ज्ञानवापी मस्जिद असो की इतर कोणती मस्जिद किंवा स्मारके यांचा वाद चव्हाट्यावर न आणता स्थानिक पातळीवर परस्पर सामंजस्याने, चर्चेद्वारे संपवावा अशी भूमीका जमीअतुल उलेमा ए हिन्द ने घेतली आणि अर्थातच ती भारतातील साऱ्या मुस्लिमांसाठी आहे, ही भूमीका काही लोकांना पसंत पडली नाही. गेले 6-7 वर्षापासून एकानंतर दुसऱ्या वादात मुस्लिमांविरूद्ध मनाला येईल ते बोलण्यात येत आहे. तरी देखील मुस्लिमांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी एक प्रकारचे मौन बाळगले. मुस्लिमांच्या नरसंहाराची घोषणा केली गेली त्यावरही कुणी आक्षेप घेतला नाही आणि ही परिस्थिती भाजपाला समजली नाही, कसेही करून मुस्लिमांना रस्त्यावर आणायचा ठाम पवित्रा त्यांनी घेतला होता. काही प्रमाणात त्यांना यशही मिळाले. खरगोण, जहांगीरपुरी येथे ते आपल्या बचावासाठी बाहेर निघाले नंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली पण याचा फटका मुस्लिमांना बसला. त्यांच्या घरावर बुलडोजर चालविले गेले. अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून मुस्लिमांनी पुन्हा तीच भूमीका घेतली जी मौलाना महेमूद अहमद मदनी यांनी जमीअतच्या अधिवेशनावेळी जाहीर केली.
ज्ञानवापीचा वाद असो की इतर कोणत्याही मस्जिदीच्या वादात प्रेषितांना गोवण्याचा अर्थ काय? उघड- उघड हेच की त्यांनी रस्त्यावर याव आणि मग दंगे व्हावेत त्यानिमित्ताने त्यांच्या घरावर, व्यवसायांवर (उर्वरित पान 7 वर)
बुलडोझर फिरविले जावे आणि झाले तसेच कानपूरमधील लोकांना भाजप प्रव्नत्याच्या वक्तव्याचा निषेध करीत बंद पाळला. दगडफेक झाली पुढे काय होतय माहित नाही.
ज्यांनी प्रेषितांच्या खासगी जीवन चरित्रावर आक्षेप घेतला त्यांना जगातील इतर संस्कृती विषयीची माहिती नसणार आणि त्याच बरोबर प्रेषितांनी त्यांच्या हक्काधिकारांसाठी जो लढा दिला त्यावेळी इस्लामच्या शिकवणीचा प्रसार करताना याचीही त्यांना माहिती नाही. ज्या काळी मानव आणि दानव यात कोणता फरक उरला नव्हता त्या काळी प्रेषितांनी मानवजातीला सुसंस्कृत केले, त्यांचे नाते त्यांच्या निर्मात्याशी जोडले. नैतिक अधःपतन त्याकाळी शिगेला पोहोचले होते. मद्यपान, जुगार, व्याभिचार हेच त्यांच्या जगण्याची रीत होती. माणसालाच जगण्याचा अधिकार नव्हता. तेव्हा स्त्रीचे कोणते स्थान असेल? का स्थान नसेल याची फक्त कल्पनाही करता येत नाही. माणसाला ठार मारणे त्याच्यासाठी खेळ होता. चलता चलता एकमेकांत वाद झाला की त्याची परिणिती कुणाच्या तरी हत्येत होत होती आणि हा सिलसिला बदल्याच्या स्वरूपात वर्षानुवर्षे चालत असे.
आफ्रीकेतून काळ्या माणसाला जनावराप्रमाणे पकडून आणले जात असे आणि त्यांना विकायला बाजार भरवले जायचे. स्त्री म्हणजे भोगवस्तू अन्य काहीच नाही. इटलीच्या्नलोसियममध्ये एका समारोहाचे आयोजन करून तिथे उच्चभ्रू श्रीमंत अभिजनवर्गाला निमंत्रण देऊन बोलवले जात होते आणि त्यांच्या करमणुकीसाठी त्या ठिकाणी भुकेल्या सिहांसमोर काळ्या गुलामांना सोडून द्यायचे. सिहांनी त्यांना ठार करून फस्त केल्यावर सर्वत्र टाळ्याचा गजर व्हायचा. एक दोन नाही हजारो उदाहरणे तत्कालीन माणसांच्या पाश्वीवृत्तीचे देता येतील. अशा काळी अरबस्थानात प्रेषितांचा उदय होतो आणि ते माणुसकीचे रक्षक बणून समोर येतात. नापीक खडकाळ डोंगरांनी व्यापलेल्या वाळवंटातून अल्लाहने मानव जातीवर कृपा प्रसादाचा वर्षाव करीत प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांना उभे केले. त्यांनी मग एक सुंस्कृत समाज व सभ्यतेची सुरूवात केली. प्रेषितांनी आपल्या अंतिम प्रवचनात घोषणा केली की, अल्लाहने तुम्हाला एकच पुरूष आणि स्त्री पासून निर्माण केले आहे तेव्हा सारे मानव समान आहेत. कोणालाही कोणावर कसलीही श्रेष्ठता नाही की प्रभाव नाही. स्त्री पुरूषांचा समान दर्जा आहे. स्त्रीची स्वतःची सामाजिक, राजकीय आणि व्यावहारिक ओळख आहे. सारे मानव आदमची संतती आहेत. आदम यांना चिखलमातीतून निर्माण केले होते. काळ्या माणसाला गोऱ्या माणसावर किंवा गोऱ्या माणसाला काळ्या माणसावर कोणतीच श्रेष्ठता नाही. अज्ञान काळातील सर्व प्रतिष्ठा प्रेषितांनी आपल्या पायाखाली तुडविल्या. प्रेषित सल्ल. त्याकाळी ज्या काळी कायद्याच्या राज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती. घोषणा केली की, ’’एकानं केलेल्या अपराधापायी दुसऱ्याला जबाबदार धरले जाणार नाही. बापानं केेलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या मुलाला दिली जाणार नाही. कोणीही दुसऱ्यांच्या समस्यांच ओझं उचलणार नाही.’’
वास्तविकता अशी की या भुतलावर कोण असा दावा करू शकतो की त्याने न्याय्य आणि प्रामाणिक मानवी समाजाची स्थापना केली. तर ते केवळ प्रेषित मुहम्मद सल्ल. आहेत. मानवजातीला त्यांनी सन्मान प्राप्त करून दिला. प्रेषित मुहम्मद सल्ल. निसर्गाचा आत्मा आहेत. मानवतेने केवळ एकदाच एका निवडक व्यक्तीमत्वाला पाहिले आहे. पुन्हा त्यांना कुणी पाहू शकणार नाही. उच्चतम उद्दिष्ट, तोकडी संसाधन तरीपण अनन्य साधारण यश हे केवळ प्रेषितांनीच करून दाखवले आहे.
इतका रूत्बा असून देखील त्यांनी साधारण माणसाचं जीवन जगले आणि म्हणूनच त्यांच्या अनुयायांनी ज्यावेळी ते गरीबीत गुरफटले होते तेव्हा ही साथ दिली आणि ज्यावेळी अरब जग त्यांच्यासमोर नतमस्तक झाले तेव्हाही साथ दिली.
खेदाची बाब ही की आम्ही प्रेषित सल्ल. व त्यांच्या कार्याची यथोचित प्रसिद्धी करू शकलो नाही किंवा त्यांचा संदेश घरोघरी जावून पोहोचविला नाही. जर त्यांना समजलं असते तर कुणीही प्रेषितांविषयी अनादराचे उद्गार केले नसते. दोष आमचा आहे.
- सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment