सैय्यद सआदतुल्लाह हुसैनी : फेडरेशन ऑफ मुस्लिम एज्युकेशनल इन्स्टीट्युशन्सचे दोन दिवसीय राष्ट्रीय शिबीर
नवी दिल्ली (सैयद तनवीर अहमद)
इस्लाममध्ये शिक्षणाला उच्च स्थान प्राप्त आहे. या दृष्टिकोणातून आपल्या शैक्षणिक संस्थाचे ध्येय व्यापक असले पाहिजे. इस्लामचे शैक्षणिक व्हिजन विश्व निर्माणाचे व्हिजन असून त्यास अनुरूप शिक्षण अपेक्षित आहे. भारतामध्ये शिक्षणासाठीचे जी संसाधने उपलब्ध आहेत त्यांचा अधिक विस्तार होणे गरजेचे आहे. अजूनही अशी काही गावे आहेत जेथील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचलेले नाही. आमची शैक्षणिक व्यवस्था ही स्मार्ट असावी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी. आपल्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांचा विस्तार वाढविण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्नशील आहोत परंतु, लक्ष यावरही देणे आवश्यक आहे की, आमच्या शैक्षणिक संस्थांचा दर्जा उच्च असला पाहिजे, अशी अपेक्षा जमाअते इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष सैयद सआदतुल्लाह हुसैनी यांनी व्यक्त केली.
ते फेडरेशन ऑफ मुस्लिम एज्युकेशनल इन्स्टीट्यूशन्स द्वारा नवी दिल्ली येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय शिबिरामध्ये बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आमच्या शैक्षणिक संस्थांचा स्तर सर्वांत उंच असला पाहिले आणि त्या दूरदर्शीही असल्या पाहिजेत. तसेच त्यांचा उद्देश्य टिकात्मक विचार, सृजनात्मक क्षमता, संवाद आणि उच्च चारित्र असावे. आम्हाला आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये असे प्रयोग करावे लागतील. असे प्रयोग काही नवीन नाहीयेत. जगातील अनेक शैक्षणिक संस्थांत होत आहेत.
फेडरेशनचे महासचिव आणि जमाअते इस्लामी हिंदचे केंद्रीय शैक्षणिक बोर्डाचे चेअरमन मुज्तबा फारूख यांनी फेडरेशनच्या स्थापनेचा आणि त्याच्या उद्देशावर प्रकाश टाकताना म्हटले की, 12 वर्षा अगोदर फेडरेशनची स्थापना झाली आणि आता याचे काम पूर्ण देशात विस्तारले आहे. फेडरेशनचा उद्देश देशातील शैक्षणिक संस्थांमधील समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांना कायदेशीर मदत आणि आवश्यक ती सहाय्यता प्रदान करण्याचा हेतू आहे. आमच्या जवळ जेवढी संसाधने उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग फक्त आणि फक्त शैक्षणिक कामासाठीच करण्यात यावा.
या शिबिरात विविध राज्यातील शैक्षणिक संस्थांधचे पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी विचार व्यक्त केले आणि अडचणी सांगितल्या. केंद्रीय शैक्षणिक बोर्डाचे निदेशक सैयद तनवीर अहमद यांनी अधिकाऱ्यांचे विचार आणि समस्या ऐकूण त्यावर समाधानकारक मार्ग सांगितला. ज्यामुळे अडचणी सोडविण्यात मोठी मदत होणार आहे. ते म्हणाले की, काही अडचणी व्यक्तिगत आहेत तर काही शाळा स्तरावरील आहेत तर काही सामुहिक आहेत. या समस्यांना सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने मार्ग काढला जाऊ शकतो आणि काहींना फेडरेशन सोडवू शकेल. त्यांनी म्हटले की, अधिकाऱ्यांनी ज्या समस्या मांडलेल्या आहेत त्यातील काही प्रशासनिक, अकॅडमिक आणि कायदेशीर व सामुदायिक व्यवहाराशी संबंधित आहेत. ज्यांचा निपटारा वैयक्तिकरित्या वारंवार संवाद प्रक्रिया वाढविल्यानंतर होवू शकतो. चार्टर्ड अकाऊंटंट वकारूल हक यांनी शाळेच्या अकाऊंटबद्दल आणि आर्थिक स्थितीशी संबंधित माहिती दिली.
अनुपम चौधरी यांनी अल्पसंख्यांक शाळा आणि शैक्षणिक सुविधांवर प्रकाश टकाला. डॉ. शुएब जिया खाँ यांनी ’प्रगती आणि प्राथमिक शिक्षा’ यावर विचार मांडले. प्राफेसर अख्तर सिद्दीकी यांनी राष्ट्रीय शिक्षा निती 2020 च्या संदर्भात मत व्यक्त केले. संमेलनाला न्या. के.डी. नकवी, सुश्री जिया फिरदौस यांनीही संबोधित केले. यावेळी शिक्षक, प्राध्यापक, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
Post a Comment