‘आयटा’चे शैक्षणिक जागरूकता अभियान
मुंबई प्रतिनिधी
कोरोना संसर्गामुळे संपूर्ण जग होरपळून निघालेला आहे. अर्थव्यवस्थेसह शिक्षण क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला, असून गेल्या दीड वर्षांपासून शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दूरावस्थेमुळे खूप चिंतित आहेत. मागील वर्षाच्या अनुभवावरून असे दिसून आले आहे की विद्यार्थ्यांना वेळेत शिक्षणामध्ये सक्रीय न केल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. शिक्षक, पालक आणि , विद्यार्थी आणि समाजातील जबाबदार व्यक्ती यांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपापल्या क्षेत्रात नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत उल्हासाने केले पाहिजे आणि शैक्षणिक जन जागृतीसाठी जास्तीत जास्त सक्रिय रहावे. या पार्श्वभूमीवर, ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन (आयटा) महाराष्ट्राने 15 दिवसांच्या राज्यव्यापी शैक्षणिक जागरूकता अभियान राबविण्याचे ठरविले आहे.
यासंदर्भात ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन या शिक्षक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी माध्यमांशी संवादात म्हणाले, आम्ही विविध माध्यमाद्वारे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना शिक्षणाकडे प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करू. शिक्षणाचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी भू-स्तरावर काम करणे, विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाइन शिकवण्याच्या पद्धतींशी जोडण्यासाठी अधिकाधिक पावले उचलणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ही उद्दीष्टे साध्य करण्यासाठी, सर्व आयटा शिक्षक संघटनेचे पद अधिकारी आणि सदस्य आपापल्या भागातील शाळा, शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे आणि सामाजिक व सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने कार्य करतील.
आयटा शिक्षक संघटने प्रदेशाध्यक्ष सय्यद शरीफ म्हणाले, की आयटाद्वारा पंधरा दिवसीय शिक्षण जनजागृती मोहीम चे उद्दिष्टे, उपक्रम आणि कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी राज्य स्तरावर एक राज्यव्यापी समिती नेमली आहे. परस्पर सल्लामसलतद्वारे, कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पावले उचलण्यात येतील, वेगवेगळे उपक्रम राबविले जातील, जागरूकता उपाययोजना केल्या जातील, या उपायांमध्ये शैक्षणिक भेटीगाठी, शिक्षकांशी संवाद, विद्यार्थी व पालकांना भेटून त्यांना शिक्षणाचे महत्व सांगण्यात येईल. या शीर्षकाअंतर्गत, धार्मिक स्थळांना शुक्रवारचे प्रवचन, उच्चशिक्षित व सेवानिवृत्त शिक्षकांकडून सहकार्य, घेण्यात येईल वर्तमानपत्रांमधून शैक्षणिक जागृतीचे लेख प्रकाशित करणे, मोहल्ला समित्या व मशिदींच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन परिस्थिती जाणून घेण्यासाठी आणि सहकार्यासाठी विनंती करणे, ऑनलाईन शिकवणीसाठी शिक्षक कार्यशाळा आयोजित करणे आदी.
श्री.अतीक अहमद (आयटीए महाराष्ट्र राज्य सचिव) म्हणाले, आपल्या सर्वांचा हा संयुक्त प्रयत्न काळाची गरज आहे आणि या शैक्षणिक जागरूकता मोहिमेचा भाग होण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र यायला हवे. आमच्या प्रयत्नांना मर्यादा न घालता आम्ही इतर शैक्षणिक आणि सामाजिक संस्था संघटनाच्या सहकार्याने काम करण्याचे प्रयत्न करू. -(आतील पान 7 वर)
ही मोहीम 15 जून ते 30 जून, 2021 या कालावधीत राज्यात आयोजित करण्यात येत असून यासंदर्भात विविध ऑनलाइन व ऑफलाइन कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. आम्ही अनेक कार्यक्रम तयार केले आहेत जे व्हॉट्सअॅप, फेसबूक व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे, शिक्षक विद्यार्थी पालक शैक्षणिक संस्था, शिक्षक संघटना, पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच लोकांकडून सूचना, सल्ले घेऊन आवश्यकतेप्रमाणे विचार केला जाईल.
या 15 दिवसीय शैक्षणिक जागृती अभियान चे संयोजक, नईम खान औरंगाबाद, अभियानाबाबत बोलताना म्हणाले, शैक्षणिक जागरूकता अभियान 10 जून 2021 रोजी उद्घाटन कार्यक्रमापासून सुरू होईल. ज्यामध्ये मुबारक कापडी (शिक्षणतज्ज्ञ) विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी आपले मत व्यक्त करतील. तथापि राज्य स्तरावर या जागरूकता मोहिमेचा कालावधी 15 ते 30 जून 2021 (पंधरा दिवस) असेल, उद्घाटनामध्ये सादर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा काटेकोरपणे पालन करण्यासंबंधी सर्व युनिट्सना सूचीत करण्यात येणार आहे.
Post a Comment