जेव्हा सरकार आपली जबाबदारी समर्थपणे पेलण्यास काही कारणामुळे असमर्थ ठरत असेल तर अशा वेळेस समाजातील श्रीमंत लोकांनी पुढे येऊन बेरोजगारीला दूर करण्याचा प्रयत्न करावयास हवा. परंतु दुर्दैवाने याची जाणीव नसल्यामुळे अनेक श्रीमंत मुसलमान असे आहेत ज्यांची संपत्ती त्यांच्या वैयक्तिक जीवनात भरभराटी आणण्यापूर्तीच उपयोगात आणली जात आहे.
कॉलेज के सब बच्चे चुप हैं कागज की एक नाव लिए
चारों तरफ दरिया की सूरत फैली हुई बेकारी है
उर्दूमध्ये एक म्हण आहे, ’’कमाता बेटा और नांदती बेटी सबको अच्छे लगते हैं’’ एका विशिष्ट वयात आल्यानंतर प्रत्येक तरूणांकडून समाज कामधंद्याची अपेक्षा करतो. ती अपेक्षा पूर्ण न झाल्यास तरूणांवर घरातून आणि बाहेरून इतका दबाव वाढतो की, त्याची अंतिम परिणीती बेरोजगार तरूणांच्या आत्महत्येमध्ये होते. बीबीसीच्या 11 फेब्रुवारी 2022 च्या बातमीपत्रात असे म्हटलेले आहे (जे की आजही त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे) की, राज्यसभेमध्ये गृहमंत्री नित्यानंद रॉय यांनी बेरोजगारीच्या कारणावरून तरूणांच्या आत्महत्येची माहिती देताना सांगितले की, 2018 मध्ये 2741 तर 2019 मध्ये 2851 तर 2020 मध्ये 3548 बेरोजगार तरूणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. या आकडेवारीवरून या प्रश्नाच्या भीषणतेची कल्पना येण्यास हरकत नाही. कमावते वय झाल्यानंतर बेरोजगार राहिल्यानंतर अनेक समस्यांना तरूणांना तोंड द्यावे लागते. लग्न वेळेवर होत नाही, झाले तरी अनुरूप स्थळ मिळत नाही, लग्नानंतर खर्च वाढतो, त्यामुळे त्याचा अतिरिक्त दबाव निर्माण होतो, लग्न केले नाही तर अनेक मानसिक समस्या उत्पन्न होतात, शारीरिक गरजा पूर्ण होत नसल्यामुळे पाय घसरण्याचा संभव असतो, त्यातून समाजात अनैतिकता वाढते त्यामुळे समाज नासतो, अनेक तरूण मनोरूग्ण होऊन जातात, एकांतप्रिय होऊन जातात, परवडेल ते व्यसन करण्यास सुरूवात करतात. जे हे सर्व दबाव सहन करू शकत नाहीत ते शेवटी आत्महत्या करतात.
तलाशे रिज्क का ये मरहला अजीब है के हम
घरों से दूर भी घर के लिए बसे हुए हैं
उर्दूत दूसरी एक म्हण आहे की, ’’सबसे बडा गम रोजगार का गम होता है’’ बेरोजगार तरूणांची न घरात किमत असते न बाहेर. फाटलेला किसा व फाटलेले नशीब घेऊन कोट्यावधी बेरोजगार तरूणांचे तांडे आज देशात भटकत आहेत. नुकतीच एक बातमी अशीही येऊन गेलेली आहे की, लाखो तरूणांनी वैफल्यग्रस्त होऊन रोजगार शोधणेच बंद केलेले आहे. असे तरूण समाजविघातक कामात सहभागी होण्याची जास्त शक्यता असते. आज याचाच अनुभव देशात होणाऱ्या जातीय दंगली, समाज माध्यमातील सांप्रदायिक मजकूर आणि टीव्हीवरील प्रक्षोभक आणि अनावश्यक चर्चांमधून येत आहे. गुन्हेगारी वाढत आहे. त्यात तरूणांचा सहभाग वाढत आहे. बेरोजगारीमुळे एक नव्हे अनेक संकटांनी भारतीय समाज चारीही बाजूंनी वेढला गेलेला आहे.
बेरोजगारीची कारणे
1. समाजात गरीबी मोठ्या प्रमाणात व्याप्त असून गरीबांमध्ये शिक्षण घेण्याची जाणीव प्रगल्भ नसते. त्यामुळे अशिक्षित आणि कौशल्यविहीन तरूणांचे समूह तयार होतात. जे की बेरोजगार राहतात. आज देशात नेमके हेच होत आहे.
2. आरक्षण : आरक्षणामुळे अनेक तरूणांना पात्र असूनही नाईलाजाने बेरोजगार रहावे लागत आहे. त्यातल्या त्यात मुस्लिम तरूणांना या आरक्षणापासून जाणून बुजून काँग्रेसने वंंचित ठेवल्यामुळे बेरोजगार मुस्लिम तरूणांची संख्या बेसुमार वाढलेली आहे.
3. शैक्षणिक दर्जा : देशात पदवीधारी तरूणांची कमतरता नाही परंतु त्या पदवी अनुरूप त्यांची योग्यता नसल्यामुळे त्यांना काम मिळत नाहीये.
4. सरकारी उदासीनता : सर्वच सार्वजनिक क्षेत्रात आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये अघोषित नोकरकपातीच्या सरकारी धोरणामुळे सुद्धा बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
5. नवनवीन कल्पनांचा अभाव : आज जगामध्ये संकल्पना विकल्या जातात. स्व:च्या मालकीचे एकही चारचाकी वाहन नसतांना ’ओला’ आणि ’उबर’ लाखो चारचाकी गाड्या भाड्यावर देऊन कोट्यावधी रूपये कमवित आहेत, स्व:च्या मालकीचे एकही हॉटेल नसतांना ’ओयो’ विविध शहरातील हजारो हॉटेलमधील लाखो खोल्या भाड्याने देऊन कोट्यावधींची कमाई करत आहे, स्व:चे कुठलेही उत्पादन नसतांना अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्या लाखो उत्पादने कोट्यावधी लोकांना विकून अब्जावधी रूपयांची उलाढाल करत आहेत आणि आपले भारतीय तरूण हॉटेल, पानपट्टी, किराणा दुकानच्या पलिकडे विचार करू शकत नाहीत. हे वैचारिक दारिद्रय भारतीय तरूणांना, त्यातल्या त्यात मुस्लिम तरूणांना बेरोजगार ठेवण्यामध्ये मोठी भूमीका अदा करत आहे.
6. मोबाईल फोन : बापाच्या कमाईतून आईला इमोशनल ब्लॅकमेल करून घेतलेल्या स्मार्टफोनमधील अनावश्यक व्यस्ततेमुळे अनेक तरूण आज बेरोजगार झालेले आहेत.
उपाय
असलम बडे वकार से डिग्री वसूल की
और उसके बाद शहर में ख्वांचा लगा लिया
वर दिलेली पाच कारणे व अशाच अनेक कारणांमुळे भारतीय तरूण विशेष: मुस्लिम तरूण मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. मुस्लिमेत्तर तरूणांची थोडीफार तरी काळजी सरकार आणि त्यांच्या समाजातील श्रीमंत लोक घेत असतांना दिसून येतात. परंतु पावलोपावली होत असलेल्या अघोषित भेदभाव व घोषित आर्थिक बहिष्काराच्या आव्हानांमुळे मुस्लिम तरूणांच्या बेरोजगारीची समस्या अधिक तीव्र झालेली आहे. जेव्हा सरकार आपली जबाबदारी समर्थपणे पेलण्यास काही कारणामुळे असमर्थ ठरत असेल तर अशा वेळेस समाजातील श्रीमंत लोकांनी पुढे येऊन बेरोजगारीला दूर करण्याचा प्रयत्न करावयास हवा. परंतु दुर्दैवाने याची जाणीव नसल्यामुळे अनेक श्रीमंत मुसलमान असे आहेत ज्यांची संपत्ती त्यांच्या वैयक्तिक जीवनात भरभराटी आणण्यापूर्तीच उपयोगात आणली जात आहे.
वास्तविक पाहता छोटे-छोटे व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवणारे खाजगी सरकारमान्य किंवा बिगरसरकार मान्य आयटीआय आणि पॉलिटे्निनकच्या संस्थांचे जाळे देशाच्या प्रत्येक शहरात सहज विनता येऊ शकते. ज्यामुळे कारपेंटर, वेल्डर ते बिल्डर तरूण तयार होऊन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून बेरोजगारीच्या मगरमिठीतून सहज बाहेर पडू शकतात.
तालीम, तरबियत और तिजारत
शिक्षणामुळे माणसाची बुद्धी प्रगल्भ होते, विचार करण्याची क्षमता वाढते. म्हणून मिळेल त्या माध्यमातून व शाखांमधून प्रत्येक मुस्लिम व बिगर मुस्लिम तरूणाने किमान पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याचे लक्ष्य समोर ठेवायला हवे. पालकांनी आपली मुलं किमान पदवीपर्यंत शिक्षण घेतील यासाठी आपले सर्वस्व पणाला लावायला हवे. या मिळालेल्या तालीम सोबत मुस्लिम तरूणांची दीनी तर्बियत म्हणजे इस्लामी शिक्षण सुद्धा पदवीबरोबर पूर्ण व्हायला हवे. ज्यामुळे मुस्लिम तरूणांच्या व्यक्तिमत्वाचा संतुलित विकास होईल. आज भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आपल्या इच्छेप्रमाणे जगण्याची एक फॅशन सुरू झालेली आहे, जी की अत्यंत चुकीची आहे. जीवन जगण्याची खरी पद्धती कोणती? याबाबतीत आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त प्रसिद्ध विचारवंत अबुल आला मौदुदी यांचे विचार खालीलप्रमाणे,
’’जहालत का लफ्ज़ इस्लाम के मुकाबले में इस्तेमाल किया जाता है. इस्लाम का तरिक़ा सरासर इल्म है. क्यों की इसकी तरफ अल्लाह ने रहनुमाई की है जो तमाम हक़ायक का इल्म रखता है. और इसके बरअक्स हर वो तरीका जो इस्लाम से मुख्तलिफ है जहालियत का तरीका है. अरब मे जमाना-ए-कब्ल-ए- इस्लाम को जाहालत का दौर इसी माने में कहा गया है के इस जमाने में इल्मके बगैर महज़ वहम या कयास व गुमान या ख्वाहिशों की बुनियाद पर इंसान ने अपने लिए जिंदगी के तरीके मुकर्रर कर लिए थे. ये तर्ज-ए-अमल जहां जिस दौर में भी इंसान इख़्तियार करेंगे उसे बहर- हाल जिहालत ही कहा जाएगा. स्कूल और यूनिवर्सिटी में जो कुछ पढ़ाया जाता है वह महेज़ एक जुज़्वी इल्म (इल्मका एक ख़लिल हिस्सा) है और किसी माने में भी इंसान की रहनुमाई के लिए काफी नहीं है. लिहाज़ा अल्लाह के दिए हुए इल्म से बेनियाज़ होकर जो निजाम-ए-जिंदगी इस जुज़्वी इल्म के साथ अवहाम, कयास और ख़्वाहिशात की आमेज़िश करके बना लिये गये हैं वो भी इसी तरह की ’जाहिलियत’ की तारीफ में आते हैं, जिस तरह कदीम जमाने की जाहिलीयत की तारीफ में आते हैं.’’ (तफहिमुल कुरआन).
अनेक लोक संपत्ती असूनसुद्धा जीवन जगण्याची खरी पद्धत माहित नसल्यामुळे जीवनात अपयशी होतात व अकाली मृत्यू पावतात. चित्रपट, संगीत सृष्टीतील अनेक सालस तरूण अकाली हृदयघात होऊन किंवा आत्महत्या करून मरत आहेत, ते यामुळेच. त्यांच्याकडे रोजगाराची किंवा पैशाची चणचण नाही फक्त त्यांना जीवन जगण्याची खरी पद्धत माहित नाही, म्हणून त्यांच्यावर अकाली जीवन संपविण्याची वेळ आलेली आहे. जीवन जगण्याची खरी पद्धत इस्लामी पद्धत आहे. या पद्धतीविरूद्ध जावून जे जगतील त्यांचे जीवन या लोकातही आणि परलोकातही यशस्वी ठरणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. इस्लाम विषयी असलेल्या पूर्वग्रहामुळे अनेक लोक या कल्याणकारी जीवन व्यवस्थेचा लाभ उठवू शकत नाहीत, हे इस्लामचे नव्हे तर त्यांचे दुर्दैव आहे.
येणेप्रमाणे भौतिक शिक्षण (तालीम) इस्लामिक प्रशिक्षण (तरबियत) घेतल्यानंतर तिजारत (व्यापार) हे तीसरे उद्देश्य तरूणांनी आणि त्यांच्या पालकांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवायला हवे. आज व्यापारातूनच चीन जागतिक महासत्ता झालेला आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटलेले आहे की, ’’ व्यापारात गुंतून रहा कारण नऊ दशांश (90) टक्के उदरनिर्वाह त्यातून मिळतो.’’ (संदर्भ : कंजुल आमाला, हदीस क्र. 9342).
येथे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी निसर्गाचा एक नियम उलगडून दाखविलेला आहे तो म्हणजे, ईश्वराच्या निर्मिती योजनेनुसार उदरनिर्वाहाचा सर्वात मोठा वाटा ईश्वराने व्यापारात ठेवलेला आहे. ही गोष्ट प्रत्येक माणसासाठी आशेचा एक खजीना आहे. (संदर्भ : युथ विंग, लातूर) जर एखाद्या माणसाला नोकरी मिळत नसेल किंवा त्याला वारसाहक्क मिळत नसेल किंवा इतर स्त्रोताकडून काहीही मिळण्याची शक्यता नसेल तरीही त्याने स्व:चा व्यावसाय सुरू करावा. त्या व्यावसायातून अर्थात व्यापारातून मोठी संपत्ती मिळण्याची शक्यता असते. आज अनेक असे व्यवसाय आहेत ज्यामुळे बिना भांडवली व्यापार करून मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावता येते. त्याचा तपशील या ठिकाणी सांगणे शक्य नाही. पूर्वी भारतात एक म्हण प्रसिद्ध होती, ’’उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी.’’ आज ही म्हण नेमकी उलट झालेली आहे. भ्रष्टाचाराची मोठी संधी असल्यामुळे उत्तम नोकरी, जोखीम असल्यामुळे मध्यम व्यापार आणि मातीत भ्रष्टाचार करणे शक्य नसल्यामुळे कनिष्ठ शेती अशी एकंदरित परिस्थिती निर्माण झालेली आहे.
तरूणांनी त्यांना मिळणारी रोजगाराची पहिली संधी कधीच सोडू नये. काय माहित दुसरी संधी मिळणार सुद्धा नाही? नोकरीची संधी मिळत असेल तर ठीक नसेल तर केवळ नोकरीवरच विसंबून राहून आयुष्याची राखरांगोळी करून घेण्यात, व्यसनाधिन होऊन निरूद्देश जीवन जगण्यात काही हाशिल नाही. स्व:च्या मनगटाच्या बळावर व्यापार करून आयुष्याला संधी दिल्यास व नेकीने व्यापार केल्यास ईश्वराची मदत आल्याशिवाय राहणार नाही. याचा किमान मला तरी तेवढाच विश्वास आहे जेवढा विश्वास या गोष्टीवर आहे की सूर्य प्रकाश देतो.
शेवटी जमाअते इस्लामी हिंदचे अध्यक्ष सआदतुल्लाह हुसैनी यांची संकल्पना स्पष्ट करून सदरचे लेखन थांबवितो. त्यांनी एक अशी संकल्पना मांडलेली आहे, जिचा मतीतार्थ असा की, प्रत्येक समाजाच्या जीवन प्रवाहामध्ये उतार आणि चढाव येतच असतात. उतारास लागलेल्या समाजामध्ये तीन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू शकतात.
1. तो समाज पराभवामुळे खचून जाऊ शकतो.
2. त्या समाजातील तरूण प्रतिक्रियावादी होऊन हिंसक होऊ शकतात.
3. त्या समाजातील लोक परिस्थितीचे योग्य आकलन करून आपल्या वर्तनामध्ये थोडीशी लवचिकता निर्माण करून स्व:ला त्या विशिष्ट परिस्थितीतून सुद्धा ज्या संधी ईश्वराने लपवून ठेवलेल्या आहेत त्यांचा शोध घेऊन स्व:ला त्या अनुरूप करून पुन्हा यश प्राप्त करू शकतात. मुस्लिम समाज कुरआन आणि प्रेषितांच्या चरित्राचा अभ्यास करून आजच्या कठीण परिस्थितीत सुद्धा पराभूत मानसिकतेमध्ये न जाता यश प्राप्त करू शकतात व सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांनी दिलेल्या तीसऱ्या पर्यायाप्रमाणे पुन्हा उत्कर्ष प्राप्त करू शकतात. कारण प्रेषित सल्ल. यांच्या समोर जेवढ्या कठीण अडचणी आणि आव्हाने होती तेवढी आज आपल्यासमोर नाहीत. म्हणून प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे चरित्र प्रत्येक मुस्लिम व्यक्तिसाठी मोटीव्हेशन (प्रेरणेचे स्त्रोत) ठरू शकते. यापेक्षा प्रभावशाली प्रेरणेचे दूसरे स्त्रोत जगात अस्तित्वात नाही. याची खात्री प्रत्येक मुस्लिम तरूणाने बाळगावी व भौतिक शिक्षण आणि नैतिक (इस्लामिक) शिक्षणातून स्व:चा संतुलित विकास साधून मिळेल तो रोजगार प्राप्त करावा आणि देशाच्या उन्नतीमध्ये आपला वाटा उचलावा. जय हिंद !
Post a Comment