कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉईड याची पोलिसांनी कस्टडीत क्रूर हत्या केल्याच्या निषेधार्थ अमेरिकेत सुरू असलेला हिंसाचार काही थांबण्याचे नाव घेत नाही. मागील आठ दिवसांपासून सुरू असलेला हा हिंसाचार रोखण्यासाठी अमेरिकेतील 24 राज्यात 17 हजार सुरक्षा सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
फ्लॉईड यांच्या हत्येच्या निषेधार्थ अमेरिकेतील 24 राज्यात हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. जाळपोळ, लूटमार, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड असे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण हजारो सशस्त्र सैनिक, लष्करी जवान आणि पोलीस पाठवून दंगल, लूटमार, गुंडगिरी, हल्ले, मालमत्तेची हानी हे प्रकार रोखू असे म्हटले होते. त्यानंतर काल या 24 राज्यात 17 हजार सैनिक रस्त्यावर उतरवण्यात आले आहेत.
मिनियापोलीस येथे गेल्या आठवडय़ात जॉर्ज फ्लॉईड या आफ्रिकन अमेरिकी व्यक्तीचा श्वेतवर्णीय अधिकाऱ्याने गुडघा मानेवर दाबून घुसमटवल्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे अमेरिकेत हिंसाचार उसळला आहे.
Post a Comment