Halloween Costume ideas 2015

‘जमाअत-ए-इस्लामी हिंद सरकारला सर्वतोपरी सहकार्य करेल’

17व्या लोकसभेच्या निकालांची घोषणा झालेली आहे आणि नवीन सरकारने कार्यभार सांभाळलेला आहे. लोकशाहीमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी फक्त त्या लोकांचे नसतात ज्यांनी त्यांना मतदान केले, उलट ते सर्वांचेच प्रतिनिधी असतात. आम्ही नवीन खासदारांकडून अशी अपेक्षा करतो की, ते जात, धर्म आणि वर्ग यांच्या पलिकडे जावून भारताच्या प्रगती आणि विकासासाठी काम करतील. आपल्या घटनात्मक जबाबदारीला ते गंभीरपणे आणि प्रामाणिकपणे पूर्ण करतील. दुर्दैवाने निवडणुकांच्या प्रचारादरम्यान ज्या प्रकारची भाषा वापरली गेली, ज्या पद्धतीने फूट पाडण्याचा प्रयत्न केला गेला ते वाईट होते. आम्हाला आशा    
आहे की निवडणुका संपल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी विसरल्या जातील आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपल्या जबाबदारीची संवेदना लक्षात घेऊन आपले कर्तव्य बजावतील. देशातील गरीब आणि अल्पसंख्यांक यांच्या सुरक्षेची आणि विकासाची जबाबदारी या सरकारची आहे. सरकारनी आपल्या कृतीतून याबाबतीचा विश्‍वास निर्माण करावा की, त्यांचे अधिकार सुरक्षित आहेत, अशी अपेक्षा जमाअत-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांनी प्रसिद्धीपकाद्वारे नुकतीच व्यक्त केली आहे.
    ते पुढे म्हणतात, भारतासारख्या खंडप्राय देशात वेगवेगळ्या संस्कृती, देशाच्या एकात्मतेसाठी , राजकारण आणि प्रगतीसाठी आवश्यक आहेत. शासनकर्त्यांनी समाजाच्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालले पाहिजे. त्यांच्या विचारांचा सन्मान केला पाहिजे. त्यांच्या हिताचाही विचार केला पाहिजे. या क्षमता शासनकर्त्यांनी स्वत:मध्ये निर्माण कराव्यात. त्यांनी स्वत:ला कुठल्या विशिष्ट समाज घटकाचे प्रतिनिधी न मानता सगळ्या देशाचे प्रतिनिधी म्हणून काम करावे. आता दुसर्‍यांदा जेव्हा त्यांनी सत्ता सांभाळलेली आहे तेव्हा आता त्यांची ही जबाबदारी आहे की, एक जबाबदार पक्षाचे सदस्य म्हणून आपली प्रतीमा त्यांनी उंचावण्याची काळजी घ्यावी. ज्यावर देशातील सर्व समाज घटक, विशेषत: गरीब, वंचित आणि अल्पसंख्यांकसुद्धा विश्‍वास ठेवतील.
    देशात शांततेचे वातावरण निर्माण करणे, न्यायाची स्थापना करणे यासाठी जमाते इस्लामी हिंद तर्फे शक्य तेवढे सहकार्य सरकारला देण्याचे मी आश्‍वासन देतो. आम्ही विरोधी पक्षांच्या नेत्यांकडूनही अपेक्षा ठेवतो की, त्यांनी गंभीरपणे स्वत:चे आत्मपरीक्षण करावे. देशाची परिस्थिती त्यांच्याकडून अधिक गांभीर्याची अपेक्षा करते. राजकीय पुढार्‍यांनी आणि पक्षांतर्फे जाती-पातीचे राजकारण आणि त्यासाठी नियमांची पायमल्ली केल्याने देशाची हानी झालेली आहे. आम्ही देशातील सर्वसाधारण नागरिकांना सुद्धा अपील करतो की, शासनाकडून योग्य कामगिरी करून घेण्यासाठी ते सुद्धा आपली सार्थक भूमिका वठवतील. एक सुसंस्कृत आणि प्रगतीशील लोकशाही प्रधान समाजात राहण्यासाठी मतदारांची भूमिका मत दिल्यानंतर संपत नाही, तर सुरू होते. सर्वसाधारण नागरिक आणि नागरी समुहांची ही जबाबदारी आहे की, राज्यकर्त्यांच्या चुका वेळीच त्यांच्या लक्षात आणून द्याव्यात. शिवाय ही पण जबाबदारी त्यांच्यावर आहे की, देशात घटनेचे आणि कायद्याचे राज्य राहील याची खात्री करावी. लोकशाही संस्था आणि लोकशाही मुल्य सुरक्षित राहतील. तसेच सर्व समाजघटकांना न्याय मिळेल. आम्ही देशाच्या मुस्लिमांना आठवण करून देऊ इच्छितो की, त्यांची भूमिका खरे पाहता एक संदेश वाहकाची आहे. निवडणुकींच्या निकालांपेक्षा आमच्यासाठी लक्ष देण्यासारखा विषय समाजातील बदलणारी परिस्थिती आहे. ज्या प्रकारे समाजात इस्लाम आणि मुस्लिमांच्या विषयी गैरसमज वाढत आहे, त्यामुळे समाज दुभंगत आहे, त्याचे परिणाम निवडणुकांवरही झालेले आहेत आणि नुकत्याच अस्तित्वात आलेल्या सरकारवरही झालेले आहेत. त्यामुळे या परिस्थितीमध्ये आपण इस्लामचे खरे प्रतिनिधी बणून देशबांधवांच्या जवळ जावून त्यांची मनं जिंकायचा प्रयत्न करायला हवा. मोठ्या प्रमाणात इस्लामचा परिचय देशाला करून देण्याची आपली जबाबदारी आपण पूर्ण करायला हवी.
    आपल्याला आपल्या चारित्र्य आणि सामुहिक वर्तनाने इस्लामची साक्ष द्यावी. इस्लामी मुल्यांवर आधारित जडण-घडण आणि विकासाचा एक नमुना देशबांधवांसमोर ठेवण्यासाठी आपल्याला भरपूर योगदान द्यावे लागेल. शिवाय अल्लाहकडून ही अपेक्षाही ठेवली पाहिजे की, या परिस्थितीमधूनही तो चांगला मार्ग काढेल. कदाचित ही परिस्थिती आपल्या सर्वांना आपल्या जबाबदारीची आठवण करून देण्यासाठी आणि मुस्लिमांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी अल्लाहने घडवून आणली असेल. आज आपण जर का एक जबाबदार इस्लामचे प्रतिनिधी म्हणून स्वत:कडे पाहू. तर इन्शाअल्लाह निश्‍चितच ही परिस्थिती उज्ज्वल भविष्याची पूर्वपीठिका असू शकते, असेही ते म्हणाले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget