कोरोनाच्या महामारीने मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रभाव टाकल्याने देशाच्या ढासळत्या परिस्थितीमुळे सर्वांनाच चिंतेत टाकले आहे. नैतिकतेचा इतका फज्जा उडाला की, मृतदेहाना अग्नी देण्यासाठी लाकुडाची गरज वाढल्याने हिंदुत्ववादी विचारधारेने प्रेरित असलेल्या लाकडाच्या व्यापारींनी भरमसाठ किंमती वाढविल्या ज्यामुळे गरीबांकडे आपल्या प्रिय जनांच्या विधीवत अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसल्याने ते गंगेत वाहण्यावर विवश झाले. ज्यांना हे सुद्धा जमले नाही त्यांनी जमीनीत पुरवून त्यांच्यावर कपडा टाकला. उत्तर प्रदेश सरकारला हे सुद्धा आवडले नाही त्यांनी त्या मृतदेहांवरील कपडा काढून टाकला जेणेकरून लोकांच्या नजरेत दृश्य पडू नयेत. दुसरीकडे पांढरे वस्त्रधारी व्यापारी वर्गाने औषधांच्या किमती वारेमाप वाढविल्या ऑक्सीजनचा तुटवडा झाला तेव्हा औषधांसहीत ऑक्सीजनचा देखील काळाबाजार केला.
राजकारणी आणि राज्य करणाऱ्यांना कवडीमोल लाज वाटली नाही ज्यांनी नागरिकांच्या या बिकट परिस्थितीवर सहानुभूतीचा एक शब्द देखील उच्चारला नाही. न्याय व्यवस्थेने लोकांचा राग कमी करण्याच्या बाता मारल्या पण काही प्रभावी कार्यवाही करण्यास सरकार दरबारला थेट सुनावले नाही, कोणते शिक्षा सरकारला दिली नाही. माध्यमांनी आपले ’कर्तव्य’ पार पाडले. लोकांच्या अडीअडचणी मांडण्याचा नव्हे तर सरकारच्या या साऱ्या गैरवर्तनाकडून त्यांचे लक्ष दूसरीकडे वेधन्याचा. लसी उत्पादनांसाठी ज्या एकमेव कंपनीची देशाला अतोनात गरज होती अशावेळी अदार पुनावाल्यांना देश सोडून जावे लागले. कुणी त्यांना धमकावले हे समोर आले नाही. देशाच्या नागरिकांना लशी मिळू नयेत, लसीकरणावरून आम नागरिकांचे प्राण वाचवता यावे हे ज्यांना आवडत नाही म्हणजे मानवी जीवन उध्वस्त करणाऱ्या ज्या शक्ती देशात कार्यरत असतील अशा शक्तींचे हे कारस्थान असेल की काय याची चौकशी कधीतर व्हायलाच हवी. अशावेळी तरी संघांन दखल घ्यावी. कारण हिंदूंची तारणहार एकमेव आपण असल्याचा प्रचार आहे. त्यांनी बैठक घेतली अशा काळी मोहन भगवतांच्या मार्गदशर्नाखाली विचारमंथन झाले. या बैठीत कोणत्या समस्यांवर चर्चा झाली. सर्व नागरिकांच्या मते हे विचारमंथन कोरोनामुळे उत्पन्न झालेल्या परिस्थितीवर, लोकांच्या दयनीय समस्यांवर झाले असावे. नव्हे असे काहीच घडले नाही. त्यांना चिंता होती पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पदरी पडलेल्या दारून पराभवाची. पण यात आश्चर्यचकित होण्याचे कारण नाही त्यांना सत्ता हवी. लोकांनी त्यांच्या विषयी चुकीचा अंदाज बांधला तर यात यांची काय चूक.
ज्या दुसऱ्या मुद्यावर संघात विचारविनिमय झाला ते म्हणजे बंगालमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराचा, पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसेचा जुना एक इतिहास आहे. यात धर्माचा प्रश्नच नसतो. हिंदू-मुस्लिम दोघांना हिंसेचे बळी पडावे लागते. संघाने मात्र हिंदूवर अत्याचाराचा मुद्दा उचलून धरला तेच हिंदू जे कोरोनामुळे मारले जात होते आणि त्यांच्या साह्यासाठी संघांला एक पाऊल सुद्धा घराबाहेर टाकता आले नाही. जेव्हा केंद्रीय सुरक्षा बळाच्या पोलिसांना मुस्लिमांवर गोळीबार केला तेव्हा भाजपाने त्या ’’सुरक्षा कर्मींची’’ बाजू घेतली पण हे केंद्रीय सुरक्षाकर्मी निवडणुकानंतर परत जाणार हे त्यांनी विसरले होते, अशात जर राज्य पोलीस शासनाने गोळ्या घातल्या तर ते काय करतील याचा विचार त्यांनी केला नव्हता. त्यावेळी पोलीस कर्मी त्यांच्या इशाऱ्यावर काम करत होते पण आता ते ममता बॅनर्जी यांच्या हाताखाली आहेत. जेव्हा भाजपवाले दंगा करत आहे तेव्हा त्यांच्या कपडयांना पाहून त्यांची ओळख करू लागले.
संघासमोर बंगालच्या बाबतीत एक प्रश्न असा देखील आहे की तिथे वैचारिक युद्ध कोणत्या दिशेने चालेल. त्यांना ह्याचा विसर पडला की बंगालमध्ये वैचारिक संघर्ष नगण्य आहे. निवडणुकी अगोदरच भाजपानं तृणमुलच्या 50 नेत्यांना आपल्यात सामावून घेतले यात 30 आमदार होते. त्यांच्या विचारांत बदल घडून आला होता की त्या सर्वांनी सत्तेच्या लालसेने भाजपात प्रवेश केला होता? त्यांचे स्वप्न धुळीस मिळाल्यावर ते परत मायघरी परतण्याच्या तयारीत आहेत. हे तर सत्ताकारणातले घोडे आहेत. जिथं जास्त किंमत त्यांच्या मालकीत असणारे, संघाला चिंता आहे त्यांना रोखण्याची ज्यांची विचारधारा केवळ सत्ता असेल त्यांनी वैचारिक, नैतिक वगैरे असे कोणत्याही उपाधींचा विचार करू नये.
पश्चिम बंगाल नंतर या बैठकीचा मुद्दा उत्तर प्रदेश निवडणुकांचा आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पंचायत निवडणुकी. भाजपाला जो दणका बसलाय त्या चिंतेत संघ व्यस्त आहे. योेगीने संघाच्या नाकेत नऊ आणलेलं आहे. जर संघाला हिंमत असेल तर त्यांनी योगींची उचल बांगडी करूनच पहावे, याचे परिणाम काय लागतील याचा त्यांना अंदाज असेलच. आजवर योगींना हटवण्याचा निर्णय संघाने केला नाही. लाचारीनं योगींना सहन करावेच लागणार आहे आणि तसे केल्यास त्याचे काय परिणाम उमटतील हे संघाला माहित नाहीत. संघानं उत्तर प्रदेश निवडणुकांचा जो अभ्यास केला आहे त्यानुसार जर आताच विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपाला केवळ 25 जागांवरच समाधान मानावे लागणार आहे. आणि म्हणूनच मायावतींची साथ घेण्याचा विचार ते करत आहेत. याचा परिणाम ठाकूर जमातीच्या मतांवर होणार. योगीच्या कारभारामुळे उत्तर प्रदेशातील ब्राह्मण लोकांची नाराजी पत्करावी लागली आहे. ज्याची किंमत संघ परिवाराला भविष्यात मोजावी लागणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेन कहर केल्यानंतरही संघ परिवाराला हे समजत नाही की या भयंकर परिस्थितीला जबाबदार कोण आहे. याचं सोपं उत्तर असं की त्याने कोरोना महामारीला कधी महत्त्व दिले नाही. कारण यात राजकारण, निवडणुका वगैरे काही नव्हते लोकांचे प्राण जात होते ज्या लोकांशी त्यांचे काही देणे घेणेच नाही. पंतप्रधानांनी एकदम लॉकडाऊनची घोषणा केली. थाळी, टाळी वाजवायला साऱ्या राष्ट्राला सांगितले. लसीविना कोरोना नियमंत्रणात येईल, असा या शासनाचा विचार होता. म्हणूनच पंतप्रधान आणि गृहमंत्री बंगालच्या निवडणुका लावायला निघाले. संघानं यावर कोणताच आक्षेप घेतला नाही. सेवेसाठी मैदानात आले असते, गंगेत तरंगणारे शव आणि सडकांवर होत असलेले अंत्यविधींनेही त्यांच्यातला माणूस जागवला नाही. संघाला केंद्रीय मंत्री मंडळातील बदलावाचा भाजपाल कोणता फायदा होईल याचा विचार आहे. पण देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री लोकांच्या कल्याणासाठी कोणते पाऊल उचलताना दिसत नाही की इतरांना अशी कामे करू देत आहेत.
संघ परिवारातील भारतीय किसान युनियनने केंद्रीय सरकारविरूद्ध जे आंदोलन शेतकरी चालवत आहेत त्यास असफल करण्याचे शक्यतो प्रयत्न केले. पण त्याला यश मिळाले नाही. जानेवारी महिन्यात 5 तारखेला संघाची अहमदाबाद येथे एक मंथन शिबीर झाले होते. या बैठकीत भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि सचिव एल. सन्तोश सहभागी झाले होते. त्यांच्या व्यतिरिक्त 200 जणांच्या या बैठकीत अनेक केंद्रीय मंत्री सहभागी होते. या बैठकीत मंत्रीमंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला होता. या सर्व घडामोडीचा निष्कर्ष असा निघतो की संघाची वैचारिक पातळी खालावलेली आहे आपल्या विचारांत अंमलात आणणं त्याच्या अखत्यारित नाही.
- डॉ. सलीम खान
Post a Comment