Halloween Costume ideas 2015

आपली गल्ली हिरवीगार

आपली गल्ली हिरवीगार हे ब्रीदवाक्य घेऊन मागील दोन महिने झटणाऱ्या भोईगल्ली, लक्ष्मीपूरी, कोल्हापूर येथील शाळकरी मुलांनी आपली गल्ली हिरवीगार करण्यासाठी कंबर कसली आहे. यंदा लॉकडाऊन मुळे शाळेच्या वार्षिक परीक्षा रद्द झाल्या. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना ना अभ्यासाचा तणाव, ना परीक्षेची कटकट!

त्यामुळे घरोघरी असलेले चित्र भोईगल्लीत देखील दिसत होते. शाळकरी मुलांचा वेळ मोबाईल फोन मध्ये गेम्स खेळण्यात खर्च होत होता. अभियंता असलेल्या प्रसाद स्नेहा भोपळे या युवकाच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. मुलांना मोबाईलच्या विळख्यातून बाहेर काढायचं आणि त्यांची सुटी सार्थकी लावायची असा त्याने निश्चय केला. भोईगल्लीतील ९ ते १६ वयोगटातील मुलांना त्याने एकत्र केले आणि आपल्या गल्लीत वृक्षारोपण व संगोपन करण्याचा मानस केला. वृक्षारोपण करायचे म्हटले तर ते सुटसुटीत आणि रहदारीस अडथळा होणार नाही हे महत्वाचं होतं. त्यासाठी बॅरेलमध्ये रोपटी लावायची कल्पना या लहानग्यांनी कोल्हापूर शहराच्या महापौर सौ. निलोफर आजरेकर मॅडम यांना बोलून दाखवली. आपल्या प्रभागातील लहान मुले इतका छान विचार घेऊन आली आहेत म्हटल्यावर त्यांनी सुद्धा आपल्यापरीने या मुलांना सर्वतोपरी मदत केली. आता ज्यांच्या दारात झाडे लावायची आहेत त्यांच्याकडून परवानगी घेणे व झाडांच्या संगोपनासाठी सहकार्य मिळवणे हे ही काम या लहानग्यांनी फत्ते केले. प्रत्यक्ष रोप लावण्याकामी वृक्षप्रेमी संघटनेचे अमोल बुढ्ढे, अक्षय कांबळे, अमित यादव यांनी मोलाचे सहकार्य केले. रोपांची निवड करण्याकरिता झाडकाका प्रतिक बावडेकर यांनी मार्गदर्शन केले. मा. महापौरांच्या सहकार्याने या लहान मुलांना झाडे लावण्याकरिता बॅरेल आणि माती उपलब्ध करुन देण्यात आली. या सर्व गोष्टींची जमवाजमव करण्यासाठी व या छोट्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी श्रीमती स्नेहा भोपळे मॅडम, श्री. चेतन शिंदे, विशाल पाटील, संतोश कुईगडे, योगेश खराडे, दिग्विजय चौगले, हेमंत यादव, समर्थ भोसले, शुभम सातपुते यांनी कोणतीच कसर ठेवली नाही.


आज रविवार दि. ७ जून २०२० रोजी माननीय महापौर मॅडम यांच्या हस्ते व गल्लीतील नागरिकांच्या उपस्थितीत हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. ज्या लहानग्यांच्या संकल्पनेतून आणि कष्टातून हा उपक्रम पार पडला त्यांची नावे पुढीलप्रमाणे

१) सौरिष निवास शिंदे (वय १६ वर्षे)
२) हर्षवर्धन किरण बोडके (वय १५ वर्षे)
३) हर्षवर्धन गणेश भोसले (वय १४ वर्षे)
४) शिवराज गणेश भोसले (वय १२ वर्षे)
५) वेंकटेश शेखर यादव (१७ वर्षे)
६) सर्वेश संदीप जाधव (वय ११ वर्षे)
७) ईश्वर रविंद्र वाघमारे (वय ११ वर्षे)

शब्दांकन - संतोष कुईगडे
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget