ये रूत्बा बुलंद मिला जिसको मिल गया
हर मुद्दई के वास्ते दार-ओ-रसन कहांसोमवार 17 जून, संध्याकाळी समाज माध्यमांवर अनाहुतपणे एक बातमी आली की इजिप्तचे माजी राष्ट्रपती मुहम्मद मुर्सी हे कोर्टामध्ये सुनावणीनंतर कोसळले व त्यातच त्यांचे निधन झाले. ही बातमी इतक्या वेगाने पसरली की प्रतिक्रियांचा जणू पाऊसच पडायला लागला. यामुळे अनेक लोकांना जे मुहम्मद मुर्सी यांना ओळखत नव्हते आश्चर्याचा धक्का बसला की कोण हे मुर्सी? ज्यांच्यासाठी एवढ्या प्रतिक्रिया येत आहेत? ते का एवढे लोकप्रिय होते? त्यांच्या निधनाची बातमी जागतिक स्तरावर का ट्रेंड करू लागली? याबद्दल जाणून घेणे उद्बोधक ठरेल. तर चला पाहूया कोण होते मुहम्मद मुर्सी?
मुहम्मद मुर्सी एक शांत, मनमिळावू व इस्लामी विद्वान होते. ते इस्लामी जगतामध्ये अत्यंत लोकप्रिय होते. त्यांच्या लोकप्रियतेला इजिप्तच्या सीमेमध्ये कैद करता येण्यासारखी स्थिती नव्हती. मुहम्मद मुर्सी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1951 रोजी इजिप्तच्या शर्किया नावाच्या गावात झाला. त्यांच्या पत्नीचे नाव नागला अली मोहम्मद आहे. त्यांना पाच मुलं आहेत. त्यांनी काहिरा विद्यापीठातून अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले होते आणि पीएच.डी. कॅलिफोर्निया विद्यापीठातून केली होती. पीएच.डी. झाल्यानंतर त्याच विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. नासाशीही ते संलग्न होते. 1985 साली ते मायदेशी परतले आणि शर्किया शहरातील एका विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रूजू झाले. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला व 2000 ते 2005 पर्यंत इजिप्तच्या संसदेमध्ये इस्लामी ब्रदरहूड या पक्षाचे प्रतिनिधीत्व केले. 2011 मध्ये त्यांच्या नेतृत्वात फ्रिडम अॅन्ड जस्टीस पार्टीची स्थापना झाली. जून 2012 मध्ये 51 टक्के मतं घेऊन ते इजिप्तचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी आपला मूळ पक्ष, मुस्लिम ब्रदरहूड आणि त्याची राजकीय शाखा जस्टीस पार्टी या दोन्ही पक्षांचा राजीनामा दिला. या मागे त्यांचा उद्देश्य हा होता की, जनतेला दाखवून द्यावे की राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यानंतर त्यांचा संबंध आता कुठल्या पक्षाशी नाही तर राष्ट्राशी आहे. 30 जून 2012 रोजी त्यांचा शपथविधी झाला. इजिप्तच्या इतिहासात ही पहिली घटना होती की, लोकांनी निवडलेला राष्ट्रपती सत्तारूढ झाला होता.
इस्लामप्रिय शासक
जब साजे सलासल बजते थे
हम अपने लहू में सजते थे
वो रीत अभी तक बाकी है
ये रस्म अभी तक जारी है
मुहम्मद मुर्सी हे इस्लामी शरिया पद्धतीने देशाचा कारभार करू इच्छित होते. ही बाब त्यांनी कधीही लपवून ठेवली नाही. उलट संयुक्त राष्ट्राच्या आम सभेमध्ये आपल्या भाषणातून त्यांनी आपल्या या भूमिकेचा स्पष्ट उच्चार केला. त्याच दिवशी ते अमेरिका आणि इजराईलच्या नजरेत आले. इजराईलच्या अत्याचाराने पीडित गाजामधील पॅलेस्टिनीयन नागरिकांशी ते उघड सहानुभूती ठेऊन होते. गाजामध्ये लोकातून निवडून आलेल्या मात्र इजराईल व अमेरिकेच्या लेखी आतंकवादी असलेल्या हमास या पॅलेस्टिनीयन संघटनेशी त्यांची जवळीक होती. हीच बाब इजराईलला स्वस्त बसू देत नव्हती. सत्तेत आल्या-आल्या त्यांनी इजिप्तची सीमा पॅलिस्टीनी नागरिकांसाठी खुली केली होती. ज्यामुळे पॅलिस्टीनी नागरिक विजा आणि पासपोर्ट शिवाय इजिप्तमध्ये येवून औषधी आणि जीवनावश्यक वस्तू घेऊन जात होते. त्यामुळे इजराईलने गाजाची केलेली कोंडी निष्प्रभ ठरण्याची भीती निर्माण झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली इजिप्त आणि पॅलेस्टीन दोन्ही दृढ होत असल्याचे पाहून इजराईल कमालीचा नाराज झाला. जेमतेम एक वर्षाचा कालावधी उलटला नाही तोच इजराईल, अमेरिका आणि सऊदी अरब यांनी इजिप्तचे लष्कर प्रमुख अब्दुल फतेह अल सीसी याच्या नेतृत्वाखाली मुर्सी विरोधकांना रसद पुरविण्यास सुरूवात केली आणि देशात अशांततेचे वातावरण निर्माण केले. 30 जून 2013 रोजी त्यांच्या शासनाला एक वर्ष पूर्ण होत असतांना त्याच दिवशी उठाव करून त्यांना पदच्युत करण्यात आले व 3 जुलै 2013 रोजी सैन्याने सत्ता काबीज केली आणि मुहम्मद मुर्सी आणि त्यांच्या साथीदारांना तुरूंगात डांबण्यात आले. 50 पेक्षा जास्त मुस्लिम ब्रदरहुडच्या नेत्यांच्या कत्तली करण्यात आल्या. मुहम्मद मुर्सींना सहानुभूती मिळेल या भीतीने जामेअ अजहर (काहिरा विद्यापीठा) ला सैन्याने ताब्यात घेतले आणि विद्यापीठाच्या प्रमुख मुफ्तीकडून जबरदस्तीने नवीन सत्ताधाऱ्यांच्या समर्थनार्थ फतवाही घेण्यात आला. मुहम्मद मुर्सीसह 12 प्रथम पंक्तीच्या इक्वानी नेत्यांवर जवळ-जवळ अर्धा डझन खटले दाखल करण्यात आले. हमासशी संबंध ठेवण्याच्या आरोपाखाली व त्यांच्या मदतीने इजिप्तमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केल्याच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 21 एप्रिल 2012 ला राष्ट्रप्रमुखांच्या निवासस्थानासमोर दंगा फैलावणाऱ्या मदत करण्याच्या आरोपाखाली 20 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय, तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न आणि इतर आरोपाखाली त्यांच्यावर खटल्यांची श्रृंखला सुरू करण्यात आली.
12 जून 2015 ला इजिप्तच्या सर्वोच्च न्यायालयाने मुर्सी यांना खालच्या न्यायालयाने दिलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. जरी मृत्यूदंड झाला असला तरी त्याची अमलबजावणी करण्याचे धाडस राष्ट्रपती अब्दुल फतेह अलसिसी याला करता आले नाही. त्यांना फाशी दिल्यास जनतेचा कधीही न शमणारा रोष सुरू होईल, या भितीने मुहम्मद मुर्सी यांना लागणारी औषधे बंद करण्यात आली. ज्यामुळे त्यांची प्रकृती औषधाअभावी दिवसेंदिवस खालावत गेली आणि 17 जूनला सुनावणीनंतर ते कोसळले ते पुन्हा उठलेच नाहीत. येणेप्रमाणे मुर्सी यांची शासनमान्य हत्या करण्यात आली. मुहम्मद मुर्सी यांनी तुरूंगामध्ये कुरआनची प्रत मागितली होती. त्यांना ती सुद्धा उपलब्ध करून दिली गेली नाही. ते स्वतः हाफिज-ए-कुरआन होते. त्यामुळे दिवसभर ते कुरआनचे पठण करत आपला कालकोठडीतला वेळ घालवत होते. त्यांना फक्त कुरआनच्या प्रतीला स्पर्श करण्याची इच्छा होती ती सुद्धा राष्ट्रपती सीसी यांनी पूर्ण होऊ दिली नाही. कुरआनला स्पर्श न करताच त्यांचे निधन झाले. निधनानंतर पत्नी, चार मुलं, दोन भाऊ आणि एक मौलवीला अंत्यविधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. त्यांच्या पत्नीला मुर्सी यांचा चेहरा पाहण्याची सुद्धा परवानगी नाकारण्यात आली. यावरून सरकार किती घाबरलेले होते याचा अंदाज वाचकांना होईल.
इक्वानुल मुस्लिमीन अर्थात मुस्लिम ब्रदरहुड
दो आलम से करती है बेगाना दिल को
अजब चीज है लज्जत-ए-आशनाई
शहादत है मतलूब-ओ-मक्सूद-ए-मोमीन न माल-
ए-गनीमत ना किश्वर कुशाई
इक्वानुलू मुस्लिमीन ही एक सुन्नी मुस्लिमांची जगातील सर्वात मोठी संघटना आहे, जिची स्थापना पेशाने शिक्षक असलेल्या हसन अल बन्ना यांनी मार्च 1928 साली इजिप्तमध्ये केली होती. सुरूवातील या संघटनेचे स्वरूप सामाजिक होते. गरीबांची मदत करणे, त्यांना स्वास्थ सुविधा पुरविणे, स्वस्त धान्याची दुकाने चालविणे, माफक दरात उत्कृष्ट शिक्षण देणाऱ्या शाळा- महाविद्यालय चालविणे, रक्तपेढ्या सुरू करणे, रूग्णवाहिका उपलब्ध करून देणे, माफक दरात इतर जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून देणे व ही सर्व कामे जी सरकारने करायला हवीत ती इक्वाननी केली. ही सर्व सेवा करत असतांना इक्वाननी इस्लामी नैतिकतेची कास कधीही सोडली नाही. त्यामुळे इजिप्तच नव्हे तर खाडीच्या इतर अरब देशांमध्ये सुद्धा मुस्लिम ब्रदरहुडची लोकप्रियता पाहता-पाहता वाढली.
मुस्लिम ब्रदरहुडचे संपूर्ण नाव ’ए सोसायटी ऑफ इस्लामिक ब्रदर्स’ असून, अरबी भाषेमध्ये याला ’अल-इक्वानुल - मुस्लिमीन’ म्हटले जाते. इजिप्तच्या इस्माईलिया शहरात मार्च 1928 मध्ये या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेचे मुख्यालय काहिरामध्ये असून मध्यपूर्वेच्या जवळ-जवळ सर्वच देशांमध्ये ही संघटना कार्यरत आहे. सुरूवातीच्या काळात वैयक्तिक व सामुहिक जीवनामध्ये इस्लामी नैतिकतेचे पालन करणे एवढाच मर्यादित उद्देश संघटनेचा होता. मात्र अल्पावधीतच मिळालेल्या लोकप्रियतेतूनच जनतेच्या दबावामुळे संघटनेने राजकीय स्वरूपधारण केले व इजिप्तची सत्ता हातात घेऊन शुद्ध इस्लामी तत्वांवर लोक कल्याणकारी शासन उपलब्ध करून देण्याचा प्रण केला. हा तो काळ होता ज्या काळात इजिप्तवर ब्रिटिशांची सत्ता होती. इक्वानचा ब्रिटिश आणि ज्यू लोकांना असलेला विरोध पाहता ब्रिटिश सरकारने इक्वानला प्रतिबंधित केले. मात्र प्रत्यक्षात या संघटनेचा स्वातंत्र्य लढा सुरूच राहिला. परिणामी, 1952 साली इंग्रजांना हा देश सोडावा लागला व देशाची सुत्रे गमाल अब्दुल नासर यांच्या हातात आली, तेव्हा इक्वानचा शरिया कायदा लागू करण्याचा दबाव सरकारवर वाढला. तेव्हा चिडून नासर यांनी फेब्रुवारी 1949 मध्ये गुप्तचरांमार्फत इक्वानचे संस्थापक हसन अल बन्ना यांची हत्या घडवून आणली. त्यानंतर 1954 मध्ये इक्वानी कार्यकर्त्यांकडून राष्ट्रपती नासर यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पुन्हा इक्वानवर प्रतिबंध लादण्यात आले व हजारो कार्यकर्त्यांची धरपकड झाली. तेव्हा इक्वानला भूमिगत व्हावे लागले. मात्र त्यांच्याच समर्थनाने अन्वर सादात यांनी 1970 साली राष्ट्रपती पद मिळविले. सातत्याने इस्लामी मुल्यांच्या पाठपुराव्यामुळे लवकरच इक्वान आणि सादात यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. सादात नंतर होस्नी मुबारक सत्तेत आले ते 2011 पर्यंत सत्तेत राहिले. त्यांनीही अमेरिका आणि इजराईलच्या कलाने तीन दशकांपेक्षा जास्त सत्ता भोगली. इजराईलच्या हिताचा प्रत्येक निर्णय मुबारक यांनी घेतला. त्यांच्या काळात ही इक्वानवर सातत्याने अत्याचार झाले.
2011 साली इजिप्तच्या ऐतिहासिक तहेरीर चौकात सुरू झालेल्या इक्वानप्रणित मुबारक हटाव आंदोलन, ज्याला अरब स्प्रिंगही म्हटले जाते ने जोर धरला. त्यामुळे होस्नी मुबारक यांना सत्ता सोडावी लागली व त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मुहम्मद मुर्सी निवडून आले. केवळ शुद्ध इस्लामवर आधारित सत्ता इजिप्तमध्ये टिकल्यास भांडवलशाही लोकशाहीला तो सशक्त पर्याय असल्याचे सत्य जगाच्या लक्षात येईल, या भितीतून मुर्सी यांची संस्थागत हत्या करण्यात आली. मात्र समाजमाध्यमातून जे वादळ उठले त्यावरून इक्वान ही आजही जगात लोकप्रिय मुस्लिम संघटना असल्याचे सत्य अधोरेखित झालेले आहे. मुहम्मद मुर्सी यांची गायबान-ए-नमाज-ए-जनाज़ा जगामध्ये इतक्या ठिकाणी अदा करण्यात आली की, त्याची तुलना 21 व्या शतकात आत्तापावेतो मृत्यू पावलेल्या कुठल्याही व्यक्तीशी करता येणार नाही. यातच सर्वकाही आले.

Post a Comment