जळगावची राहणारी 26 वर्षीय पायल तडवी हिने 22 मे रोजी स्वत:ला फाशी लावून आपली जीवनयात्रा संपविली. सकृतदर्शनी ही एक आत्महत्या आहे. परंतु, ही आत्महत्या नसून सामाजिक हत्या आहे. समाजातील तीन सवर्ण महिला डॉक्टरांनी ज्या तिच्या वरिष्ठ डॉक्टर होत्या. यांनी तिच्याशी केलेल्या भेदभावपूर्ण व्यवहारामुळे पायलने आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येस तिन्ही डॉक्टर जबाबदार असून, समाजातील उच नीचतेची भावना अजून संपलेली नाही, ह्याचे हे द्योतक आहे. असे म्हटले जाते की, भेदभाव ग्रामीण भागात असतो शहरामध्ये नसतो. परंतु, उच्च विद्याविभूषित मुंबई राहणार्या नायर हॉस्पिटलमध्ये रेसिडेंन्स डॉक्टर म्हणून काम करणार्या लोकांमध्ये सुद्धा भेदभावाची, उच्चनीचतेची मानसिकता ठासून भरलेली आहे, हे या घटनेवरून दिसून येते.
आदिवासी भिल्ल समाजातून येणार्या पायल तडवीने आपल्या कमी वयामध्ये अपार कष्ट करून एमबीबीएस पूर्ण केले होते. तिला एस.टी. कोट्यामधून एम.डी.साठी प्रवेश मिळाला म्हणून चिडून तिच्या सहकारी महिला डॉक्टर्सनी तिचा पावलोपावली अपमान केला. म्हणून रोहित वेमुलासारखे तिने स्वत:लाच जगातून संपविण्याचा निर्णय घेतला. हा व्यवस्थेने केलेला खून आहे. सामाजिक हत्या आहे. म्हणायला तिन्ही डॉक्टर्सना अटक झालेली आहे. परंतु, त्यांना शिक्षा होईल याची शक्यता कमीच आहे. कारण पोलिसांमध्येसुद्धा सांप्रदायिक भेदभाव राखणार्यांची संख्या कमी नाही. ते पायलला न्याय मिळवून देतील, याची शक्यता कमी आहे. अॅट्रॉसिटी अॅक्टखाली दाखल झालेले बहुतेक गुन्हे याच कारणामुळे सुटतात.

Post a Comment