समाज माध्यमांवर ज्या चित्रफिती फिरत आहेत त्या पाहता हे सर्व प्रकार एका व्यापक षडयंत्राचाच भाग असावा, असे समजण्यास जागा आहे. या सर्व घटनांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. जमाअते इस्लामी हिंदची अशी धारणा आहे की, प्रयागराजमधील प्रसिद्ध सामाजिक आणि मानवाधिकार कार्यकर्ते जावेद मुहम्मद यांच्याविरूद्ध केली गेलेली कारवाईसुद्धा सूडाच्याच्या राजकारणाचे उघड उदाहरण आहे.
नवी दिल्ली
10 जून रोजी झारखंडच्या रांची, उत्तरप्रदेशच्या प्रयागराज आणि देशातील इतर ठिकाणावर पैगंबर मुहम्म्द सल्ल. यांच्या अवमाननासंबंधी निघालेल्या मोर्चांवर क्रूर लाठीहल्ला आणि गोळीबार केला आणि ज्यात किमान दोघांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक जखमी झाले. अनेकांना अटक करण्यात आली. पैकी काही लोकांना कोठडीमध्ये बेदम मारहाण करण्यात आल्याच्या चित्रफिती पुढे आल्या आहेत. तसेच अनेकांची घरे जेसीबीनीे उध्वस्त करण्यात आली आहेत. जमाअते इस्लामी हिंद या सर्व बाबींचा निषेध करते व हे सर्व बेकायदेशीर कृत्य करणार्यांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करते. उध्वस्त केलेली घरे पुन्हा बांधून द्यावीत अशी सरकारकडे मागणी करते. या संबंधी खरोखर ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांच्या विरूद्ध कारवाई करण्याचीही मागणी करते.
गेल्या 10 जूनला अनेक ठिकाणच्या मुस्लिमांनी आपल्या लोकशाही अधिकारांचा वापर करीत प्रदर्शने केली होती. त्यात विशेष करून उत्तर प्रदेश आणि झारखंडच्या पोलिसांनी जो काय अत्याचार केला तो देशाच्या लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार होता.
या संदर्भात अमीरे जमाअत सआदतुल्लाह हुसैनी यांनी मुस्लिम समाजाकडे ही अपील केलेली आहे की, लोकांनी आपल्या संवैधानिक अधिकाराचा वापर करून प्रदर्शन जरूर करावे पण शांततेच्या मार्गाने. त्यांच्या शांतपणे सुरू असलेल्या प्रदर्शनाचे निमित्त साधून शांतताभंग करणार्या तत्वांपासून समाजाने सावध रहावे. त्यांनी प्रयागराजमधील मुहम्मद जावेद यांच्या घराला उध्वस्त करण्याच्या प्रशासनाच्या कारवाईवरही नाराजी व्यक्त केली. या संदर्भात ते म्हणाले की, ज्या घटनेची सभ्य समाजामध्ये कल्पनाही केला जावू शकत नाही अशी घटना प्रत्यक्ष प्रयागराजमध्ये घडलेली आहे. हे त्या ठिकाणी नागरी प्रशासन व पोलीस स्व:च गुन्हेगारी कृत्य करून कायदा भंग करत आहे. विषेश म्हणजे जे काही प्रशासन करत आहे ते उघडपणे करत आहे. कोणाच्या घराला फक्त याचसाठी उध्वस्त करणे की ते प्रदर्शन करत आहेत व ती प्रदर्शने सरकार आपल्या विरोधी आहे असा समज करून घेते व त्यातून अशी कारवाई होते हे चुकीचे आहे. अशा शांततापूर्ण प्रदर्शन करणार्यांना गोळ्या घालणे कुठल्याही सभ्य समाजामध्ये याची कल्पनाच केली जावू शकत नाही. हे बदल्याचे राजकारण वाटते. ते पुढे म्हणाले की, आम्ही या गोष्टींचा तीव्र शब्दात निषेध करतो. आमची अशी धारणा आहे की, प्रशासनाच्या अशा कृत्यामुळे देश आणि विदेशात आपल्या देशासंबंधी चुकीची प्रतीमा उभी राहत आहे. पोलिसांच्या अशा कृत्यामुळे समाजाच्या भावना आणखीन तीव्र होतील. त्यांच्यामध्ये बेचैनी वाढेल. अशामुळे त्यांचा प्रशासनावरील विश्वासही कमी होईल. उत्तर प्रदेश सरकारला कायद्याची थोडीजरी बूज असेल तर त्यांनी उध्वस्त घरांची नुकसानभरपाई द्यावी आणि यासाठी जबाबदार लोकांविरूद्ध कायदेशीर कारवाई करावी.
सआदतुल्लाह हुसैनी यांनी रांची मध्ये झालेल्या गोळीबाराची न्यायालयीन चौकशीचीही मागणी केली. ते पुढे म्हणाले की, प्रेषित सल्ल. यांच्या अपमानासाठी जबाबदार असणार्या लोकांवर वेळीच आणि योग्य कायदेशीर कारवाई केली गेली असती तर या सगळ्या अप्रिय घटना घडल्याच नसत्या. समाज माध्यमांवर ज्या चित्रफिती फिरत आहेत त्या पाहता हे सर्व प्रकार एका व्यापक षडयंत्राचाच भाग असावा, असे समजण्यास जागा आहे. या सर्व घटनांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. जमाअते इस्लामी हिंदची अशी धारणा आहे की, प्रयागराजमधील प्रसिद्ध सामाजिक आणि मानवाधिकार कार्यकर्ते जावेद मुहम्मद यांच्याविरूद्ध केली गेलेली कारवाईसुद्धा सूडाच्याच्या राजकारणाचे उघड उदाहरण आहे. जावेद मुहम्मद आणि त्यांच्या घरातील सदस्यांनी 10 जूनच्या प्रदर्शनामध्ये सहभागच घेतला नव्हता. शिवाय तोडण्यात आलेले घर जावेद मुहम्मद यांच्या मालकीचे नसून त्यांच्या पत्नीच्या मालकीचे होते. म्हणून हे घर तोडणे तसेही बेकायदेशीरच असल्याचेही ते म्हणाले असल्याची माहिती प्रेस नोटद्वारे जमाअते इस्लामी हिंद मीडिया विभागाचे सय्यद तन्वीर अहेमद यांनी दिली.
Post a Comment