Halloween Costume ideas 2015

अमेरिकेत फायरिंगमधे 19 विद्यार्थी, दोन शिक्षकांची हत्या

बंदुक लॉबीला रोखण्याचे आव्हान 


अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील एका शाळेत जिचे नाव रॉब एलिमेंट्री स्कूल असे आहे मध्ये घुसून 18 वर्षाच्या एका युवकाने ऑटोमेटिक गनने अंधाधूंद फायरिंग करून 19 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांची हत्या केली. सुरक्षा रक्षकांनी उत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो युवकही ठार झाला. गन शुटआऊटची ही पहिली घटना नाही. अमेरिकेत नियमितपणे अशा घटना होत असतात. आपल्यापर्यंत बातमी त्याच घटनांची पोहोचते ज्या घटनेत जास्त लोक ठार झालेले आहेत. अ‍ॅडम लांजा नावाच्या एका विद्यार्थ्याने कने्निटकटच्या एका शाळेत अंधाधूंद गोळीबार करून 26 विद्यार्थी आणि शिक्षकांना ठार केले होते. 2018 मध्ये फ्लोरिडाच्या एका महाविद्यालयात बेछूट गोळीबार करून निकोलस क्रूझ याने 17 लोकांचा जीव घेतला होता. या नियमित शूट आऊटसाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या (आतील पान 8 वर)

आहेत. एक ओपन गन पॉलिसी, दोन तणाव वाढविणारी जीवनशैली आणि तीन हिंसक व्हिडिओ गेम्स. 2018 मधील घटनेला जबाबदार असणारा निकोलस क्रूझ हा दैनंदिन 15 तास हिंसक व्हिडिओ गेम पाहत होता, असे पोलीस तपासात निष्पन्न झालेले आहे. अमेरिकेची मुक्त जीवनशैली, उध्वस्त कुटुंब व्यवस्था, अश्लिलते आणि लैंगिकतेचे थैमान या सर्वांमधून निर्माण होणारा तणाव हाच या शुटआऊटला कारणीभूत आहे. परंतु, अमेरिकन समाज एवढा सडलेला आहे आणि परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली आहे की, या कारणांचीामहिती असून सुद्धा ती कारणं आपल्यामधून दूर करता येत नाहीत. जपानच्या दौऱ्याहून परत आल्या-आल्या जो बायडन यांना ही वेदनादायक बातमी समजली आणि त्यांनी पुन्हा एकदा गन कल्चरच्या विरूद्ध कार्यवाही करण्याची ही योग्य वेळ असल्याचे जाहीर केले. परंतु, मजबूत गनलॉबीच्या विरोधात जाऊन ते काही करू शकतील, याची शक्यता कमीच आहे. 

या सर्व घटनांमध्ये एक महत्त्वाचा धागा समान आहे तो म्हणजे मोठ्या मॅगझीनच्या स्वयंचलित बंदुका हल्लेखोरांनी वापरलेल्या आहेत. अशा प्रकारच्या बंदुका फक्त पोलीस आणि मिलिट्री यांच्या उपयोगासाठी निर्माण केल्या जातात. परंतु, अशा घातक बंदुका अमेरिकेमध्ये येथील नागरिकांना बिना लायसेन्सच्या खरेदी करता येतात. त्यामुळे सहज उपलब्ध असलेल्या बंदुकीमधून प्रचंड मनुष्यहानी असते. एकदा तर परिस्थिती अशी झाली होती की, अफगानिस्तानच्या आतंकी हल्ल्यामध्ये जेवढे लोक ठार झाले होते त्यापेक्षा जास्त नागरिक अमेरिकेमध्ये एका वर्षात ठार झाले होते. गनलॉबीचे एक तत्व असे आहे की, गन नेव्हर किल मॅन, मॅन किल मॅन. म्हणजे बंदूक माणसाला मारत नसते तर माणसं माणसाला मारत असतात. 


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget