Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(११३) हे नबी (स.)! जर अल्लाहची कृपा तुमच्यावर नसती व त्याची दया तुमच्यासोबत नसती तर त्यांच्यातील एका गटाने तुमचा गैरसमज करण्याचा निश्चय केला होता. खरे पाहाता  वस्तुस्थिती अशी होती की ते स्वत: आपल्याव्यतिरिक्त इतर कोणाचा गैरसमज करीत नव्हते आणि तुमचे काही नुकसान करू शकत नव्हते.१४२ अल्लाहने तुमच्यावर ग्रंथ व विवेक  अवतरित केला आहे. आणि तुम्हाला ते सर्व काही ज्ञात करून दिले आहे जे तुम्हाला माहीत नव्हते, आणि त्याची कृपा तुम्हांवर मोठी आहे.
(११४) लोकांच्या गुप्त कानगोष्टींमध्ये बहुधा काहीही भले असत नाही, परंतु होय, जर कोणी दानधर्मासाठी गुप्तरित्या प्रवृत्त केले अथवा एखाद्या पुण्यकार्यासाठी अथवा लोकांच्या  व्यवहारात सुधारणा घडवून आणण्यासाठी एखाद्याला काही सांगितले तर अर्थातच ही चांगली गोष्ट आहे. आणि जो कोणी अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठी असे करील त्याला  आम्ही मोठा मोबदला प्रदान करू.
(११५) परंतु जो कोणी पैगंबराच्या विरोधात वंâबर कसेल आणि श्रद्धावंतांचे मार्गानुकरण करण्याऐवजी इतर मार्गाचे अनुसरण करील तेही अशा परिस्थितीत की त्याच्यावर सरळमार्ग  स्पष्ट झाला असेल तर त्याला आम्ही त्याच मार्गावर चालवू जिकडे तो स्वत: वळला१४३ आणि त्याला नरकामध्ये झोकू जे अत्यंत वाईट ठिकाण आहे.
(११६) अल्लाहजवळ फक्त१४४ अनेकेश्वरत्वासाठी क्षमा नाही. याखेरीज इतर सर्व काही माफ होऊ शकते, ज्याला तो माफ करू इच्छितो. ज्याने अल्लाहबरोबर इतर कोणाला भागीदार  केले तो तर मार्गभ्रष्टतेत फारच लांब भरकटत गेला.
(११७) ते अल्लाहला सोडून देवदेवतांना उपास्य बनवितात, ते त्या विद्रोही शैतानाला उपास्य बनवितात.१४५
(११८) की ज्याला अल्लाहने धिक्कारग्रस्त केले आहे. (ते त्या शैतानाची आज्ञा पाळत आहेत) ज्याने अल्लाहला सांगितले होते, ‘‘मी तुझ्या दासांकडून एक निश्चित वाटा घेऊनच  राहीन,१४६
(११९) मी त्यांना बहकवीन, मोहपाशात  अडकवीन व मी त्यांना आदेश देईन व ते माझ्या आज्ञेने जनावरांचे कान चिरतील.१४७ व मी त्यांना आज्ञा करीन व ते माझ्या आज्ञेने  अल्लाहच्या संरचनेत फेरबदल१४८ करतील.’’ त्या शैतानाला ज्याने अल्लाहऐवजी आपला वाली व पालक बनविला तो उघडपणे तोट्यात आला.
१४२) म्हणजे ते खोटे बोलून तुम्हाला भ्रमात पाडण्यात सफल झाले तरी आणि न्यायाविरुद्ध आपल्या बाजूने निर्णय प्राप्त् करून स्वत:चेच नुकसान करून घेतले असते. पैगंबर मुहम्मद  (स.) यांचे काहीच नुकसान झाले नसते कारण अल्लाहजवळ अपराधी ते लोक ठरले असते; पैगंबर मुहम्मद (स.) नव्हे. अधिकाऱ्याला धोका देऊन जो मनुष्य आपल्या बाजूने निर्णय  प्राप्त् करतो तो खरे तर स्वत:ला धोका देतो. त्याला वाटते की यामुळे सत्य आपल्या बाजूला झाले. अल्लाहजवळ सत्य ज्याचे आहे त्याचेच राहाते आणि न्यायालयीन अधिकाऱ्यांना  धोक्यात टाकून निर्णय लावण्याने वास्तविकतेवर काहीच प्रभाव पडत नाही. (पाहा सूरह २, टीप १९७)
१४३) वरील दाव्यामध्ये अल्लाहने जे मार्गदर्शन केले (दिव्य प्रकटन) त्या आधारावर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी विश्वासघात करणाऱ्या मुस्लिमाविरुद्ध आणि त्या निरपराध यहुदीच्या  बाजूने निर्णय दिला. तेव्हा त्या दांभिक मुस्लिमाला अज्ञानतेने असे घेरले की तो पैगंबर मुहम्मद (स.) व इस्लामला सोडून मदीना येथून निघून मक्का येथे गेला आणि विरोधकांशी  हातमिळवणी करून इस्लाम विरोधात उभा राहिला. या आयतमध्ये त्याच्या या कुकर्माकडे संकेत आहे.
१४४) या आयतीत उपरोक्त वार्ताक्रमाला सुरु ठेवून सांगितले गेले आहे की आपल्या अज्ञानतेच्या उन्मादात हा मनुष्य ज्या वाममार्गावर गेला आहे तो कसा मार्ग आहे आणि ज्या भल्या  लोकांचा सहवास सोडून त्याने ज्या लोकांचा सहवास मिळवला ते लोक कशाप्रकारचे आहेत?
१४५) शैतानाला तर या अर्थाने कोणीही उपास्य बनवित नाही. त्याची पूजाअर्चा केली जात नाही आणि त्याला अल्लाहचे स्थान दिले जात नाही. त्याला उपास्य बनविण्याची पद्धत म्हणजे  मनुष्य आपल्या मनाचा लगाम शैतानाच्या हातात देतो आणि शैतान जिकडे चालवितो तिकडे मनुष्य चालू लागतो. जणूकाही मनुष्य शैतानाचा दास आहे आणि शैतान त्याचा ईश्वर.  म्हणजेच कोणाच्या आदेशांचे विचार न करता केलेले पालन आणि त्याचे अंधानुकरण करणे म्हणजेच त्याची उपासना करणे आहे आणि जो मनुष्य अशाप्रकारचे आज्ञापालन करतो तो   खरेतर त्या माणसाची उपासना करतो ज्याला त्याने अल्लाहव्यतिरिक्त आपला स्वामी बनवून त्याची आज्ञाधारकता स्वीकारली आहे.
१४६) म्हणजे त्यांच्या वेळेत, त्यांच्या मेहनतीत आणि प्रयत्नात त्यांच्या सामथ्र्य आणि योग्यतेत, त्यांच्या संततीत आणि संपत्तीत आपला वाटा घेईन. आणि त्यांना धोका देऊन त्यांना या सर्व वस्तूंपैकी माझ्या मार्गात मोठा हिस्सा लावण्यासाठी मजबूर करील.
१४७) अरबांमध्ये प्रचलित अंधविश्वासांपैकी एकाकडे हा संकेत आहे त्यांच्याजवळ ही रूढी रूढ होती की जेव्हा उंटीण पाच किंवा दहा पिल्लांना जन्म देत असे तेव्हा तिचे कान फाडून  आपल्या आराध्य देवाच्या नावाने तिला सोडून देत असत. अशा वेळी त्या उंटिणीपासून काहीएक काम घेणे हराम समजले जात असे. त्याचप्रमाणे ज्या उंटाच्या वीर्यापासून दहा पिल्लं  होत असत, त्यालासुद्धा देवाच्या नावावर सोडून दिले जाई. कान फाडणे याची निशाणी होती की हे जनावर देवाला सोडलेले आहे.
१४८) `अल्लाहच्या संरचना' मध्ये परिवर्तन करण्याचा अर्थ वस्तूंच्या मौलिक संरचनेत परिवर्तन करणे नाही. जर याचा अर्थ हा घेतला तर पूर्ण मानवसभ्यताच शैतानाच्या अपहरणाचे  फळ समजले जाईल. कारण सभ्यता तर नाव त्या प्रयोगांचे आहे ज्यांना मानव अल्लाहनिर्मित वस्तूंमध्ये करीत असतो. वास्तविकपणे येथे ज्या परिवर्तनाला शैतानी कृत्य म्हटले गेले  आहे ते म्हणजे मानवाने वस्तूंपासून ते काम घ्यावे ज्याच्यासाठी अल्लाहने त्या वस्तूंची निर्मितीच केली नाही. तसेच काही वस्तूंपासून ते काम घेऊ नये की ज्याच्यासाठी त्या वस्तूंची   निर्मिती अल्लाहने केली आहे. दुसऱ्या शब्दांत ती सर्व कामे मनुष्य आपल्या व वस्तूंच्या स्वाभाविकतेविरुद्ध करतो आणि ते सर्व प्रकार जो मनुष्य निसर्गाविरुद्ध करतो, अशी ती सर्व  कामे मनुष्य शैतानाच्या मार्गभ्रष्टतेत ढकलणाऱ्या आंदोलनांचा परिणाम आहे. उदा. लूत यांच्या समाजातील लोकांची कुकृत्ये, बर्थकंट्रोल, संन्यास, ब्रह्मचर्य, पुरुष आणि स्त्रियांना वांझोटे  बनविणे, पुरुषांना हिजडे बनविणे, स्त्रियांना त्या सेवेपासून मुक्त करणे जी त्यांना निसर्गाने बहाल केलेली आहेत. स्त्रियांना त्या क्षेत्रात ढकलून आणणे ज्याच्यासाठी पुरुषांना निर्माण  केले आहे. हे आणि असे अनेक कर्मे शैतानाची चेलेमंडळी जगात करीत आहेत; वास्तविकपणे याचा हा अर्थ निघतो की हे लोक सृष्टीनिर्मात्या प्रभुच्या कायद्यांना चुकीचे ठरवून त्या  ईशआदेशात सुधारणा करू इच्छितात.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget