राम पुनियानी
आपण एका अशा कालखंडातून जात आहोत ज्यात सामाजिक आणि घटनात्मक मुल्यांचे पुन्हा-पुन्हा उल्लंघन होत आहे. मागील काही वर्षांपासून दलितांवरील वाढलेले अत्याचार आणि गोरक्षेच्या नावाखाली अल्पसंख्यांकांच्या झुंडीकडून झालेल्या हत्यांच्या घटनांमुळे सगळा समाज हादरून गेला आहे. या सगळ्यामागे जातीय राजकारणामध्ये वाढ करण्याचा उद्देश आहे. हे संकीर्ण जातीय राजकारण धार्मिक ओळखीवर आधारित आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना जबरदस्त जनादेश मिळाल्याच्या कारणामुळे परिस्थिती आणखीन खराब होईल, या शंकेचा इन्कार केला जाऊ शकत नाही. सत्तेमध्ये परतल्यानंतर मोदींनी आपल्या भाषणात जे काही म्हटलेले आहे ते अत्यंत चिंताजनक आहे. त्या भाषणातून भविष्यात काय वाढून ठेवलेले आहे, याचे संकेतसुद्धा मिळालेले आहेत. मोदी म्हणाले, ”या निवडणुकांनी छद्म धर्मनिरपेक्षवाद्यांच्या खोट्या दाव्यांना उघडे पाडलेले आहे. ते आता पुन्हा देशाला भ्रमित करू शकणार नाहीत. या निकालांनी त्यांचा धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा टराटरा फाडला आहे. आणि हे दाखवून दिलेले आहे की, धर्मनिरपेक्षतेचे दूसरे नाव अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आहे.” ते पुढे म्हणाले की, ”धर्मनिरपेक्षतेचा दावा करणार्या पक्षांनी अल्पसंख्यांकांना धोका दिलेला आहे. त्यांच्यासोबत कपट केलेले आहे.” मोदींच्या या विधानाला विजयाच्या नशेत मस्त एका अतिउत्साही व्यक्तीने केलेले विधान समजून दुर्लक्ष करता येणार नाही. धर्मनिरपेक्षतेचा अंत हा जातीयवादी राजकारणाचे लक्ष्य राहिलेले आहे. हे सत्य आहे की, धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेच्या क्रियान्वयानामध्ये अनेक त्रुटी होत्या. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली शहाबानोच्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला पलटने आणि बाबरी मस्जिदीचे दरवाजे उघडणे सारख्या गंभीर चुका केल्या गेल्या. परंतु, असे म्हणणे की, अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण झालेले आहे, एकदम खोटे आहे. गोपालसिंग, रंगनाथ मिश्रा आणि सच्चर समितीच्या अहवालातून एक गोष्ट लक्षात येते की, देशातील मुस्लिमांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती फक्त खराबच नाही तर ती दिवसेंदिवस आणखीन खराब होत चाललेली आहे.
मुस्लिम समुदायातील काही कट्टरपंथी तत्वांचा जरी काही फायदा झाला असला तरी सर्वसाधारण मुसलमान आर्थिक दृष्टीने दयनीय अवस्थेमध्ये पोहोचलेला आहे. हा समाज स्वतःला असुरक्षित समजत आहे. आपल्याला या गोष्टीवर चिंतन करावे लागेल की, आपण आपल्या देशात धर्मनिरपेक्षतेच्या तत्वज्ञानाला जमिनीवर प्रत्यक्षात का लागू करू शकलो नाही.
धर्मनिरपेक्षतेच्या अनेक व्याख्या आहेत. भारतीय संदर्भात, ”सर्व धर्म समभाव” ही धर्मनिरपेक्षतेची सर्वात स्विकार्य व्याख्या आहे. सोबतच देशाचा धार्मिक विषयांमध्ये हस्तक्षेप न करणे आणि धर्माचा राज्यकारभारामध्ये कुठलाही हस्तक्षेप नसणे हा सुद्धा धर्मनिरपेक्षतेचा भाग आहे. धर्मनिरपेक्षता लोकशाहीचे मूळ अवयव आहे. दोघांना वेगळे केले जावू शकत नाही. या संदर्भात काही उदाहरणं दिली जावू शकतात. जेव्हा सोमनाथ मंदिराच्या पुनर्निमाणाची मागणी काही लोकांनी केली, तेव्हा गांधीजींनी म्हटले होते की, हिंदू समुदाय असे करण्यासाठी सक्षम आहे. त्यांचे शिष्य नेहरू त्यांच्याच दाखविलेल्या मार्गावर चालत राहिले. नेहरूंनी धरणे, कारखाने आणि विद्यापीठांना आधुनिक भारताचे मंदिर म्हणून संबोधले. गांधीजींनी धर्मनिरपेक्षतेची अत्यंत सारगर्भीत व्याख्या करतांना लिहिले होते की, ”धर्म आणि राष्ट्र वेगवेगळे असतील. मी आपल्या धर्मात विश्वास ठेवून त्यासाठी मी आपला जीवही ओवाळून टाकीन. परंतु, हा माझा व्यक्तिगत विषय आहे. राज्याचे याच्याशी काही देणेघेणे नाही. राज्य जनतेच्या भौतिक प्रगतीची देखरेख करील.”
सामाजिक विज्ञानाचे एक तज्ज्ञ लेखक राजीव भार्गव यांच्या मतानुसार, ”धर्मनिरपेक्षता केवळ भेदभाव, धार्मिक वर्चस्व आणि विकृती उदाहरणार्थ बहिष्कार, दमन आणि घृणा यांचा विरोध करते. एवढेच नव्हे तर ती प्रत्येक धार्मिक समुदायाच्या आतील (महिला, दलित आणि आपल्या विचाराशी सहमत नसलेल्या लोकांवरील) वर्चस्वाचाही विरोध करते. भारतात धर्मनिरपेक्षतेचा मार्ग सोपा नाही. ही अवधारणा इंग्रजांच्या काळात उदयास आलेल्या वर्गाच्या माध्यमातून आली. ही औद्योगिकरण, संचार, साधनांचा विकास आणि आधुनिक शिक्षणाच्या प्रसारासोबत अस्तित्वात आली. या वर्गांनी देशात होत असलेल्या समग्र परिवर्तनाला भारताच्या निर्मितीची प्रक्रिया म्हणून तिच्याकडे पाहिले. भगतसिंह, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीसारख्या महान लोकांनी धर्मनिरपेक्षतेला आपली राजकीय विचारधारा आणि एका सुदृढ समाजाच्या निर्माणाच्या संघर्षाचा आधार बनवला. हे लोक भारतीय राष्ट्रवादाचे समर्थक होते. या उलट अस्त होणारे समुदाय. उदा. राजे, रजवाडे आणि जमीनदारांनी या सामाजिक परिवर्तन आणि आपल्या वर्चस्वाच्या समाप्तीच्या संभावनेला घाबरून जातीय राजकारणाचा आधार घेतला. धार्मिक राजकारण पुढे चालून दोन धारांमध्ये विभाजित झाला. तो म्हणजे हिंदू जातीयता आणि मुस्लिम जातीयता. हे दोन्ही गट क्रमशः हिंदू राष्ट्र आणि मुस्लीम राष्ट्राच्या निर्मितीचे स्वप्न पाहू लागले. या संदर्भात प्रा. बिपिनचंद्र लिहितात जातीयता, धार्मिक समुदायांना राष्ट्राचा पर्याय मानते. भारतात जातीयतेच्या राक्षसाने आक्राळ विक्राळ रूप धारण केलेले आहे.जातीयवादी विचारधारेची अशी मान्यता आहे की, एका धार्मिक समुदायाच्या सर्व सदस्यांचे हित समान असतात आणि ते दुसर्या समुदायाच्या हितापेक्षा वेगळे असतात आणि म्हणूनच एक धार्मिक समुदाय दुसर्या धार्मिक समुदायाचा नैसर्गिक प्रतिद्वंद्वी असतो. जातीय राजकारणाचे समर्थक मानतात की, दूसरा समुदाय आपल्या समुदायासाठी संकट आहे. हे राजकारण धार्मिक समुदायांच्या आत उच्चनीचतेचा सुद्धा पडदा टाकते. शिवाय, जातीअंतर्गत आणि लैंगिक पदक्रम कायम ठेवू इच्छिते.
भारतात वाढते जातीय राजकारण धर्मनिरपेक्ष मुल्यांसाठी एक मोठे आव्हान आहे. पाकिस्तानात तर मुस्लिम जातीयवादी शक्ती अगदी सुरूवातीपासूनच मजबूत होती. भारतात मात्र ती मागच्या चार दशकात मजबूत झाली आहे. आणि यासाठी जातीय हिंसेतून जन्माला आलेले धार्मिक ध्रुवीकरण, राम मंदिर, लव जिहाद, घर वापसी आणि पवित्र गाय सारखे ओळखचिन्ह जातीयवादाला खतपाणी घालत आहेत. जातीयता देशाच्या धर्मनिरपेक्षतेवरील मोठे संकट आहे. हे संकट देशाला खर्या अर्थाने धर्मनिरपेक्ष बनू देत नाही. जातीयवादाच्या विघटनकारी राजकारणाला प्रोत्साहन देणारे मोठे कारण देशाच्या धर्मनिरपेक्षकरणाच्या प्रक्रियेला समाप्त न होवू देणे. धर्मनिरपेक्षता अशी एक प्रक्रिया आहे ज्यामुळे लोकशाही जसजशी वाढत जाते तेव्हा समाजातील पुरोहित आणि जमीनदार वर्गाच्या हातातील सत्ता आणि वर्चस्व समाप्त होत जाते.
भारतात इंग्रजांच्या शासनामुळे राष्ट्रीय आंदोलनात उर्जा म्हणून मुख्य स्वरूपात त्यांचा विरोध करण्यामध्ये खर्ची झाली. राजा आणि जमीनदार ज्यांच्यासोबत नंतरने उच्च मध्यम वर्गाचा एक भाग त्यात जोडला गेला. हे वर्ग पुढे पडद्यामागे गेले मात्र त्यांचा प्रभाव संपुष्टात आला नाही. हेच लोक पुढे चालून जातीयवादी राजकारणाचे ध्वजवाहक बनले. याच राजकारणाने शेवटी देशाचे विभाजन घडवून आणले आणि समाजात अनेक नकारात्मक प्रवृत्तीला जन्माला घातले. परंतु, एवढे निश्चित की, जातीयवादी शक्ती भारताच्या बहुलतावादी आणि विविध वर्णी चारित्र्याला कधीही संपुष्टात आणू शकणार नाहीत. त्यांचा पराभव निश्चितपणे होईल.
(या मूळ इंग्रजी लेखाचे हिंदी भाषांतर अमरिश हरदेनिया यांनी हिंदीतून मराठीत भाषांतर एम.आय. शेख, बशीर शेख यांनी केले.)

Post a Comment