डॉ.अलीम शेख यांचा गौरव : रूग्णाने केला अनोखा सत्कार
लातूर (सालार शेख)माणुसकीचे नाते प्रत्येकाने आपल्या मनात ठेउन गरजवंतांना सहकार्य केले तर नक्कीच मानवकल्याणाचे हित साधता येते. निःस्वार्थपणे केलेल्या सेवेचा मोबदला न मागता ईश्वराकडून मिळत असतो. याची प्रचिती 9 जून रोजी लातुरात आली.
लातूर येथील कव्हा नाका येथे डॉ. अलीम शेख (बीएएमएस) यांचे रोशन क्लिनिक आहे. डॉ. शेख हे प्रत्येक रूग्णास बरा करण्याचे अटोकाट प्रयत्न करतात. अशावेळी रूग्णांकडे पैसे नसले तरी ते उपचार करण्याचे सोडत नाहीत. माणुसकी जपणे त्यांच्यातील अंगभूत गुण. शहराच्या जवळच असलेल्या कव्हा येथील एका रूग्णास त्यांनी वर्षानुवर्षे विनामुल्य वैद्यकीय सेवा दिली. या रूग्णानेही डॉक्टरांचे ऋण फेडले पाहिजे, ही मनोभावना मनात ठेवून पैसे येताच ईद मुबारक म्हणत डॉक्टरच्या अख्या कुटुंबाला भरआहेर व डॉक्टरांना सोन्याची अंगठी केली़
कव्हा येथील सीताबाई सारगे यांची परिस्थिती जेमतेम होती़ त्यांनी आपल्या संधीवातावरील उपचारासाठी मोठ्या शहरात जाण्याचा सल्ला दिला जात होता़ अशावेळी लातूर शहरातील कव्हा नाका स्थित रोशन क्लिनिकचे डॉ़ अलीम इस्माईल शेख यांनी विनामुल्य एक दोन वेळा नव्हे तर वर्षानुवर्षे उपचार केले़ शेवटी त्या आजारातून बर्या झाल्या़ त्यांनी डॉक्टरांची आठवण ठेवली़ सीताबाई यांची जमीन शेततळ्यात गेली होती़ त्याचे पैसे येताच सीताबाईंनी ईदचे औचित्य साधून डॉक्टरांच्या कुटुंबाला भर आहेर करून सोन्याची अंगठी दिली़
यावेळी रूग्ण सीताबाई सारगे पुढे म्हणाल्या, मला मृत्यूच्या दाडेतून डॉ़ अलीम यांनी बाहेर काढले़ मी गंभीर आजारी असताना बर्याच डॉक्टरांकडे गेले़ मात्र त्यांनी माझ्यावर उपचार करण्याऐवजी सोलापूर, हैद्राबाद, मुंबई आदी ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला. आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती. माझे कुटुंब घाबरून गेले होते़ अशात डॉ़ अलीम शेख यांना दाखविण्याचा सल्ला मिळाला़ आम्ही त्यांच्याकडे गेलो़ त्यावेळेस त्यांनी आजार व त्यासंबंधीची संपूर्ण माहिती घरच्यांना दिली़ डॉ़ अलीम यांच्या उपचारामुळे मी बरे झाले़ आमची आर्थिक परिस्थिती हलाकीची होती़ कधी कधी उपचाराला पैसे नसायचे़ डॉ़ अलीम हे स्व:खर्चाने औषधी गोळ्या द्यायचे़ कधी त्यांनी पैशाअभावी उपचार करायचे सोडले नाही़ त्यांच्या सर्व कुटुंंबांनी माझी सेवा केली़ आज आजारपणातून बरे झाले आहे़ माझ्या कुटुंबाने डॉ़ अलीम शेख यांचा सहकुटुंब सत्कार करायचे ठरवले व आज सत्कार करून मला फार आनंद झाल्याचे सीताबाई सारगे म्हणाल्या़ यावेळी नगरसेवक अजित पाटील कव्हेकर म्हणाले, निस्वार्थ भावनेने केलेली सेवा सर्वकाळ लक्षात राहते़ डॉ़ शेख यांचा लौकिक मी ऐकून आहे़ आज रूग्णांची डॉक्टरांप्रती असलेले प्रेम पाहून फारच आनंद झाला़ या सत्कार सोहळ्याला नगरसेवक अजित पाटील कव्हेकर, नीळकंठ पवार, नेताजी मस्के, सालार शेख, मुलगा गोपाळ सारगे, मुलगी मंगल इर्ले, नदीम शेख, सद्दाम शेख, आबेद पठाण, शोएब शेख, इस्माईल शेखसह परिसरातील नागरिक उपस्थित होते़
Post a Comment