष आरोग्य कर्मचारी, अमानुष नेते करत होते. दवाखान्यात पोहचायला वाहन मिळत नव्हते. अॅम्ब्युलन्सचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा याच काळात होत होता. मेलेल्यांच्या अंत्यविधीसाठी ब्लॅकमध्ये पैसे उकळण्यात येत होते. मरतानादेखील यातना मेल्यावरदेखील मयताबरोबरच नातेवाईकांना यातना, संघाच्या नेत्यांनी त्यांच्या मते भलामोठ्या लोकांच्या सेवेचा विचार प्रस्तुत केला. सकारात्मक राहा. सकारात्मक विचार करा. जो माणूस मृत्युच्या दाढेत क्षणोक्षणी जात आहे त्याला मृत्यूबद्दल सकारात्मक राहायला सांगत होते. मेल्यावरसुद्धा त्यांना कोडले नाही. संघवाले म्हणाले, “जे मेले ते मुक्त झाले”. जे मुक्त झाले ते मेले बाकिच्यांचे काय? जेव्हा माणसाला शासनाची, शासनाच्या साहाय्याची अधिक गरज होती ऐन त्याच वेळेला शासन गायब होते. निवडणुका लढवत होते. स्वतःसाठी महाल बांधत होते. कशा कशाबद्दह सकारात्मक विचार करायचा हे संघवाल्यांनी स्पष्ट केले नाही. देशावर कोणतीही आपत्ती कोसळली की संघाचा कुठे थांगपत्ता नसतो. हे सरकारच त्यांचे असल्याने सरकारचासुद्धा कुठे ठावठिकाणा नव्हता. जर आपण त्यांचा इतिहास पाहिला तर एकंदरीत असे पाहायला मिळेल की देशाच्या स्वातंत्र्यापासून देशावर कोणतेही संकट कोसळले तर त्यांचा कठेही पत्ता नसतो. पण जर लोक खुशालीत जीवन जगत असतील, काही प्रमाणात सगळीकडे शांतता असेल, भरभराटीचे दिवस असतील, तर अशा वेळी मात्र सगळीकडे संघाच्या कारवाया चालू असतात. नोटबंदी करून देशाच्या नागरिकांची संपत्ती लंपास करण्याचा असो की दंगे करून लोकांची शांतता भंग करण्याचे कारस्थान असो, सगळीकडे हे लोक नजरेत पडतील. सगळीकडे सुरळीत जीवन चालू असताना ठिकठिकाणी विस्फोट करून निष्पाप लोकांची हत्या केली जाते. याला जबाबदार कोण? याचे उत्तर भारतीय शासनासहित इथल्या पोलीस यंत्रणेला वास्तविकतेचे पूर्ण ज्ञान असूनदेखील यासाठी एखाद्या धार्मिक समुदायाला हक्ष्य करतात. या मागेदेखील तीच विचारधारा जी कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्यांविषयी अमलात आणली गेलेली आहे. लोकांचे प्राण घेणे, कोणत्या न् कोणत्या कारणांनी जगातील तज्ज्ञ लोक भारतात कोरोनाने मरण पावलेल्यांची संख्या शासकीय आकडेवारीच्या कित्येक पटींनी जास्त असेल असे म्हटले आहे. काहींच्या मते हा आकडा फाळणीत जितके लोक मारले गेले त्यापेक्षाही जास्त असेल. हे जाणून भाजपावाल्यांना समाधानच झाले असणार. कारण त्यांचे उद्दिष्ट रक्तपात आहे. लक्षद्वीप सध्यचे उदाहरण द्या. तेथे लोक शांततेने जगत असताना त्या बेटाला विकासाचे लक्ष केले गेले. विकास म्हणजे अशांतता, नासधूस, यातना देणे यापलीकडे काहीच नाही.
- सय्यद इफ्तिखार अहमद
संपादक,
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment