येवला येथे ईद मिलन
येवला (शकील शेख)
समाजामध्ये एकोपा वाढीसाठी सर्व धर्मियांनी एकत्र येण्याची गरज आहे. इस्लाम सर्वांना समान वागणूक देण्याची शिकवण देतो. रमजानमध्ये कुरआनचे अवतरण झाले असून कुरआन हा ग्रंथ सर्व मानवांसाठी मार्गदर्शन असल्याचे औरंगाबादचे ज्येष्ठ पत्रकार तथा इस्लाम धर्माचे अभ्यासक नौशाद उस्मान यांनी सांगितले.
येवला येथील मस्जिद अल फुरकान येथे जमाते इस्लामी हिंद शाखा येवला तर्फे गावातील सर्व जातीधर्मांच्या लोकांना एकत्र बोलावून ईद मिलन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषणात नौशाद उस्मान बोलत होते.
यावेळी अर्जुन कोकाटे सर, प्राध्यापक गमे सर, अजीज भाई शेख, वसंत घोडेराव, भाऊलाल खैरे, प्रकाश इंगळे, ज्येष्ठ पत्रकार सुनील गायकवाड, पोलीस उपनिरिक्षक खडान्ग्डे, रवींद्र करमासे, सचिन सोनवणे, ब्रह्माकुमारीच्या निता दीदी, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमास संबोधित केले. कार्यक्रमाची सुरूवात मौलाना इस्माइल नदवी यांनी कुरआनच्या वाचनाने केली व कार्यक्रमाची प्रस्तावना नाशिक जिल्हा अध्यक्ष जमाते इस्लामी हिंद फेरोज़ आज़्मी यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजहर शहा यांनी केले व आभार शकील शेख यांनी मानले.
Post a Comment